Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

न्यु यॉर्क "सफर"!

प
पिलीयन रायडर
Fri, 08/26/2016 - 03:33
💬 143
म्हात्रे काकांनी न्यु यॉर्क सफरीला सुरवात केली आहेच.काकांच्या विमान प्रवासापेक्षा थोsssडासा वेगळा माझा प्रवास होता. आमचीही सफरच, फक्त हा "सफर" वेगळ्या अर्थाने आहे! भावना अगदी ओथंबुन वहात आहेत म्हणुन ही वीट धागा म्हणुन वेगळी काढत आहे. ;) अर्थातच ही वीट म्हात्रे काकांच्या चरणी अर्पण! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ वीट पहिली! कधी कधी माणसाचं नशिबच जोरात असतं. मागच्या वर्षी माझंही होतं. नवरा अमेरिकेला आल्याने मलाही २ महिने अमेरिका पहायला मिळाली. दोन महिने शुद्ध तुपातली निव्वळ ऐश!! पण त्याहुनही महत्वाचं म्हणजे नवरा!!! गेले पाच महिने आम्ही भेटलो नव्हतो. अखेर "लालाला लाला..." करत पळत पळत येऊन गळ्यात पडुन फिल्मी होऊन रोमँटिक डायलॉग मारत भेटायची वेळ आली होती. =)) व्हिजा डिपेंडंट असल्याने तसा काही प्रॉब्लेम येणार नाही असं सगळेच म्हणत होते. आणि तसंही माझा जॉब चालु असल्याने रिजेक्शनचा प्रश्न नव्हता. तरीही मी लग्नाच्या अल्बम पासुन सगळं काही घेऊन गेले. आमचं बायोमेट्रिक शुक्रवारी आणि मुलाखत सोमवारी होती! अबीरला न्यायची गरज नव्हती पण आदल्या रात्री समजलं की मुलाचा फोटो २ बाय २ अशाच साईझचा लागतो. मग सकाळी पोरालाही बखोटिला मारलं. त्याचा मुंबईत हवा तसा फोटो काढला. बायोमेट्रिक मोजुन ५ मिनिटात झाले. सातव्या मिनिटाला अबाऊट टर्न आणि पुणे! सोमवारी मात्र अभुतपुर्व गर्दी!!! ११ च्या मुलाखतीला आम्ही अतिकाळजीवाहु लोक ७.३० लाच पोहचलो =)) आणि आत जायला १२ वाजले. नुकताच काही दिवसांपुर्वी अमेरिकेचा सर्व्हर डाऊन झाल्याने जास्तीच्या अपॉईंट्मेंट्स दिल्या होत्या म्हणे. आत जाऊन अजुन १ तास बसुन राहिले. मग नंबर आला. समोरच्या काकुंनी सुहास्य वदनाने "नवरा आधीच अमेरिकेत आहे का?" असं विचारलं. मी मान डोलावली. म्हणे काही प्रुफ आहे का? आय १९४ फॉर्म वगैरे. मी दिला. पुढची ३० सेकंद मला माझ्या हृदयाचे ठोके कानात जोरजोरात ऐकु येत होते. "तीन दिवसांनी व्हिजा स्टॅम्प करुन मिळेल, धन्यवाद!" काकु वदल्या. मी सुद्धा चारदा धन्यवाद म्हणून निघाले, पण तरीही जाताना सुरक्षारक्षकाला "पासपोर्ट परत दिला नाही म्हणजे मिळाला ना व्हिजा? जाऊ ना आता घरी??" असं विचारुन विचारुन मगंच बाहेर पडले! पण खरं सांगु का?! मला अजिबात आनंद झाला नाही. त्या काकुंनी मला जरा ३-४ तरी प्रश्न विचारायला हवे होते. मग जमत नाही ब्वॉ असा चेहरा करायला हवा होता. मग मी त्यांना पटवलं असतं की कसा तुम्ही मला व्हिजा द्याच. मग त्या पटल्या असत्या आणि मग व्हिजा दिला असता तर मला कसं, व्हिजा "कमावल्या" सारखं वाटलं असतं. पण असो.. थ्रिल पेक्षा व्हिजा जास्त महत्वाचा होता! जाण्याच्या दिवशी दुपारी ५ ला निघायचं होतं. कसा कोण जाणे फोन सायलेंटवर गेला. सहज म्हणुन ३ ला फोन पाहिला तर सगळ्यांच्या फोनवर भरपुर मिसकॉल्स. गडबडीने कॉल केले तर आमचा ड्रायव्हर आणि माझी मावस बहीण फोन करुन सांगायचा प्रयत्न करत होते की मुंबई - पुणे महामार्गावर दरड कोसळली आहे. संपुर्ण जाम लागला आहे. ड्रायव्हर म्हणे तुमचा फोन लागेना म्हणुन मी सरळ निघालोच. आता घराजवळ आलोय. १० मिनिटात बॅगा पॅक करुन आम्ही गाडीत बसलो होतो. धो धो पाऊस. शिस्तीत घाटात अडकलो. गाडी इंचभरही हलत नव्हती. पुढे जिथवर दिसत होतं तिथवर ब्रेक लाईट्स लावुन उभ्या गाड्या! ड्रायव्हर काकांचा एक मित्र पुढे अडकला होता. त्याला विचारुन विचारुन काका निर्णय घेत होते. शेवटी त्यांनी महामार्ग सोडला आणि गावातुन गाडी घातली. मला वाटत होतं की गेलं विमान. घरुन बहीण विमानतळावर फोन लावत होती. विमान १.३० चं होतं. त्यामुळे ते लोक म्हणत होते की किमान ११ पर्यंत आले तर ठिक. नाही तर आम्ही काही करु शकत नाही. काकांनी गाडी पळवली आणि ११ ला विमानतळावर आणुन टाकलं. पुढच्या सेकंदाला मी सामान ट्रॉलीवर टाकुन आत पळत सुटले. तर अमेरिकेचा सर्वर पुन्हा ठप्प झाला होता आणि बोर्डींग पासेस बनतच नव्हते. =)) तिथे मी चक्क १२:३० पर्यंत उभी होते. तासाभराने मला शेवटी हाताने लिहुन दिलेला पास मिळाला आणि त्याचक्षणी सिस्टीम परत सुरु झाली!! मग हाताने दिलेला पास परत घेऊन तो छापुन देण्यात आला. सिक्युरिटी तर ठिकच. पण मला उगाच इमिग्रेशनचं फार टेन्शन. मी आपली पोराला कडेवर घेऊन, पाठीवर सॅक टाकुन उभी. तिकडुन सुटाबुटात एक गंभीर माणुस आला आणि नुसती मागे येण्याची खुण केली. ९९% जनता मागे लाईन मध्ये सोडुन जिकडे लोकांनी जाऊ नये म्हणुन चेन्स लावल्या होत्या अशा भागात आम्ही जात होतो. मी तर जाम टरकले होते. त्या माणसाने मला बिझिनेस क्लासच्या लाईन मध्ये नेऊन २ मिनिटात आम्चे काम करुन दिले! अबीरने इमिग्रेशनच्या माणसाला का कोण जाणे "तुम्हाला कुंग फु पांडा माहितीये का?" असा प्रश्न विचारुन हैराण केले!! तोवर इतका उशीर झाला होता की मी सरळ चाल्त जाऊन विमानातच बसले. लाऊंज वगैरे काही नाही. एयर इंडीयाच्या लाल पिवळ्या विमानात पाय टाकल्यावर मला नाही म्हणलं तरी धक्का बसला होता! सीट्स, खालचा गालीचा, एयर होस्टेसचे गणवेष, सगळं काही लाल-पिवळं! १० मिनिटात ते हळदी कुंकु विमान निघालंच. पहिल्यांदाच एवढ्या लांब जात होते. "नवर्‍याला खुप महिन्यात पाहिलेलं नाही, तेव्हा जिवंत पोहचु दे रे अमेरिकेला" अशी देव जाणे कुणाला तरी प्रार्थना केली! (नास्तिक असुन असं बोलायची सवय आहे मला मनातल्या मनात!!) विमान उडालं. झोप आली होती. गपागप डोळे मिटत होतेच. अबीर केव्हाच माझ्या मांडीवर डोकं ठेवुन झोपला होता. मी पण झोपुन घेतलं. आणि पाचच मिनिटात मला गदागदा उठवुन जेवण देण्यात आलं! मी झोपेतच ते घेतलं. ट्रॅफिकच्या भानगडीत जेवण केलेलं नसल्याने झोपेतच ते खाल्लं सुद्धा. परत झोपायचा प्रयत्न चालु केला. मी शप्पथ सांगते ह्या पेक्षा एस्टी बरी हो. लेग स्पेस नावाची काही गोष्ट नव्हतीच. अबीरसाठी मांडी घालणं आवश्यक होतं. महामुश्किलीने ती घातली. भुत म्हणुन आपण लोकांना घाबरवायला डोक्यावरुन जशी चादर घेऊ तशी चादर टाकली. जिथे जिथे काही तरी रुततय असं वाटत होतं, तिथे तिथे उशा खुपसल्या. अजुन फक्त १३ च तास असं म्हणुन डोळे मिटले. सकाळी उठले म्हणण्यात काही अर्थ नाही कारण झोपच कुणाच्या बापाला लागली होती इथे? अबीर रावही निवांत उठले. त्यांच्या मते विमान थांबलं होतं. मी कितीही पटवायचा प्रयत्न केला की विमान आकाशात जात आहे म्हणुन आपल्याला कळत नाही, तरी ते त्याला मान्य नव्हतं. खिडकी उघडुन दाखव नाही तर चला खाली उतरु ह्यावरच तो अडुन बसला होता. पण अशावेळेसच टिव्ही कामाला येतो. तातडीने त्याला एक कार्टुन चॅनल लावुन दिलं. जागरुक पालकत्वाच्या आयचा घो! आता पुढचं मिशन होतं बाथरुमला जाणं. बाकीच्या लोकांना आधीच एयर इंडियाच्या आदरातिथ्याची कल्पना असल्याने सकाळ पासुनच रांगा लागल्या होत्या. आता तर बाथरुम्सच्या बाहेर पाणी आणि टिश्यु पडलेले दिसत होते. माझ्या अंगावर काटा येत होता पण जाणं तर आवश्यक होतं. मुख्य प्रश्न खरं तर अबीर होता. त्याला कार्टुन लावुन देऊन बसवलं होतंच. म्हणलं आलेच हं दोन मिनीटात. जाऊ नकोस कुठे. आणि त्याला काही कळायच्या आत पटकन बाथरुममध्ये घुसले. अक्षरशः एका मिनिटात बाहेर येऊन पाहिलं तर अबीर सीट वरुन गायब.. माझ्या तर काळजाचा ठोकाच चुकला. मी फारसा काही विचार न करता हाका मारायला सुरवात केली. तिकडून घाबरुन "आई आई" म्हणुन आवाज ऐकु आला. साहेब माझ्या मागे जायचं म्हणुन चालत चालत उलट्या दिशेने गेले होते. पुढच्या वेळेपासुन त्यालाही बाथरुमला नेणे आणि बाहेर उभं करुन त्याच्याशी गप्पा मारत रहाणे हा कार्यक्रम चालु केला. स्क्रिनवरच्या मॅपवर अमेरिका जवळ येताना दिसत होती. एयर इंडीयाचे सर्व कर्मचारी एव्हाना गायब झाले होते. पॅण्ट्री उघडी ठेवुन ते बहुदा झोपायला गेले असावेत. लोक जाऊन जे हवं ते घेत होते. कचराच कचरा झाला होता. एक बाथरुन तुंबलं होतं. अबीरची तिसरी झोप चालु झाली होती. मी पुन्हा एकदा त्या सीटवर मांडी घालुन बसले होते. मला फक्त आणि फक्त ह्या विमानातुन बाहेर पडायचं होतं. समोर एक से एक भिकार चित्रपट ऑप्शनला दिले होते. त्यातला कमीत कमी भिकार लावुन मी सुन्न होऊन स्क्रिनकडे डोळे लावले होते. हे सगळं आपण नवर्‍यासाठी करतोय ना!! आता नवरा भेटणार ना!! वगैरे वगैरे स्वप्नरंजनं करत मी वेळ काढत होते. अखेर १४ तासांच्या अंग मोडुन केलेल्या प्रवासानंतर ती वेळ आलीच. विमान अखेर अमेरिकेच्या जमिनीवर उतरलं. मला आणि अबीरला भयानक आनंद झाला होता.. अगदी तुरुंगातुन सुटावं असा! अबीर आजुबाजुच्या लोकांना "मी अमेरिकेला जाणार.. तुम्ही नाही.. टुक टुक" असं आनंदातिरेकानं सांगत होता! पण अर्थातच आयुष्य एवढं सोप्पं नसतं. इमिग्रेशनला १ तास लागला. कुणीही लेकरू बघुन वगैरे काही सवलत दिली नाही. अबीर सैरावैरा सगळीकडे पळत होता. त्याला बिचार्‍याला खुप वेळाने नाचायला मिळालं होतं. मी जवळपास ७५% सुन्न होते. मला नवर्‍यापर्यंत पोहचवण्या इतपत २५% महत्वाची अ‍ॅप्स मी मेंदुत सुरु ठेवली होती! त्या माणसानी सुद्धा दहा वेळा मला आणि अबीरला निरखुन मग शिक्का मारला. बॅगा तोवर आल्या होत्याच. ट्रॉलीला ५ डॉलर लागणार होते. ताबडतोब रुपयात हिशोब करुन "इतके कुठे पैसे असतात का" असं म्हणून मीच जोशात बॅगा उतरवल्या आणि दोन हातात दोन २३ किलोच्या बॅगा आणि समोर गुरं काठीनं हाकतात तसं हाकत हाकत अबीर नेला. सुदैवाने कस्ट्म मध्ये काही न उचकता जाऊ दिलं. ज्याचसाठी केला अट्टाहास तो नवरा आता उभाच असेल वाट बघत म्हणुन उड्या मारत आणि रोमँटिक विचारात बाहेर आलो. कुणीही आलेलं नव्हतं. १०-१५ मिनिटं संपुर्ण मुड नीट जाईस्तोवर वाट पाहिली. मग पळत पळत नवरा आला. आल्या आल्या त्याने अबीरला आणि अबीरने त्याला पिक्चरमध्ये दाखवतात तशी पळत पळत येऊन मिठी मारली. पुढचा बराच वेळ ते नाचत होते. मी नवर्‍याला पाहुन खुश होऊन पळत पुढे आलेले बाकावर जाऊन दीर्घ मिठी संपायची वाट बघत बसले. ५ मिनिटांनी वगैरे नवर्‍याला जाणिव झाली की मी पण आलेय. "अरेच्चा! बायको तू इकडे कुठे?!" टाईप अत्यंत क्यॅज्युअल लुक देऊन "चला, टॅक्सी करु!" म्हणुन बाप लेक निघाले. "अबीरला पाहिलं की मला अक्षरशः काही सुचेना! तो दिसला की जाणवलं कित्ती मिस केलं मी ह्याला!!..." नवरा.. सॉरी सॉरी.. अबीरचा बाप बडबडत होता.. मी १००% सुन्न होऊन ऐकत होते.. रोमँटिक भेट झाली होती, फक्त बाप लेकाची!

प्रतिक्रिया द्या
49510 वाचन

💬 प्रतिसाद (143)
स
सामान्य वाचक Fri, 08/26/2016 - 03:58 नवीन
Air india चा अनुभव असाच असतो अपल्यासारख्याना काही पुण्यवान लोक ना चांगला अनुभव येतो बाबा
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 08/26/2016 - 04:12 नवीन
अगदी अगदी! पण डायरेक्ट जाता येतं आणि कुणी तरी मला सांगितलं की एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे बाळांना सांभाळतात सुद्धा =)) म्हणुन इतिहाद सोडून इकडे आले मी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
म
मुक्त विहारि Fri, 08/26/2016 - 04:54 नवीन
गोष्ट खरी असावी.... खरे खोटे राम जाणे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
आ
आदूबाळ Fri, 08/26/2016 - 07:18 नवीन
एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे बाळांना सांभाळतात सुद्धा =))
मला काळजी नाही म्हणजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अभ्या.. Fri, 08/26/2016 - 07:37 नवीन
लै उडू नकात, मुवि 'स्वतःच्या' असे लिहायला विसरले असतील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
मुक्त विहारि Fri, 08/26/2016 - 07:46 नवीन
तुम्ही मद्य घेत नसाल तर, काळजीचे कारण नाही. एका बाळाला, ह्या "एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे बाळांना सांभाळतात सुद्धा" गोष्टीचा अनुभव असावा. १९८४ मध्ये, अशा एका बाळाने, बाललीला केल्याचे पुरावे जालावर उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
उ
उडन खटोला Fri, 08/26/2016 - 08:26 नवीन
Are baal, Air India chya hostess ahet tya, air india chya.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Fri, 08/26/2016 - 09:59 नवीन
"आकाशात मिळवा मायेची पाखर" अशी काहीतरी जाहिरात करता येईल ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
म
मारवा Fri, 08/26/2016 - 11:03 नवीन
बाळ गोंडस असेल तर त्या चक्क गोड पापा सुद्धा घेतात. अर्थात गोंडसनेस चा मामला सबेज्क्टीव्ह आहे. पण स्कोप आहे म्हणजे बराच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/26/2016 - 10:34 नवीन
एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे बाळांना सांभाळतात सुद्धा तुम्हाला जागेपणी स्वप्नं बघायची वाईट खोड दिसते... ती इतक्या वरच्या थराला गेली असेल तर उपाय करायची गरज आहे. ;) त्या "कुणीतरी" तुमच्यावर प्रॅक्टिकल जोक केला आहे, त्याचा जरूर बदला घ्या. :) ८२ ते ९६ या काळात अधून मधून देशभक्तीचा झटका आल्याने मी तीन चारदा एअर इंडियाने प्रवास केला आहे. दर वेळेस त्यांनी माझा निर्णय कित्ती कित्ती चूकीचा आहे याची पूरेपूर खात्री पटवून द्यायची खबरदारी घेतली आहे. दर अनुभवावर एक एक धागा काढता येईल. आपल्याच देशाची आपणच किती नाचक्की करायची असा विचार करून गप्प आहे. मात्र, यापुढे, हृदयात कितीही देशभक्ती उचंबळून आली तरी जगातले सर्व पर्याय संपले तरच एअर इंडियाने प्रवास करणार अशी शपथ घेतली आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मोदक Fri, 08/26/2016 - 10:43 नवीन
आपल्याच देशाची आपणच किती नाचक्की करायची असा विचार करून गप्प आहे असे काही नाही हो.. तुम्ही बिन्धास्त लिहा. त्यांना काही वाटत नाही तर आपण का विचार करायचा..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 08/26/2016 - 12:25 नवीन
कारण, देश आपला आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/26/2016 - 17:47 नवीन
>>>>>> आपल्याच देशाची आपणच किती नाचक्की करायची असा विचार करून गप्प आहे. नाय नाय, एखाद्या गोष्टीची जितकी करता येईल तितकी नाचक्की करावी, जे जे वाईट असेल त्या त्या बद्दल बोललं पाहिजेच. असं आमचं प्रामाणिक मत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अस्वस्थामा Fri, 08/26/2016 - 18:00 नवीन
जगातले सर्व पर्याय संपले तरच एअर इंडियाने प्रवास करणार अशी शपथ घेतली आहे !
अगदी अगदी. बाकी आमच्या पहिल्या प्रवासाची पण अशीच अवस्था होती पिरा तै (तरी नशीबाने एकटाच होतो). एअर-इंडिया होती. सुरुवातीसच सतरा तास डिले (टेक्निकल इश्यू) आणि मग नंतर असाच रांगेत उभा राहिल्यावर बिजनेस क्लास दिला. लै खुश होवून उड्या मारत आत गेलो. मोजून दहा (दुर्दैवी) लोक्स त्या "वॉर्डात". तशी लेग-स्पेस वगैरे होती पण एकही विडिओ स्क्रीन चालेना. चार वेळा सीट बदलल्यावर मग वैतागून एक खिडकीची जागा पकडून गप बाहेरचा अंधार बघत बसलो. बिचारी "हवाई-सुंदरी" इतर पब्लिकच्या शिव्या खाऊन वैतागली होती. ;) परत हापिसवाल्यांला सांगितलं मी वरचे पैसे देतो पण ही विमान सेवा नग. आजवर 'काष्ठ-स्पर्शे (टच-वूड)' अजून तरी इतर ऑप्शन आहेत म्हणून ठिक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पगला गजोधर Fri, 08/26/2016 - 21:04 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
स
संदीप डांगे Fri, 08/26/2016 - 21:14 नवीन
तेव्हाचाच स्टाफ अजून कॅंटीन्यू आहे की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
म
मुक्त विहारि Fri, 08/26/2016 - 03:58 नवीन
दुसरा भाग लवकर टाकलात तर उत्तम....
  • Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे Fri, 08/26/2016 - 04:01 नवीन
जबरदस्त ... पु भा प्र !!!! रोमँटिक भेट झाली होती, फक्त बाप लेकाची! हा हा हा !!
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 08/26/2016 - 04:03 नवीन
एअर इंडिया सही सही वर्णन!!
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 08/26/2016 - 04:26 नवीन
बापरे! तुम्हाला प्रणाम! जग जवळ येतंय हेच खरं, सेम परिस्थिती आम्ही आमच्या आईची करत असू फक्त तेव्हा लांबचा प्रवास म्हणजे, अमरावती ते कोल्हापूर असे महाराष्ट्र एक्सप्रेस ने, कचऱ्याच्या बाबतीत ती ट्रेन अन ही फ्लाईट बहिणी दिसतात खऱ्या. कधीकधी प्रश्न पडतो, नॅशनल इज्जत घालवणारे नॅशनल फ्लॅगशिप कॅरीयर हवंय तरी कश्याला!.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 08/26/2016 - 04:37 नवीन
एयर इंडियाचं आमच्याही जमत नाही हेच खरं! काहींना चांगले अनुभवही येतात. मला तीन वेळा असाच बेक्कार अनुभव आहे! बाकी आईच्या बाबतीत सहमत. मी ५ वर्षाची हाताशी आणि बहीण कडेवर अशी बाई अंबेजोगाईच्या पुढे, चंदनसावरगावपासुन चालत जाऊन भाटुंबा नावाच्या खेड्यात यष्टीने का, कशी आणि मुख्य म्हणजे "कशाला" जायची देवच जाणे बाबा!! त्यामानाने हा प्रवास फार सोप्पा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
स्रुजा Fri, 08/26/2016 - 05:11 नवीन
हाहाहा, फार च भारी. दोन तीन वेळा फिसकन हसले. बाकी तुझ्या प्रवासात तुझी गोची झाली की तुझ्या विनोद बुद्धीला अजुन च धार चढते असं एक आपलं निरिक्षण.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 08/26/2016 - 05:17 नवीन
लेखन मस्त! नको त्या जुन्या आठवणी. एयर इंडियाच्या तर नकोतच!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 08/26/2016 - 10:45 नवीन
हेच म्हणते, रेवतीसारखेच तंतोतंत. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
अ
अजया Fri, 08/26/2016 - 05:24 नवीन
पिराश्टाइल ढिंचॅक वर्णन! बाकी विमान थांबतं हे मलाही लहानपणापासून वाटत आलंय;) अबिरबुवांशी सहमत.खाली उतरून बघायचे तरी ना ;) क्षणाचा नवरा आणि अनंतकाळाचा बाप भेटला तर एकदाचा!! पुभाप्र..
  • Log in or register to post comments
र
राही Fri, 08/26/2016 - 06:23 नवीन
लेख फारच आवडला. अगदी श्टाईलला इमाने इतबारे जागून लिहिलेला. शिवाय "क्षणाचा नवरा आणि अनंतकाळाचा बाप" हे प्रतिसादातलं अजरामर (होऊ घातलेलं) सुभाषित म्हणजे एक्स्ट्रा बोनस किंवा केकवरचं आय्सिंग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ब
बहुगुणी Fri, 08/26/2016 - 16:40 नवीन
क्षणाचा नवरा आणि अनंतकाळाचा बापही तुमची 'वरिजिनल' निर्मिती असेल तर अतिशयच आवडलेली आहे! (अवांतरः पूर्वी मिपावरच इतरत्र वाचलेलं वाक्य आठवलं: स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता आहे तसेच भेंडी ही क्षणाची भाजी आणि दिवसभराची क्यॅलरी आहे असा गपगुमान विचार करुन जेवावे ! हाच संसारसागरातुन तरुन जाण्याचा मार्ग आहे!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Fri, 08/26/2016 - 19:00 नवीन
:) वरिजनलच!अजून कोणाला सुचली असेल तर वाचण्यात नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
च
चतुरंग Fri, 08/26/2016 - 05:46 नवीन
ही पहिली वीट वाचून "वीट येणे" चा अर्थ नव्याने समजला!! ;) मराठीतून सुरु झालेली सफर नंतर नंतर इंग्लिश सफर कशी होत जाते हे एअर इंडियात जाणवतं. ज्या कोणाला एअर इंडियाचा चांगला अनुभव आलेला आहे अशा पुण्यात्म्याचं दर्शन मला घ्यायचं आहे! :) (पुविशु)रंगा
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 08/26/2016 - 05:53 नवीन
'क्षणाचा नवरा आणि अनंतकाळाचा बाप'!!! ड्वॉले पाणाव्ले! ह्रदयाचं पाणीपाणी झालं! अष्टसात्विकभाव दाटून आले! कधीतरी आमच्या क्षुद्र क्याटेगरीची दखल घेतली गेली! असो. बाकी लेख कसला भारी!
  • Log in or register to post comments
द
दिपस्वराज Fri, 08/26/2016 - 06:04 नवीन
हाहाहा, फार च भारी. दोन तीन वेळा फिसकन हसले. बाकी तुझ्या प्रवासात तुझी गोची झाली की तुझ्या विनोद बुद्धीला अजुन च धार चढते असं एक आपलं निरिक्षण.
+११११११
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 08/26/2016 - 06:17 नवीन
अतिशय खुसखुशीत वर्णन. डॉक्टर साहेबांचे आणि तुमचे लेख समांतर चालू द्यात. दोन्हींचे स्वभाव वेगळे असले तरी दोन्ही लेखांमध्ये वाचकाला धरून ठेवण्याची जबरदस्त ताकद आहे. तुमचे दोघांचे लेखन संपले की मग मी माझे लेखन सुरु करेन. नाहीतर एव्हढ्या सशक्त लेखांपुढे ते दुर्लक्षित राहील. टिआरपीची चिंता आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 08/26/2016 - 06:39 नवीन
टी.आर.पी. साठी.....काही टिप्स..... १. कुठून तरी धाग्यात मोदी आडनांव आणायचे. २. पुणे ते कोथरूड ह्या प्रवासाचा उल्लेख करायचा. ३. प्रवासातील औषधात होमिओपाथीचा उल्लेख करायचा. ४. परदेश आणि भारत ह्याची तुलना करायची. ह्या चतू:सुत्री मुळे, टी.आर.पी.ची हंडी वाढत जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
महासंग्राम Fri, 08/26/2016 - 09:24 नवीन
मुवि सरळ मुपी वाचायला सांगा ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Fri, 08/26/2016 - 11:45 नवीन
मिपा वेगळे आणि मुपी वेगळे.... असो,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
अ
अभ्या.. Fri, 08/26/2016 - 12:00 नवीन
मुवि+मिपा=मुपी असे काही इक्वेशन आहे काय? ;) मुवि हलके घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/26/2016 - 18:27 नवीन
कधी नव्हे ते मूवीशी सहमत. शक्यतो भारताच्या जवळ जवळ सर्वच* गोष्टींना नाक मुरडली म्हणजे लेखनाला एक उंची लाभते असं माझं एक आपलं निरीक्षण आहे. * रस्ते, हॉटेल, प्रवासाची साधनं, माणसं, वाहतूक व्यवस्था, कायदा, आणि इ.इ. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/26/2016 - 13:06 नवीन
धन्यवाद ! लिहाहो पेठकरसाहेब तुम्हीही. तुमच्या अभ्यासू आणि जिवंत अनुभवी लिखाणाचे माझ्यासकट अनेक मिपाकर पंखे आहेत. एका वेळेस अनेक समान विषयांवरचे धागे आले तरी मिपाकर त्या सर्वांना योग्य न्याय देतातच असा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
पिशी अबोली Fri, 08/26/2016 - 06:19 नवीन
फिस्स्स! =))
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Fri, 08/26/2016 - 06:44 नवीन
तुमचा अनुभव भयंकर होता. तुम्ही सफरीकरता अगदीच चुकीचा मुहूर्त निवडलात असे वाटते! असो. माझा पहिला परदेश प्रवास हाही एअर इंडियाद्वारे झाला. पहिलाच प्रवास होता त्यामुळे सगळेच छान, मस्त वाटत होते. मुंबई, दिल्ली, लंडन आणि न्यूयॉर्क असा प्रवास होता. सडाफटिंग एकटा माणूस असल्यामुळे त्रास जाणवला नाही. नंतर एक दोनदा पुन्हा ए इ ने प्रवास केला. अस्वच्छता अन्य विमानकंपन्यांच्या मानाने जास्त होती. पण बाकी फार त्रास नव्हता. विमानही बर्यापैकी वेळेत होते. बहुधा ए इशी कुंडली जमत असावी माझी! तुमचा नवरा तुमचे लिखाण वाचत नसला तर बरे नाहीतर फार दु:खी होईल तुमची टीका वाचून!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 08/26/2016 - 14:50 नवीन
तो "माझा" नवरा आहे! मनाव बिनावर घेत नसतो तो! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
र
रुपी Fri, 08/26/2016 - 06:47 नवीन
मस्त.. एकदम खुसखुशीत वर्णन! :)
  • Log in or register to post comments
उ
उडन खटोला Fri, 08/26/2016 - 06:58 नवीन
एकंदर असा 'परकार' झालाय तर....
  • Log in or register to post comments
व
विभावरी Fri, 08/26/2016 - 07:02 नवीन
भन्नाट वर्णन केलय पि .रा .हळदी कुंकू विमान !!!! मस्त
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 08/26/2016 - 07:08 नवीन
झकास वर्णन.. पुढील विटेच्या प्रतिक्षेत. ;)
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Fri, 08/26/2016 - 07:14 नवीन
अबीर रॉक्स!
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 08/26/2016 - 07:20 नवीन
लौल! एक नंबर! पुभाप्र.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 08/26/2016 - 07:43 नवीन
इफ यु डोन्ट माईंड पिराताइ, तुम्ही काय काय नेलं ह्याची डिट्टेल लिस्ट मिळू शकेल काय? म्हणजे कपडे शूज अगदी डिट्टेल. प्लानिंग वाल्या माणसाला हे विचारलेले कधीपण बरे. त्यातल्या त्यात तुम्ही तर आक्खे नियम कोळून पॅकिंग केले असणार.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 08/26/2016 - 15:11 नवीन
तुम्हाला खरंच एका आईची लिस्ट हवीये का?! कारण निम्म्या गोष्टी तर खेळणी, रंग, पुस्तकं, सगळ्या वातावरणातले कपडे इ अबीरच्याच होत्या. पण तरीही नवर्‍याला दिलेल्या वस्तुंचा एक अंदाज देते. पहिलं तर एयर इंडिया २३ किलोच्या २ बॅगा आणि ७ किलोची केबिन बॅग नेऊ देते. अबीरला सेम. त्यामुळे मला स्वतःला ८४ किलो नेता येणार होते, जे मी नेले! नवर्‍याला ४६ किलो होते त्यात आम्ही १. तांदुळ - डाळ वगैरे दिलं पहिल्यांदा. पण त्यातले तांदुळ (दावतचा पॅक्ड तांदुळ) फेकुन दिले. डाळी मात्र ठेवल्या. बहुदा डाळी डायरेक्ट पेरुन शेती करता येणार नाही पण दावतच्या बासमतीपासुन भात शेती तो करेल म्हणुन असेल!! खरं तर गरजही नाही कोणत्याच धान्य / कडधान्यांची. जर्सी मध्ये सगळं मिळतं. २. रेडी टु इट चे काही पॅक्स जसं की उपमा, सुप्स, मॅगी इ. देवश्री म्हणुन एका कंपनीचे मराठी पदार्थ जसं की अळुची भाजी, मेथी, पालक,अंबाडी, मुगाचा हलवा, खिचडी इ बरंच काही मिळतं. मी ह्यावेळेस आणलंय. चांगलं आहे. फक्त कंपनी नीट पाहुन घ्यायची. सारख्याच नावाच्या १-२ जुन आहेत. त्यांच्या भाज्या वाईट होत्या. ३. कुकर (आणि तवा सुद्धा जर हॉटेल मह्ये रहाणार नसाल). मी नवर्‍या सोबत एक ताट-वाटी-चमचा-किचन टॉवल, डाव/पळी, लहान खिसणी, चहा गाळणी, सुरी, कात्री हे दिलं होतं. मी स्वतः पोळपाट लाटणं, लहान कढई, छोटी छोटी भांडी, लहानसा बत्ता घेऊन आलेय! ८४ किलो मध्ये मी जवळपास एक मिनी संसार आणलाय! ४. थंडीच्या दिवसात जाणार असाल तर एखादा कोट किंबा बेसिक स्वेटर वगैरे ठेवा. ते इथे पुरत नाही म्हणे. म्हणून मी आणि अबीर ह्या वर्षी इथेच ती खरेदी करणार आहोत. बॅगेतले वजनही कमी होते. इथे खास शुज वगैरेही लागतात. इतकं सगळं बॅगेत मावत नाही. ५. मसाले, भाजणी, मेतकुट, पापड-कुरडया, चटण्या - हे मी सगळं आणलय कारण मी इथे एक वर्ष आहे. मला मध्येच होमसिक व्हायला होतं. तेव्हा खायला बरं! ६. औषधं - सगळी बेसिक औषधं जसं की सर्दी, ताप, खोकला, अ‍ॅसिडिटी, पोट बिघडणे, लहान जखमा इ आणली आहेत. इथे मेडिकल सिस्टिम अत्यंत महामुर्ख आहे. तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. जे काही घ्याल त्याचे प्रिस्क्रिप्शन सोबत असलेले बरे. काही विशिष्ट औषधं धेत असाल तर डोक्टरचे प्रिस्क्रिप्शन ठेवाच. बाकी कपडे, कागदपत्र, सौंदर्यप्रसाधनं, पुस्तकं इ आपल्या आवश्यकते प्रमाणे. तुम्ही न्यु जर्सी सारख्या ठिकाणी येत असाल तर खाण्या पिण्याची एकही वस्तु नाही आणली तरी चालेल. स ग ळं मिळतं. मला अबीरमुळे असेल पण एकदाही कस्टम मध्ये काही विचारलं नाही. नवर्‍याला पहिल्यांदा सगळं उचकुन दाखवावं लागलं, पैकी तांदुळ फेकुन दिले. सोबत दिलेले घरचे अन्न (लाडु-चिवडा-पुर्‍या-पुरण-चटण्या) काहीही काढले नाही. मी भाजणी आणली आहे, पण ती चेक झालीच नाही. खसखस वगैरे न दिलेलंच बरं. रेवाक्का अजुन जास्त डिटेल मध्ये सांगु शकेल. तिला माझ्याहुन खुपच जास्त अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Fri, 08/26/2016 - 16:26 नवीन
ओके, म्हणजे कपडे वगैरे जास्त नेले नै तरी चालते, लॅपटॉपची सोय काय? तो पण बारीक चेक होतो का? आपलं मोबाईल तिकडं चालत नाहीत म्हणे. तिथे लगेच सिम मिळतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा