Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझीच मी...

आ — आनंदमयी, Wed, 08/31/2016 - 20:48
शुभ्र कोऱ्या चांदव्याशी हासले माझीच मी धुंद हळव्या शब्दगंधी गुंतले माझीच मी.. लाख स्वप्ने गुंफुनी मी बांधली तारांगणे उसवता अलवार टाका उसवले माझीच मी सौख्यसमयी भोवताली लाख होते सोबती आणि दु:खाच्या घडीला सोबती माझीच मी हाय तू तुडवून जाता दूर प्रीतीची फुले त्या फुलांच्या अत्तरासम बहरले माझीच मी मतलबी सारेच येथे, नाहि कोणाचे कुणी मुखवटे नुसते सभोती, शेवटी माझीच मी! © अदिती

प्रतिक्रिया द्या
2615 वाचन

💬 प्रतिसाद (12)
च
चाणक्य Wed, 08/31/2016 - 21:17 नवीन
छान झालीये.
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 08/31/2016 - 21:21 नवीन
आवडली.. छान :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी गुरुवार, 09/01/2016 - 07:09 नवीन
धन्यवाद _/\_
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी गुरुवार, 09/01/2016 - 07:17 नवीन
सुंदर... खूप आवडली
  • Log in or register to post comments
र
रातराणी गुरुवार, 09/01/2016 - 07:35 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 09/01/2016 - 07:45 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
च
चिनार गुरुवार, 09/01/2016 - 07:55 नवीन
छान !!
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 09/01/2016 - 11:39 नवीन
हाय तू तुडवून जाता दूर प्रीतीची फुले त्या फुलांच्या अत्तरासम बहरले माझीच मी हे फार आवडलं. सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर गुरुवार, 09/01/2016 - 11:41 नवीन
सगळे अगदी मनातले शब्द आहेत...
  • Log in or register to post comments
प
पथिक गुरुवार, 09/01/2016 - 12:15 नवीन
सुंदर..!
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी Fri, 09/02/2016 - 15:49 नवीन
:) धन्यवाद
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 09/02/2016 - 16:01 नवीन
छान
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा