Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अर्पिते मी तुला ,जे तुला हवे ते.

अ — अविनाशकुलकर्णी, गुरुवार, 08/25/2016 - 15:09
दिसलास तू, उमले यौवन हसलास तू, लाजले नयन. आवेग प्रीतीचा,तनूत मोहरे गंध पसरवे, यौवन वारे. रोम रोमात रे फुलतो फुलोरा देहात उसळे, बेभान वारा जाळते तन, धुंद चांदणे, घे मिठीत, हेच मागणे, अधरा वरती तू लिहिले ते गुपित आपले अधरी जपते मिठीत तुझ्या हि तनू विरघळते श्वासांत मिसळता श्वास, नयन मिटते, देहास आलिंगता ,मी एकरूप होते, अर्पिते मी तुला ,जे तुला हवे ते.

प्रतिक्रिया द्या
5984 वाचन

💬 प्रतिसाद (31)
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 08/25/2016 - 15:17 नवीन
अकु पेटलेत इथे!
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 08/26/2016 - 14:01 नवीन
फटू घासला! परत धार काढायला दिलाय, धार काढून कल्हई करून आणतो काही दिवसांत, आणला तरी काकाग्नी शांत होइलसे वाटत नाही, काका रॉक्स! काका कायम जितके गरम असतात त्यावरून काकासुद्धा ग्लोबल वॉर्मिंग मध्ये एक महत्वाचे घटक आहेत असे वाटते! अस्तु!. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
अभ्या.. Fri, 08/26/2016 - 16:14 नवीन
टेम्पररी कुलदीप पवार किंवा राजशेखर लावावा काय? भाषा पण मराठी, आंबट पण मराठीच असलेला बरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ब
बोका-ए-आझम Sat, 08/27/2016 - 08:00 नवीन
फुटलो!मेलो! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
च
चतुरंग Sat, 08/27/2016 - 08:25 नवीन
ह्या प्रतिसादात बापूंच्या कीबोर्डावरती सरस्वतीने टायपिंग करवून घेतले आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 08/27/2016 - 11:17 नवीन
की बोर्ड वर माहिती नाही पण डोसक्यात मात्र तांडव केले होते अगदी ते रुंडमाला तोडून केश मोकळे सोडून का काय म्हणतात तसले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Sat, 08/27/2016 - 11:20 नवीन
सरस्वती तांडव करत नाही, तो मक्ता भोलेसांबांचा परंतु हा काकाग्नी बघता तिने देखील कदाचित तांडव केले असेल! ;) -रंगा तांडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ज
ज्योति अळवणी गुरुवार, 08/25/2016 - 20:37 नवीन
छान
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 08/26/2016 - 13:02 नवीन
जोरावर आलय काव्य!
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 08/26/2016 - 13:19 नवीन
आवरा!
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 08/26/2016 - 13:59 नवीन
लावणी म्हटले तर...ती यापेक्षा रोमँटिक असते.. हा प्रकार गलिच्छ वाटतो... प्रेमगीत म्हटले तर...त्यात प्रेम ना दिसता ..सगळे दिसत आहे... तेव्हा स्व:ताला आवरा...आणि भक्ती गीत लिहिता येते का बघा... ऍडमीन ने लक्ष घालायची वेळ आणू नये...
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 08/26/2016 - 14:06 नवीन
पिवळे साहित्य फक्त गद्य असू नये तर ते पद्य प्रकारात सुद्धा उपलब्ध व्हावे(प्रसंगी नियमांची, शुद्धलेखनाची ऐशीतैशी करून), ह्या उदात्त हेतूने काका ह्या पिवळा रंग घातलेल्या जिलब्या पाडत असतात, निष्काम असते तशी ही सकाम किंबहुना सकाळ दुपार संध्याकाळ फक्त कामच अभिप्रेत असलेली साहित्य सेवा काका व्रतस्थपणे नेटाने चालवत असतात असे ह्या प्रसंगी सांगू इच्छितो! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
ज
जव्हेरगंज Fri, 08/26/2016 - 16:48 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
न
नाखु Sat, 08/27/2016 - 05:08 नवीन
आज दिवटे सर असते तर याची "केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे"अशी गद्य रचना आणि ५०-६० प्रतिसाद नक्कीच आले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
ब
बोका-ए-आझम Sat, 08/27/2016 - 08:01 नवीन
कुठेही तुलना करायची नाही पण ' मालवून टाक दीप ' आणि ही कविता यांमधले विचार सारखेच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 08/26/2016 - 19:38 नवीन
अशो...आप्लं असो !
  • Log in or register to post comments
उ
उडन खटोला Sat, 08/27/2016 - 05:17 नवीन
अरे चांगली रशिक कविता लिहिलीय की. अकुंची म्हणून न वाचता एखाद्या कवयित्रीची म्हणून वाचा, आवडेल बघा!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 08/27/2016 - 08:23 नवीन
कवितेला (अ)विनाशी काकास्पर्ष झाला की संपलेच!! ;)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 08/27/2016 - 08:37 नवीन
रंगाकाका, मी लिहिलेला प्रतिसाद डिलीट केलाय बरका. ;) नको उगी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Sat, 08/27/2016 - 09:13 नवीन
तू काय लिहिलं असशील ते! ;) (आणि तेवढ्यात मलाही काका म्हणून घेतलंसच ना मेल्या!) -(काकाकुवा)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 08/27/2016 - 09:23 नवीन
वा काका, जुने ०८-०९ चे मिपा आठवले एकदम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
उ
उडन खटोला Sat, 08/27/2016 - 09:36 नवीन
कॉ आभ्यो कॉ ऑसॉ बॉलटॉय्?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 08/27/2016 - 09:40 नवीन
डॉन्या, धम्या, विन्या वगैरे मंडळींना मेल्या वगैरे घरगुती संबोधने बिनधास्त चालायची ती आठवली. बाकी अनापशनाप काही मेंदूत आणू नकात लगेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
स
सतिश गावडे Sat, 08/27/2016 - 13:13 नवीन
लुच्चा आणि लुच्ची शब्द नसल्यामुळे पास.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 08/27/2016 - 13:34 नवीन
कविता चांगली आहे. आवडली. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अनुराग कश्यप Sat, 08/27/2016 - 13:38 नवीन
+१११. छान कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 08/27/2016 - 14:04 नवीन
हॅलो सर आय एम अ बिग फ्यान ऑफ युवर्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुराग कश्यप
ब
बोका-ए-आझम Sat, 08/27/2016 - 14:23 नवीन
पण बाँबे व्हेल्वेट गंडलाय असं सपष्ट मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुराग कश्यप
उ
उडन खटोला Sat, 08/27/2016 - 16:07 नवीन
आशेच् म्हंतो. काय सांगने का था तेच नै समझ्या. नंतर रामन राघव ने बौंस ब्याक केला म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
अनुराग कश्यप Sat, 08/27/2016 - 18:12 नवीन
ये आपका बढप्पन है! बोकाजी के अनुवाद और सोन्याबापुजी के सेनादल अनुभव के हम भी बहुत बड़े फॅन है.
  • Log in or register to post comments
भ
भालचंद्र_पराडकर Sun, 08/28/2016 - 03:03 नवीन
गंध पसरवे, यौवन वारे. कुनीतरी हवाबाण हरडे खाल्लं असावं असा फील का येतोय इथे?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा