आता मला वाटते भिती
आता मला वाटते भिती
कोठे गुंड त्रास देती
कोठे पोलीस मार खाती
अशा या समाजाची
आता मला वाटते भिती
कधी तरुणाईचे भांडण तर
कधी रस्त्यावरचे भांडण
सुशिक्षित समाजातले असंस्कृत जन
अशा या जनाची आता मला वाटते भिती
रामराज्याची अपेक्षा पण
वागण्याची रावणनिती
या समाजाला आता नाही कोणाची भीती
अशा या समाजाची आता मला वाटते भिती
या समाजाच मी एक भाग
मला माझ्या सावलीची आता मला वाटते भिती
राजेंद्र देवी
💬 प्रतिसाद
(3)
व
वेल्लाभट
Fri, 09/09/2016 - 14:14
नवीन
चांगले विचार. पण काव्य म्हणून सुधारणेला खूप वाव आहे. असेच लिहीत रहा.
शुभेच्छा.
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Fri, 09/09/2016 - 14:31
नवीन
एकूण सगळ्याचीच भिती वाटते मग जगायचं कस?
- Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी
Mon, 09/12/2016 - 05:37
नवीन
हाच तर मुद्दा आहे... समाज कोठे आहे...
- Log in or register to post comments