Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सायकल कट्टा - पुणे - २७ ऑगस्ट २०१६

म
मोदक
Sat, 08/27/2016 - 16:21
💬 28
बर्‍याच महिन्यांपासून ठरत असलेला सायकल कट्टा आज पुण्यात पार पडला. प्रत्येक वीकांताला कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या राईडमध्ये बिझी असल्याने एकत्र भेटीचा योग येत नव्हता. घमासान चर्चा आणि फोनाफोनी होवून शेवटी पुण्याचा कट्टा शनिवारी सकाळी ठरलाच.. ग्रूपवर ठरल्याप्रमाणे ज्यांना जमणार आहे ते सायकलवीर सायकल चालवत चांदणी चौकात जमणार.. आनंदराव बुलेट आणि कपिलमुनी कारमधून येणार असेही ठरले. पुपेंसाठी (पुण्याचे पेशवे) ठिकाण जवळच असल्याने ते डायरेक्ट मल्टीस्पाईसला भेटणार होते. मी सकाळी सकाळी स्वच्छ उजेडात बाहेर पडलो आणि अर्धा पाऊण तासात चांदणी चौकात पोहोचलो. तेथे सागर, अभिजीत आणि प्रशांत मालक भेटले. (विशेष म्हणजे सगळेजण अगदी वेळेवर पोहोचले. माझ्यासह..!!) चांदणी चौक नेहमीप्रमाणे वाहनांनी ओसंडून वाहत होता. . चांदणी चौकातच जाज्वल्य अभिमानाचा एक ठसठशीत लिखीत पुरावा दिसला. . एकत्र भेटून आरामात गप्पा मारत मारत सगळेजण कर्वेनगरकडे सायकल हाणू लागले. प्रशांत चिंचवडहून, मी आणि अभिजीत सिंहगड रोड वरून तर सागर सकाळी कोंढव्यातून निघून प्रभात रोडला १ तास पोहणे आवरून आंम्हाला भेटायला चांदणी चौकात आला होता. कर्वेनगरात सायकलवर सागर.. मागे प्रशांत आणि अभिजीत. . वरच्या फोटोत अस्पष्ट दिसणारे प्रशांत आणि अभिजीत.. . मल्टीस्पाईसला पोहोचलो.. तेथे सायकली कुठे पार्क करायच्या यावर तिथले वेटर साहेब आणि आमच्यात चर्चेच्या फेर्‍या पार पडू लागल्या. आंम्हाला सायकली आमच्या समोरच हव्या होत्या.. आणि वेटर साहेब नकार देत होते. शेवटी आंम्ही सुचवलेली बरीच ठिकाणे हाणून पाडून त्यांनी आंम्हाला टू व्हीलर एरीयामध्येच सायकल पार्क करायला लावली. मग आम्हीच सायकल नजरेआड होणार नाहीत अशी टेबले बघितली. . बसल्या बसल्या सहज सागरची खेचण्यासाठी मी त्याला सांगितले की "आंम्ही, सायकली आणि तू येशील असा सेल्फी काढ" सागरने खरंच सेल्फी काढला.. . "इतक्या उंच माणसाला काय सेल्फी स्टिकची गरज नाही" असा शेरा जाता जाता प्रशांतने मारला यावर सागरने त्याच्या साईजची सायकल शोधायला किती त्रास झाला ते वर्णन करून सांगितले. आंम्ही एकंदर मेन्यू पाहून खादाडी सुरू केली.. . टोंमॅटो आम्लेट, त्यावर पराठा, वाटीत व्हेज खिमा, ब्रेड कटलेट, पालक चीज चिली टोस्ट, पपई, चहा आणि फोटोत न आलेले मँगो मूस असा जंगी बेत होता. तितक्यात पुपेंचे आगमन झाले. त्यांचा रणगाडा आणि त्याला येणार्‍या समस्या यावर त्यांनी माहिती द्यायला सुरूवात केली. . आसपासच्या केलेल्या राईड्स, औरंगाबादचे उत्साही सायकलवीर मिपाकर, लातूरहून एकटेच खिंड लढवणारे मानस चंद्रात्रे असे वेगवेगळे विषय सुरू होते. मध्येच मी मानस साहेबांना फोन लावला.. त्यांच्याशी गप्पा झाल्या. कपिलमुनी रस्ता चुकून डेक्कनच्या मार्गाला लागले होते. त्यांना योग्य रस्त्यावर आणण्यात थोडा वेळ गेला. कपिलमुनी एकदाचे पोहोचले. त्याच दरम्यान आनंदरावही येवून पोहोचले. नकुल आला होताच. कोरम पूर्ण झाला. मग खादाडी आणि चर्चांना ऊत आला.. एकाच वेळी वेगवेगळे विषय, एकच विषय, दोघा चौघांमध्ये सुरू असलेले असे चर्चांचे अनेक प्रकार सुरू होते. सायकल, बुलेट, लेह लदाख, कपिलमुनींची जुनी थंडरबर्ड, कोकणयात्रा, आगामी कोकणयात्रा असे अनेक विषय सुरू होते. अधून मधून फोटोग्राफी सुरू होतीच.. ओळखपरेड डावीकडून : प्रशांत, अभिजीत, पुपे, आनंदराव, कपिलमुनी, नकुल, मोदक आणि सागर. . . १० च्या दरम्यान वेटर साहेब आता शेवटची ऑर्डर आहे असे सांगून गेले. पालक चीजचिली टोस्टवर विशेष उड्या पडत होत्या. गप्पा रंगल्या आहेत हे बघून आणखी एक एक कप चहा ऑर्डर न देता मिळाला... पुन्हा गप्पांचा फड रंगला. काम असल्याने नकुल थोडा लवकर निघाला. त्यानंतर बराच वेळ आणखी गप्पा हाणून सायकलच्या माहीतीची देवाणघेवाण करण्यासाठी आंम्ही टेबले सोडली व पार्किंग लॉटकडे मोर्चा वळवला. येथे प्रशांतने ग्रूप फोटो काढण्यासाठी गार्डला तयार केले तोच त्याच्या कामाची गाडी आल्याने तो पसार झाला मग एक काका बराच वेळ फोनवर बोलत होते त्यांचे झाल्यावर फोटो घेण्यासाठी आंम्ही त्यांना विनंती केल्यावर "एक का.. दोन फोटो घेतो की" असे सौजन्याने सांगून काकांनी सुखद धक्का दिला. . शेवटी उभ्याउभ्याच बरेच वेगवेगळे विषय चघळून आणि पुढील राईडचे प्लॅनींग करून १२ वाजता नाईलाजाने कट्टा आवरता घेतला.

प्रतिक्रिया द्या
9689 वाचन

💬 प्रतिसाद (28)
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 08/27/2016 - 16:31 नवीन
प्रशांत खूप दिवसांनी भेटला. बरं वाटलं. बाकी सगळ्या नवीन ओळखी आनंददायी होता. मजा आली.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 08/27/2016 - 16:43 नवीन
वाह! फोटोंखाली जरा ओळखपरेड होऊन जाऊद्या की.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 08/27/2016 - 19:58 नवीन
एका फोटो वर दिली आहे की ओळखपरेड..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अरिंजय Sat, 08/27/2016 - 16:58 नवीन
फार छान वर्णन. वाचुन मजा आली. संधी हुकल्यासारखं वाटतंय. सर्वांना समक्ष भेटण्याची ईच्छा होत आहे.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 08/27/2016 - 17:04 नवीन
प्रशांत खूप दिवसांनी भेटला. बरं वाटलं. बाकी सगळ्या नवीन ओळखी आनंददायी होता. मजा आली.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sat, 08/27/2016 - 17:27 नवीन
प्रत्येकाने हव्या असलेल्या ठिकाणची रिक्षा पकडून दाखवायची ! बाकी ऐड्या भारी आहे राव सायकल कट्ट्याची...मोदकशेट इथंही करा काहीतरी..
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Sat, 08/27/2016 - 17:31 नवीन
मला वाटल सायकली घेऊन लांब गेला असाल? पण खतरुडातच थांबलात. बाकी बे फा बघून परत भूक लागली.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/27/2016 - 18:01 नवीन
करा लेको मजा खा मटाराची उसळ आणि शिकरण जळजळ झाली आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 08/29/2016 - 16:57 नवीन
ओ साहेब कंजुस काका स्पा , अजया याना घेऊन तुम्ही पण एक सायकल ट्रीप करा की ! मग खा काजुची उसळ खा फ्रूट सालाड असे आम्हीही म्हणू !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
स्थितप्रज्ञ Sat, 08/27/2016 - 21:01 नवीन
या ग्रुप चे मेम्बर भारी, त्यांच्या सायकली भारी....च्या मायला हा ग्रुपच लै भारी!!!
  • Log in or register to post comments
श
शलभ Sat, 08/27/2016 - 21:14 नवीन
झकास कट्टा.. आणि मस्त वृत्तांत..
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज Sun, 08/28/2016 - 08:35 नवीन
मोदक भौ, वृत्तांत आवडल्या गेला आहे. आणि मानस भौच्या दुकानातून (पोटात होणारी) जळजळ यावर औषध मागविण्यात आलेले आहे. आता एखादा कट्टा आमच्या मराठवाड्यात घ्यावाच लागणार. बाबा योगीराज.
  • Log in or register to post comments
अ
अरिंजय Sun, 08/28/2016 - 18:44 नवीन
आणि बाहेरुन पाठींबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज
आ
आनंदराव Sun, 08/28/2016 - 19:12 नवीन
चला औरंगाबाद चा कट्टा ठरवा
  • Log in or register to post comments
आ
आनंदराव Sun, 08/28/2016 - 19:13 नवीन
चला औरंगाबाद चा कट्टा ठरवा
  • Log in or register to post comments
आ
आनंदराव Sun, 08/28/2016 - 19:14 नवीन
चला औरंगाबाद चा कट्टा ठरवा
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 08/28/2016 - 21:34 नवीन
वा! बर्‍याच लोकांची तोंडोळख जाहली...
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 08/29/2016 - 06:32 नवीन
मानवलेले दिसतेय. एक वेगळा कट्टा. प्रशांत सायकल प्रेमी(ही) आहेत हे प्रथमच कळले. पुपे नवीन मिपाकरांना भेटण्यास आवरजून आले हे मस्तच. वृत्तांत आणी चायाचित्रे उत्तम
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Mon, 08/29/2016 - 07:01 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
अ
असंका Mon, 08/29/2016 - 07:13 नवीन
आनंदराव....एकदम टकाटक!! मस्त मजा केलेली दिसतीये भावा....!!
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Mon, 08/29/2016 - 07:59 नवीन
लै मजा करता राव तुमी, आमास्नी वाचाया जर यवढी मजा येत आसल तर... तुमच काय.... असच कायबाय करत र्‍हावा आनी आमास्नि वाचाया द्या...
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 08/29/2016 - 08:17 नवीन
हा बुफे ब्रेकफास्ट होता काय? तिथे छान असतो ब्रेकफास्ट असं ऐकलं आहे.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Mon, 08/29/2016 - 13:48 नवीन
दुष्ट मनुष्य आहेस. श्रावण चालु आहे उपवासाला असलं काही काही दाखवुन जीव का बरे जाळत आहेस?????
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 08/29/2016 - 14:27 नवीन
सायकलींगचा हुरुप आला अवांतर : जुनी थंडरबर्ड नाही "अँटीक" थंडरबर्ड आहे ती ! चलाओ तो जानो
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 08/30/2016 - 13:36 नवीन
ह्यायला कप्या, गाडीइतकाच वजनदार व्यक्तीमत्व हैस की. प्रशांतमालक दिसले. बरे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
पद्मावति Tue, 08/30/2016 - 12:24 नवीन
मस्तं वृत्तांत!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 08/30/2016 - 13:34 नवीन
आवडला...
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 08/31/2016 - 08:03 नवीन
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा