पावसाची रुपे
नभांसवे वा-याची नवी तान घुमली
जलधारांच्या नादसंगिताची साथ लाभली
डबक्यातल्या पाण्यात होडी डुलू लागली
निरागस पावसात ती कैकवार डोलली
शोधार्थ त्याच्या ती ही बाहेर पडली
जिची छत्र्ी मुद्दामच होती विसरलेली
खट्याळ पावसात ती जास्तच भिजली
गालावरील आसवे सर्वांपासुन लपुन राहिली
एक बाग उदास होती बनलेली
जिथे कैक व्रद्ध जोडपी होती विसावलेली
एक सरी त्या जोडप्यावरही बरसली
भुतकाळच्या आठवणीत ती आजही रमली
क्षणोक्षणी ह्या पावसाने रुपे बदलली
परि त्याची साथ न सुटली
💬 प्रतिसाद
(2)
ज
जव्हेरगंज
Sun, 08/28/2016 - 10:10
नवीन
मस्त!!
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
गुरुवार, 09/01/2016 - 07:52
नवीन
सुंदर कल्पना
- Log in or register to post comments