जाणिवांच्या जखमा
हे असे दिवसा उजेडी आभाळ आंधारू नये
करावे उपकार कुणी केस मोकळे सोडू नये.
हसतोच आहे हाय मी मंदिरात अन् मसणातही
काय याला दुःख कसले?असे कुणा वाटू नये.
काल शिकलो मी धडा प्राक्तनाच्या बेदिलीचा
क्षणासाठी तोडले मोगऱ्याला , मग वाटले तोडू नये
का अशा जाणिवानां होतात जखमा सारख्या?
काळीज चिरणार्या अशा आठवां कुणी काढू नये.
....म्हैश्या
💬 प्रतिसाद
(6)
प
पैसा
Sat, 09/10/2016 - 13:53
नवीन
चांगला प्रयत्न. अजून लिहीत रहा.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 09/10/2016 - 14:18
नवीन
सहमत. लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
महेश रा. कोळी
Sat, 09/10/2016 - 17:07
नवीन
अत्यंत आनंद झाला. आपण दखल घेतली हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. नक्की लिहित राहीन. खरच मूठभर मास चढलं.
मनापासून धन्यवाद!
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Sat, 09/10/2016 - 14:03
नवीन
छान... येऊ द्या अजुन
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sat, 09/10/2016 - 18:07
नवीन
छान लिहीलंय!
कथा वगैरेपण ट्राय करा :)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 09/12/2016 - 06:01
नवीन
संपूर्ण+वण!
- Log in or register to post comments