Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

त्या दोघी.

अ — अंतरा आनंद, Fri, 09/02/2016 - 16:30
त्या घरात दोघी बाया रहातात. एकीच्या पाठीवर पंख आहेत, तर दुसरीच्या पायात पैजण. दोघींना पहाटेची चिकार स्वप्न पडतात, ती स्वप्नं डोळ्यात घेऊनच त्या उठतात. पंखवालीला दिसते शुभ्र आकाश, निळे डोंगर, तर पैंजणवाली बघते सुंदर सजवलेलं नीटस घर. दोघी आपापल्या स्वप्नांना न्याहाळत रहातात, एकमेकींकडे पाठ करून स्वप्नांनाच जवळ करतात. घर बिचारं दमून जातं, पंखांच्या फडफडाटाला छेद देणारा, पैजणांचा छुमछुमाट ऐकत रहातं. दिवस मावळत येतो. पंख दमतात, पैंजण थकतात, दोघीजणी एकमेकींना सामोर्‍या येतात. पंखवालीला वाटतं, आपल्या पंखांचा छुमछुम आवाज व्हावा; तर पैंजणवालीला वाटतो तिच्या पंखांचा हेवा. दोघींच गळ्यात गळे घालतात, एकमेकींना मौनातून समजावून घेतात. पंखांशेजारी पैंजण मान टाकतात, तेव्हा दोघींचे डोळे भरून येतात. त्यांचं घर भिजत रहातं, त्यांच्या आसवांना नाईलाजानं झेलत रहातं.

प्रतिक्रिया द्या
5648 वाचन

💬 प्रतिसाद (46)
ज
ज्योति अळवणी Fri, 09/02/2016 - 16:38 नवीन
अप्रतिम कविता. खूप आवडली. त्यादोघी सासू-सून असू शकतील. भूतकाळ-वर्तमानकाळ असतील, गृहिणी-बाहेर काम करणारी अशीही कल्पना असेल.... मात्र भावना त्याच.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 09/02/2016 - 18:03 नवीन
अप्रतिम कविता!
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Fri, 09/02/2016 - 18:17 नवीन
आवडली. बाईचेच नव्हे तर एकूणच माणसाच्या स्वप्न आणि वास्तव यात होणार्या ओढाताणीचे यथार्थ चित्रण. मनोवेधक प्रतिमा!
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Sat, 09/03/2016 - 11:19 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
अ
अभ्या.. Fri, 09/02/2016 - 18:18 नवीन
वॉव, जबरदस्त!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 09/02/2016 - 18:18 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 09/02/2016 - 18:23 नवीन
कोणीतरी उलगडून सांगावे यातला गहण अर्थ! वाचायला छान वाटली. कळली नाही.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 09/02/2016 - 18:58 नवीन
विथ ऑल रिस्पेक्ट टू अंतरा ताई, हे जव्हेरभाऊसाठी सुलभ जरासे, . . मोडक्या खोपटात राहतेत दोघेजण एक विके रंगीबेरंगी फुगे दुसरा रस्त्यावर रांगोळी काढून जगे दोघाना पहाटेची लैच स्वप्नं पडतात, तीच नजरंत घेऊन ते उठतेत. फुगेवाल्याला दिसतात फुललेले चेहरे न फुगलेले रंग तर रांगोळीवाला रंगातच पाहतो जमीनीवरचे आकार. दोघे आपापल्या स्वप्नांना न्याहाळत रहातात, एकमेकाकडे पाठ करून स्वप्नांनाच जवळ करतात. खोपट बिचारं दमून जातं, फुगल्या फुग्याच्या आकाराना पाहून रंगलेली जमीन पाहात रहातं. दिवस मावळत येतो. फुगे मलुलतात, रांगोळी विस्कटते, दोघे एकमेकांनासमोर येतात. फुगेवाल्याला वाटतं, आपल्या फुग्यांवर अशीच नक्षी उमटावी तर रांगोळीवाल्याला वाटते अलगद रंग हवेत चढावेत. दोघे एकमेकांना हलकेच थोपटतात एकमेकांना मौनातून समजावून घेतात. फुग्याशेजारी रांगोळीचे डबे मान टाकतात, तेव्हा दोघांचे डोळे भरून येतात. त्यांचं खोपट भिजत रहातं, त्यांच्या आसवांना नाईलाजानं झेलत रहातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
ज
जव्हेरगंज Fri, 09/02/2016 - 19:05 नवीन
निशब्द झालो ब्वॉ! खिक्क! मीटर म्हणजे मीटर. लैच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
य
यशोधरा Sat, 09/03/2016 - 10:36 नवीन
खिक्क का? दोन्हीही कविता चांगल्याच आहेत की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
र
रुपी Sun, 09/04/2016 - 01:17 नवीन
हो ना.. खरं तर मलाही फारच आवडली ही पण, पण त्या खिक्कमुळे मला काही अर्थ समजला नाहीये का असे वाटले, त्यामुळे इथे प्रतिसाद देणे टाळलेच. छान हो अभ्या.. भाऊ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
अ
अंतरा आनंद Sat, 09/03/2016 - 04:31 नवीन
क्या बात है|
फुगेवाल्याला वाटतं, आपल्या फुग्यांवर अशीच नक्षी उमटावी तर रांगोळीवाल्याला वाटते अलगद रंग हवेत चढावेत
हे खुपच आवडलं. ही कविता अनाहितात टाकलेली तेव्हा मेन बोर्ड वर टाक असं सांगणार्^यांना शतशः धन्यवाद. नाहीतर एवढं छान रुपांतरण ('विडंबन' या शब्दातला खवटपणा यात नाही )वाचायला नसतं मिळालं. छान असलें तरी फुगे वा रांगोळी हे त्या माणसाच्या जगण्याचे बाह्य भाग आहेत. कवितेतल्या स्त्रीचं तसं नाही. फुगेवाला फिरून दमल्यावर फुगे खुंटीला टांगून त्या परेशानीतून (सोलापुरचे ना तुम्ही?) मोकळा होऊ शकतो. पण तिला पाठीलाच पंख आहेत. ते दमतात तेव्हा ती सुद्धा दमतेच. त्यांचं थकणं हे तिचं खचणं असतं. पैंजणांचंही तसंच. आता नाही पण पुर्वी जोडव्यांएवढंच पैजण हे सौभाग्याचं चिन्ह होतं. आपल्या कुठल्या महत्वाकांक्षेपायी घराचं, मुलांचं नुकसान होत असेल तर स्त्रीला वाईट वाटतं ( ठाम असणार्^या अपवाद.) 'नक्की कश्याची किंमत देऊन काय मिळवतोय?' याचा हिशेब सतत चालतच असतो मनात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 09/03/2016 - 10:21 नवीन
छान असलें तरी फुगे वा रांगोळी हे त्या माणसाच्या जगण्याचे बाह्य भाग आहेत.
मला असा विचार करताच आला नाही. पुलं चे एक वाक्य आहे बघा, एखादा माणूस आलेपाक का विकतो? तसंय ते. आयुष्य का? कसे? असं नाहीच. आहे तेच आयुष्य. फक्त त्याचे अ‍ॅनालिसिस होते त्रुटी जाणवून. सोडता येत नाहीये मूळ. ते जाणवले. बाकी काही नाही. पैंजन परफेक्ट. पण एक रिअलिस्टिक(पैंजन) आणि एक फॅन्टसी(पंख) असा फरक जाणवला म्हणून दोन्ही उदाहरणे रिअ‍ॅलिस्टिक घ्यायचा मी प्रयत्न केला. आपली कविता अप्रतिमच आहे. मिपाबोर्डावर बळेच चांगले म्हणणार्‍यापेक्षा मापे निघतील, एखादेवेळेस दुर्लक्ष होईल पण चांगल्याला वाईट कधी म्हणले जात नाही. म्हणू दिले जातही नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
य
यशोधरा Sat, 09/03/2016 - 10:49 नवीन
पण एक रिअलिस्टिक(पैंजन) आणि एक फॅन्टसी(पंख) असा फरक जाणवला
मला तर वाटले की तेच तर म्हणायचे आहे. काहीसे यिन आणि यांगसारखे. एकाच नाण्याच्या दोन बाजूसारखे.पंख उभारुन उडू पाहणारीला बेड्या मान्य नाहीत, तिची काही जगावेगळी स्वप्नंही असतील, त्यासाठी वाटेत येणारा कोणताही अडथळा ती पार सुद्धा करेल, कोणताही पाश तिला जुमानायचा नाहीये, पण.. तिचे पैंजण - बेड्या नव्हेत, पैंजणच - तिला मागे खेचतात, तिच्या जबाबदार्‍यांकडे खेचतात, ज्या तिने आवडीने स्वीकारल्यात, त्या जबाबदार्‍यांविषयी तिची काहीही तक्रार नाहीये (म्हणून पैंजण, नाहीतर बेड्या म्हटलं असतं का कदचित), त्या तिच्याच आहेत, पण कुठेतरी ह्या दोन विश्वांमध्ये एक किंचितशी दरार आहे - ही दोन विश्वं एकरुप नाही होऊ शकत, एकावेळी सगळंच मिळू शकत नाही, तसं काहीसं. आणि मग, कुठेतरी अपरिहार्य तडजोड, तडजोडी कराव्या लागण्याने मनाची झालेली तडफड. एकूणच मजओपलेपलेल्या दोन्ही विश्वांची झालेली तडफड, नाईलाज.. असे सारे मांडले आहे, असे मला वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
य
यशोधरा Sat, 09/03/2016 - 10:49 नवीन
मनात जोपासलेल्या*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
र
रातराणी Sun, 09/04/2016 - 09:54 नवीन
वा!! आता कळल्यावर कविता अतिशय आवडली! धन्यवाद यशोतै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
पैसा Fri, 09/02/2016 - 18:25 नवीन
अतिशय सुंदर लिहिलंय! अगदी थोड्या शब्दात खूप काही सांगून जाणारं! खूप तरल लिहिलंय. वाचता वाचता इनिगोयची अशीच तरल नक्षी आठवली!
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Sat, 09/03/2016 - 04:31 नवीन
'नक्षी' मस्तच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पगला गजोधर Fri, 09/02/2016 - 19:16 नवीन
माफ करा, पण मला कविता उमजली नाही कदाचित. गेई छंद .... वाली वाटली.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 09/02/2016 - 19:20 नवीन
''गेई छंद'' ह्या शब्दनिर्मीतीची रॉयल्टी माझ्याकडे द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Fri, 09/02/2016 - 19:22 नवीन
''गेई छंद'' ह्या शब्दनिर्मीतीची रॉयल्टी माझ्याकडे द्यावी.
वरील वाक्यात प्राइड जाणवते आहे बरे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Fri, 09/02/2016 - 19:26 नवीन
वरील वाक्यात प्राइड जाणवते आहे बरे !
नाही. वसूलीचा अनुभव म्हणा. चालेल मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
अ
अंतरा आनंद Sat, 09/03/2016 - 04:32 नवीन
गेई छंद
संदर्भ नाही कळला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Sat, 09/03/2016 - 06:02 नवीन
या सदर संज्ञेचे मिपाजनकत्व व स्वामित्व हक्क, यावर अभ्याभो यांनी दावा केलेला आहे, सबब त्यांच्या या शाब्दिक मिळकतीवर भाष्य करण्यासाठी, अभ्याभो यांनी स्वत: पुढाकार घ्यावा. ह घ्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
प
पगला गजोधर Sat, 09/03/2016 - 06:11 नवीन
संदर्भ नाही कळला.
ज्यांना संधर्भ नाही कळला, त्यांनी त्या संज्ञेचा अर्थ (एकूणच) 'आनंदी-आनंद' असा घ्यावा. . . ता.क. 'आनंदी-आनंद' यावर माझी कोणतीही रॉयल्टी नाही ;) सदर संज्ञा प्रताधिकार मुक्त आहे. सर्वजण याचा हवातसा वापर करू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
श
श्रीगुरुजी Sat, 09/03/2016 - 11:14 नवीन
माफ करा, पण मला कविता उमजली नाही कदाचित. गेई छंद .... वाली वाटली.
मला पण तसंच का वाटतंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ए
एस Fri, 09/02/2016 - 19:54 नवीन
वेल, मलाही नाही समजली. (स्वगत- दगड झालोय की काय मी? कशी काय नाही समजली)
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 09/02/2016 - 20:03 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
र
रेवती Fri, 09/02/2016 - 19:59 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
र
रुपी Fri, 09/02/2016 - 20:16 नवीन
छान.. आवडली!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 09/03/2016 - 03:11 नवीन
सुरेख उतरली आहे.
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Sat, 09/03/2016 - 04:34 नवीन
वाचून, आवर्जून प्रतिसाद लिहीणार्‍यांचे धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Sat, 09/03/2016 - 04:40 नवीन
लिहीणार्‍यांना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
स
सिरुसेरि Sat, 09/03/2016 - 05:41 नवीन
छान..छान . शेवट आनंदी /आशावादी हवा होता असे वाटते .
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 09/03/2016 - 10:42 नवीन
कविता फार आवडली.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 09/03/2016 - 11:13 नवीन
कविता वाचल्यावर यात एक अजून वेगळा अर्थ असावा असं वाटतंय. पण तो अर्थ इथे सांगितला तर खूप धुरळा उडेल. तो अर्थ पगला गजोधर यांनी एका प्रतिसादात सूचित केला आहेच. इतरांना तो उमगलेला दिसत नाही. असो. कविता चांगली आहे.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 09/03/2016 - 11:40 नवीन
कविता परत वाचली. पैताईंमुळे कवितेचा अर्थ समजला. दोन्ही रूपकं प्रचंड ताकदीनं उतरली आहेत. फारच छान लिहिलंय. सुंदर. _/\_
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 09/03/2016 - 11:44 नवीन
एका स्त्री ची दोन मनांची ओढाताण छान!
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Sat, 09/03/2016 - 11:56 नवीन
सुरेख कल्पनाविष्कार..
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Sat, 09/03/2016 - 12:31 नवीन
सुंदर कविता .
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 09/03/2016 - 12:32 नवीन
आवडली कविता अतिशय आवडली. अभ्यानी लिहीलेली कविता सुध्दा मस्त आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
व
विशाखा पाटील Sun, 09/04/2016 - 05:57 नवीन
सुरेख! कविता आवडली. मनातलं द्वंद्व छान उतरलंय.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sun, 09/04/2016 - 08:13 नवीन
ताकदीची रचना...
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 09/04/2016 - 19:14 नवीन
अंतराची कविता आवडली होतीच, अभ्याची कविताही आवडली. स्वाती
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Mon, 09/05/2016 - 06:25 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Tue, 09/06/2016 - 17:39 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा