सेपेन (तिबेटियन तिखट चटणी)
Primary tabs
साहित्य
८ ते १० सुक्या लाल मिरच्या
१ मोठा कांदा, उभा चिरून
६ ते ८ लसणाच्या पाकळ्या
२ माध्यम आकाराचे टोमॅटो, चिरून
१ मोठा चमचा तेल
१ मोठा चमचा व्हिनेगर
१ मोठा चमचा सोया सॉस
१ चमचा काळीमिरी पावडर
१ चिमूट साखर
मीठ, चवीनुसार
कृती
लाल मिरच्या २ ते 3 तास गरम पाण्यात भिजत घाला. बाहेर काढून, तुकडे करून, पाणी निथळून मग व्हिनेगर मध्ये अजून २ तास भिजत ठेवा
पॅन मध्ये तेल गरम करून त्यात लसणाच्या पाकळ्या घाला. थोडा वेळ परतून मग त्यात उभा चिरलेला कांदा घाला. कांदा थोडा वेळ परतून झाला की मग त्यात चिरलेले टोमॅटो घालून मिश्रण परता. गॅस बारीक करून पॅन वर झाकण ठेवून टोमॅटो आणि कांदा मऊ शिजवून घ्या.
भिजवलेल्या सुक्या मिरच्या, व्हिनेगर, सोया सॉस, काळीमिरी पावडर घालून मिश्रण एकजीव करा. चवीनुसार मीठ घालून गॅस बंद करा. एक चिमूट साखर घालून मिश्रण गार होऊ द्या.
गार झालेले मिश्रण मिक्सर मधून बारीक करून घ्या.
सेपेन चटणी स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून गरम गरम मोमोज सोबत खायला घ्या!
अहाहाहाहाहा!!!
मस्तच!
फार तिखट होते का ही?
अर्थात कुठल्या मिरच्या घेताय त्यावर अवलंबून आहे. हि खास मोमोज बरोबर खायला देतात, त्यामुळे थोडी तिखट असते (मोमोज ची चव थोडी ब्लाँड (subtle) असते म्हणून.
:)
टिकते का हि चटणी ?
फ्रिज बाहेर टिकेल. पण दिलेल्या मापात केलेली चटणी मोमोज सोबत फार उरणार नाही :-)
केडी सर,
सेपेनची अस्सल पहाडी तिबेटीयन चव हवी असल्यास तेल तिळाचे वापरावे असे सुचवतो मी,स्मोकिंग पर्यंत गरम करून (तिळाचे तेल) मग इतर कृती केली की अजून बहारदार खमंग अन जबरी तिखट सेपेन तयार व्हावी :)
करण्यापेक्षा शेवटी वरून एक चमचा तिळाचं तेल घातलं कि छान लागतं.
तोंपासु!
खरच तोंपासु.
करून बघायला हरकत नाही.
बाबा पंखेश्वर
भारी!! तिखट कितपत झेपेल याचा विचार करता गप्प बसावे.
नक्की करून पहाणार.
मी तिळाच्या तेलात करणार.
नक्की करणार!
कांदा घातलाय. लगेच संपवायला लागणार ना ही? बाकी मोमोजबरोबर असली झणझणीत चटणी, रिपरिप पाऊस आणि मस्त रहस्यकथेचं पुस्तक पाहिजे.
- उमर - ए - आझम.
( चटणीची कृती आपल्या वेब साईट वरून घेऊन ) गेल्याच आठवड्यात केले. ऑफिस मध्ये सर्वांना ( आणि अर्थातच मलाही) खूपच आवडले.
स्टफींगचे फोटो काढले पण नंतर काढायची विसरले. मी स्टफींगमध्ये बारीक चिरून फरसबी आणि फ्लॉवरही घातला होता. :)
पुढल्या वेळी फोटो नक्की टाका. फरसबी आणि फ्लॉवर ची कल्पना पण छान आहे.
छान
केदार सर,
सदर रेसिपी मला, शेजवान सॉस ची जुळी बहीण वाटते.
अवांतर, तुमचे मिपा नाम परत केदार दीक्षित करा, के डी, म्हटल्यावर खडकी-दापोडी डोळ्यापुढे येतं
Rx,
दर विकांती "अदालत" शिरेल पाहणेचे करावे!
धन्यवाद.लय भारी.
नक्की तेलंच वापरायचं ना? कुठचं वापरायचं? तिबेटी चटणी आहे म्हणून विचारलं. का याक चं लोणी वापरायचं?