Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाऊस

B — bhavana kale, Tue, 09/06/2016 - 11:46
काल खूप दिवसांनी तुला पावसात चिंब भिजताना पाहिलं.. आणि छत्री मध्ये असूनसुद्धा माझा मन भलतंच शहारलं....... जोरदार वाऱ्याने त्यात अजून कहर करावा छत्रीचे तीन तेरा वाजवून त्याने आपला इरादा स्पष्ट करावा.... समोरचा अथांग सागर जणू पावसाने कुशीत घेतलेला आता नजरेसमोर फक्त तू... आणि नजरेत तुझ्या प्रेमाचा ओलावा... समोरून बेफाम लाटा.. वरून चिंब धारा.. पायाखाली गुदगुल्या करणारी वाळू अन सर्वांगला शहारणारा वारा... पूर्ण निसर्गचं आपल्या साथीला असतांना कॅमेरा क्लिक ची गरजच कशाला... निथळलेला तुझा तो चेहरा माझ्या नजरेत मी कधीच टिपलेला... पापण्यांवर जमलेले थेंब हळुवार गालावरून ओघळत होते.... उगाच केसांना दिलेल्या झटक्याने ते बिचारे गडबडले होते... पुढचा पूर्ण वेळ माझं मन.. त्या थेंबातलाच एक भाग बनून राहिला... काल खूप दिवसांनी तुला चिंब भिजताना पाहिलं... आणि छत्री मध्ये असून सुद्धा माझं मन भलताच शहारलं.... माझं पहिलाच प्रयत्न आहे मिपावर काही खरडण्याचा म्हणून सांभाळून घ्यावे हि विनंती..मी मिपा गेली तीन वर्षांपासून वाचतेय तर बरेच मिपा सदस्य ओळखीचेच वाटायला लागलेत..असो.. धन्यवाद..

प्रतिक्रिया द्या
2002 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
पाटीलभाऊ Tue, 09/06/2016 - 12:32 नवीन
चांगली सुरुवात...पुढील वाटचालीस शुभेच्छा..!
  • Log in or register to post comments
B
bhavana kale Tue, 09/06/2016 - 12:32 नवीन
मिसळलेला काव्यप्रेमी यांना विशेष धन्यवाद ...धाग्यातील चुका सुधारणेसाठी..
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 09/06/2016 - 12:38 नवीन
छान कविता धन्यवाद कसले? कामचं आहे ते आमचं! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: bhavana kale
ए
एस Tue, 09/06/2016 - 12:56 नवीन
पापण्यांवर जमलेले थेंब हळुवार गालावरून ओघळत होते.... उगाच केसांना दिलेल्या झटक्याने ते बिचारे गडबडले होते...
खासच. पुलेशु.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 09/06/2016 - 13:07 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 09/06/2016 - 13:32 नवीन
भारी कविता! अजुन लिहा!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 09/06/2016 - 13:40 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्रभास Tue, 09/06/2016 - 14:15 नवीन
छानच...
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Tue, 09/06/2016 - 17:29 नवीन
पूर्ण निसर्गचं आपल्या साथीला असतांना कॅमेरा क्लिक ची गरजच कशाला... निथळलेला तुझा तो चेहरा माझ्या नजरेत मी कधीच टिपलेला...
  • Log in or register to post comments
व
वाल्मिक Tue, 09/06/2016 - 20:12 नवीन
छान कविता
  • Log in or register to post comments
र
रुपी Tue, 09/06/2016 - 20:48 नवीन
छान कविता. आवडली :)
  • Log in or register to post comments
प
पथिक Wed, 09/07/2016 - 08:27 नवीन
छान आहे कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
B
bhavana kale Wed, 09/07/2016 - 09:24 नवीन
धन्यवाद सगळ्यांना...प्रयन्त करेन पुन्हा काहीतरी लिहिण्याचा..
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Wed, 09/07/2016 - 10:45 नवीन
खुप आवडली कविता.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा