Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सार्वजनिक सणांचे करायचे तरी काय?

स
स्वामी संकेतानंद
गुरुवार, 08/25/2016 - 17:27
🗣 53 प्रतिसाद
दहीहंडी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात पण लोक गेलेत. सर्वोच्च न्यायालयाला न जुमानता लोकांनी मनोरे रचले( माणसांचे आणि डीजेचे पण) आपण तरी का मागे राहा म्हणून काही लोकांनी निळी हंडी पण साजरी केली! निळी हंडी साजरी करून आपण बाबासाहेबांनी ज्या कर्मकांडापासून आपल्याला स्वतंत्र करायचा प्रयत्न केला त्यांच्यातच गुरफटून जात आहोत का? (निळ्या हंडीच्या आयोजनाला कुणी गेले असतील तर त्यांनी ती पण डीजेच्या तालात झाली काय हे सांगावे. ) आपण वाईट गोष्टी उचलायला एवढे उत्सुक का असतो? सार्वजनिक जीवन शांत सुस्थिर असावे असे वाटते. घरात काय करायचे ते करा. सार्वजनिक आयोजनांना एक निश्चित जागा उपलब्ध करून द्यावी, रस्त्यावर नको. खेळाडू आले की ट्राफिक जाम करून ओपन टॉप रॅली पण मला आवडत नाही. उगाच उन्माद! विदेशातून आपण हे उचलले. ते करतात म्हणून लगेच हे स्वीकारार्ह होत नाही.( स्पॅनिअर्ड्सचा टोमॅटिना सणही मला व्यक्तिशः आवडत नाही. ) त्यांच्यासारखी पर्यायी व्यवस्था आपण करतो का? कोणाला आणीबाणी आली असेल तर फुकट जीव जातो आपल्याकडे. रस्ते बंद करून सण काय काहीच साजरे करू नये आपल्या देशात. रस्त्याला पर्याय सार्वजनिक मैदानं वगैरे आहेत. दहीहंडी आपण देवळाच्या प्रांगणात किंवा शाळेच्या आवारात करू शकतो. आमच्याकडे आज सुट्टी असते आणि मला आठवते गावात एकच दहीहंडी आणि ती पण शाळेच्या मैदानात फोडली जायची. ( अजूनही तसेच असावे.) माझ्या गावी एकच कोजागिरी पौर्णिमा व्हायची , ती पण मैदानात आणि कोजागिरी म्हणजे गाणी वाजवून रात्र जागवणे ही संकल्पनाच नव्हती आमच्याकडे. कोजागिरी पौर्णिमेला गच्चीवर गाणी वाजवायची असतात हे मला पहिल्यांदा नागपुरात कळले. गावी एकच दुर्गा बसायची, तीसुद्धा मैदानात आणि गाणी वाजत ती फक्त संध्याकाळी ठराविक वेळेतच. फक्त धार्मिक गाणी. गणपती बसत नव्हते आमच्या गावी. गावात जे शक्य होते ते शहरात शक्य होणे कठीण आहे याची जाणीव आहे. नवरात्रीत मैदानाचा फक्त एक कोपरा( कायमस्वरूपी स्टेज होते गावात, तेवढेच) फक्त व्यापले जाई. बाकी मैदान मोकळे असे. गावातले व्यवहार सुरळीत राहत. आम्ही पोट्टे खेळत बसू. एखादा सिक्सर देवीच्या कुशीत जायचा, पण तिला वाईट नव्हते वाटत! शहरात मोठी मैदानं असतीलच असे नव्हे. मोकळ्या जागाच सापडणे कठीण! तर प्रश्न हा आहे की मोठ्या शहरातल्या कळपाला शिस्त लागावी हा स्वच्छ हेतू कसा पुरा करता येईल? सार्वजनिक सण सार्वजनिकही राहतील आणि लोकांना शून्य त्रासदायक राहतील हे कसे साध्य करायचे?
वर्गीकरण
संस्कृती
सार्वजनिक सुव्यवस्था

प्रतिक्रिया द्या
11875 वाचन

💬 प्रतिसाद (53)
स
स्वामी संकेतानंद Mon, 08/29/2016 - 02:54 नवीन
लोक गुंडांच्या विरोधात जास्त नातील कारण जीवाची भीती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
क
कायरा Mon, 08/29/2016 - 09:19 नवीन
कोर्टाने मनाई करूनसुद्धा उल्हासनगर येथे एक 12 वर्षाचा मुलगा दहीहंडी उत्सवात सामील झाला व तो 6व्या थरावरून खाली पडला . पालकांचा मूर्खपणा दुसरे काय? ठीक झाला तर ठीक नाहीतर आहेच नशीबाला दोष.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 08/29/2016 - 09:24 नवीन
काय नाय ओ, लक्ष सुध्दा द्यायचे नाही. मरेना का. अति कौतुक केल्याने शेफारल्यासारखे करतात सगळेच. चर्चा काय, फेस्बुकावर लाइक्स काय, व्हाटसपवर प्रसिध्दी काय. कोर्टात गेले प्रकरण तरी त्याचा इश्श्यु करणारे लोक. कोर्टाचा अवमान केल्याचे सुध्दा मिरवणारे लोक म्हणल्यावर अजुन काय? काही का होईना. आपले माणूस नावाचे बेट सांभाळायचे बस्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कायरा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा