Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ईच्छा

प — पथिक, Fri, 09/02/2016 - 07:38
चांदण्यात एकदा न्हायचंय मला ताऱ्यांच्या गावाला जायचंय मला वेळूच्या बनात दूर किर्र रानात गातो जे गीत वारा, गायचंय मला रात्रीच्या काळोखात नदीच्या पात्रात सोडलेल्या दिव्यासंगे वाहायचंय मला अंधारात सुगंधाचा मागोवा घेत घेत स्वप्नांच्या गावाला जायचंय मला माझ्यात जो खोल खोल बसलाय दडून त्याचा रूप एकदा पहायचंय मला

प्रतिक्रिया द्या
2066 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ज
ज्योति अळवणी Fri, 09/02/2016 - 16:39 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments
न
निनाव Tue, 09/13/2016 - 08:21 नवीन
"माझ्यात जो खोल खोल बसलाय दडून त्याचा रूप एकदा पहायचंय मला" -- खूपच सुन्दर कल्पना!
  • Log in or register to post comments
आ
आनंद Tue, 09/13/2016 - 08:30 नवीन
मंगेश पाडगावकर ही कविता ऐकवत आहेत अशी कल्पना करुन ऐकली. मस्त.!!
  • Log in or register to post comments
न
निनाव Tue, 09/13/2016 - 08:32 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद
प
पथिक Tue, 09/13/2016 - 17:07 नवीन
मंगेश पाडगावकर ही कविता ऐकवत आहेत अशी कल्पना करुन ऐकली.
बापरे ! कुठे लपू मी !? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद
प
पथिक Tue, 09/13/2016 - 17:06 नवीन
धन्यवाद आनन्द, निनाव !
  • Log in or register to post comments
प
प्रभास Tue, 09/13/2016 - 20:53 नवीन
सुंदर...!!! खूपच छान!!! अप्रतिम!!! तुमच्या अत्युत्कृष्ट रचनांपैकी एक म्हणावी लागेल!!! थोडेसे स्वयंशोधनाकडे वळलात की काय पथिकभाऊ? :)
  • Log in or register to post comments
प
प्रभास Tue, 09/13/2016 - 20:58 नवीन
शीर्षक थोडंसं चुकलं असं वाटतंय... अजिबात अपील होत नाहीये... पण तुमच्या नावाचा दराराच असा आहे की धागा वाचल्याशिवाय राहवलं नाही... आणि खरंच काव्य अत्युत्तम उत्कृष्ट आहे... खरंच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभास
प
प्रभास Tue, 09/13/2016 - 21:01 नवीन
शीर्षकाबाबत थोडेसे दक्ष रहा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभास
प
पथिक Wed, 09/14/2016 - 11:19 नवीन
मलासुद्धा हे शीर्षक पटलं नाही. आळस केला.. ईतकी प्रशंसा बांधून कससंच वाटतंय हो... कारण मला मी त्यायोग्य वाटत नाही.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभास
प
पथिक Wed, 09/14/2016 - 11:17 नवीन
थोडेसे स्वयंशोधनाकडे वळलात की काय पथिकभाऊ?
दिंडी गेली पुढे, अर्ध्यात मी अडे.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभास
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा