Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झाडावर पाखरू बसलं : लावणी

ग — गंगाधर मुटे, Sun, 08/28/2016 - 19:41
झाडावर पाखरू बसलं : लावणी

पाडाशी आला आंबा बघुनी
आभाळ खुदू खुदू हसलं
चोच टोचण्यास पोपट बघतंय
टक लावून एकतार टपलं
कुणी तरी याssss गं
पोपट धराssss गं
माझ्या धीराचं अवसान खचलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||धृ||

आडून येती, झाडून येती
चहुबाजूला थवेच दिसती
लगट करुनी झोंबाझोंबी
पानाच्या आडोशाला धसती
चोचटोचुनी चोची चरती
माझ्या फळांची खादल करती
कुणी तरी याssss गं
अलग कराssss गं
माझं काळीज चोळीत थिजलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||१||

कलम लावली, खतपाणी दिधलं
कुंपण करुनी जिवापाड जपलं
कुणी ना आलं, पाणी घालाया
खतं टाकाया, कुणी न दिसलं
बहर बघुनी, लाळ गाळती
ताव माराया, अभय चळती
कुणी तरी याssss गं
गोफण धराssss गं
कच्च्या आंब्याला लई बाई पिडलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||२||

                  - गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रिया द्या
9751 वाचन

💬 प्रतिसाद (14)
अ
अनुप ढेरे Mon, 08/29/2016 - 07:30 नवीन
१२ तास आणि एकही प्रतिसाद नाही? पब्लिक आता घाबरतं बहुधा तुमच्या धाग्यांवर प्रतिसाद द्यायला मुटेकाका!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 08/29/2016 - 07:42 नवीन
१२ तासात फक्त ६९ वाचनं आहेत. लोक्स यायला पण घाबरतेत भौतेक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अभ्या.. Mon, 08/29/2016 - 07:45 नवीन
ह्ये जबरदस्त फेटेउडाऊ लावणी. फक्त आमराई राखताना गोफण वापरतेत का म्हाइत नाही.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 08/29/2016 - 11:00 नवीन
है शाबास जोररदार लावनी हाय एकदम फक्कड आवडली म्हणजे एकदम आवडलीच पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Mon, 08/29/2016 - 11:25 नवीन
मस्त जमलीये लावणी..!
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 08/29/2016 - 12:00 नवीन
लिखाण, एखादा चाल लावणारा सापडला तर ताल-लयीत घुमवील या लावणीला. जुने जाणते प्रमोदकाकांनी लावली असती चाल.
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Mon, 08/29/2016 - 14:37 नवीन
फर्मास लावणी...
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 08/29/2016 - 16:34 नवीन
सर्वांना मनपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 08/31/2016 - 02:21 नवीन
मस्त..कडक
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 08/31/2016 - 06:45 नवीन
आज...उन्हात चांदण पडलं गं........ , ह्या गान्याची आटवन जाली ना जी. बाकि लावनी लै ब्येक्कार कडक हाय. लै लै आवाडली बगा.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 08/31/2016 - 12:41 नवीन
जबरदस्त लावणी मुटे काका..!! चाल वगैरे लावली आहे का?
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Wed, 08/31/2016 - 14:25 नवीन
लैच जबरी! आजून पाहिजे...
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी गुरुवार, 09/01/2016 - 07:41 नवीन
जबरदस्त.... फक्त एक प्रश्न... दीधल... हा शब्द गावरान भाषेच्या लावणीत बसतो का?
  • Log in or register to post comments
न
निनाव Mon, 09/12/2016 - 22:07 नवीन
बेजोड !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा