Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी संस्थळे : एक अभ्यास

झ
झपाटलेला फिलॉसॉफर
Fri, 09/02/2016 - 09:24
🗣 11 प्रतिसाद
मी गेली ७ वर्षे विविध मराठी संस्थळे जवळून पहात आहे . त्यात काही संस्थळावर सदस्य म्हणून तर इतरत्र रोमात वावरताना मी खालीलप्रमाणे ट्रेन्ड्स किंवा आयडीज चे वर्गीकरण केले - १. अभ्यासू व तज्ज्ञ -यामध्ये खरोखर एखाद्या विषयाचा सखोल माहितीपूर्ण अभ्यास करून विविध विषयावर लेख लिहिणारे . उदा. आर्किओलॉजी / टेक्नॉलॉजी / आर्मी / अर्थकारण / अध्यात्म इ. २. भटक्या जमाती यामध्ये विविध देशांचे पर्यटन अथवा ट्रेक्स/भटकन्ती यांची प्रवासवर्णने लिहिणारे ३. स्युडो-स्पिरिच्युअल- यांचे अध्यात्म हा एक भ्रम अथवा न फुटलेले बिंग असते . उगाच कुठल्यातरी बाबा-बुवाचे ढोल बडवण्यात ही मंडळी दंग असतात ४. संघ-भाजपा-हिन्दुत्ववादी /मोदीभक्त ह्याच्या अधिक स्पष्टीकरणाची आवश्यकता नसावी ५. स्युडो सेक्युलर अथवा फुर्रोगामी हे सहज ओळखू येतात . कोणत्याही विषयावर संघ-भाजपा-हिन्दुत्व/मोदी विरोधी भूमिका घेवून भारतीय संस्कॄती /इतिहास /धर्म /परंपरा यांची टिन्गल टवाळी / निन्दा / खिल्ली उडवणे ६. मनोरुग्ण / डिप्रेस्ड - हे वैयक्तिक आयुश्यातील अपयश अथवा फ्रस्ट्रेशन संस्थळावर येवून काढत असतात अथवा काहीतरी बिनडोक्/बाळबोध प्रतिसाद अथवा धागे काढून संस्थळाची बॅन्डविड्थ वाया घालवत असतात . ७. निर्लज्ज नव-मत-वादी - हे सेक्स सारख्या वैयक्तिक विषयावर जाहीर आणि नको तितके/ नको ते जाहीरपणे मत व्यक्त करत फिरतात ८. प्युअर ट्रोल ९. सामान्य मूकवाचक १०. प्युअर टाइमपास म्हणून संस्थळावर येणारे / भेट देणारे ११. गॄहिणी - देशस्थ्/परदेशस्थ हाउसवाइफ आपण यापैकी कोणत्या प्रकारात मोडतो ,हे प्रत्येकाने गम्भीरपणे विचार करून ठरवावे असे मला वाटते. त्याचप्रमाणे याखेरीज अन्य कोणत्या कॅटेगरीज असतील तर त्या इथे सांगाव्यात .

प्रतिक्रिया द्या
2504 वाचन

💬 प्रतिसाद (11)
स
संन्यस्त खड्ग Fri, 09/02/2016 - 09:37 नवीन
लयी जबरा अभ्यास दिसतोय तुमचा भावू
  • Log in or register to post comments
स
सतिश रानडे Fri, 09/02/2016 - 10:44 नवीन
आपण संस्थळा ची यादी दिली असती तर इतर वाचकांना बरे वाटले असते.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 09/02/2016 - 11:54 नवीन
यापैकी तुम्ही कोण?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 09/02/2016 - 12:20 नवीन
१ काडी सारक २ मज्याशी मयतरी कर्नार कं हे दोन समुदाय राहिले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मारवा Fri, 09/02/2016 - 12:00 नवीन
बाजीचा-ए-अत्फाल कॅटेगरी मला सर्व कॅटेगर्‍या माहीत आहेत असा एक तीव्र अभिनिवेष असलेला. मी सर्व कॅटेगर्‍याना पुरुन उरलोय मी सर्व कॅटेगर्‍या कोळुन प्यायलोय मी सर्व कॅटेगरीजच्या पलीकडे गेलोय आणि इथुन उंचावरुन फार उंचावरुन खोल दरीत ती चालणारी शुद्र मानवांची धडपड मोठ्या मौजेने बघतोय. हे आपण स्वतः किती व्हल्नरेबल आहोत हे सोयिस्कररीत्या विसरुन इनफॅक्ट आपण चक्क लॉगिन आहोत व टंकत आहोत हे विसरुन एका बेभान शैलीत अ‍ॅज इफ मेस्मराइज्ड बाय सेल्फ इमेज लिहीतात ते म्हणजे बाजीचा-ए-अत्फाल कॅटेगरी. त्यांना एक भीती ही असते त्याला मीफोबिया म्हणतात. त्याची व्याख्या अशी MEPHOBIA Fear of becoming so awesome, that the human race can,t handle it and everyone dies.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 09/02/2016 - 12:59 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
च
चौकटराजा Fri, 09/02/2016 - 12:27 नवीन
ही मला जिलबी वाटतेय कुणीतरी चित्र टाका जिलबीच्या ताटाचं !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 09/03/2016 - 08:04 नवीन
मलाही चांगली पाकात मुरलेली जिल्बी वाटली. पण चांगली कुरकुरीत आहे. -दिलीप बिरुटे (हलवाई)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
सिरुसेरि Sat, 09/03/2016 - 07:42 नवीन
लेस बांधलेला समुदाय
  • Log in or register to post comments
ए
एक होता गणू Sat, 09/03/2016 - 19:00 नवीन
व्यक्त होणारे... आणि हो खरे सेक्युलर पण असतात बरं का...
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sat, 09/03/2016 - 19:52 नवीन
त्यावर लिहा की. आयडींचे हे प्रकार माहित आहेत आणि अनेक जण वेळ आणि प्रसंग बघून वेगवेगळ्या भूमिका घेत असतात. अत्यंत अभ्यासू लेख टाकणारा आयडी अत्यंत टारगट लेखही टाकू शकतो. त्यामुळे आयडींचं stereotypical profiling करण्याऐवजी मजकुराबद्दल लिहावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा