समाजामध्ये कमी माहिती जैन समाजाबद्दल ?
आपल्या समाजामध्ये जैन समाजाबद्दल खूप कमी माहिती आहे का ?
दिगंबर जैन का आहेत?
त्याची गरज का आहे?
ते दिगंबर का आहेत ?
जर आपल्याला एका धर्माबद्दल माहिती नसेल तर आपण आपले मत व्यक्त करताना थोडी माहिती का शोधू नये?
काही लोकांनी "ते नागडे" इत्यादी प्रकारे उपहास केला आहे. त्याना धर्माची माहिती घेणे गरजेचे आहे असे का वाटत नाही?
जैन धर्म मधील प्रत्येक व्यक्ती हिंदू-जैन असे लिहितो, तुम्हीच जर असे लिहले किंवा विरोध केला तर त्याचा परिणाम काय होइल याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. जैन हे आधी हिंदू आहेत मग ते जैन आहेत पण असे दिसू लागले आहे की हिंदू जैन समाजाला आपले समजत नाही आहे.
खूप वाईट वाटले म्हणून लिहिले.
💬 प्रतिसाद
(182)
अ
अनिरुद्ध.वैद्य
Tue, 09/06/2016 - 04:02
नवीन
:)
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 09/06/2016 - 07:51
नवीन
अगदी राक्षस मानतात का याबद्दल शंका वाटते. गणपती हा शिवगण, गणांचा अधिपती म्हणजे तत्सम दुय्यम देवतांपैकी होता. त्याला देवस्वरूप गुप्तकाळात किंवा त्यानंतर आले. त्यामुळे जैनांच्या जुन्या साहित्यात त्याचे तसे वर्णन असेल.
मात्र माझ्या माहितीतली काही जैन कुटुंबे घरी पार्थिव गणपती इतरांप्रमाणेच आणून बसवतात. एक हुबळीचे जैन कलीग गणपतीच्या देवळातही जात असत.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/06/2016 - 07:55
नवीन
राक्षस नाही पण अनार्य मानतात.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Tue, 09/06/2016 - 08:06
नवीन
मुळ वैदीक देवतांमध्ये शंकर गणपती आदी देवता नाहीत, पण त्यांचे गुण विशेष असलेल्या इतर देवता आहेत, जसे की रुद्र अथवा बृहस्प्ती अथ्वा ब्राहम्ण्स्पती.
गुप्तकाळ हिंदुंचा सुवर्णकाळ. ह्यात बर्याच अनार्य देवतांचे उन्नयन होउन त्या मुख्य हिंदु पंचायतानात आणल्या गेल्या.
गणपतीवर विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता असा प्रवास झाला ह्याचे व॑र्णन असणारा लेख वाचला होता बहुधा किस्त्रीम मध्ये. त्यात बरेच लिहिले होते. पण आता नेमके संदर्भ आठवत नाहीत :(
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 09/06/2016 - 08:11
नवीन
रा.चिं.ढेरे यांनी यावर भरपूर संशोधन करून लिहिले आहे.
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Tue, 09/06/2016 - 08:13
नवीन
यांवरून सहज एक किस्सा आठवला. आमच्या येथे जैन लोकं सर्रास गणपती,लक्ष्मी वगैरे पूजतात आणि दुकानात,हापिसात
गणपतीची मूर्ती वा तसबीर लावलेली दिसते. काही वर्षांपूर्वी जैन समाजानी एका साधवींचा कार्यक्रम आयोजित केला होता.
प्रवचनात त्यांनी यांबद्दल नाराजी प्रकट केली आणि जैन धर्माला मूर्ती पूजा कशी निषिद्ध आहे यांवर भाष्य करून हे सर्व थांबवावे असे सांगितले. त्यानंतर बऱ्याचं लोकांनी आपापल्या गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्ती फोटोचे विसर्जन करून टाकले.
काही दिवसां नंतर ज्या लोकांनी हे केले त्यांना अचानक आपला व्यापार मंदावलाय असे वाटू लागले आणि ज्या लोकांनी
केले नव्हते त्यांची भरभराट चालूचं आहे असा प्रचार चालू झाला. मग काय , वाजत गाजत गणपती आणि लक्ष्मी परत
स्थानापन्न झाले.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Tue, 09/06/2016 - 08:39
नवीन
ही त्या मुर्त्यांच्या व्यापार्याने उठवलेली अफवा असावी !!
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Fri, 09/09/2016 - 06:03
नवीन
जैन धर्मात पण अनेक पंथ आहेत उदा. श्वेतांबर , दिगंबर वगैरे वगैरे. त्यापैकी काही पंथ हे मूर्ती पूजक आहेत ज्यांना मंदिरवासी म्हणतात तर काहींमध्ये मूर्ती पूजा निषिद्ध मानली जाते.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 09/05/2016 - 08:40
नवीन
मोक्ष संकल्पनेच्या मुळाशी शंकर आहे. मोक्ष मिळवणारा पहिला व्यक्ती म्हणून शंकर समजला जातो. त्यानेच वेगवेगळ्या ध्यानपद्धती, योगपद्धती शोधून काढल्यात व त्याचा प्रसार केला. शंकर हा त्यामुळेच आदिगुरु आहे. काळाच्या ओघात मुळं हरवली असल्यामुळे अनेक पंथांना उगम माहित नसतो.
जैनांमधे शंकराच्या नामसाधर्म्यामागे हे एक कारण असू शकते.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 09/05/2016 - 09:12
नवीन
नक्की? याचा उल्लेख वाचायला आवडेल.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 09/05/2016 - 09:52
नवीन
उल्लेख कुठे झाला त्याचे ऐतिहासिक संदर्भ देऊ शकत नाही - तसे ते आहेत का याबद्दल मला तरी माहिती नाही. पण वेगवेगळ्या ठिकाणी वाचलेले की शंकर हा सर्व मोक्ष इच्छुकांचा आद्यगुरु आहे म्हणून. कदाचित माझी वाक्यमांडणी चुकली असावी. शंकराने योगसाधनेसहित मोक्षाकडे जाणार्या अनेक मार्गांचा शोध लावला व गुरु-शिष्य परंपरेने त्याचा प्रसार झाला आहे असे अध्यात्मात समजले जाते. ह्यात शंकराला सर्वोच्च समजले जावे असा हेतु नसून मूळ कुठे आहे हे लक्षात यावे असा अर्थ अभिप्रेत आहे. तसेच शंकर हा रुढार्थाने देव समजला जात नसून गुरु समजला जातो. त्याची कृपा (गुरुशिष्यांच्या साखळीमधून आपल्यापर्यंत ते ज्ञान पोचेल ही व्यवस्था) झाली तर मोक्षाकडे जाणार्या पायर्या भराभर चढल्या जातात.
अर्थात ह्या सर्व मान्यता-समज-बीलिफ आहेत. ह्याचे वैज्ञानिकरित्या-ऐतिहासिकरित्या विश्लेषण होईलच असे नाही.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 09/05/2016 - 11:01
नवीन
वैज्ञानिक वगैरे सोडा ओ, ऐतिहासिक संदर्भच हवे होते. पाहतो.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Mon, 09/05/2016 - 11:32
नवीन
यावरुन ज्ञानदेवांचा आपल्या गुरु परंपरेचा (नाथ संप्रदाय) अभंग आठवला:
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा
मच्छिन्द्र तयाचा मुख्य शिष्य
मच्छिन्द्राने बोध गोरक्षासी केला
गोरक्ष वदला गहिनीप्रती
गहिनी प्रसादे निवृत्ती दातार
ज्ञानदेवा सार चोजविले
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 09/05/2016 - 11:55
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments
न
निओ१
Sun, 09/04/2016 - 16:59
नवीन
१) जैनांमध्ये श्वेतांबर, दिगंबर व स्थानकवासी हे ३ उपपंथ/उपजाती (दुसरा योग्य शब्द सुचला नाही) आहेत असे ऐकून आहे. हे खरे आहे का? या व्यतिरिक्त अजून उपपंथ/उपजाती आहेत का?
पन म्न्दिरामध्ये जान्यास बन्दि नाहि. तत्वात फर्क आहे म्हनुन वेगले प्न्थ आहेत.
२) फक्त दिगंबर साधूच दिगंबरावस्थेत राहतात पण इतर उपपंथाचे/उपजातीचे साधू तसे राहत नाहीत हे खरे आहे का?
हो
३) साधूंनी दिगंबरावस्थेत राहण्यामागची नक्की कारणे काय आहेत?
खालि लिहले आहे
दिगंबर साधू भारताव्यतिरिक्त इतर देशांना भेटी देतात का?
माझ्या माहितित नाहि.
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Sun, 09/04/2016 - 15:27
नवीन
नागा साधु पण दिगंबरच असतात
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Sun, 09/04/2016 - 15:43
नवीन
दिगंबर असणे हेच खरेतर नैसर्गिक आहे. आपण उगीच्च्या उगिचच एवढे कपटेलत्ते चढवत असतो.
खालील सुप्रसिद्ध कलाकृती बघा. यातील निर्वस्त्र स्त्रीच्या रूपात पवित्रतेचे, तर सवस्त्र स्त्रीत लोलुपतेचे चित्रण केले गेलेले आहे.
Sacred and profane love – Titian c. 1514 (Borghese Gallery, Rome)
दिगंबर मुनि आणि नागा साधूंना शिरसाष्टांग नमस्कार.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 09/04/2016 - 15:56
नवीन
संदीप डांगे,
तुमचे इथले प्रश्न वाचले. रोचक आहेत. जमेल तशी उत्तरं देतो.
प्र. १. : .... एक धर्मगुरु येऊन राज्यघटनेचा अपमान करुन जातात ह्याबद्दल कोणती केस त्या धर्मगुरुंवर करावी?
उ. १ : कोणाचा आणि कसला अपमान मुनीश्रींनी केलाय?
प्र. २. : जे आहे ते तसेच सत्य ठळक भाषेत मांडल्याने कोणाचा व कसा अपमान होतो? जैन धर्माला सत्याची लाज वाटते का?
उ. २. : तुम्ही थोर पुरूष आहात. म्हणून तुमच्या जन्माचं सत्य उघड्यानागड्या भाषेत मांडावं का? म्हणजे तुमचे जन्मदाते तुमच्या जन्माआधी काही महिने कोणत्या अवस्थेत होते, नंतर प्रत्यक्ष जन्माच्या वेळेस कोणत्या अवस्थेत होते, मधला प्रवास तुम्ही यशस्वीरीत्या कसा पार पाडलात, इत्यादि, इत्यादि?
आता उपप्रश्न पाहूया.
अ) जैन गुरु नागडे नाहीत?
उ) आहेत. बरं मग?
ब) त्यांनी विधानसभेत भाषण केले नाही?
उ) केलं. त्यासाठीच तर आमंत्रण होतं.
क) त्यांनी राजनीती ही धर्माची पत्नी असल्याचे म्हटले नाही?
उ) हो, म्हंटलं. मग काय आकाश कोसळून पडलं? आजच्या समानतेच्या युगात धर्म आणि राजनीती पतीपत्नींप्रमाणे हातात हात घालून गेले पाहिजेत. यात काय चुकीचं आहे?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
न
निओ१
Sun, 09/04/2016 - 16:57
नवीन
आता मुसल्मान यानि ३ तलाक वर कोर्तात भाश्य केले आहे, त्यावर त्यान्चे मत काय अस्ले?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 09/04/2016 - 17:29
नवीन
महाशय, माझ्या वक्तव्याने जैन धर्माचा अपमान कसा झाला याबाबद्ल उत्तर हवंय, आहे का तुमच्याकडे? बाकीचा फाफट पसारा नन्तर बघू!
बाकी माझ्या जन्माचं रहस्य वगैरे काही नाही हो, जसा तुमचा झाला तसाच माझाही झाला, तुमचा काही वेगळ्या पद्धतीने झाला असल्यास ऐकायला आवडेल!
- Log in or register to post comments
न
निओ१
Sun, 09/04/2016 - 16:33
नवीन
णमो अरिहंताणं
णमो सिद्धाणं
णमो आयरियाणं
णमो उवज्झायाणं
णमो लोए सव्व साहूणं
ही जैन धर्माचि शिकवन आहे.
वादाला वाद करने नाहि. विरोधि मताचे स्वागत आहे पन आम्च्या मताला विरोध म्हनुन विरोध करु नका.
काहि बाबिबद्दल मि सविस्तर उत्तर देइन पन आता उत्तर देत नाहि याचा अर्थ असानाहि कि उत्तर देनार नाहि.
जैन धर्मामध्ये दिग्न्बर जैन हे नग्न राहतात, त्याबद्दल सविस्तर् लिह्तो आहे.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/04/2016 - 17:48
नवीन
>>>> जैन धर्मामध्ये दिग्न्बर जैन हे नग्न राहतात, त्याबद्दल सविस्तर् लिह्तो आहे.
सविस्तर लिहा. मला खूप विचित्र वाटतं तो सर्व प्रकार . "नागड़ेपण" आजच्या काळात धर्मोपयोगी कसं आहे, तेवढे नक्की पटवून द्या.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Mon, 09/05/2016 - 06:59
नवीन
"नागड़ेपण" आजच्या काळात धर्मोपयोगी कसं आहे, तेवढे नक्की पटवून द्या.
जगातल्या सर्व धर्म, पंथांचे साधक आपापली संख्या वाढवत राहतात. त्या दृष्टीने नग्नता उपयोगी आहेच.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Mon, 09/05/2016 - 17:44
नवीन
एक अवांतर प्रश्न: हे "णमो" असं का लिहितात?
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Mon, 09/05/2016 - 17:46
नवीन
'नमो' लिहील्यास ते 'नरेंद्र मोदीं'चे भक्त आहेत असा गैरसमज पसरेल, म्हणून असेल.
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Mon, 09/05/2016 - 17:52
नवीन
पेठकर काकांनी षट्कारच मारलाय. चेंडू स्टेडियमच्या बाहेर.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 09/05/2016 - 17:56
नवीन
बहुधा ते पाली, अर्धमागधी किंवा ब्राह्मी (ह्यापैकी असेल ते) असावेत. त्यात न एवजी ण असेल.
मिच्छामि दुक्कडम, पर्युषण आले वाटते. कार्डांची ऑर्डर येईल बहुधा. ;)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 09/06/2016 - 04:33
नवीन
आबा: अभ्या इज़ रैट्ट. जैनांची धर्मभाषा अर्धमागधी, त्यात असे लिहितात.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 09/06/2016 - 04:40
नवीन
"गाथा सप्तशती"ला "गाहा सत्तसई" लिहिणारी भाषा अन ही जैन पद्धतीची अर्धमागधी सेम का बॅटमॅन भाई? का ती पाली/ब्राह्मी अन ही अर्धमागधी? ब्राह्मी स्क्रिप्ट असते की भाषा?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/06/2016 - 05:27
नवीन
गाहा सत्तसईची भाषा महाराष्ट्री प्राकृत.
पालीचीच ही विविध व्हर्जन्स. सुप्रसिद्ध विनोदी लेखक चिं. वि. जोशी हे पाली भाषेचे मोठे विद्वान होते हे खूप कमी जणांना माहित आहे.
ब्राह्मी ही लिपी आहे.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 09/06/2016 - 05:39
नवीन
महाराष्ट्री प्राकृत म्हणजे "दिण्णले, दिधल्ले असे बोलणारे" असा उल्लेख आहे तीच का?
चिं. वि. जोशींची माहिती रोचक आहे राव. पूर्वी पाली अन अर्धमागधी ह्या भाषा दहावीच्या/बारावीच्या अभ्यासक्रमात होत्या असे ऐकिवात आहे. मुले स्कोअरिंगसाठी त्या घ्यायचे.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/06/2016 - 05:55
नवीन
हो. तीच.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Tue, 09/06/2016 - 08:07
नवीन
देवी सप्तशती कोणती?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 09/07/2016 - 22:38
नवीन
तो दिण्हले, गहिल्ले, इ. उल्लेख असलेला श्लोक/आर्या सुमारे इ.स. ७००-८०० च्या सुमारास आहे, उद्योतनसूरी नामक एका जैन मुनींच्या कुवलयमाला नामक ग्रंथातला. त्या काळात महाराष्ट्रात जी भाषा बोलत तिला अपभ्रंश अशी संज्ञा आहे. महाराष्ट्री प्राकृत ही सातवाहन(वल्ली)कालीन, अदमासे दोनेक हजार वर्षांपूर्वीची. अर्थात याचा अर्थ त्या दोहोंत काही साम्यच नव्हते असा आजिबात घेऊ नये. पण यांच्यातले फरक मला नक्की माहीत नाहीत. नीट अभ्यासले पाहिजे.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 09/07/2016 - 22:36
नवीन
वल्ली सरांनी उत्तर दिलेलेच आहे. त्यात भर घालायची म्हणजे महाराष्ट्री प्राकृत ही भारताच्या पश्चिम भागातली, तर अर्धमागधी ही पूर्व भागातली भाषा आहे. पाली हे अनेक बोलींचे कडबोळे मुद्दाम तयार केले गेलेले आहे.
- Log in or register to post comments
न
निओ१
Sun, 09/04/2016 - 16:48
नवीन
गिन्बर जैन हे दिशा हे आमचे वस्त्र आहे असे मानते, वस्त्र त्यागाने मोक्श प्राप्तिमध्ये मदत होते.
जैन धर्म्चाचि ५ तत्वे आहेत.
१. अहिंसा
२. सत्य
३. अस्तेय
४. ब्रह्मचर्य
५. अपरिग्रह
या मध्ये जो अपरिग्रह आहे त्याचा अर्थ सरल आहे, कि कुथल्याहि ताज्य वस्तुबद्दल ममत्व न थेवने. त्यामध्य भोजन, वस्तु, वास्तु व परिधान याचा त्याग अभिप्रेत आहे व त्याचेच पालन मुनि करत असतात.
- Log in or register to post comments
इ
इल्यूमिनाटस
Sun, 09/04/2016 - 16:53
नवीन
पण तेवढं शुद्धलेखनाचं बघा कि जरा
वाचायला सोपं पडेल
- Log in or register to post comments
न
निओ१
Sun, 09/04/2016 - 16:55
नवीन
तुम्हालापन हे ताइपिन्ग शिकताना वेल लागल असेल ना ? मला थोदा त्रास होतो आहे पन शिकेन.
- Log in or register to post comments
इ
इल्यूमिनाटस
Sun, 09/04/2016 - 16:58
नवीन
शिकाऊ अवस्थेत आहात होय
शिका हो शिका
- Log in or register to post comments
न
निओ१
Sun, 09/04/2016 - 17:00
नवीन
तुम्हि शिकुन आलात का?
येथे येउनच शिकला असाल ना?
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Mon, 09/05/2016 - 04:53
नवीन
तुमची मराठी शुद्ध दिसते. टायपिंग मुद्दाम अशुद्ध केल्यासारखे दिसते आहे.
शिवाय शाब्दिक हिंसाही भरपूर करीत आहात ;)
- Log in or register to post comments
इ
इल्यूमिनाटस
Mon, 09/05/2016 - 04:56
नवीन
;)
- Log in or register to post comments
भ
भम्पक
Sun, 09/11/2016 - 16:08
नवीन
हा हा हा ह्ह्पुवा
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 09/04/2016 - 18:43
नवीन
>>> गिन्बर जैन हे दिशा हे आमचे वस्त्र आहे असे मानते, वस्त्र त्यागाने मोक्श प्राप्तिमध्ये मदत होते.
दिगंबरावस्थेत राहिल्याने मोक्षप्राप्तीसाठी कशी मदत होते हे जरा उलगडून सांगता का?
- Log in or register to post comments
म
मुक्त
Sun, 09/04/2016 - 18:48
नवीन
नागा साधू नंगे का रहातात. धर्म मार्तंडांकडून उत्तर मिळेल हि अपेक्षा. ;)
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sun, 09/04/2016 - 19:35
नवीन
कपडे घातल्याने तरी मोक्ष मिळतो का ?
.....
अपरिग्रह १०० % पाळायचे म्हणजे नागडेच रहायला लागेल ना ?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 09/05/2016 - 04:58
नवीन
>>>>>> दिगंबरावस्थेत राहिल्याने मोक्षप्राप्तीसाठी कशी मदत होते हे जरा उलगडून सांगता का?
हो,हो, मोक्षप्राप्तीचा मार्ग जरा उलगडून सांगा.
मोक्षप्राप्ती मिळत असेल तर मलाही असल्या अवस्थेत राहायला आवडेल. ;)
(फक्त आजूबाजूला लोक नसले पाहिजेत, म्हणजे कुठे जंगलात वगैरे बरं पडेल)
-दिलीप बिरुटे
(लाजाळू)
- Log in or register to post comments
न
निओ१
Sun, 09/04/2016 - 17:13
नवीन
आपल्याला माहिति नाहि म्ह्नजे त्याचा विरोधच केला पाहिजे का?
- Log in or register to post comments
इ
इल्यूमिनाटस
Sun, 09/04/2016 - 17:16
नवीन
नाय शिकून आलुय
क्लास लावला होता
शिकवणी लावण्यापूर्वी :तुम्हालापन हे ताइपिन्ग शिकताना वेल लागल असेल ना ? मला थोदा त्रास होतो आहे पन शिकेन.
शिकवणी लावल्यानंतर: तुम्हाला पण हे टायपिंग शिकताना वेळ लागला असेल ना? मला थोडा त्रास होतो आहे, पण शिकेन.
खात्रीलायक बदल फक्त एका आठवड्यात!
पत्ता तुम्हाला व्यनि करतो
पण तुमच्या शिकाऊ वृत्तीला सलाम
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 09/04/2016 - 17:32
नवीन
निओ साहेब, तुम्ही आहे तसं लिहा, शुद्धलेखन आता तरी महत्वाचे नाही, माझ्या वक्तव्याने अपमान कसा झाला तेवढ्या पुरतं बोललात तरी पुरे, म्हणजे नेमक्या मुद्द्यावर बोलता येईल, बाकी भडकाऊ प्रतिसादांकडे इग्नोर मारा,
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »