बरे नाही
टपोरे पाणीदार नयन, त्यावर रेघ काजळाची,
वर असे रोखून बघणे, बरे नाही
*
भिवया कोरलेल्या, शर नजरेचे घातक
ह्या पारध्यास,असे घायाळ करणे, बरे नाही
*
ओष्ट पाकळ्या गुलाबी,खट्याळ हास्य शराबि,
बहकवलेल्यास, बहकावणे साजणे, बरे नाही
*
रेशमी कुंतल,त्यावर गजरा,काय नखरा,
लाविली आग,अंगास फुलांनी, हे, बरे नाही
*
गुलाबी रेखीव जिवणी, त्याचे विभ्रमी चाळे
होतो जीव चोळा मोळा, असे करणे बरे नाही
*
तुझे अल्लड वय,वाट अशी नीसरडी
अस भेटणं वेळी अवेळी,प्रिये बरे नाही.
*
खवळला तो सागर, सुटले पिसाट वारे
तरी लोटतेस होडी वादळात ,सखे बरे नाही
💬 प्रतिसाद
(9)
अ
अभ्या..
Wed, 08/31/2016 - 08:34
नवीन
मला पण आज जरा बरे नाही.
डेबायडे अकुकाका बीइंग गुलाबी हं.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 08:36
नवीन
गुलाबी का हिरवट?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 08/31/2016 - 08:39
नवीन
बरं बाबा, पिवळसर
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 08:40
नवीन
तो रंग दुसर्यांकडे राखीव आहे.
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Wed, 08/31/2016 - 08:38
नवीन
शेवटचे कडवे वाचून लै ब्येक्कार काही तरी आठवले आहे.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 08/31/2016 - 08:40
नवीन
नीच मास्तराने सॉलिड काडी/होडी सारली आहे.
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 08/31/2016 - 09:10
नवीन
(गूणी)मास्तर चित्रदर्शी आहेत याचा अनुभव आहेच.
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
गुरुवार, 09/01/2016 - 07:39
नवीन
छान आहे कविता.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/01/2016 - 07:42
नवीन
काका चक्क जीवणीखाली न सरकल्याच्या अत्यानंदात आज काकांचा जाहीर सत्कार शनिवारवाड्यावर करावा असा प्रस्ताव मांडतो =))
- Log in or register to post comments