Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गणेशोत्सवाचे नवनिर्माण

म
मी-सौरभ
Mon, 09/12/2016 - 13:44
🗣 63 प्रतिसाद
सध्या सगळिकडे गणेशोत्सवाची धामधूम आहे. ते बघुन मला काही प्रश्न पडले आणि ते ईथे चर्चेला यावेत अशी ईच्च्छा झाली म्हणून हा धागा. १. गणेश मुर्ती: सध्या बरेच जण प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जनाचे वेगेवेगळे पर्याय सुचवत आहेत. त्यामध्ये कायमस्वरुपी धातुची किन्वा पाषाणाची गणेश मूर्ती हा पर्याय जास्त वापरला जावा असे आपल्याला वाटते का? २. गणेश पूजा: माझ्या माहितीत बरेच ठिकाणी पुरोहित नसल्याने किंवा अपुर्‍या माहितीमुळे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आणि ऊत्तर पूजा योग्य रितीने होत नाहीत. याला अ‍ॅप वापरणे हा पर्याय आहेच पण अजुन काही पर्याय आहेत का? ३. अपव्ययः ऊत्सवकाळात फुले, मिठाई, अन्न ई. गोष्टींचा अपव्यय झाल्याचे बर्‍याच वेळा पाहण्यात येते, त्यावर काय ऊपाय करता येइल? ज्यांना या विषयावर चर्चा करायची आहे त्यांचे या धाग्यावर स्वागत आहे. बाकीच्यांच्या अनुपस्ठितीबद्दल मंडळ आपले आभारी आहे.
वर्गीकरण
अभिषेक पद्धती

प्रतिक्रिया द्या
10255 वाचन

💬 प्रतिसाद (63)
म
महासंग्राम Mon, 09/12/2016 - 13:51 नवीन
चुकून महानिर्वाण वाचलं...
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 09/12/2016 - 14:13 नवीन
१.गणेशमूती धातूची काय किंवा पाषाणाची काय, निर्माल्य साठणारच. सबब निर्गुण, निराकार स्वरुपाचे ध्यान करावे. २. पुरोहित केवळ मध्यस्थ असतो. तेव्हा app वापरून किंवा चातुर्मासाचे पुस्तकातील विधी वाचून पूजा करता येउ शकते. ३. उरलेल्या फ़ुलांचा वापर ख़त म्हणून करावा. मिठाई आणि जेवणासाठी घरी मित्रमंडळींना बोलवावे किंवा फ़क्त घरातील व्यक्तींइतकेच अन्न बनवावे.
  • Log in or register to post comments
र
रुस्तम Mon, 09/12/2016 - 15:11 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अंतरा आनंद Mon, 09/12/2016 - 14:37 नवीन
मानसपूजा करावी.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 09/12/2016 - 14:55 नवीन
मा.मो.ऑन फक्त मनात नाव घेतल्यानेसुध्धा नमस्कार पोचतो हो असे आमच्या(च) ह्यांचे मत...पण मलासुध्धा पटते बै ते...आजकाल नुस्ता गोंगाट आणि हिडिसपणा चालू आहे... बाकी सध्ध्या दुसर्या आयडीने लॉगिन असल्याने वयोमानानुसार मिपावर यायला जमत नाही त्याबद्दल वैट्ट वाटून घेउ नका...अत्ता टकामार्फत प्रतिसाद पाठवला आहे तसा आमच्या(च) ह्यांचे मत अधूनमधून कोणानाकोणाकडून जरुर पाठवत जाईन मा.मो.ऑफ
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Mon, 09/12/2016 - 15:06 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
फ
फेदरवेट साहेब Mon, 09/12/2016 - 15:27 नवीन
१. गणेश मुर्ती: सध्या बरेच जण प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जनाचे वेगेवेगळे पर्याय सुचवत आहेत. त्यामध्ये कायमस्वरुपी धातुची किन्वा पाषाणाची गणेश मूर्ती हा पर्याय जास्त वापरला जावा असे आपल्याला वाटते का? मूर्ती फक्त शाडूची अन ठराविकच उंचीची असावी, हे न ऐकणाऱ्या मंडळाच्या मेंबर अन खास करून आधारवड अध्यक्ष महोदयांना नेमक्याजागी पोकळ बांबूचे फटके देण्यात यावे. ह्याने पैसा वाचेल , उरलेला पैसा गरीब लोकांत किंवा गरीब वस्तीत लोकोपयोगी कार्यक्रम करायला उदाहरणार्थ जिल्हा परिषद शाळेत गणवेश वाटप वगैरे करायला वापरला जावा, सीएसआर प्रमाणे ह्या मंडळांवर ठराविक रक्कम लोकपयोगी कामात खर्च करणे सक्तीचे करावे २. गणेश पूजा: माझ्या माहितीत बरेच ठिकाणी पुरोहित नसल्याने किंवा अपुर्‍या माहितीमुळे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आणि ऊत्तर पूजा योग्य रितीने होत नाहीत. याला अ‍ॅप वापरणे हा पर्याय आहेच पण अजुन काही पर्याय आहेत का? मनापासून गणपती बसवतात हे काय कमी आहे, बाकी अर्थवशीर्ष ते आरती कॅसेट लावून (कमी आवाजात) वाजवली तरी काय फरक पडतो?? ३. अपव्ययः ऊत्सवकाळात फुले, मिठाई, अन्न ई. गोष्टींचा अपव्यय झाल्याचे बर्‍याच वेळा पाहण्यात येते, त्यावर काय ऊपाय करता येइल? नाही ते फुले सजावट मखर अन मांडवापर्यंत ठीक आहे हो, उगा प्रसाद अन मिठाईवर नका घसरू बुआ, नाही ह्या सणांच्या दरम्यानच तर आम्हा कुत्रे मंडळीला थोडे गोडाधोडाचे चाखायला मिळते म्हणून म्हणले हॅ हॅ हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 09/12/2016 - 16:37 नवीन
हे सगळ करायलाच पाहिजे का ? मी स्वत: घरातील गंपती बसवणे बंद केलय. सार्वजनीक मंडळांना देणगी देत नाही.
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Mon, 09/12/2016 - 16:39 नवीन
तुम्ही लय मोठे क्रांतिकारी आहात म्हणून लोकसमूह क्रांतिकारी नसतो हो जेपीश्री. समूहाचा आयक्यु किमान असतो. समूह प्रश्नात असलेल्या विषयात वैयक्तिक मते देणे अप्रस्तुत वाटते. (विचारवंत भूभू) ढेल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
आ
आदूबाळ Mon, 09/12/2016 - 17:54 नवीन
जेपीश्री? पिवळी अक्षरं? ऐकूया लता मंगेशकरांच्या आवाजातलं सुरेल गाणं, चित्रपट हकीकतः कहीं ये "वो" तो नहीं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
अ
अनुप ढेरे Mon, 09/12/2016 - 18:01 नवीन
आत्मभानवाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अभ्या.. Mon, 09/12/2016 - 18:06 नवीन
साथमे निराकार गधे की जगह एक कुत्ता भी तो आया है. आता ऐकुया लतादिदींच्या आवाजातच बहुधा. "हां... तू है वही"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
फ
फेदरवेट साहेब Mon, 09/12/2016 - 18:19 नवीन
हि हि हि हि ... किमान आम्ही आयडीचा "अष्टवर्ग" जमा करून नंतर मला संपादक करा म्हणून नाही खेटे घालत हो ! ;) मला तर भीती वाटत होती की आबा मला जेपीश्रींचाच एखादा आयडी समजतायत का काय..... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Mon, 09/12/2016 - 18:39 नवीन
किती लागतात हो मिनिमम? काही अंदाज? बाकी गुण कळलेत. कुणाचाय ते सांगायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
फ
फेदरवेट साहेब Mon, 09/12/2016 - 18:02 नवीन
अरे दिवानो मुझे पहचनो, कहाँ से आया, मई हु कौन! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
पिलीयन रायडर Mon, 09/12/2016 - 16:38 नवीन
आमच्या ओळखीच्या एक काकु शाडूचा गणपती घरी बनवतात, मग त्याचे बादलीत विसर्जन करतात. ती माती गाळुन घेतात आणि परत पुढच्या वर्षी वापरतात. हे अनेक वर्ष चालु आहे. निर्माल्य कुंड्यांमध्ये टाकता येते. थर्माकॉलचे डेकोरेशन आम्ही तर अनेक वर्ष वापरतो. फेकुन कधी दिलं नाही.
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Mon, 09/12/2016 - 16:46 नवीन
हे बेस्टे, विशेषतः शाडू बादली अन पुनर्वापर प्रयोग, ह्याची सुजाण लोकांनी सुरु केल्यास चळवळ होऊ शकेल, थर्माकोल सजावट करतानाच जर थर्माकोल मोठ्या गेजचा (जास्त जाडीचा) घेतला तर अजूनच टिकाऊ सजावट होऊ शकते. थर्माकोल नको असेल अन अगदी बायो डिग्रेडेबल साहित्य वापरायचे असेल तर बालसावूड वापरले जाऊ शकते (ऐरो मॉडेलिंग मधील उड्डाण क्षमता असलेली बारकी विमाने तयार करायला वापरलेले लाकूड) ते लाकूड अगदी हलके असते (थर्माकोल समकक्ष) अन खूप टिकाऊ असते, वर्षोंवर्षे चालावे ते. बंगाली लग्नात नवरीच्या डोक्यावरचा मुकुट अन नवऱ्याच्या डोक्यावरची मजेशीर गोल टोपी ह्याच लाकडाची असते, त्याला बंगालात (लाकडाला) सोलापित का कायसे म्हणतात. अन त्या मजेशीर टोपीला टुपुर म्हणतात. (इंटरनेट ज्ञानी ) ढेल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सतिश गावडे Mon, 09/12/2016 - 16:41 नवीन
आईची शपथ घालून डीजेला आवाज वाढवण्यास उदयुक्त करण्याबद्दल काहीच लिहीले नाही.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Mon, 09/12/2016 - 20:41 नवीन
मग आपण लिहावे हि विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Mon, 09/12/2016 - 17:17 नवीन
गणेश/गणपती असा कोणता देव नव्हताच मुळी, 1)मानव शरीरास हत्तीचे मुख कसे असू शकते?? 2)बरं बसवले हत्तीचे मुख,मग शंकराने एक हत्ती मारून पाप केले नाही का?? 3)गणपतीने शंकाराला आत सोडले नाही म्हणून शंकराने त्रिशूलने त्याचे मस्तक उडवले??? योगी शंकर इतके रागीष्ठ कसे??? त्यांच्या योगशक्तीचा काय फायदा?? 4)लहान मुलाला एक देव ठार मारतो??? म्हणजे हाईटच आहे राव!! किती सोप्या गोष्टी आहेत,पण विचार कोण करतयं?काय उपयोग आमच्या शिक्षणाचा?काय उपयोग आमच्या शेंबड्या बुद्धीचा? सबब,ही थेरडेशाही बंद करावी (प्रतिसाद उडाला तरी i don't care)
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 09/12/2016 - 18:42 नवीन
काही वर्षांपूर्वी काहीसे असेच प्रश्न माझ्या एका अमेरिकन सहकारीणीने विचारले होते. (जी तेव्हा जवळपास माझ्या आईच्याच वयाची होती) म्हणे, हाऊ अ सुप्रीम गॉड कॅन कील अ चाइल्ड? तेव्हा श्रद्धाळू होतो. तिने विचारलेले प्रश्न पूर्वी कधीच पडले नव्हते. क्षणभर काही सुचलेच नाही. "लॉर्ड शिवा इज अ गॉड ऑफ डिस्ट्रक्शन सो ही कॅन डू इट" असे म्हणून वेळ मारुन नेली होती. आता असे प्रश्न कुणी विचारले तर मी तीन शब्दांत उत्तर देतो, "these are myths".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ख
खटपट्या Mon, 09/12/2016 - 20:28 नवीन
हेच तो झाकीर नाइकही विचारीत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
फ
फेदरवेट साहेब Mon, 09/12/2016 - 17:37 नवीन
तुमचा प्रतिसाद उडायच्या अगोदर मी तुम्हाला चावलो नाही असे व्हायला नको म्हणून हा प्रतिसाद. आता बघ असं आहे, तू पण डु आयडी, मी पण डु आयडी =)) आपण दोघेही काय वाटेल ते बोलू शकतो. पण म्हणून मी बोलत नाही अन तू बोलतो. तू तुझ्या घरातली सगळी गणपतीची चित्रे फाडून टाक, शिवलिंग फोडून टाक, पण जामावावर तुझा कंट्रोल नाही, त्यामुळे सार्वजनिक जागी असली अक्कल पाजळून उपेग बी नाही हा ही प्रतिसाद उडाला तरी हरकत नाही (चावरा) ढेल्या
  • Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Mon, 09/12/2016 - 20:55 नवीन
त्यामुळे सार्वजनिक जागी असली अक्कल पाजळून उपेग बी नाही
उपयोग आहे, कारण मिपा वाचूनच मी नास्तिक झालोय. . . एकमेकां नास्तिक करू अवघे धरू सुपंथ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
ट
टवाळ कार्टा Tue, 09/13/2016 - 04:23 नवीन
नास्तिक असणे आणि दुसर्याच्या देवतांबद्दल काहीही बोलणे या २ वेगवेगळ्या गोष्टी आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
फ
फेदरवेट साहेब Tue, 09/13/2016 - 04:28 नवीन
++१०,०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 09/13/2016 - 04:37 नवीन
अण्णा....तुम्ही परत आलात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
फ
फेदरवेट साहेब Tue, 09/13/2016 - 04:40 नवीन
होय, तुम्ही यझ आयडी म्हणून आमची वासलात लावलीत तरी आम्ही तुमचे पंखेच आहोत हो! येऊन येऊन येणार कोण टका सोडून आहेच कोण. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 09/13/2016 - 05:25 नवीन
खी खी खी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
म
मी-सौरभ Tue, 09/13/2016 - 07:19 नवीन
असे पटकन मान्य नाही करायचं. अजुन थोडे दिवस तुम्हि आम्हाला ईथे हवे आहात. आता त्याची शक्यता कमी झाली :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मी-सौरभ Tue, 09/13/2016 - 07:22 नवीन
सध्या जी गणेशाची पुजा उपलब्ध आहे ती संस्कृत मध्ये आहे. त्याला काही मराठीत पर्याय आहे का?
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 09/13/2016 - 13:59 नवीन
१. गणेश मुर्ती: सध्या बरेच जण प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जनाचे वेगेवेगळे पर्याय सुचवत आहेत. त्यामध्ये कायमस्वरुपी धातुची किन्वा पाषाणाची गणेश मूर्ती हा पर्याय जास्त वापरला जावा असे आपल्याला वाटते का?
शाडूची किंवा इतर मातीची मुर्ती वापरणे हा योग्य पर्याय आहे. कायमस्वरुपी धातुची किन्वा पाषाणाची गणेश मूर्ती हा पर्याय देखील चांगला आहे. मात्र नावीन्याची हौस यामुळे भागवली जाऊ शकणार नाही.
२. गणेश पूजा: माझ्या माहितीत बरेच ठिकाणी पुरोहित नसल्याने किंवा अपुर्‍या माहितीमुळे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आणि ऊत्तर पूजा योग्य रितीने होत नाहीत. याला अ‍ॅप वापरणे हा पर्याय आहेच पण अजुन काही पर्याय आहेत का?
शक्यतो पुरोहित मिळत नाहीत असे होत नाही. मात्र दिवसाचे महत्त्व आणि त्यांच्या अपॉईंटमेंटची संख्या जास्त असल्यामुळे उशीरा येऊ शकतात. तुम्ही भारता बाहेर राहत असाल तर तुम्ही म्हणता तसे असू शकेल. अ‍ॅप वापरणे हा योग्य पर्याय नाही. दरवेळी पुरोहित मिळण्याची अडचण असेल तर जरुरीपुरते स्वतः शिकून घ्यावे. आवाहन मंत्र, विसर्जन मंत्र, दोन चार आरत्या शिकण्यासाठी फार मेहनत लागत नाही. अ‍ॅपवर / मोबाईलवरच आरत्या करायच्या तर मोबाईलवर एक गणपतीचा फोटो टाकून तिथेच अ‍ॅपद्वारे पुजा करावी. हेडफोनवर आरती ऐकावी. घरात वेगळी मुर्ती आणण्याचे काय कारण ? मध्यस्थ, गुरु कशाला पाहिजे ? अशी भावना असेल तर तो वेगळ्या लेखाचा विषय आहे. ३. अपव्ययः ऊत्सवकाळात फुले, मिठाई, अन्न ई. गोष्टींचा अपव्यय झाल्याचे बर्‍याच वेळा पाहण्यात येते, त्यावर काय ऊपाय करता येइल? शक्यतो या गोष्टींचा अपव्यय होत नाही. मिठाईचा अपव्यय होतो हे माझ्यातरी पाहण्यात नाही. पण कदाचित तुम्ही म्हणता तसेदेखील होई शकेल. अन्नाचा अपव्यय करणे हे फक्त उत्सवकाळातच होते असे नाही. ती तुमची एक चुकीची सवय आहे. जर तुमच्या घरात नेहमीच अन्न वाया जात असेल तर ते उत्सवकाळात देखील जाणारच. त्यामुळे जर ही सवयच असेल तर मुळापासून सुधारण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर वाईट वाटून घेऊ नये. फुलांचे निर्माल्य झाले तरी ते निसर्गाशी एकरुप होतात त्यामुळे त्यांची चिंता करु नका. तुम्ही प्लॅस्टिकची फुले वापरत असाल तर वेगळा प्रश्न. ही झाली तुमच्या प्रश्नांची उत्तरे. आता थोडे अवांतर पण महत्त्वाचे : गणपती बसविणे हा श्रद्धेचा विषय असू द्यावा. उगाच पोराने हट्ट केला म्हणून, बाजूवाले आणतात मग आपण का मागे रहा अशा भावनेतून आणू नये. शक्यतोवर सगळेच सण पारंपारिक पद्धतीने साजरे करण्याचा प्रयत्न करावा. पुर्वीच्या काळात तंत्रज्ञान जास्त प्रगत नव्हते त्यामुळे साधेपणाने सण साजरे करण्यावर भर असे. तोच साधेपणा वर्तनात दिसू द्यावा. ध्वनी़क्षेपकाचा वापर टाळावा. असेही बाप्पाचे कान मुळातच मोठे आहेत. त्यामुळे त्याला ध्वनीवर्धन करुन ऐकविण्यात काही हशील नाही. गणेशाचे रुप मुळातच मोहक आणी आनंददायी आहे. पुजा अर्चना मनोभावे व कोणतीही आशा मनात न ठेवता करावी. बाप्पाच्या दर्शनमात्रे मनोकामना पुर्ण होतात. अजून काय मागायचे ? भगवंताची साधना हा एक आनंदोत्सव व्हावा. देण्याघेण्याचा बाजार होऊ नये हा कटाक्ष पाळावा. अमुकतमुक गल्लीचा राजा नवसाला पावतो म्हणून मुर्खपणाने त्याच्या मागे पळून वेडे होऊ नका. असे गल्लोगल्लीचे राजे फक्त त्यांच्या आयोजकांनाच पावतात. तुमच्या घरात तुम्ही मनापासून पुजा केलेया भगवंताच्या रुपापेक्षा कल्याणकारी आणी आनंददायी रुप दुसरीकडे नाहीच याची खात्री बाळगा. सगुण / निर्गुण च्या वादाचे बळी होऊ नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमुक पुजेमागे तमुक विज्ञान आहे, तुळशीमुळे अमू़क होते, दुर्वांमुळे तमुक फायदा होतो असले सो कॉल्ड भंपक विज्ञान आणी भक्ती यांची सांगड कधीही घालू नका. काय होतं की विज्ञानापेक्षा धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करायच्या नादात लोक धार्मिक कर्मकांडात विज्ञान शोधतात आणी फसतात. या तो चतूर बोलो या तो घोडा बोलो. देवाधर्माला कोणत्याही वैज्ञानिक सर्टिफिकेटची गरज नाहिये हे लक्षात ठेवा. विज्ञान आणि देवधर्म कधीही एक होऊ शकत नाही. त्यामुळे आपले विचार जरी डाऊन मार्केट वाटले तरी भक्ती केवळ आपल्या आनंदापुरती, आपल्या समाधानासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी करावी. त्यात विज्ञान आणूच नये. तुम्हाला प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चष्म्यातून पाहायची सवय असेल तर देवधर्म तुमच्यासाठी नाही याची खात्री बाळगा आणि या वाटेवर चालू नका. तुम्हाला फक्त वाईट गोष्टीच दिसत राहतील आणी मनोस्वास्थ गमवायची पाळी येईल. असो. लेखणीला विराम देतो. गणपती बाप्पा मोरया !
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 09/13/2016 - 14:07 नवीन
छान आणि व्यवस्थित लिहिले आहे. एकूण एक मुद्दे अन परामर्ष आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
य
यशोधरा Tue, 09/13/2016 - 14:11 नवीन
गणेशाचे रुप मुळातच मोहक आणी आनंददायी आहे. पुजा अर्चना मनोभावे व कोणतीही आशा मनात न ठेवता करावी. बाप्पाच्या दर्शनमात्रे मनोकामना पुर्ण होतात. अजून काय मागायचे ? भगवंताची साधना हा एक आनंदोत्सव व्हावा. देण्याघेण्याचा बाजार होऊ नये हा कटाक्ष पाळावा. अमुकतमुक गल्लीचा राजा नवसाला पावतो म्हणून मुर्खपणाने त्याच्या मागे पळून वेडे होऊ नका. असे गल्लोगल्लीचे राजे फक्त त्यांच्या आयोजकांनाच पावतात. तुमच्या घरात तुम्ही मनापासून पुजा केलेया भगवंताच्या रुपापेक्षा कल्याणकारी आणी आनंददायी रुप दुसरीकडे नाहीच याची खात्री बाळगा. सगुण / निर्गुण च्या वादाचे बळी होऊ नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमुक पुजेमागे तमुक विज्ञान आहे, तुळशीमुळे अमू़क होते, दुर्वांमुळे तमुक फायदा होतो असले सो कॉल्ड भंपक विज्ञान आणी भक्ती यांची सांगड कधीही घालू नका. काय होतं की विज्ञानापेक्षा धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करायच्या नादात लोक धार्मिक कर्मकांडात विज्ञान शोधतात आणी फसतात. या तो चतूर बोलो या तो घोडा बोलो. देवाधर्माला कोणत्याही वैज्ञानिक सर्टिफिकेटची गरज नाहिये हे लक्षात ठेवा. विज्ञान आणि देवधर्म कधीही एक होऊ शकत नाही. त्यामुळे आपले विचार जरी डाऊन मार्केट वाटले तरी भक्ती केवळ आपल्या आनंदापुरती, आपल्या समाधानासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी करावी. त्यात विज्ञान आणूच नये. तुम्हाला प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चष्म्यातून पाहायची सवय असेल तर देवधर्म तुमच्यासाठी नाही याची खात्री बाळगा आणि या वाटेवर चालू नका. तुम्हाला फक्त वाईट गोष्टीच दिसत राहतील आणी मनोस्वास्थ गमवायची पाळी येईल.
भारी. मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
अ
अभिजीत अवलिया Tue, 09/13/2016 - 16:54 नवीन
मस्त प्रतिसाद धर्मराज मुटके साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
सतिश गावडे Tue, 09/13/2016 - 18:04 नवीन
सुंदर प्रतिसाद. अगदी मनापासून आवडला. असा विचार प्रत्येक श्रद्धावंताने केला तर सण आणि उत्सव खुपच सुसह्य होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
म
मी-सौरभ Wed, 09/14/2016 - 14:59 नवीन
सर्व्प्रथम तुमचा प्रतिसाद आवडला आणि बराचसा पटला देखिल. माझे काही मुद्दे आहेत
शक्यतो पुरोहित मिळत नाहीत असे होत नाही. मात्र दिवसाचे महत्त्व आणि त्यांच्या अपॉईंटमेंटची संख्या जास्त असल्यामुळे उशीरा येऊ शकतात.
माझ्या स्वतःच्या घरी गणपती स्थापन होत नाहीत पण नातलग आणि मित्रांकडे होतात (मु.पो.: पुणे / परदेश नाही). त्यांच्या अनुभवानुसार गणेश चतुर्थीला गुरुजी मिळणे अवघड जाते.
अ‍ॅपवर / मोबाईलवरच आरत्या करायच्या तर मोबाईलवर एक गणपतीचा फोटो टाकून तिथेच अ‍ॅपद्वारे पुजा करावी. हेडफोनवर आरती ऐकावी. घरात वेगळी मुर्ती आणण्याचे काय कारण ?
अ‍ॅपचा किंवा पुर्वी सीडी / कॅसेट ह्या फक्त प्राणप्रतिष्ठा करताना वापरले जाते आणि माझ्या मते ते सोयीचे आहे. गुरुजी नाहीत किंवा पूजा सांगता येत नाही म्हणून गणपती बसवू नका हा पर्याय पटला नाहीये. गणपती हा पुजार्‍याला पूजा सांगण्यासठी साजरा करत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके Wed, 09/14/2016 - 16:03 नवीन
अ‍ॅपचा किंवा पुर्वी सीडी / कॅसेट ह्या फक्त प्राणप्रतिष्ठा करताना वापरले जाते आणि माझ्या मते ते सोयीचे आहे. गुरुजी नाहीत किंवा पूजा सांगता येत नाही म्हणून गणपती बसवू नका हा पर्याय पटला नाहीये. गणपती हा पुजार्‍याला पूजा सांगण्यासठी साजरा करत नाहीत.
आपण आपले राहणीमान सुधारण्यासाठी वयाची २०-२५ वर्षे मेहनत करुन शिकत असतो पण दोन-चार आरत्या / श्लोक पाठ करण्याऐवजी कोणत्यातरी सीडी/अ‍ॅपचा आधार घेणे माझ्या मनाला तरी पटत नाही. असो. एकदा प्रयत्नपुर्वक हे करुन बघा. तुमचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल. बाकी तुमच्या मताचा आदर आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
ट
टवाळ कार्टा Wed, 09/14/2016 - 16:33 नवीन
आरती पाठ केलेल्याची पूजेची भक्ती जास्त स्ट्रॉंग असते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके Wed, 09/14/2016 - 16:42 नवीन
धागा आणि प्रतिसाद नेहमीच्या वळणावर जायला सुरुवात झाली आहे. माझे विचार डाऊनमार्केट व चुकीचे आहेत आणि ते मला बदलण्यात स्वारस्य नाहीत. मी आता नम्रपणे रजा घेतो. राग नसावा. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 09/14/2016 - 16:49 नवीन
आर्र असं काय करता, मला म्हणायचे होते की ज्याला जशी जमेल त्याने तशी पूजा करावी, आपलीच पद्धत जास्त बरोबर असे करू नये अथवा आपली पद्धत जास्त बरोबर कशी ते पटवून द्यावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके Wed, 09/14/2016 - 16:59 नवीन
नक्कीच. मी फक्त माझं मत सांगीतलं. आग्रह नाही. ज्यांना आवडेल ते सहमत होतील. नाही आवडलं तरीही हरकत नाही. विरोधी मतांचा खरोखरीच आदर आहेच. आपण इथं येतो ते व्यक्त व्ह्यायला. दुसरं सगळं दुय्यम. तरीही अशा चर्चा वाचून विचारमंथनातून जे बदलतात त्यांच अभिनंदन !
आपली पद्धत कशी बरोबर ते पटवून द्यावे .
अवघड आहे हो. आयुष्यात कधी कुणाला पटवता आलचं नाही. ") माझं एक आवडतं वाक्य इथे देण्याचा मोह आवरत नाहिये. "सांगून शिकवून कोणीही शहाणं होत नाही. जो तो आपल्या अनुभवातूनच शहाणा होतो."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मी-सौरभ गुरुवार, 09/15/2016 - 04:26 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 09/15/2016 - 10:29 नवीन
:) मग ठिकाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
अ
अभ्या.. गुरुवार, 09/15/2016 - 10:45 नवीन
लै भारी वाटतय का असे लिहायला? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 09/15/2016 - 11:47 नवीन
ए गपे भा(व)ड्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
र
रंगासेठ Tue, 09/27/2016 - 14:17 नवीन
मस्त प्रतिसाद, आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
प
पैसा गुरुवार, 09/15/2016 - 12:00 नवीन
धर्मराज मुटके यांचे प्रतिसाद आवडले. मराठीतून पूजा किंवा विधीमधे काही बदल हवे असतील तर धाग्यावर आपल्या आत्मुबुवांना बोलवा.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 09/15/2016 - 13:45 नवीन
त्यांचा मिपावरील प्रोफाइल आठवून डोळे पाणावले.
व्यवसायाचे/कामाचे स्वरूप दूध तापवून देणे. अटवणे. चाटवणे. घो....(माफ करां हं! ;) ) घोटवणे... थोडक्यात काय? लोकांना "हवि असलेली" आवडती मिठाई करून देतो. (हल्ली या कलेला पौरोहित्य असे म्हणतात,पूर्वी संस्कृती संरक्षण असे म्हणत! ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 09/15/2016 - 13:50 नवीन
हा, म्हणूनच त्याना बोलवा म्हटले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा