Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मनाचा एकांत - रवा आणि खसखस

श — शिव कन्या, Fri, 09/02/2016 - 20:06
रवा आणि खसखस वेगवेगळे करायची शिक्षा भोगताना, सूक्ष्म नजरेने, एकाग्र चित्ताने, वेचत राहते मन जनामनातले साम्यभेद तासनतास, . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! शिवकन्या

Book traversal links for मनाचा एकांत - रवा आणि खसखस

  • ‹ मनाचा एकांत - ब्लड
  • Up
  • मनाचा एकांत - cursor च्या सुईने ›

प्रतिक्रिया द्या
8740 वाचन

💬 प्रतिसाद (18)
र
रातराणी Fri, 09/02/2016 - 20:13 नवीन
कशाला करायचा वेगळा? चिमण्यांना ठेवायचा खायला ;)
  • Log in or register to post comments
र
रुपी Fri, 09/02/2016 - 20:15 नवीन
छान आहे.. माझा एकांत जरा सध्या चांगला जातो यापेक्षा, पण बर्‍याच प्रमाणात हे खरे आहे. बाकी, रवा आणि खसखस यापेक्षा राजगिरा आणि खसखस वेगळे करण्याची शिक्षा जास्त असे माझे मत ;)
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Sat, 09/03/2016 - 08:35 नवीन
'राजगिरा आणि खसखस वेगळे करण्याची शिक्षा जास्त' - त्यात वरई ही असली तर, संपलंच मग,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
र
रातराणी Fri, 09/02/2016 - 20:15 नवीन
मुक्तक आवडले हेवेसांनलगे :)
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Fri, 09/02/2016 - 20:59 नवीन
तसेच लाडू केले, साखर मिसळून, तर बरे नाही लागणार का? (एक पाक-अज्ञानी निरागस प्रश्न)
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 09/03/2016 - 03:37 नवीन
जरुर! स्वागत आहे. फक्त लाडवात खसखस किती हे शुद्धीवर आल्यावर की विचारु नका! खोडसाळ स्मायली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर
अ
अंतरा आनंद Sat, 09/03/2016 - 04:51 नवीन
फारच छान कविता. खरोखर आपण एकटं असताना वागण्यांचे गुंते मनात सोडवत असतो तेव्हा लक्षात येतं की अतिशय सुक्ष्म फरक असतो . :फार पुर्वी 'कगार' म्हणून एक मालिका लागायची. माणसाची परिस्थिती, वेळ या सगळ्याचा परिपां म्हणून घटना घडत असतात. यापैकी काही थोडंही बदललं तर एखादी आधी घटनाही भयानक स्वरूपाच्या अनेक शक्यता पोटात बाळगून असते; या थीमवर आधारीत. आपलेच विचार काही जनातल्या समजुतींवर तर काही मनाच्या समजुतींवर आधारित असतात. त्यातला फरक ओळखत रहाणं आणि आपलं एखादं वागणं हा कुठल्या विचारांचा परिपाक होता हे समीकरण सोडवण्यात तासन तास जातात.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sat, 09/03/2016 - 07:27 नवीन
शीर्षक फक्त 'रवा आणि खसखस' एव्ढेच पाहीजे होत. सध्याच्या शीर्षकामुळे शेवटचा पंच हुक्लाय.
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 09/03/2016 - 07:36 नवीन
एकांतात असताना काय करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एकांतात असताना लोकांचा कशाला विचार करायचा ? फक्त आपला आणि आपल्या प्रिय व्यक्तिचा करायचा. म्हणजे लाडु आणि त्यातील बेदाणा वेगळा करायला कष्टही होणार नाहीत.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 09/03/2016 - 09:08 नवीन
खवा आणि खरवस जेवणात एकत्र खायची मजा लुटताना बुभुक्षीत नजरेने, एकाग्र चित्ताने, वेचत राहतो मी ताटातला कणन कण तासनतास, . . . दुसरं काय असत हावरटपणा म्हणजे तरी! भीमपुत्र पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रभास Sat, 09/03/2016 - 09:51 नवीन
माऊली माऊली... __/\__ पैजारबुवांच्या प्रतिसादांचा पंखा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
पैसा Sat, 09/03/2016 - 09:52 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
अ
अजया Sat, 09/03/2016 - 10:40 नवीन
=)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 09/03/2016 - 09:46 नवीन
गुढ...आहे
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 09/03/2016 - 09:59 नवीन
गूळ आणि खसखस अकराच्या पटीत मोजायची शिक्षा भोगताना, दीनवाण्या नजरेने, हरवलेल्या वित्ताने, वेचत राहते मन लग्नाआधी आणि नंतरचे साम्यभेद तासनतास, . . . दुसरं काय असतो अधिकमास म्हणजे तरी! अनारसे खाताना (दाताच्या कन्या) करणारा जावई
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 09/03/2016 - 10:52 नवीन
अनारश्या बरोबर चांदीचे ताट नव्हते वाटत? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रभाकर पेठकर Sun, 09/04/2016 - 08:10 नवीन
सतत 'जनमनातील साम्यभेद' शोधत राहिल्याने विचारांमध्ये परिपक्वता येते. हाही फायदाच आहे. मग त्याला शिक्षा का माना? शिक्षण मानूया की. (अर्थात शालेय शिक्षण ही सुद्धा एक शिक्षाच वाटायची, हिंदीत उगीच नाही त्याला 'शिक्षा' म्हणत).
  • Log in or register to post comments
म
मारवा Sun, 09/04/2016 - 12:01 नवीन
छान आहे कविता किती कमीत कमी शब्द वापरत टोकदार केलेली आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा