Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

घाटवाटांची सायकल राईड - v2.0 - ताम्हिणी घाट (भाग ३) - समाप्त.

म
मोदक
Fri, 09/02/2016 - 20:53
💬 22
***************************** भाग १ - कुंभार्ली घाट भाग २ - कशेडी घाट ***************************** माणगांवला सकाळी उठलो.. आवरले. किरणने जाहीर केले की त्याला बरे वाटत नाहीये, हातही सुजला आहे त्यामुळे बहुदा तो वाटेतून टेम्पो घेईल. आजचे टारगेट होते ताम्हिणी घाट. अनेकदा सायकलने माणगांवला उतरून, अनेकदा ताम्हिणी, डोंगरवाडी वगैरे गावांना भेटी देवूनही आम्ही ताम्हिणी घाट कधीही सलग एका दिवसात पूर्ण केला नव्हता. ऊन, अपघात, कंटाळा आणि आळस अशा अनेक कारणांमुळे दर वेळी ताम्हिणी घाटातून परत येताना टेम्पो पकडूनच आलो होतो. आज मात्र काहीही झाले तरी ताम्हिणी घाट पूर्ण मारायचाच्च असे ठरवले होते. माणगांव ते निजामपूर थोडा चढ थोडा उतार असा रस्ता आहे. फारसा त्रास न होता सलग वेगात सायकली पळत होत्या. . अधूनमधून हलका हलका पाऊस पडत होता. आजुबाजूला हिरवळीची सोबत होतीच. . . . वाटेत एक नदी लागली.. थोडे ऊन पडले होते. . . येथे नदीपात्रात एका दगडाला कोणीतरी हार घालून ठेवला होता. त्या हार घातलेल्या ठिकाणी एखादा आकार दिसतो आहे का ते थोडावेळ बघत बसलो.. नंतर अमित आणि किरण आल्यानंतर पुन्हा पुढे निघालो.. . मध्येच जोरदार पावसाची सर येवून गेली. भिजलेला चकचकीत रस्ता. . . निजामपूरला पोहोचलो. सर्वप्रथम एक मेडीकल शोधले. किरणसाठी मूव्हचा स्प्रे घेतला. लगेचच त्याच्या सुजलेल्या हातावर मारला. निजामपूरच्या नेहमीच्या हॉटेलची क्वालिटी बिघडली आहे असे अनेक फीडबॅक मिळाल्यामुळे नाष्टा करायला वेगळे हॉटेल शोधले. पोहे, आम्लेट पाव अशा ऑर्डरी सुटल्या. नाष्टा आवरून सायकली विळा MIDC कडे वळवल्या तोच या आजोबांचे दुकान दिसले. . . मग उगाचच त्या ढोलक्यांवर टांग टांग असे बोट बडवून परत सायकलवर स्वार झालो. थोड्याच वेळात विळा MIDC भागात आलो. अमित आणि किरण येत होतेच. या MIDC चा रस्ता सरळसोट म्हणजे अगदी पट्टीने आखल्यासारखा आहे. मग पॉस्कोच्या भल्यामोठ्या प्लँट समोर उगाचच क्लिकक्लिकाट केला.. . . . . पुणे आणि कोलाडच्या नाक्यावर तिघेजण पोहोचलो.. किरणने "मी येथून टेम्पो घेतो" असे जाहीर केले. या पठ्ठ्याने सुजलेल्या हातासह २५ किमी सायकल चालवली होती. आता ताम्हिणी घाट खुणावत होता.. . वल्लीशेठ - ही कुठली लेणी आहेत का हो..? . कशेडी घाट चढताना पाऊस होता त्यामुळे फार त्रास झाला नव्हता.. इथे ताम्हिणी घाट चक्क कोरड्या वातावरणात आणि उन्हात चढायची चिन्हे दिसत होती. . . एक धबधबा सामोरा आला.. . धबधब्यासमोर थोडा क्लिकक्लिकाट केला.. अमित. [ हा फोटो पोझ देवून काढलेला नाही. ;) ] . मी. . ऊन आणि चढामुळे आलेला थकवा धबधब्यामध्ये भिजून घालवल्यानंतर आम्ही पुन्हा सायकली चालवू लागलो. . आणखी एक धबधबा.. . शारूक.. (अमित) . या फोटोमध्ये निळे छत दिसत आहे तो पॉस्कोचा प्लँट आहे. आम्ही इतके अंतर चढून वर आलो होतो. . राकट देशा.. कणखर देशा.. दगडांच्या देशा.. . मी पुढे गेलेल्या अमितला मागे बोलावून हा फोटो काढला. . येथे रस्त्यावर एक साधेसेच फुलपाखरू निवांत बसले होते. त्याच्यावर साध्या कॅमेर्‍याने मायक्रो फोटोग्राफीचे प्रयोग केले. . थोडे पुढे आल्यानंतर बघतो तोच अमित एका भुभुला काहीतरी देत होता. आणखी जवळ आलो तर लक्षात आले की अमित त्याला राजगिरा लाडू खायला घालायचा प्रयत्न करत होता. यापूर्वीच्या कोकणराईडमध्ये राजगिर्‍याचा अतीरेक झाल्याने मी परत राजगिरा खाल्ला नाहीच. वर अमित त्या भुभुला लाडू खायला घालायचा प्रयत्न करत होता. मी यावर अमितला टोमणे मारले व पुढे निघून गेलो. अमितने त्याला दुसरा लाडू यशस्वीरीत्या खायला घातला आणि नंतर ते भुभु अमितच्या मागे मागे जावू लागले. अमितने त्या भुभुसोबत काढलेला हा धमाल सेल्फी व्हिडीओ.. ते भुभू असे आमच्या मागे येत होते. . अमित.. भुभु आणि फोटोग्राफर मी. . पाऊस गायब झाला होता आणि घाटात हिरवळीचे राज्य होतेच . याच रस्त्यावरून आम्ही वर आलो होतो. . . घाट चढवायचा कंटाळा आल्यानंतर आम्ही चालत चालत थोडे अंतर पार केले. . वाटेत रस्त्यावर ताजी ताजी दरड कोसळली होती. . रस्त्यावर एखादा खड्डा दिसत होता. . अन्यथा रस्ता एकदम मख्खन होता. . इतका वेळ झाला तरी किरण आमच्या पुढे गेला नव्हता. आम्ही फोनवरून संपर्कात होतोच. घाट चढून वर येणारे गाडीवालेही आम्हाला किरणचे अपडेट्स देत होते. अरे हो... हे साहेब अजुनही आमच्या सोबत होतेच. . २०१४ च्या कोकणराईडला येथेच माझा अपघात झाला होता. विशेष म्हणजे याही वेळी कोणीतरी त्याच मार्गाने अपघातग्रस्त झाल्याच्या टायर खुणा दिसत होत्या. . २०१४ च्या माझ्या अपघाताची टायरखुण.. . हाच तो खड्डा.. . मुंबई हद्द संपली.. पुणे हद्दीत प्रवेश. . पुणे हद्दीत पोहोचल्या पोहोचल्या खड्ड्यांनी स्वागत केले. जाम चिडचिड झाली. या फोटोमध्ये हद्दीनुसार रस्त्यातील फरक कळेल.. . हा आणखी एक धबधबा लागला.. अमित तेथे माझी वाटच बघत होता. . . येथे आम्ही थोडी चर्चा करून त्या कणिसवाल्याला विनंती केली की आमचा एक भिडू खाली थांबला आहे त्याला दुचाकीवरून घेवून येवूया.. थोडे आढेवेढे घेवून तो तयार झाला. तोपर्यंत किरणने टेम्पो मिळत नाही म्हणून त्याच परिस्थितीमध्ये घाट चढवायला सुरूवात केली होती. मग अमित आणि कणिसवाला किरणला घेवून आले.. थोडे पुढे जावून डोंगरवाडीला एका धाब्यावर जेवण आवरले. पिठले, भाकरी कांदा असा बेत होता. जेवता जेवता किरणने घरी फोन करून ड्रायव्हरला कार घेवून डोंगरवाडीला बोलावले. त्या धाब्यावर डबा खाणार्‍या एका मामांच्याकडे लक्ष गेले तर ते एका छोटा हत्ती मध्ये बसून आले होते व रिकामेच हिंजवडीला चालले होते. मग किरणची आपसूकच त्यांच्यासोबत सोय झाली. किरणने ड्रायव्हरला पिरंगूटला येण्यास सांगितले. आम्ही वेळेचा हिशेब केला तर सकाळपासून साडेसहा तासात फक्त ३६ किमी अंतर पार केले होते. मूव्हींग स्पीड ९ किमी/तास इतका खाली गेला होता. अजुन ७० ते ७५ किमी जायचे होते आणि दुपारचे अडीच वाजले होते. यावेळी रात्री सायकल चालवावी लागणार नाही + पाऊस या दोन कारणांमुळे मी लाईट घेतला नव्हता. आता बघू काय होते ते असे ठरवून सायकल चालवायला लागलो.. अमित थोडा पुढे निघून गेला. थोड्या वेळाने दोघांच्यात भरपूर अंतर पडले आहे असे वाटेपर्यंत अमित दिसला. मला येताना बघून तो लगेच पुढे रवाना झाला. नंतर बराच वेळ 'तो पुढे आणि मागे मी' असे अंतर पार करत होतो. तीन साडेतीनच्या दरम्यान एका ठिकाणी थांबून पाणी प्यायले. एक एनर्जी बार पोटात ढकलला. सायकलची हवा कमी झाल्यासारखी वाटत होती म्हणून टायर मध्ये हवा भरली. लै टाईमपास झाला आता काही झाले तरी ५ वाजेपर्यंत किमान मुळशी तरी गाठायचेच्च अशा विचाराने सायकल हाणायला सुरूवात केली.. रस्ता एकदम खराब होता.. . कुंडलिका.. . वाटेत सलग असा रस्ता नव्हताच.. नुसते चढ आणि उतार.. सुरूवातीला त्रासदायक असलेले ते प्रकरण नंतर नंतर मी भलतेच एंजॉय करू लागलो.. जमेल ते खड्डे चुकवत आणि वेळप्रसंगी खड्यातून काळजी घेत आजिबात वेग कमी न करता सायकल हाणत होतो.. वाटेत एका ठिकाणी विश्रांती घेत थांबलेल्या अमितलाही मागे टाकले. . अशाच एका मंदिराजवळ.. . ताम्हिणी, मुळशी, पिरंगुट अशी ठिकाणे एका लयीत पार पडली होती.. आणि घड्याळात बघितले तर फक्त सव्वापाच वाजले होते. येस्स... ही एक खूप मोठी अचिव्हमेंट होती माझ्यासाठी. ताम्हिणी घाटाची एक नेहमी मनावर बसणारी अढी आज संपणार होती.. एका हॉटेलमध्ये दोन्ही पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि पिरंगुटचा घाट चढायला सुरूवात केली.. यथावकाश तो ही घाट संपला.. तो घाट संपताना केडीचा स्टेटस विचारणारा फोन आला.. त्याला हाफ हुफ्फ करत उत्तरे दिली.. या संपूर्ण राईड दरम्यान तिनही दिवस केडी आमचा दररोज थोड्या थोड्यावेळाने ट्रॅक ठेवत होता. फोन करून उत्साह वाढवत होता ..आणि कानपिचक्याही देत होता. आम्ही फिश थाळी, कुंभार्लीतला अप्रतीम नजारा असे फोटो पाठवून परतफेड करतो होतो. :D पिरंगुटच्या माथ्यावर.. . ठीक ६ वाजून १० मिनीटांनी चांदणी चौकात पोहोचलो...!! . साडेतीन तासात ताम्हिणी घाटातले जवळजवळ सत्तर किमी अंतर पार केले होते..!!!! खूप खूप समाधान वाटले..!!!!!! आजच्या राईडचे आकडे.. . ग्राफ.. . हा स्पीडचा ग्राफ मुद्दाम देत आहे.. ६ तास ४८ मिनीटांनंतरचे स्पीड प्रोफाईल जबरदस्त निघाले होते. कमीतमी थांबे आणि चढ उतारांवर राखलेल्या वेगामुळे दिवसा उजेडी पुण्याला पोहोचलो होतो. . खूप खूप मजा आली.. धमाल केली.. भेटू पुन्हा.. घाटवाटांचे व्हर्जन 3.0 पूर्ण झाले की..!! . समाप्त.

Book traversal links for घाटवाटांची सायकल राईड - v2.0 - ताम्हिणी घाट (भाग ३) - समाप्त.

  • ‹ घाटवाटांची सायकल राईड - v2.0 - कशेडी घाट (भाग २)
  • Up

प्रतिक्रिया द्या
9010 वाचन

💬 प्रतिसाद (22)
ब
बाबा योगिराज Fri, 09/02/2016 - 21:11 नवीन
क्या बात, क्या बात, क्या बात. एकदम बढिया है यह. सम्पूर्ण ताम्हिणी घाट चढून आलात. दादानु ____/\____. बाबा योगीराज
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 09/02/2016 - 21:18 नवीन
अप्रतिम!! __/\__
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 09/02/2016 - 22:21 नवीन
.मस्त!
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 09/02/2016 - 22:51 नवीन
जबरदस्त. ते ढोलकीवाले आजोबा म्हणजे टीपीकल कोकणी माणूस...बाकी रस्ते वगैरे बघून जळफळाट झाला आहे.
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Fri, 09/02/2016 - 22:56 नवीन
मोदकराव...लै भारी फोटो आणि वर्णन १ नंबर...! एक प्रश्न...जेवढ्या वेळ सायकल चालवता तेवढ्या पूर्ण वेळ GPS सुरु ठेवता का? GPS पूर्ण वेळ सुरु ठेवल तर फोनची बॅटरी लगेच डिस्चार्ज होत असेल.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Sat, 09/03/2016 - 07:27 नवीन
गुर्जीं अर्धेच फटू दिसत्यात आमाले असा अन्याव काहून करता आमच्यावर :(
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 09/03/2016 - 10:19 नवीन
भारीच रे. ह्या पावसाळ्यात तीनदा ताम्हिणीत जाणं झालं. रस्ता इतका खराब नव्हता. बहुधा जुलैच्या शेवटच्या आठवड्यातल्या पावसानं वाट लावली असेल. बाकी बहुधा ती लेणी नसावीत. खडकातली नैसर्गिक भेग दिसते आहे.
  • Log in or register to post comments
झ
झेन Sat, 09/03/2016 - 10:43 नवीन
एक शंका, एक सायकल बहुधा तुमचीच मेरीडा- विना कॅरियर सायकल वरून इतक्या लांबच्या प्रवासात सामानाच कसंकाय जमवता आणि पावसात मडगार्ड शिवाय म्हणजे टीशर्ट च्या मागे मॉडर्न आर्ट होत नाही का.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 09/03/2016 - 12:04 नवीन
लैच झकास फोटो.
  • Log in or register to post comments
श
शलभ Sat, 09/03/2016 - 20:42 नवीन
खूपच मस्त घाटसफर..
  • Log in or register to post comments
क
केडी Sun, 09/04/2016 - 04:40 नवीन
मग अमित आणि कणिसवाला किरणला घेवून आले
सायकलिंग मूळे येणारे टीम स्पिरिट चे उत्तम उदाहरण. अमित, हॅट्स ऑफ टू यू, किरण ला मोटोरसायकल वर बसवून तू त्याची सायकल हाणत वर आणली.
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Wed, 09/07/2016 - 18:27 नवीन
लय भारी ट्रिप आणि लेखमालिका मोदक भाऊ !!! तिन्ही भाग मस्तच. सायकलीचे व्यसन मला कधी लागेल ????
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Wed, 09/07/2016 - 19:13 नवीन
आम्हि १ का दिवसात मुळशी ला जाउन आलो तर आ दुसर्या दिवशी १० किमि सायकल चालवावी नाहि वाटली तिन दिवसात तिन घाट... भन्नाट. V3.0 साठि शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 09/07/2016 - 19:43 नवीन
शुभेच्छा?? ओय मालक, V3.0 चा लेख तुम्ही टाकायचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत
म
मोदक Fri, 09/30/2016 - 16:21 नवीन
उशीरा उत्तरे देत आहे त्याबद्दल क्षमस्व..! जेवढ्या वेळ सायकल चालवता तेवढ्या पूर्ण वेळ GPS सुरु ठेवता का? GPS पूर्ण वेळ सुरु ठेवल तर फोनची बॅटरी लगेच डिस्चार्ज होत असेल. फोन फारसा डिस्चार्ज होत नाही. कदाचित नेट ऑफ आणि GPS सुरू असे असल्याने असेल. (विंडोज फोन आहे.) एक सायकल बहुधा तुमचीच मेरीडा- विना कॅरियर सायकल वरून इतक्या लांबच्या प्रवासात सामानाच कसंकाय जमवता आणि पावसात मडगार्ड शिवाय म्हणजे टीशर्ट च्या मागे मॉडर्न आर्ट होत नाही का. अगदी पहिल्या कोकण राईडला भरपूर सामान नेवून पस्तावलो होतो तेंव्हापासून कमीतकमी सामान सोबत ठेवतो. एकदा का कॅरीयर बसवले, की मग पॅनीयर.. अधिक सामान न्यावयाची सोय.. असे वाढत जाण्यापेक्षा सामान कमी करण्यासाठी कॅरीयर बसवले नाहीये. अत्यंत आवश्यक असे सामान एकदम छोट्या सॅकमधून पाठीवरून वाहून नेतो. हो. मडगार्ड नसल्याने मॉडर्न आर्ट तयार होते. :)
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 09/30/2016 - 18:07 नवीन
अन परत एक इन्स्पारींयरींग सायकल राईड!
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 09/30/2016 - 20:31 नवीन
अहाहा! क्या बात है मोदकराव!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sat, 10/01/2016 - 05:47 नवीन
तुम्हाला तुमची बायको घरात कशी घेते? असं दर वीकांताला उंडारायला परवानगी कशी मिळते?
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sat, 10/01/2016 - 18:37 नवीन
सारे घाट सर केले, जबरदस्त एकदम. सारे लेख आज वाचले. मजा आली वाचून आणि फोटो बघून. आता टूर ऑफ निलगिरीज किंवा मनाली, लेह खारदुंगला पण ट्राय करा.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 10/01/2016 - 18:48 नवीन
काही फोटो पाहून मला मत्सर वाटला. का॑ळेशार रस्ते हिरवाई चा आसमंत. माशाल्ला ! मोदका मात्र महाराष्ट्र का खडकांचा देश दगडांचा कर्नाटक !
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं Sat, 01/07/2017 - 12:51 नवीन
फोट दिसेनात
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 01/07/2017 - 19:17 नवीन
मलापण फोटो दिसत नाहीत :( ऑफिसमध्ये पण दिसले नाहीत, घरच्या नेटवर पण दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा