लाहौल आणि स्पिती - एक अविस्मरणीय अनुभव (भाग ३)
लाहौल आणि स्पिती - एक अविस्मरणीय अनुभव (भाग १)
लाहौल आणि स्पिती - एक अविस्मरणीय अनुभव (भाग २)
आज पाचवा दिवस. रात्री एवढी मस्त झोप लागली कि सकाळी उठायला उशीर झाला. असंही आजचा दिवस थोडा निवांत होता. आज काझा च्या आजूबाजूला थोडं फिरायचं होत, किब्बर या गावाला भेट आणि की (Key) येथील मठ (Monastary) बघायचा होता. सकाळी न्याहारी करून निघालो. पेट्रोल भरायला काझा येथील इंडियन ऑइल च्या पेट्रोल पंपवर निघालो. १२,२७० फूट उंचीवर असलेला हा पेट्रोल पंप जगातील सर्वात उंचावर असलेला पेट्रोल पंप म्हणून स्थान मिळवून आहे. पेट्रोल भरून निघालो की येथील मठ बघायला.
काझा येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंप
उंचावर दिसणारा की येथील मठ
मठाकडे जाणारा रस्ता...
११व्या शतकात बांधला गेलेला हा मठ स्पिती खोऱ्यातील सर्वात जुना आणि मोठा मठ आहे. डोंगरावर उंचावर असलेला हा मठ अतिशय सुंदर आहे. मठाच्या आतमध्ये फोटो काढण्यास मनाई होती. वरून स्पिती खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. हा मठ म्हणजे लामा यांचे धार्मिक क्षैक्षणिक केंद्र आहे. थोडेफार आजुबाजूचे फोटो काढून किब्बर कडे प्रस्थान केले.
अतुल्य भारत !
मठावरून दिसणारे स्पिती खोऱ्याचे दृश्य
किब्बर हे जगातील अशा सर्वात उंचावरील गावांपैकी आहे जिथे गाडी जाण्यापत रस्ता आहे. एवढ्या उंचावर रस्ते बांधणं आणि त्यांची देखभाल करणं…खरंच किती कठीण काम असेल. किब्बर नंतर काझा च्या आजुबाजूला फेरफटका मारण्यास निघालो.
टुमदार किब्बर गाव
काझामधील एक मठ...
आज सहावा दिवस, गुरुवार. आज खरेतर टाबो ला जायचा बेत होता. टाबो वरून पुढे शिमला आणि मग चंडीगढ. पण कळले की दरड कोसळल्यामुळे टाबो ला जाणारा रास्ता बंद आहे...मग काय इथून परत मागे फिरण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणजे परत कीलॉंग, मनाली आणि चंडीगढ. आम्हाला रविवारी सकाळ पर्यंत चंडीगढला पोहोचणे भाग होते कारण विमानाची वेळ. तसे २ दिवस होते आमच्या हातात, पण इथल्या रस्त्यांचा काही भरवसा नाही. त्यामुळे सकाळी लवकरच निघालो. आज संध्याकाळपर्यंत मनालीला पोहोचायचं ठरवलं, जेणेकरून शनिवारचा एक पूर्ण दिवस मनालीमध्ये फिरता येईल. इथे पोरांचा मनालीला पॅराग्लायडिंग करण्याचा प्लॅन बनलासुद्धा.
आवडला का रस्ता :)
चार तासांतच छतरुला पोहोचलो. तिथे जेवण करायला थांबलो. जेवण म्हणजे काय तर मॅगी. आठवड्याभरापासून आम्ही मॅगी आणि मोमो खात होतो. जिथे जिथे हॉटेलवर जेवण केलं तिथे फक्त पोळी-भाजी, आमटी-भात मिळाला. मॅगी खातच होतो...तेव्हढ्यात एकजण ओरडत आला की जवळच दरड कोसळल्याने रस्ता बंद आहे. आणि संध्याकाळपर्यंतही BRO च्या लोकांची येण्याची शक्यता फार कमी होती. कारण रस्त्यात अजून २ ठिकाणी दरड कोसळली होती. झालं...म्हणजे आजचा दिवस इथून निघणं अशक्य..! बॅकअप प्लॅनमधलं पॅराग्लायडिंग गुंडाळून मनाच्या बॅकलॉग मध्ये ठेऊन दिलं. म्हटलं असंही आता इथून निघता येणार नाही म्हणून जिथे दरड कोसळली आहे तिथपर्यंत फिरून यावे. जाऊन पाहतो तर काय रस्त्याची दुर्दशा झाली होती.
रस्त्यातच हे आढळले...कोणती भाषा ते मात्र कळले नाही...!
दुर्घटना स्थळाकडे वाटचाल करताना..
दरड कोसळलेला रस्ता...
संध्याकाळपर्यंत तिथे गाड्यांची लांब रांग लागली होती. पर्याय नसल्याने ती पूर्ण रात्र गाडीतच झोपून काढावी लागणार होती. थंडी असल्यामुळे गाडीच्या काचा वगैरे बंद करून कसेबसे झोपण्याचा प्रयत्न करत होतो. पण २-३ जणांचे सूर लागले होते आणि त्यात माझा खोकला त्यामुळे झोपण्याची पुरती बोंब. प्रवासासाठी जरी आरामदायी असली तरी झोपण्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलर नक्कीच आरामदायी नव्हती. झोपेत हालचाल करणेसुद्धा कठीण. थोड्या वेळाने डोळा लागला पण मध्ये मध्ये कोणा न कोणामुळे जाग येत होतीच. मग जबरदस्तीने डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. एवढी नीरव शांतता होती की आजूबाजूच्यांच्या श्वासाच्या आवाजाने देखील झोप लागत नव्हती. अखेर झोपण्याचा निष्फळ प्रयत्न सोडून उजाडण्याची वाट पाहू लागलो. थोडं उजाडताच गाडीतून खाली उतरलो, आखडलेले हात-पाय ताणून जरा मोकळे केले. तोंड वगैरे धुवून फ्रेश झालो आणि सगळे रस्त्याविषयी विचारपूस करू लागले. आणि दिवसाची सुरुवातच धक्कादायक बातमीने...रस्त्यात कोसळल्या दरडीमुळे BRO चे कामगार अजूनही इथपर्यंत पोहोचू शकले नव्हते. संध्याकाळपर्यंत रस्ता खुला होईल असं सांगत होते...पण आम्हाला दुसऱ्यादिवशी सकाळपर्यंत चंडीगढ ला पोहोचणे भाग होते. झाली ना पंचाईत...तेव्हा आशूभाईने एक मार्ग सुचवला. इथून १६ किमी. वर अजून एका ठिकाणी दरड कोसळली होती. तिथपासून मनालीपर्यंतचा रस्ता सुरु आहे, जर तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकलात तर संध्याकाळपर्यंत मनालीला पोहोचाल. पण तिथपर्यंत तुम्हाला चालत जावे लागेल. म्हणजे आता आम्हाला १६ किमी. चालत जावे लागणार होते...आणि तेही १४-१५००० फूट उंचीवर जवळपास १५ किलोच्या बॅग्स खांदयावर घेऊन. दोन दिवसांपूर्वीची आमची अवस्था बघू अंगावर काटा आला…पण दुसरा काही मार्गही सुचत नव्हता. शेवटी हो-नाही करता-करता सगळे तयार झाले. आपापल्या मोठाल्या बॅग्स उचलल्या आणि निघालो पदयात्रा करत. आमच्यातल्या बऱ्याच जणांच्या बॅग्स पाठीवर घेता येतील अशा नव्हत्या...त्यामुळे त्या हातात घेऊन चालणे त्रासदायक होऊ लागले. त्यातही रस्त्यात उतार दिसत नव्हता…सलग चढ. अवस्था अशी की स्वतःचीच बॅग जड असल्याने कोणाला मदत करणेही शक्य नव्हते. दम लागत असल्याने सारखे सारखे थांबावे लागत होते. आणि एकदा थांबलो की परत निघताना ती बॅग उचलायची म्हणजे जीवावर येत होते. मध्येच वाटले की द्यावी हि बॅग इथेच सोडून पण त्यात तर सगळं सामान होतं. सर्वांचीच अवस्था सारखी. तरी एकमेकांना प्रोत्साहन देऊन कसेबसे मार्गक्रमण करत होतो. अखेर ३-३.३० तासांची पायपीट केल्यानंतर त्या ठिकाणी येऊन पोहोचलो जिथून पुढे रस्ता सुरु होता. तेव्हा कुठे जरा हायसे वाटले. रस्ता वाहून गेलेल्या ठिकाणी काही बुलेटस्वार दगड लावून आपली बुलेट पुढे काढण्याच्या प्रयत्नात लागले होते.
वाहून गेलेला रस्ता
बुलेट काढण्याचा सुरु असलेला प्रयत्न...
आशूभाईने आमच्यासाठी मनालीवरून गाडी मागवली होती, गाडीत बसलो तेव्हा कुठे जीवात जीव आला. तिथून आम्ही निघणार तेव्हढ्यात इस्त्राईलचे २ तरुण आणि २ तरुणी आमच्या गाडीपाशी आले. मनालीपर्यंत सोडण्यासाठी विनंती करत होते. ते चौघे देखील आमच्यासारखेच १६ किमी चालून आले होते. पण त्यांच्यासाठी गाडीची व्यवस्था नव्हती. गाडीत जागा तर नव्हती...तर बोलले की आम्ही खालीच बसू. मग त्यांना पण बरोबर घेऊन आम्ही मनालीला निघालो. रोहतांग पासमध्ये १-२ ठिकाणी रस्त्याचं काम सुरूच होते त्यामुळे मनाली ला पोहोचायला थोडा उशीर झाला.
मनसोक्तपणे खेळणारी मुले..
मनाली जवळ येताच हिरवागार निर्सग पुन्हा बहरू लागला.
मनाली जवळ आल्याची चाहूल...
अखेर मनालीला सुखरूप पोहोचलो. मनालीला पोहोचताच थोडीफार खरेदी केली. रात्रीच चंडीगढ साठी निघायचं होतं जेणेकरून सकाळी पोहोचू. चंडीगढला जाणाऱ्या सगळ्या ट्रॅव्हल्स फुल होत्या मग शेवटी HPTDC च्या बसमध्ये जागा मिळाली. सकाळी लवकरच चंदीगढला पोहोचलो. विमानतळावरच फ्रेश होऊन विमानाची वाट बघत बसलो. आधीच्या दोन दिवसांचं नियोजन बिघडलं असलं तरी शेवट मात्र नियोजनाप्रमाणेच झाला. विमान वेळेवर निघालं आणि २.३० तासांतच मुंबईला पोहोचलोसुद्धा. टॅक्सी करून आपल्या डोंबोलीला सुखरूप पोहोचलो आणि लाहौल-स्पितीची अविस्मरणीय सहल पूर्ण झाली...!
समाप्त...!

💬 प्रतिसाद
(14)
य
यशोधरा
Tue, 09/13/2016 - 11:18
नवीन
फार सुरेख फोटो. खूप आवडले.
मला वाटते ते तिबेटन ट्रान्स्क्रिप्ट आहे, सहसा ॐ मणिपद्मे हूं हे लिहिलेले असना, असे पाहिलेय.
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Tue, 09/13/2016 - 12:02
नवीन
अप्रतिम लेखमाला. निसर्गाचं हे रुद्र सौंदर्य नुसतं फोटोतूनही पाहून थक्क व्हायला होतंय.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 09/13/2016 - 12:12
नवीन
एक सो एक फोटो आहेत बाबा!!!!
वेड आहे हे. खलास वर्णन.
- Log in or register to post comments
भ
भटक्य आणि उनाड
Tue, 09/13/2016 - 13:13
नवीन
एकच सुधारणा सान्गतो... साउथ पुल्लु, खरदुन्गला पास इथला पेट्रोल पम्प सर्वात उन्चावर आहे..१५३०० फीट..म्हणजे मी तर तोच पाहीला आहे.. बाकी जाणकार सान्गतील्च...
- Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ
Tue, 09/13/2016 - 16:09
नवीन
असेलही..पण आंतरजालावरसुद्धा सर्वात उंचावर असलेल्या पेट्रोल पंपांमध्ये याच पेट्रोल पंपाची नोंद आहे.
इतर मिपाकर यावर प्रकाश टाकू शकतील.
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 09/13/2016 - 14:38
नवीन
सफर आवडली.
- Log in or register to post comments
अ
अजया
Tue, 09/13/2016 - 15:04
नवीन
काय सुरेख सफर! लाजवाब फोटो.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/13/2016 - 15:10
नवीन
वैराण पण अत्यंत देखणा निसर्ग आहे हा.
छायाचित्रे आणि वर्णन अत्यंत सुंदर.
- Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर
Wed, 09/14/2016 - 04:04
नवीन
तिन्ही लेख आवडले. प्रकाशचित्रे तर खासच.
धन्यवाद
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Wed, 09/14/2016 - 04:18
नवीन
मस्त ...२०१७ मध्ये पुणे ते लडाख कारने करायचे हा निर्धार केलेला आहे.
- Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ
Wed, 09/14/2016 - 09:45
नवीन
आपल्या भ्रमंतीसाठी शुभेच्छा..!
आणि जपून कार चालवा.
- Log in or register to post comments
इ
इशा१२३
Wed, 09/14/2016 - 05:03
नवीन
हा हि भाग छान! फोटो सुंदर.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/14/2016 - 09:54
नवीन
सुंदर प्रवासवर्णन ! अप्रतिम फोटो !!
- Log in or register to post comments
क
किल्लेदार
Wed, 09/14/2016 - 16:02
नवीन
व्वाह !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
- Log in or register to post comments