Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नरेन्द्र मोदी आणि २०१९

झ
झपाटलेला फिलॉसॉफर
गुरुवार, 09/08/2016 - 18:56
🗣 32 प्रतिसाद
परवाच इन्डियन एक्स्प्रेस वॄत्तसमूहाने घेतलेल्या सर्व्हे मध्ये पन्तप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या नेतॄत्वाखाली भाजप सरकार वर जनतेचा पूर्ण विश्वास असून २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपच विजयी होइल असा निष्क्रर्ष व्यक्त केला आहे. http://indianexpress.com/article/india/india-news-india/70-percent-indians-want-modi-back-as-pm-in-2019-over-50-percent-want-liquor-ban-app-based-poll-3010422/ ही एक अतिशय आशादायी बाब असून मोदींच्या नेतॄत्वाखाली भाजपने देशाला स्थिर आणि कणखर सरकार दिलेले आहे. आन्तरराष्ट्रीय राजकारणात भारताची पत उंचावलेली असून आर्थिक आणी अन्य सामाजिक्/प्रशासकीय सुधारणांचा गाडा पुढे चालवून सरकारच्या कामगिरीचे ग्राउन्ड रिझल्ट्स दिसायचे असतील तर मोदी सरकार मोठ्या कालावधी साठी सत्तेत असणे गरजेचे आहे. त्याबरोबरच याआधीच्या सरकारानी प्रचंड बिघडवून ठेवलेल्या गोष्टी सुधारायच्या तर पुरेसा वेळ हवाच . पण त्याबरोबरच आणखी एक गोष्ट महत्त्वाची वाटते ती म्हणजे आता केन्द्र सरकार असे म्हणत आहे की देशातील विविध निवडणुका एकत्र घेतल्यास प्रचंड पैसा आणि मनुष्यबळ वाचेल . हे तात्त्विक दॄष्ट्या बरोबर असले तरी प्रॅक्टी़कली योग्य दिसत नाही . याचे कारण वाजपेयी सरकारने अशाच हव्यासापायी केन्द्र आणि राज्यातील सहा महिन्याचा कार्यकाळ वाया घालविला होता ,शेवटी लवकर निवडणुका घेवून केन्द्र आणी राज्य दोन्ही ठिकाणी आपटी खाल्ली होती हा इतिहास विसरू नये असे वाटते. आपणास काय वाटते?

प्रतिक्रिया द्या
6027 वाचन

💬 प्रतिसाद (32)
च
चंपाबाई गुरुवार, 09/08/2016 - 19:26 नवीन
१६ ... १७ .... १८ अजुन बाकी आहे.
  • Log in or register to post comments
प
पथिक Fri, 09/09/2016 - 07:09 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
म
मुक्त विहारि Sat, 09/10/2016 - 08:49 नवीन
मनोरंजक प्रतिसाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Sat, 09/10/2016 - 15:39 नवीन
करी मनोरंजन जो मुलांचे (जनांचे) जडेल नाते प्रभूशी तयाचे. ..साने गुरुजी. ..... तुमचे मनोरंजन केल्याने माझे नाते प्रभूशी जुळले आहे. ... चंपे गुरुजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अभ्या.. Sat, 09/10/2016 - 16:19 नवीन
आता रेल्वेत काही प्रॉब्लेम आला की चंपे गुरुजींना ट्वीट करायचे. त्यांचे नाते आहे प्रभूंशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
अ
अभ्या.. गुरुवार, 09/08/2016 - 19:38 नवीन
जनतेचा विश्वास हाय ना, मग कशाला इलेक्शन बिलेक्शन? इलेक्शनचा खर्च लोकसंख्येने डिव्हाईड करून खात्यावर जमा द्या म्हणावं. आधीचे 15 पण पेंडिंग आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 09/08/2016 - 21:51 नवीन
बरं ...
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 09/09/2016 - 05:10 नवीन
नरेन्द्र मोदी हे देशाला लाभलेले चांगले पंतप्रधान आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची निश्चितच प्रगती होईल. परंतु सर्व्हेचा हा निष्कर्ष : "परवाच इन्डियन एक्स्प्रेस वॄत्तसमूहाने घेतलेल्या सर्व्हे मध्ये पन्तप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या नेतॄत्वाखाली भाजप सरकार वर जनतेचा पूर्ण विश्वास असून २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपच विजयी होइल असा निष्क्रर्ष व्यक्त केला आहे." काही तेवढा खरा नाही वाटत. पन्तप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्यावर जनतेचा पूर्ण विश्वास आहे परंतु भाजप वर नक्कीच नाहीये. शत प्रतिशत भाजपा या ध्येयाने पछाडलेल्या भाजप च्या नेते मंडळींनी जवळपास सर्व राज्यात आपल्या मित्र पक्षांशी शत्रुत्व निर्माण करून ठेवले आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत ह्या पक्षाला बहुमत मिळणे हि अशक्य गोष्ट वाटते, निकाला नंतर ह्याच दुखावलेल्या मित्र पक्षांच्या मदतीच्या कुबड्या घेऊनच पुन्हा सरकार स्थापन करता येण्याची शक्यता अधिक वाटते.
  • Log in or register to post comments
म
महेश शिपेकर Fri, 09/09/2016 - 07:05 नवीन
जनतेचा विश्वास आहे ना मग जनतेन च त्याना कुबड्या घ्यायचि गरज भासु देउ नये कारन कुबड्या घेउन चालनरे सरकार हे अपन्ग असनार हे नक्कि मग अपन्ग सरकार निवदुनच देउ नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
प
पक्षी Fri, 09/09/2016 - 09:50 नवीन
ते सिगरेट सोडायचा प्रयत्न करणारे फिलॉसॉफर तुम्हीच का ??? सुटली का सिगरेट?
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Fri, 09/09/2016 - 10:02 नवीन
नक्कीच..नमो पंतप्रधान म्हणून चांगले आहेतच...त्यात वाद नाहीच...! पण भाजपा मध्ये काही वाचाळ वीर आहेत...त्यांना जरा लगाम घातला तर..बरं होईल. उदो उदो ऐवजी...नमो नमो करणारा.. पाटील !
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Fri, 09/09/2016 - 10:10 नवीन
बर्नॉल कुठली कंपनी बनवते? त्या कंपनीचे शेअर घेऊन ठेवावे म्हणतो. वर म्हटल्याप्रमाणे झालं खर तर बर्नॉलचा खप खूप वाढेल.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 09/09/2016 - 12:36 नवीन
फक्त 9 प्रतिसाद, मोदी असून???
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 09/09/2016 - 13:06 नवीन
मोदींना मते मिळतात, हे कदाचीत बहुमताने मान्य असेल. त्यामुळे प्रतिसादाची काय गरज? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Fri, 09/09/2016 - 13:15 नवीन
अहो अजेंडा राबवायचा आहे ना तुम्हाला..? मग असे नसते बोलायचे. "हिटलर मोदीच्या फॅसीस्ट हुकुमशाहीला मते मिळतात, हे कदाचीत बहुमताने मान्य असेल" असे काहीतरी लिहा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ग
गॅरी ट्रुमन Fri, 09/09/2016 - 13:53 नवीन
हिटलरही लोकशाही पध्दतीनेच निवडून आला होता हे विसरलात का मोदकराव? तेव्हा हिटलर मोदीच्या फॅसीस्ट हुकुमशाहीला मते मिळणे अगदीच शक्य आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 09/09/2016 - 16:41 नवीन
हा हा.. बादवे, मोदी २०१९ ला निवडणूक जिंकले तर त्यांना पुढील दशकात एखाद्या कारणाने नोबेल प्राईझ मिळण्याची दाट शक्यता आहे. ...आणि जर चुकून ते शांती साठी मिळाले तर किती जणांची दुकाने बंद होतील देव जाणे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sat, 09/10/2016 - 05:46 नवीन
तर किती जणांची दुकाने बंद होतील देव जाणे. :)
बाकी कुणाची नाही तरी बुबुडाविपुमाधविंची (बुध्दीजीवी बुध्दीप्रामाण्यवादी डावे विवेकवादी पुरोगामी मानवतावादी धर्मनिरपेक्ष विचारवंत) दुकाने मात्र लवकरात लवकर कायमची बंद व्हावीत असे फार वाटते. भारताचे तुकडेतुकडे होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ही जे.एन.यु मधील घोषणा त्यांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य वाटते पण माजी लष्करी अधिकारी जी.डी.बक्षी यांनी "आमच्या पिढीने पाकिस्तानचे दोन तुकडे केले आता तुमच्या पिढीने पाकिस्तानचे आणखी चार तुकडे केले पाहिजेत" असे म्हटले तर ते विधान द्वेषपूर्ण वाटते. असली हरामखोर जमात आहे ही बुबुडाविपुमाधवि म्हणजे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
फ
फेदरवेट साहेब Sat, 09/10/2016 - 15:59 नवीन
बाकी कुणाची नाही तरी बुबुडाविपुमाधविंची (बुध्दीजीवी बुध्दीप्रामाण्यवादी डावे विवेकवादी पुरोगामी मानवतावादी धर्मनिरपेक्ष विचारवंत) दुकाने मात्र लवकरात लवकर कायमची बंद व्हावीत असे फार वाटते. हे असले शॉर्ट फॉर्म तुम्हाला फारच उच्च विनोद वगैरे वाटतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
संदीप डांगे Fri, 09/09/2016 - 16:06 नवीन
2019 मघ्ये उत्तर देईल ह्या प्रतिसादाला... तोवर वाट बघूया! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
म
मोदक Fri, 09/09/2016 - 16:50 नवीन
2019 मघ्ये उत्तर देईल ह्या प्रतिसादाला... तोवर वाट बघूया! ;) असे असेल तर "फक्त 9 प्रतिसाद, मोदी असून??? " येथे नक्की कसले प्रतिसाद अपेक्षित होते..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 09/09/2016 - 18:07 नवीन
तुमची कॉपी मारण्याचा प्रयत्न केला ;)) निस्ते मोदीं चे नाव घेतले की प्रतीसादाचे रतीब पडतात, इसबार ऐसा होते नही देखा;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 09/09/2016 - 18:37 नवीन
बहुत बार ऐसा नहीं हुवा है, पढाई जारी रख्खे..! :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ज
जेपी Fri, 09/09/2016 - 16:11 नवीन
एक पण मेगाबायटी प्रतिसाद नाही.लेखाच विश्लेषण नाही. हंत्तप्रभो:
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 09/09/2016 - 17:56 नवीन
हल्ली मोदीभक्त आणि मोदीद्वेष्टे अशी दोन टोकाचीच माणसे पहायला मिळतात. माझ्या मते २०१९ मधे मोदींनी हरावेच. कारण कितीही काम केले तरी जनतेच्या शिव्याच खायच्या असतील तर कशाला यायचे सत्तेवर. लोकांना पुन्हा एकदा जुन्या राजवटीचा अनुभव घेऊ दे. हरण्याचा दुसरा फायदा म्हणजे, भाजपातले इतर मूर्ख लोक तरी ताळ्यावर येतील. यथा प्रजा तथा राजा, हेच आपल्या देशाला लागू आहे आणि तसेच होईल.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 09/09/2016 - 23:12 नवीन
बरेच लोक असे आहेत की मोदी किंवा भाजपाचे विशेष प्रेम नाही पण सिकुलर व काँग्रेस यांच्यावर प्रचंड राग आहे. अशा बहुसंख्यांच्या मनाप्रमाणे व्हायचे तर मोदी अजून एकदा पीयेम होऊदेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
व
विकास Sat, 09/10/2016 - 00:13 नवीन
मला किंचीत वेगळे वाटते... मला मोदींनी जिंकावे असेच वाटते... पण ते व्यक्तीगत झाले. पण त्याहूनही असे वाटते की, मोदींनी हरावे का जिंकावे या पेक्षा, मोदींना (कुठल्याही अथवा एकत्रीत) विरोधी पक्षाकडून त्यांच्या कार्यशक्तीशी आणि एथिक्सला तुल्यबळ ठरेल अशा एखाद्या नेत्याकडून आव्हान मिळावे. त्यातून देशाचे पण भले होईल आणि राजकारण्यांमधे पण सकारात्मक इर्षा जागॄक होईल. (काही पण वाटते मला! ;) :( ) अगदी सुरवातीस मला व्यक्तीगत आवडत नसले तरी केजरीवाल तसे होऊ शकतील असे वाटत होते... पण नीळा कोल्ह्याचा रंग देखील पाण्यात पडून निघून जायला जितका काळ लागला असेल तितका देखील या माणसाला दम ठेवता आला नाही! :( त्यामुळे ते बाद. दुसरे म्हणजे नितिशकुमार वाट होते... पण लालूशी गटबंधन करून सगळे मुसळ केरात गेले आहे असे वाटते. भारत हा सव्वाशे कोटींचा देश आहे. मोदींना तुल्यबळ ठरेल असा एक नेता इतक्या पैदाशीतून निघू नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
म
मंदार कात्रे Sat, 09/10/2016 - 04:36 नवीन
पण नीळा कोल्ह्याचा रंग देखील पाण्यात पडून निघून जायला जितका काळ लागला असेल तितका देखील या माणसाला दम ठेवता आला नाही! :(
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
च
चंपाबाई Sat, 09/10/2016 - 05:21 नवीन
भाजपा भगवा कोल्हा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
म
मुक्त विहारि Sat, 09/10/2016 - 08:48 नवीन
मनोरंजक प्रतिसाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
इ
इरसाल Sat, 09/10/2016 - 07:11 नवीन
२०१९ च्या सुरुवातीला मोदींनी कॉग्रेस जॉईन करावी म्हणजे मग, मोदीसमर्थक आणी कॉग्रेस समर्थक एकमत होवुन एक सुरळीत चालणारे सरकार मिळेल. दोन्ही बाजुची कटकट बंद होईल नी डुआय्ड्या गप्चिप उताण्या पडुन रहातील.
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Sat, 09/10/2016 - 13:22 नवीन
एकच उदाहरण देतो, गावात एकमेकांवर भुकायला बंद केले कुत्र्यांनी तर चोराचिलटांचे फावते अन घरफोड्या वाढत्यात. त्यामुळे गावात एकमेकांवर भुकणाऱ्या कुत्र्यांच्या टोळ्या असाव्यातच, नाहीतर कुत्रीच एकत्र होऊन गावकऱ्यांच्या बकऱ्या फाडाय लागतील बघा. म्हणजे किमान, आमच्या कुत्रे समाजात तरी असंच असतं बुआ, तुम्हा माणसांनी अजून पातळी वैग्रे सोडली असल्यास कल्पना नाही (जय हाडूक मिळवून खा किडूकमिडूक संघटना, कचरापेटी क्रमांक 3, वॉर्ड क्रमांक चार, बोंबलवाडी खुर्द, शाखाअध्यक्ष) ढेल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा