नाही पुरेसे....
नाही पुरेसे....
जगात शर्यती खूप आहेत
नाही पुरेसे चपळपण सशांचे
नको राहूस आळशी
ठेव आदर्श कासवांचे
चांगुलपणाचे दाखले नुसते
नाही पुरेसे दाखवायचे
लाव हातभार तू पण
जग हे आसवांचे
विझण्यास सूर्य
नाही पुरेसे ढग पावसांचे
नको राहूस कोरडा
ढाळ चार दोन थेंब आसवांचे
राजेंद्र देवी
💬 प्रतिसाद
(4)
च
चांदणे संदीप
Tue, 09/13/2016 - 15:24
नवीन
आसवांचे दोनदा झाल ओ... त्यात "सासवांचे" असे बदलवता आले तर बघा की!
Sandy
- Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी
Wed, 09/14/2016 - 04:43
नवीन
धन्यवाद...
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Wed, 09/14/2016 - 08:48
नवीन
धन्यवादच देऊन मोकळे झालात! काही हरकत नाही मीच काहीतरी जमवून बघतो.... कृ.ह.घ्या!
चांगुलपणाचे नाटक पुरते
सतत करीत राहायचे
दाखव तुझी कला तू पण
जग हे सासवांचे
असं काहीसं....!
- Log in or register to post comments
प
प्रभास
Wed, 09/14/2016 - 09:08
नवीन
एकाच दिवशी सतत लेखन टाकत राहू नका. इतर सदस्यांचं लेखन मागं जातं मग. इतर लोक लिहित आहेत ते पण वाचत चला. :)
- Log in or register to post comments