Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

समाजामध्ये कमी माहिती जैन समाजाबद्दल ?

न
निओ१
Sat, 09/03/2016 - 18:54
🗣 182 प्रतिसाद
आपल्या समाजामध्ये जैन समाजाबद्दल खूप कमी माहिती आहे का ? दिगंबर जैन का आहेत? त्याची गरज का आहे? ते दिगंबर का आहेत ? जर आपल्याला एका धर्माबद्दल माहिती नसेल तर आपण आपले मत व्यक्त करताना थोडी माहिती का शोधू नये? काही लोकांनी "ते नागडे" इत्यादी प्रकारे उपहास केला आहे. त्याना धर्माची माहिती घेणे गरजेचे आहे असे का वाटत नाही? जैन धर्म मधील प्रत्येक व्यक्ती हिंदू-जैन असे लिहितो, तुम्हीच जर असे लिहले किंवा विरोध केला तर त्याचा परिणाम काय होइल याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. जैन हे आधी हिंदू आहेत मग ते जैन आहेत पण असे दिसू लागले आहे की हिंदू जैन समाजाला आपले समजत नाही आहे. खूप वाईट वाटले म्हणून लिहिले.
वर्गीकरण
धर्म

प्रतिक्रिया द्या
39886 वाचन

💬 प्रतिसाद (182)
स
संदीप डांगे Sat, 09/03/2016 - 19:08 नवीन
नमस्कार निओ१साहेब, माझे तुम्हाला दोन प्रश्न आहेत त्याची उत्तरं मिळतील काय? १. भारतीय राज्यघटना कोणत्याही धर्माला मान्यता देत नाही. अशा राज्यघटनेने स्थापित विधानसभेत एक धर्मगुरु येऊन राज्यघटनेचा अपमान करुन जातात ह्याबद्दल कोणती केस त्या धर्मगुरुंवर करावी? २. जे आहे ते तसेच सत्य ठळक भाषेत मांडल्याने कोणाचा व कसा अपमान होतो? जैन धर्माला सत्याची लाज वाटते का? दोन उपप्रश्नः अ) जैन गुरु नागडे नाहीत? ब) त्यांनी विधानसभेत भाषण केले नाही? क) त्यांनी राजनीती ही धर्माची पत्नी असल्याचे म्हटले नाही? वरिल मुख्य व उपप्रश्नांची उत्तरे द्यावीत, बाकी धार्मिक भावना दुखावून घेण्याआधी कॄपया 'मुनिवर्य तरुण सागर' यांचेकडून जरुर मार्गदर्शन घ्यावे. मला विश्वास आहे की ते आपल्याला अगदी योग्य सल्ला देतील. कदाचित जैन धर्मियांनी त्यांचे 'कडवे वचन' समजून घेतले नसावे. ते आधी क्लिअर करुन घ्यावे. भारतीय राज्यघटनेचा अपमान माझ्यासाठी कोणत्याही धर्मापेक्षा मोठा आहे व त्याबद्दल बोलण्याचा अधिकार मला राज्यघटनेनेच दिला आहे. आपण ह्या बाजूवर आधी विचार करावा आणि आपले मत कळवावे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
न
निओ१ Sun, 09/04/2016 - 17:10 नवीन
१. भारतीय राज्यघटना कोणत्याही धर्माला मान्यता देत नाही. याचा आधार द्याल का? २. २. जे आहे ते तसेच सत्य ठळक भाषेत मांडल्याने कोणाचा व कसा अपमान होतो? जैन धर्माला सत्याची लाज वाटते का? सत्य जर सर्ल वर स्पस्त असेल तर कोन का विरोध करेल. ? जर असे असेल तर आपच्या त्या नेत्यावर केस कश्या रजिस्तर झाल्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 09/03/2016 - 19:13 नवीन
बाकी तुमच्या धाग्यातले विचार बघून तुम्हाला तरी नक्की किती माहिती आहे जैनधर्माविषयी याबद्दल शंका आहे.
  • Log in or register to post comments
न
निओ१ Sat, 09/03/2016 - 19:46 नवीन
जैन धर्मिय व्यक्तिलाच माहिति नसेल असे तुम्हाला माहिति असेल तर शेअर करा प्लिज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 09/03/2016 - 20:59 नवीन
तुम्ही धाग्यात जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याची उत्तरे तुम्हीच द्या आधी. म्हणजे दिगंबर जैन का असतात, इत्यादी. तुमचे ज्ञान कोठवर आहे त्यापुढे मी बोलतो मग. तुम्ही हिंदु-जैन ही काही संकल्पना मांडत आहात ती फारच मनोरंजक आहे. त्यासाठीच तुम्हाला कितपत माहिती आहे ह्याची शंका आली. बाकी तुमच्या भावना दुखावू नयेत म्हणून तुमच्या धर्माची माहिती घ्यावी ही तुमची फारच कैच्याकै अपेक्षा झाली. आम्ही "अलम दुनियेतल्या धर्मांच्या, पंथांच्या भावना दुखावतील का" याची काळजी करत बसलो तर जगणे मुश्किल होईल. तुमच्या भावना दुखवतात हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. माझा नाही. बाकी माझ्या त्या विधानाने जैन धर्माचा अपमान कसा झाला हे काही तुम्ही अजून स्पष्ट केलेले नाही तेव्हा तेही करावे. अजून एकः http://misalpav.com/node/29981 ह्या धाग्यावरची धार्मिक भावना दुखावण्याबद्दलची चर्चा वाचून घ्या. तुमच्या कामी येईल. माझ्यातर्फे चर्चा खुली आहे. हेल्दी डिबेटसाठी तुमचे सदा स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१
न
निओ१ Sun, 09/04/2016 - 17:05 नवीन
काहि उत्तरे दिलि आहेत, हिंदु-जैन चे नवल का वातले याचे मला देखिल नवल वातत आहे. हे आज पासुन सुरु नाहि आहे, माझे आजोबा (स्व. आदिनाथजि जैन) हे त्याच्या शालेय जिवनापासुन लिहित आले आहेत व अनेक शालेय स्न्स्था असे लिहतात हे तुम्हला माहिति नसावे हेच दर्श्वत आहे कि अद्य्ना किति आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
निओ१ Sat, 09/03/2016 - 19:15 नवीन
हे तुम्हि आताच मला खरडवही मध्ये विचारल होते व मि तेथे उत्तर दिले आहे मग हेच प्रश्न येथे परत?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 09/03/2016 - 19:16 नवीन
तुम्हीच म्हटले ना? धाग्यावर लिहिले असते तर..? मग लिहिले की...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१
न
निओ१ Sat, 09/03/2016 - 19:18 नवीन
१. भारतीय राज्यघटना कोणत्याही धर्माला मान्यता देत नाही. अशा राज्यघटनेने स्थापित विधानसभेत एक धर्मगुरु येऊन राज्यघटनेचा अपमान करुन जातात ह्याबद्दल कोणती केस त्या धर्मगुरुंवर करावी? त्याना हरियाना विधानसभाने निमत्र्न दिले होते, तसेच दिल्लि ने पन दिले होते. २. जे आहे ते तसेच सत्य ठळक भाषेत मांडल्याने कोणाचा व कसा अपमान होतो? जैन धर्माला सत्याची लाज वाटते का? उत्तर आधिच दिले आहे, आम्चे मुनि बोलवल्या शिवाय कोथे हि जात नाहित. दोन उपप्रश्नः अ) जैन गुरु नागडे नाहीत? ब) त्यांनी विधानसभेत भाषण केले नाही? क) त्यांनी राजनीती ही धर्माची पत्नी असल्याचे म्हटले नाही? ते नागदे / दिग्न्बर आहेत, पन त्याचि कारने आहेत ते शोधा. ब चे उत्तर दिले आहे क हा प्रश्न उत्तर आनि वाद ह्या वेगल्या गोश्ति अहेत, मि हि त्याचा विरोध करतो आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sun, 09/04/2016 - 02:18 नवीन
निओ१ साहेब, भारतात शेकडो धर्म आणी हजारो जाती पंथ आहेत. त्यामुळे प्रत्येक धर्माची/जातीची/ पंथाची प्रत्येकाने माहिती ठेवणे जरुरी नाही आणी ते शक्यही नाही. दुसरी गोष्ट धार्मिक ज्ञान असलेच पाहिजे असे कुणावरही भारतात बंधन नाही. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय की त्याना हरियाना विधानसभाने निमत्र्न दिले होते, तसेच दिल्लि ने पन दिले होते. आम्चे मुनि बोलवल्या शिवाय कोथे हि जात नाहित. -- भारतात अशा प्रकारे धार्मिक गुरूंना विधानसभेत बोलावणे हाच मोठा अपराध झालेला आहे असे मी मानतो. मग तो धार्मिक गुरु कुठल्याही धर्माचा का असेना. कारण हे आपल्या घटनेच्या विरुद्ध आहे. जरी त्यांना विधानसभेने निमंत्रण दिले असले तरी त्यांनी घटनेचा अवमान होऊ नये ह्यासाठी त्या ठिकाणी जाणे टाळायला हवे होते असे माझे मत आहे. कारण देशाची घटना आणी तिचे पावित्र्य ही कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. आता जैन मुनी दिगंबर अवस्थेत विधानसभेत गेले ह्या बद्दल -- तुमच्या मते दिगंबर अवस्थेत फिरण्याची काही तरी कारणे आहेत आणी ती दुसऱ्यानी शोधून काढावीत. का बरे आम्ही शोधावी ? जर एखादी गोष्ट मला योग्य वाटत नाही तर त्याचा विरोध करण्याचा हक्क आम्हाला आहे. केवळ धर्मात किंवा अन्यत्र सांगितलेले आहे म्हणून एखादी गोष्ट सगळ्यांना मान्य झालीच पाहिजे असे नाही.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 09/04/2016 - 02:59 नवीन
@तुमच्या मते दिगंबर अवस्थेत फिरण्याची काही तरी कारणे आहेत आणी ती दुसऱ्यानी शोधून काढावीत. का बरे आम्ही शोधावी ?››› +++१११ हेच तर टनाटनी लोकांचं वैशिष्ट्य असतं. ते टनाटनी पणा करणार. आणी कारणं आपण शोधायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
च
चित्रगुप्त Sun, 09/04/2016 - 03:16 नवीन
दिगंबर अवस्थेत रहाण्याची जी काही कारणे असतील, ती धागाकर्त्याने ती विशद करावीतच, शिवाय त्यामुळे ती व्यक्ति इतर कपडे घालण्यार्‍या लोकांच्या आदरास पात्र का ठरते हेही विशद करावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 09/04/2016 - 03:29 नवीन
जैन मुनींच्या नग्नतेविशयी ओशो रजनीशांनी केलेले सुंदर विवेचन फार पूर्वी वाचले आहे, परंतु त्यातले तपशील आता विसरलो. कुणाला ठाऊक आहे का ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त Sun, 09/04/2016 - 05:29 नवीन
पराकोटीचा इंद्रिय संयम असल्याशिवाय शक्य नाही.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 09/04/2016 - 14:26 नवीन
दिगंबर अवस्था पराकोटीचा इंद्रिय संयम असल्याशिवाय शक्य नाही.
काहीही हं 'मु' त्यांना कुठे सनी वगैरेंचे ठुमके, पिच्चर किंवा अन्य फाजील प्रकार वगैरे बघायचे असतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त
म
मुक्त Sun, 09/04/2016 - 17:08 नवीन
चित्रगुप्त साहेब. तुम्ही एक्स्ट्रीम बाजूला गेलात. जैनमुनी दिगंबर अवस्थेत समाजात वावरत असतात. इंद्रिय निग्रहाशिवाय हे कसे शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
न
निओ१ Sun, 09/04/2016 - 17:11 नवीन
सनी वगैरेंचे ठुमके, पिच्चर किंवा अन्य फाजील प्रकार वगैरे बघायचे असतात ? ह्याच गोश्ति तुमचि मास्निकता व्यक्त करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
च
चित्रगुप्त Sun, 09/04/2016 - 18:21 नवीन
माझ्या मानसिकतेचे सोडा हो, मी चित्रकार असल्याने विवस्त्र मॉडेलवरून एकाग्र चित्ताने तासन तास रेखाटन, पेंटिंग करण्याचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे नग्नतेबद्दल माझी मानसिकता फार वेगळी आहे. माझ्या लेखी मुनि, साधू, लहान मुले, नग्न मॉडेल्स, चित्रा - सिनेमातील नग्नता यात काही फरक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१
व
विवेकपटाईत Sun, 09/04/2016 - 07:45 नवीन
सनातन धर्मापासून थोडा वेगळा झालेला जैन धर्म हा बहुतेक एका निश्चित पूजा पद्धतीवर आधारित जगातील पहिला धर्म असावा. इसाई धर्मापूर्वीचा. आपल्या सारखे जैन हि त्यांच्या देवतांची पूजा करतात. सनातनी परमपरांना आपल्यापेक्षा जास्ती निष्ठेने पाळतात. जैन देवालयांमध्ये स्वच्छता आपल्या मंदिरांपेक्षा जास्त असते. बाकी माझ्या मोठ्या भावाची एक सून जैन (गुजराती) आहे. लग्न सनातन रिती प्रमाणे सुरळीत पार पडले. कुठलाही कडवा विरोध झाला नाही. कसलीही समस्या आली नाही. लग्नाच्या जेवणात कांदे, लसूण, जमिनी खाली उगविणारे कंद असे पदार्थ नव्हते, तरी जेवण स्वादिष्ट होते. लग्नाला ३-४ वर्ष झाली तरी कसलीही समस्या उद्भवली नाही.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 09/04/2016 - 08:10 नवीन
हेच म्हणतो! जेवण चांगलं झालं की सगळा आनंदीआनंद असतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
अ
असंका Mon, 09/05/2016 - 06:35 नवीन
लैच भारी!!!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
क
कंजूस Sun, 09/04/2016 - 08:22 नवीन
पुन्हा एकदा धर्मचर्चा होणार तर! देव ,कर्म आणि स्वर्ग आहे या तीन समजूती वजा केल्या तर बय्राच धर्मांचा फक्त भुस्सा उरतो.
  • Log in or register to post comments
म
मारवा Sun, 09/04/2016 - 08:26 नवीन
जैन समाजाचे अवलोकन करतांना काही बाबी विशेष वाटतात १- पंच महाव्रतांपैकी केवळ अहिंसा या एकच एक व्रताचा पुरस्कार प्रचार आचार करण्यात सध्याच्या सर्वसाधारण जैन समाजाला रस दिसतो. अतीव आश्चर्याची बाब म्हणजे ब्रह्मचर्य, अस्तेय, अपरीग्रह, सत्य आदी व्रतांचा उल्लेख प्रचार आग्रह फारच कमी असा जैनांमध्ये सध्याच्या काळात आढळतो. म्हणजे अनेक जैन वक्ते लेखक मांसाहार कसा घातक आहे शाकाहार कसा श्रेष्ठ आहे वगैरे तारस्वरात आक्रमकतेने मांडणी करतांना दिसतात. कोणी काय खावे कोणी काय नाही. व मांसाहार करणारी व्यक्ती किती पतित झालेली आहे माणुस म्हणवण्याच्याही लायकीची नाही इ.इ.. पण एक की अपरीग्रह संचय नको पैशाचा धनाचा संचय नको असे कोणी आग्रह करतांना दिसत नाही. किंवा ब्रह्मचर्य किंवा अस्तेय यावर कोणीच काहीच बोलतांना सहसा दिसत नाही. म्हणजे एकुण ५ व्रत मिळुन १०० % धरले तर केवळ २० % वरच समाधान मानलेले दिसुन येते. अब साध्य करा हमने अहिंसा का व्रत अब बारी है ब्रह्मचर्य की अब पा ली हमने हिंसा पर विजय अब बारी है अपरीग्रह की चलो आगे बढे अब अहिंसा से अब बात करे अस्तेय की हर घर का कमसे कम एक बच्चा अब करेगा पालन ब्रह्मचर्य का हर घर का कमसे कम एक बच्चा अब दिखा देगा पालन अपरीग्रह का हम नही रहेंगे अब अधुरे अधुरे हम करेंगे पांच महाव्रत पुरे पुरे आगे बढो अहिंसा के अब तो बहोत सफर बाकी है. अशा काही घोषणा ऐकावयास मिळत नाही. अहिंसा या एकमेव तत्वाशिवाय इतर ४ जणु पंच महाव्रतांपैकीच नाहीत की काय असा भास होतो. यामागे उघड कारण सोय हे आहे. अहिंसा हे सर्वात सोयिस्कर सुरक्षित आटोपशीर कमीत कमी मिनिमम त्रासाचे व्रत आहे. यामध्ये थोड्याश्या सोप्या सुटसुटीत दोन-चार गोष्टी खाणे कंट्रोल करुन ( कंट्रोलही नाही अनेकांना कधी खाल्लेलेच नसेल तर ते न खाण्याचा निर्णय घेणे अती सोपे मी आजपासुन लिची या फळाचा त्याग करत आहे असे एखाद्या मराठवाड्यातील व्यक्तीने ठरवल्यासारखे ) झाल्यावर इतरांवर हल्ला करण्यास एक अनकंट्रोलेबल सुट मिळते. ब्रह्मचर्य नुसता विचार करा, अपरीग्रह कुठलाच संचय करायचा नाही म्हटल्यावर तर सर्व धंदे व्यवसाय बंद करण्याचा दुर्धर प्रसंग ओढवेल धनसंचय कसे होणार ? त्यामानाने अहिंसा फारच इझी टु हॅन्डल. शिवाय हिंसे चा संदर्भ केवळ खाणे पिणे संदर्भात इतकाच मर्यादीत संकुचित केल्यावर मग बाकी हिंसेची सुक्ष्म रुपे आचरली तरी हरकत नाहीच. २- सार्वजनिक स्थळांवरील नग्नता काही निसर्गवादी मंडळे असतात. त्यांच्या थेअरीनुसार नग्न राहणे नग्न विहार हाच उत्तम कपडे घालणे त्याचे बंधन बाळगणे चुक इ.इ. त्यातला एखादा जर भारताच्या एखाद्या रस्त्यावर ही माझी थेअरी आहे यात मी विश्वास करतो यात माझी आस्था आहे असे म्हणत फिरु लागला तर अगोदर त्याला चार फटके मारुन जेल मध्ये टाकतील सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन इ. कलमाखाली असा कायदाही आहे. मात्र असेच जर एका दुसर्‍या थेअरीच्या नावाने जर......... शिवाय जी लहान मुले ज्यांना इतर काहीही कळत नाही धर्म नाही थेअरी नाही ती रस्त्याने शाळेत जात असतांना त्यांना जर असे काही दृश्य दिसले तर म्हणजे समाज एरवी या बाबीला जी मान्यता देत नाही त्या संदर्भात हा प्रश्न आहे. कि लहान मुलांना असे दृश्य एका किमान वयापर्यंत न बघु देण्याची काळजी घेणे ही एक अपेक्षा मागणी आहे मात्र ती या रीतीने अडचणीत आली म्हणजे एक निसर्गवादी मंडळाचा पुरुष समोर आला किंवा तर कसे करायला हवे ?
  • Log in or register to post comments
प
परिंदा Sun, 09/04/2016 - 08:31 नवीन
एक नंबर प्रतिसाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
च
चंपाबाई Sun, 09/04/2016 - 09:09 नवीन
यम नियम ( अहिंसा स अ ब्र अ ) वगैरे हिंदु धर्मातील अष्टांगयोगाचेही भाग आहेत.. योगदिन पालन करणारे लोक त्याचे पालन करतात का? मग जैनांबद्दलच २० % वगैरे विष्लेषण कशाला? http://hindi.awgp.org/gayatri/sanskritik_dharohar/bharat_ajastra_anudan/yoga/yam_niyam_kya_hai.1 ( बाकी, ते २० % , ८०% वगैरे अध्यात्मिक आकडेवारी सनातनवाले वापरतात)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
संदीप डांगे Sun, 09/04/2016 - 09:15 नवीन
योगदिन पालन करणारे आमच्या धर्माच्या भावना दुखावल्या अशी छाती पिटतांना दिसतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
आ
आनंदी गोपाळ Sun, 09/04/2016 - 08:31 नवीन
जैन लोकांच्या असंख्य संस्थांना, मुस्लिम संस्थांसारखाच, 'अल्पसंख्यांक धार्मिक दर्जा' असतो.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 09/04/2016 - 09:25 नवीन
मला जैनांची एक घोषणा फार आवडते. आमच्या इकडे बर्‍याच ठिकाणी दिसते. "जैनं जयति शासनम"
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 09/04/2016 - 10:57 नवीन
निओ१, तुम्ही जैन असावात असे वाटते. जैनांबद्दल फारशी माहिती नाही हे माझ्याबाबतीत तरी खरे आहे. कृपया खालील माहिती द्याल का? १) जैनांमध्ये श्वेतांबर, दिगंबर व स्थानकवासी हे ३ उपपंथ/उपजाती (दुसरा योग्य शब्द सुचला नाही) आहेत असे ऐकून आहे. हे खरे आहे का? या व्यतिरिक्त अजून उपपंथ/उपजाती आहेत का? २) फक्त दिगंबर साधूच दिगंबरावस्थेत राहतात पण इतर उपपंथाचे/उपजातीचे साधू तसे राहत नाहीत हे खरे आहे का? ३) साधूंनी दिगंबरावस्थेत राहण्यामागची नक्की कारणे काय आहेत? संन्यास धारण केल्यावर दिगंबरावस्थेत राहणे सक्तीचे आहे का? एखादा संन्यास घेतलेला साधू स्वतःच्या मर्जीने वस्त्रे वापरू शकतो का? का तसे करण्याची धर्माने परवानगी दिलेली नाही? दिगंबरावस्थेत राहिल्यास काही पारमार्थिक किंवा सामाजिक लाभ मिळतो का? दिगंबरावस्थेत न राहिल्यास काही पारमार्थिक किंवा सामाजिक तोटा होईल का? ४) दिगंबर साधू भारताव्यतिरिक्त इतर देशांना भेटी देतात का? तसे असल्यास जाताना विमानात व नंतर त्या देशात दिगंबरावस्थेत असण्याची परवानगी असते का? हे प्रश्न जैन धर्माची बदनामी करण्यासाठी विचारलेले नसून माहितीत भर पडावी या उद्देशाने विचारले आहेत.
  • Log in or register to post comments
र
रिम झिम Sun, 09/04/2016 - 11:11 नवीन
१) जैनांमध्ये श्वेतांबर, दिगंबर व स्थानकवासी हे ३ उपपंथ/उपजाती (दुसरा योग्य शब्द सुचला नाही) आहेत असे ऐकून आहे. हे खरे आहे का? या व्यतिरिक्त अजून उपपंथ/उपजाती आहेत का? होय. माझ्या माहितीप्रमाणे १५ उपजाती आहेत. श्वेतांबर, दिगंबर व स्थानकवासी या जास्त करुन दिसुन येतात. २) फक्त दिगंबर साधूच दिगंबरावस्थेत राहतात पण इतर उपपंथाचे/उपजातीचे साधू तसे राहत नाहीत हे खरे आहे का? होय. श्वेतांबर साधू श्वेत वस्त्रे परिधान करतात. ३) साधूंनी दिगंबरावस्थेत राहण्यामागची नक्की कारणे काय आहेत? संन्यास धारण केल्यावर दिगंबरावस्थेत राहणे सक्तीचे आहे का? एखादा संन्यास घेतलेला साधू स्वतःच्या मर्जीने वस्त्रे वापरू शकतो का? का तसे करण्याची धर्माने परवानगी दिलेली नाही? दिगंबरावस्थेत राहिल्यास काही पारमार्थिक किंवा सामाजिक लाभ मिळतो का? दिगंबरावस्थेत न राहिल्यास काही पारमार्थिक किंवा सामाजिक तोटा होईल का? माहित नाही. ४) दिगंबर साधू भारताव्यतिरिक्त इतर देशांना भेटी देतात का? तसे असल्यास जाताना विमानात व नंतर त्या देशात दिगंबरावस्थेत असण्याची परवानगी असते का? माहित नाही. (मी स्वतः जैन श्वेतांबर आहे, पण फार धार्मिक नसल्यामुळे फार माहिती नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गणामास्तर Sun, 09/04/2016 - 15:33 नवीन
श्वेतांबर आणि माहेश्वरी एकचं की वेगळे याबाबत काही सांगू शकाल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रिम झिम
अ
अभ्या.. Sun, 09/04/2016 - 15:38 नवीन
वप्याला माह्यतीय. कुठे खपलंय ते हुडक न विचार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
र
रिम झिम Sun, 09/04/2016 - 16:33 नवीन
श्वेतांबर हा पंथ आहे.माहेश्वरी वेगळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
ब
बॅटमॅन Mon, 09/05/2016 - 08:14 नवीन
पण माहेश्वरी हे शंकराचे भक्त, (नावच बघा-माहेश्वरी म्ह. महेश्वराचे भक्त, जैनांच्या कुठल्या तीर्थंकरांना असे नाव दिलेले ऐकले नाही.) ते जैन असणे संभवत नाही असे वाटते. ते हिंदूच असतात, माझा एक मित्र आहे त्यांपैकी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
अ
अभ्या.. Mon, 09/05/2016 - 08:22 नवीन
आदिनाथ, ऋषभनाथ हे तीर्थंकरांचे नाव जवळपास शंकराचेच वाटते ना? नेमिनाथ हे नाथपंथी नांव सुध्दा एका तीर्थंकराचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 09/05/2016 - 08:25 नवीन
हम्म ते बाकी खरे आहे म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Mon, 09/05/2016 - 08:30 नवीन
माझे बरेच मित्र आहेत माहेश्वरी. ते जैनच असतात. बहुतेक ते राजस्थानी मूळ सांगत असावेत. मारवाडी ह्या नावाने जास्त करुन तेच ओळखले जातात. व्यापारात बहुतांशी असलेले धर्मासाठी सढळ हस्ते धन देणारे पण हेच लोक मला तरी पाहण्यात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 09/05/2016 - 08:34 नवीन
ओह अच्छा, धन्यवाद. माझी गफलत झाली असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
असंका Mon, 09/05/2016 - 10:24 नवीन
माझी पण माहिती अशीच होती की माहेश्वरी लोक जैन नसतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 09/05/2016 - 10:55 नवीन
माझ्यामाहिती प्रमाणे, माहेश्वरी हे जैन धर्मीय नसून हिंदू मारवाडी असतात खास करून हिंदू मारवाडी कायस्थ, ज्यांना आपण "मारवाडी" ह्या नावाने ओळखतो, महाराष्ट्र किंवा इतर राज्यांत धंद्यानिमित्त पसरलेल्या मारवाडी समाजात अग्रवाल, माहेश्वरी ह्या दोन पोटजाती प्रचंड पुढे आहेत उदा लक्ष्मी मित्तल (अग्रवाल), बजाज, धूत इत्यादी हि एक अतिशय बेसिक लिंक कामी यावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 09/05/2016 - 10:59 नवीन
धन्यवाद सरजी, माझा मित्र हिंदू मारवाडीच आहे हे कन्फर्म केले परत एकदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
प्रचेतस Mon, 09/05/2016 - 08:30 नवीन
संस्कृती एकच आहे ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 09/05/2016 - 08:35 नवीन
डिपेंड्स, अगदी सुपरफिशिअली एक आहे असे म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अभ्या.. Mon, 09/05/2016 - 08:40 नवीन
अरे संस्कृतीची मज्जा (डुबली नाहीये बरका अजून) जैनांच्या तीर्थंकर कथामध्ये एका तीर्थंकरांना वनवासातील रामलक्षमणसीता भेटल्याची कथा आहे. नंतर अयोध्या राज्याभिषेकात उपस्थित राजात पण एक तीर्थंकर राजा म्हणून उपस्थित असल्याचे वाचल्याचे स्मरते. बरेचसे रामायण आणि महाभारतातील पण सन्दर्भ येतात. गोम्मटेश्वर बाहुबलीची भरताची गोष्ट तशीच. आणि नवल म्हणजे गणेशाला राक्षस म्हणून गणले जाते. देव नाही. (हे ऐकलेले आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रचेतस Mon, 09/05/2016 - 08:44 नवीन
भगवान नेमीनाथ तर कृष्णाचा भाउ म्हणून समजले जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ब
बॅटमॅन Mon, 09/05/2016 - 09:11 नवीन
लोल हे बाकी भारीच. अर्थात जैन रामायणांची व्हर्जन वेगळी आहे हे माहितीये पण डीटेल्स माहिती नाहीत. वाचले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
च
चित्रगुप्त Mon, 09/05/2016 - 13:41 नवीन
'जैन धर्म' हा महावीरांपासून वेगळा गणला जाऊ लागला ना? ज्याप्रमाणे ख्रिस्ती आणि मुसलमान यांचा प्राचीन इतिहास एकच असल्यामुळे (ओल्ड टेस्टामेंट, बुक ऑफ जेनेसिस इ) जशी या दोन्ही धर्मात प्राचीन व्यक्ती त्याच त्या आहेत (अब्राहम्=इब्राहिम, मोझेस्= मूसा, आयझॅक्=इसाक, डेव्हिड्=दाऊद, जॅकब्=याकूब, जीजस्=ईसा, जोसेफ्=युसुफ, अ‍ॅबेल्=हबीब,सोलोमन्=सुलेमान, अ‍ॅडम-ईव्ह्=आदम-हव्वा वगैरे) तसेच महावीरांपूर्वीचे तीर्थंकरांचे बाबतीत झाले असावे. म्हणजे मोझेस वा इब्राहीम हे खिस्ती वा मुसलमान होते असे म्हणणे चूक, तसेच आदिनाथ, मल्लिनाथ, नेमिनाथ वगैरे जैन होते असे म्हणणे हे चूक. (अर्थात माझी ही माहिती चूक असल्यास जाणकारांनी नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे अवश्य सांगावे) अर्थात क्रिश्चनिटी = कृष्णनीति, चर्च = चर्चा करण्याची जागा, ट्रिनिटी = त्रिनीती, वॅटिकन = वाटिका, जीजस क्राईस्ट = ईशस कृस्त(कृष्ण), महंमद पैगंबर = महा-मद पग-अम्बर वगैरे मानणारांसाठी सर्व प्रश्नच निकालात निघतो. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 09/06/2016 - 04:21 नवीन
सहमत, तसेच आहे हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
अ
अनिरुद्ध.वैद्य Mon, 09/05/2016 - 19:09 नवीन
ह्यांची कथा वाचली होती. रामायणातही जैन तीर्थांकरांचे उल्लेख आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रचेतस Mon, 09/05/2016 - 19:27 नवीन
रामायणात जैन तीर्थंकरांचे उल्लेख नाहित मात्र तथागत गौतम बुद्धाचे उल्लेख एक दोन ठिकाणी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा