प्रेमकविता...विडंबन.
एका मित्राचे नुकतेच लग्न ठरले आहे. सध्या प्रेमरसात न्हाऊन निघत असल्यामुळे ट ला ट जुळवून रोज तो एक प्रेमकविता करतो. मला कवितेतलं खूप काही कळतं असा त्याचा समाज असल्यामुळे तो आधी मला पाठवतो मग तिला..आज सकाळी त्याने पाठवलेल्या कवितेचे विडंबन करण्याचा मोह मी टाळू शकलो नाही..
मित्राची कविता..
भिडत होती नजर मोहक ती...
माझ्या नजरेस जेंव्हा जेंव्हा...
उमटत होते प्रतिबिंब तूझे ते...
या ह्रुदया मधे तेंव्हा तेंव्हा...
पडत होते शब्द तूझे ते
या कानांवर जेंव्हा जेंव्हा...
तरंग उठत होते प्रेमाचे
या मनामधे तेंव्हा तेंव्हा...
येत होता हात नाजूक तो
या हातांमध्ये जेंव्हा जेंव्हा...
धस्स होत होते ते
या काळजात तेंव्हा तेंव्हा...
पाहून मजला उमटत होते
स्मितहास्य मुखावर जेंव्हा जेंव्हा...
हरवून जात होतो मी
त्या हसण्या मध्ये तेंव्हा तेंव्हा...
जवळ येत होतीस
या ह्रुदयाच्या तू जेंव्हा जेंव्हा...
शहारून येत होते ते
या तनामध्ये तेंव्हा तेंव्हा...
येत होती वेळ नजीक
दूर जाण्याची जेंव्हा जेंव्हा...
घालमेल होत होती ती
या वेड्या जीवाची तेंव्हा तेंव्हा...
सतावतो मजला हा
एकटेपणा आता जेंव्हा जेंव्हा...
घेता मिटून डोळे ते
जवळ जाणवतेस तु तेंव्हा तेंव्हा...
लग्नानंतर या कवितेचे स्वरूप कसे असेल ह्याविषयी केलेले चिंतन..भिडत होती नजर मोहक ती...माझ्या नजरेस जेंव्हा.. देवा!! काय मागशील तू आता..खर्च किती अनं केंव्हा ! पडत होते शब्द तूझे ते...या कानांवर जेंव्हा... शांत कधी बसशील का?..विचार एवढाच तेंव्हा ! येत होता हात नाजूक तो.. या हातांमध्ये जेंव्हा... तुका म्हणे क्षणिक हे सारे..मोहपाश हे सुटतील केंव्हा !! पाहून मजला उमटत होते..स्मितहास्य मुखावर जेंव्हा.. घाबरत होतो मी..काय चुकलो मी देवा अनं केंव्हा ! येत होती वेळ नजीक... दूर जाण्याची जेंव्हा.. क्षण कधी येईल तो..वाट त्याचीच तेंव्हा ! सतावतो मजला हा एकटेपणा आता जेंव्हा.. बाकी काहीच नाही ..भुकेची जाणीव फक्त असते मला तेंव्हा..! -चिनार
पुन्हा मिसामा