गुडगांव
आपणच खरवडून काढावे
आपल्या अजस्र जखमेवरच्या
अपक्व खपल्यांचे तुकडे....
तसं हे शहर
भयाण स्वप्नांच्या रात्रीनंतर
दिवास्वप्नांच्या भीतीने
टक्क जागे राहावे.....
तसं हे शहर
सागराचा थांग घेताना
अथांग व्हावे नदीने
अन् त्याचा माज करावा......
असं हे शहर
उत्फुल्ल पाण्यात
कळकट शेवाळी
तवंग तरंगावा.....
तेच हे नगर
एका पराभवातून अलगद
दुसऱ्या पराभवात ढकलणाऱ्या
विजयाचा आनंदोत्सव....
.....गुडगांव
💬 प्रतिसाद
(20)
च
चांदणे संदीप
गुरुवार, 09/08/2016 - 20:38
नवीन
कविता आवडली...!
Sandy
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 09/08/2016 - 20:51
नवीन
बॅडगाव आहे म्हणा कि हे.
आवडली स्वामी कविता
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Fri, 09/09/2016 - 03:03
नवीन
पण गुडगाव कनेक्शन न कळल्याने वाईच कंफ्युज झालोय.
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Fri, 09/09/2016 - 03:38
नवीन
हा धागा दोनदा का आलाय?
http://www.misalpav.com/node/37289
- Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद
Fri, 09/09/2016 - 04:11
नवीन
कल्पना नाही ब्वा! इंटरनेटच्या गडबडीमुळे दोनदा प्रकाशित झाला असेल.
- Log in or register to post comments
प
पथिक
Fri, 09/09/2016 - 06:12
नवीन
वा! आवडली !
- Log in or register to post comments
ह
हलकट बाब्या
Fri, 09/09/2016 - 07:58
नवीन
कवितेचं शीर्षक गुरुग्राम करा हो, गुडगांवच गुरुग्राम केलंय हरियाणा सरकार ने.. उगीच भावना दुखवायला नको ;)
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 09/09/2016 - 10:09
नवीन
दिल्ली/नोइडाही चालेल ना?
- Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद
Sun, 09/11/2016 - 03:37
नवीन
बर्यापैकी चालू शकेल. पण या कवितेत दिल्लीतून गुडगाव उगवले आहे याचे हिंट्स आहेत, त्यामुळे दिल्ली गॄहीत धरली तर अजून वेगळ्या पद्धतीने त्या ओळी पहाव्या लागतील. अर्थात, एका कवितेचे वेगवेगळ्या दृष्टिकोणातून आकलन नक्कीच शक्य असते. दिल्लीवर माझी एक कविता आहे, पण ती हिंदीत आहे. कधीतरी मराठीत अनुवाद करून टाकतो. नोइडाचा फार अनुभव नाही मला, त्यामुळे नोइडावर थेट अशी कविता लिहीलेली नाही अद्याप.
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 09/09/2016 - 10:16
नवीन
माणसांच्या जंगलात हरवलेलं शहर! शहर का जंगल म्हणावं हे! का मानवी भावनांचं वाळवंट?
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Fri, 09/09/2016 - 12:00
नवीन
मस्त!!
ᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜ
ᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜ
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Fri, 09/09/2016 - 14:41
नवीन
नाही आवडली
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 09/10/2016 - 06:14
नवीन
आम्हाला आवडली (सगळी समजली नाही आणि सगळी समजलीच पाहिजे असा अट्टाहासही नाही,कधी कधी न कळण्यातही आनंद असतोच की)
का आवडली नाही त्याचे एक दोन घटक्/मीमांसा सांगा ही विनंती.
याचकाची पत्रेवाला नाखु
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Sat, 09/10/2016 - 18:02
नवीन
नकारात्मक भावना जाणवते कवितेत. म्हणून नाही आवडली.
- Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद
Sun, 09/11/2016 - 03:34
नवीन
हाहाहा! कविता सकारात्मकच पाहिजे असे असते तर आपण पुष्कळशा अप्रतिम कवितांना मुकलो असतो. अख्खं विद्रोही साहित्यच गायब झालं असतं! हेहेहे!
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Sun, 09/11/2016 - 07:16
नवीन
कविता मला का आवडली नाही ते मी सांगितलं. एकूण विद्रोही किंवा नकारात्मक साहित्याची मीमांसा अपेक्षित आहे हे मला माहीत नव्हात. असो! चालुद्या
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Sun, 09/11/2016 - 05:31
नवीन
एका पराभवातून अलगद
दुसऱ्या पराभवात ढकलणाऱ्या
विजयाचा आनंदोत्सव.
हा एक जबरदस्त षटकार आहे ह्या कवितेतला. वैश्विक सत्य वगेरे काय ते म्हणतात तसे.
बाकीच्या एकेरी दुहेरी धावाही आवडल्या
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब
Sun, 09/11/2016 - 07:09
नवीन
गुडगावात कुत्री असतात का हो? काय परिस्थिती आहे आमच्या समाजाची तिथे?
(अखिल भारतीय कलुंगी कुत्री संघटना, संस्थापक अध्यक्ष)
ढेल्या
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Sun, 09/11/2016 - 13:21
नवीन
दिल्ली आणि गुरूग्राम दोघांचे वर्णन - एके ठिकाणी महानगर आणी दुसरीकडे मागासलेली गाव असे आहे. बाकी द्रोणाचार्यांचे गाव म्हणाल तर एकी कडे युवराज अर्जुन तर दुसरी कडे सूतपुत्र कर्ण. एकाच नगरात राहतात. पण गुरूग्राम अत्यंत महागडे शहर आहे, हे म्हणू शकतो. नौकरी साठी हजारोंच्या संख्येने दिल्लीकर गुरूग्राम येथे येतात.
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
Sun, 09/11/2016 - 19:22
नवीन
एका पराभवातून अलगद
दुसऱ्या पराभवात ढकलणाऱ्या
विजयाचा आनंदोत्सव....
शहरीकरण होताना होणारे शहारीकारण.
अप्रतिम.
- Log in or register to post comments