नव्या प्रकारच्या ओळख चोरी पासून सावधान
आधार कार्ड करणे गरजेचे आहे का असा कुणी तरी प्रश्न केला आहे. आधार कार्ड शक्यतो करू नये आणि केले तर कुठेही वापरू नये. कुठल्याही प्रायव्हेट कंपनीला कधीही आपले हे कार्ड देऊ नये. मी सर्व कागदपत्री व्यवहारासाठी एक जुनाट सरकारी ओळखपत्र वापरते ज्यात नाव आणि फोटो सोडून काहीही बरोबर नाही.
तर पुण्यात सुरु असलेल्या नवीन प्रकारच्या चोरी बद्दल हा लेख आहे. अमेरिकेत वगैरे आपण कुणाला पैसे देणे असाल आणि आपल्याला ते पैसे देण्याची इच्छा नसेल तर आपण खुशाल डिफाल्ट करू शकता. बहुतेक वेळा आपली क्रेडिट इतिहास ह्यामुळे खराब होईल ज्याचे परिणाम दूरगामी असतात. पण अनेकदा दुसऱ्या पार्टीकडे पैसे सोडून देण्याशिवाय पर्याय नसतो. आपण देणे आहात $१०० आणि वसुलीचा खर्च असेल $१००० तर कुठलीही पार्टी असले नुकसान करून घेणार नाही.
पण अश्या प्रकारच्या लो debt वसुलीसाठी एक नवीन बिसिनेस मॉडेल अमेरिकेत आहे. ज्या पार्टीला तुम्ही देणे आहेत ती पार्टी आपली देणी एका दुसऱ्या डेबीट collection कंपनीला विकते. $१०० चे देणे असेल तर सर्वनाशे समुत्पन्ने अर्ध्यम त्यजति पंडिता: न्यायाने पार्टी $१० घेऊन ते डेबीट ट्रान्सफर करते. त्याच बरोबर आपला पत्ता, फोन नंबर इत्यादी सर्व माहिती त्या collection agency ला दिली जाते. हि सगळी माहिती घेऊन पैसे कसा उकळवा ह्याचे ज्ञान असल्याने कधी ती agency किमान $३० तरी वसूल करते. उदाहरणार्थ ह्यांच्याकडे बेकार वकिलांची फौज असते जी घाबरवून टाकणाऱ्या नोटीस आपल्याला पटवतात, कधी कधी सशस्त्र लोक घरी पाठवून पैसे परत देण्याची मागणी करतात, कधी कधी आपल्या बँक, नोकरीचे ठिकाण इत्यादी ठिकाणी आपल्या देण्या ची माहिती देण्याची धमकी वगैरे देतात. (माणूस पाहून आणखीनही भयानक गोष्टी केल्या जाऊ शकतात). कधी कधी फक्त स्पॅम मेल वाल्याना आपली माहिती विकून पैसे मिळवले जाऊ शकतात.
हा बिसिनेस मॉडेल भारतात कधी अवतीर्ण झाला माहित नाही पण हल्लीच मला ह्याचा अनुभव आला. सुमारे १० वर्षां पूर्वी माझ्याकडे एक रिलायन्स फोन होता ज्याची थकबाकी सुमारे १३०० रुपये होती. बिल भरले होते कि नाही ह्याची माहिती नाही. ऑटो डेबिट असल्याने बिल भरून गेले असावे. रीतसर पावती मात्र माझ्याकडे नव्हती.
काही दिवस आधी एका पुणेरी पठाण वकिलाकडून मला इमेल ने नोटीस आली. हि शेवटची नोटीस असून ह्या नंतर माझ्यावर दिवाणी दावा केला जाईल अशी धमकी होती. मी काळजीपूर्वक सर्व गोष्टी वाचून पहिला. माझे नाव, घराचा पत्ता, जुना रिलायन्स फोन नंबर, शेवटच्या बिलाचा एकदा इत्यादी सर्व माहिती अगदी तंतोतंत जुळत होती.
पण दोन गोष्टी जुळत नव्हत्या. बिल Overdue असल्याने ५० रुपये फाईन त्याला अधिक केलेली नव्हती. त्याशिवाय पैसे कुणाला द्यायचे ह्या खाली Reliance Communications ऐवजी Reliance Web Store Ltd हे कम्पनी नाव दिले होते. प्रत्यक्षांत Reliance Webstore Ltd हि कंपनी रिलायन्स ची असून बिल कलेक्ट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर नाही. बिल RCIL ला द्यावे लागते.
ह्यातून दोन गोष्टी साफ होत्या कि रिलायन्स वाल्यानी किंवा त्यांच्या कुणा पार्टनर ने माझी माहिती ह्या फुटकळ वकिलाला विकली होती. वकिलाने आपला पत्ता आणि फोन दिला होता. मी फोन केला तर नंबर अस्तितवात नाही अशी मेसेज ऐकू अली. हजारो लोकांना ह्या प्रकारे ईमेल गेले असावेत अशी माहिती सुद्धा गूगल वरून लक्षांत आली.
समजा ह्या लोकांनी माझा PAN नंबर अश्या प्रकारे मिळवला असता आणि भलत्या सलत्या transaction मध्ये वापरला आता तर ? आधार कार्ड जर प्रत्येक ठिकाणी अनिवार्य केले आणि अश्या प्रकारे आपल्या माहितीची चोरी झाली तर आपले अक्खे आयुष्य धोक्यांत येऊ शकते.
💬 प्रतिसाद
(59)
स
सुबोध खरे
Wed, 09/21/2016 - 06:38
नवीन
आपल्या अपत्यासाठी आपण अशी पदवी "विकत" घेणार काय ?
आपण मॅकबुक विकत घ्यायला गेलात तेथे PAN कार्ड मागितले कारण रुपये ५००००/- च्या पेक्षा जास्त कोणताही व्यवहार करताना हे आवश्यक आहे.आपल्या मित्राचे PAN आपण दिलेत. उद्या त्याला आयकर अधिकारी विचारू शकतील कि हे ५००००/-(किंवा जी काही किंमत असेल ती) आपण कुठून आणल)/? त्याचा स्रोत दाखवा.
अवैध संपत्तीवर डोळा ठेवणे हा याचा हेतू आहे.
असा कायदा आपण पाळत नसाल तर आपल्यात आणि अवैध संपत्ती बाळगणारा माणूस याच्या मनोवृत्तीत काय फरक राहील?
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 09/21/2016 - 22:19
नवीन
सरकारने असली संपत्ती शोधायचे इतर मार्ग शोधावेत मला PAN कार्ड द्यायला वेळ नाही ! आणि जो विकत आहे त्याला सुद्धा फरक पडत नाही. हा सरकारी चोम्बडे पणा आहे आणि ह्यातून काहीही फायदा नाही.
> अवैध संपत्ती बाळगणारा माणूस याच्या मनोवृत्तीत काय फरक राहील?
काहीही नाही. माझे शेजारी प्रचंड प्रमाणात अवैध पैसे बाळगून आहेत पण कधी वर्तमानपत्र सुद्धा त्यांनी नेले नाही. अतिशय छान गृहस्थ आहेत. सरकारी कर भरला नाही म्हणून सम्पत्ती अवैध ठरते तर मला त्यांत काहीही वाईट वाटत नाही. सरकारने कर कमी करावा.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 09/22/2016 - 00:07
नवीन
आम्हाला तर पगार असो वा क्लायंटचं पेमेंट असो, कायम पॅनकार्ड लागतंच. आता क्लायंटच्या तोंडावर 'नाही देत पॅनकार्ड' म्हटले तर कसे चालायचे? काळापैसा एवढा नाही मिळत हो आम्हा गरिबाला... पन्नासहजारच्या वर पेमेंट असले की पॅनकार्ड लागतंच. अगदी पाच-दोन हजाराचं ट्रॅन्झॅक्शनलाही बॅन्केत पॅनमधे नोंद होते, बॅन्केत खातं उघडायला पॅन लागतं. सर्वच पॅनकार्डविरहित अवस्थेत करायचं तर वेगळे धंदे करायला लागतील. ते धंदे कोणते?
तुमच्याकडे पॅनकार्ड नाही? तुमचा पोटापाण्याचा धंदा काय?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 09/22/2016 - 09:14
नवीन
संदीप डांगे,
तुमचं प्यान कार्ड ही तुमची व्यावसायिक गरज आहे. साहना यांना संगणक विकत घेतांना प्यान क्रमांक द्यावा लागणे ही साहना यांची गरज नाही. ही विक्रेत्याची गरज आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 09/22/2016 - 09:33
नवीन
असं म्हणताय?
आता बघा कसं ते: माझं प्यान्कार्ड ही माझी व्यावसायिक गरज नै हो. क्लायंटचीच व्यावसायिक गरज आहे. त्याला टॅक्स रिटर्न फाईल करायला लागतात, बेहिशेबी ट्रॅन्झॅक्शन आयटीला-पर्यायाने-सरकारला चालत नाहीत. (कारण सरकारला कर हवा असतो, कारण सरकारला त्यातून देश चालवायचा असतो, कारण त्यातूनच रोजगार आणि पैसे कमावण्याच्या संधी मुक्तपणे मिळू शकतात. त्यामुळे कोणी कर चोरलेला सरकारला चालत नाही) त्यामुळे क्लायंट अशांशीच व्यवहार करण्यास तयार असतात ज्यांचे वॅट-पॅन-सर्विसटॅक्स असं सगळं बरोबर असतं, अन्यथा अमुक एक लाख संदिप डांगेंना दिले, का आणखी कुणाला दिले, दिले तर का दिले असे क्लायंटला आयटी विचारत येते. आयटी घरा आली की सगळ्यांचे शहाणपण गोठून जाते.
साहनाजींनी क्रेडीट वा डेबिटकार्ड मार्फत व्यवहार केला असता तर त्याला पॅनकार्ड मागायची गरज पडली नसती.
अवांतरः साहनाजींनी संगणक घेतल्यावर बिल घेतले असेलच, तर ते का घेतले असावे. समजा विक्रेत्याने बिल देण्यास नकार दिला तर?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 09/22/2016 - 21:32
नवीन
संदीप डांगे,
तुमच्यापेक्षा साहना यांच्याकडे जास्त पर्याय आहेत. एव्हढं जरी लक्षात आलं तरी पुरे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
साहना
Fri, 09/23/2016 - 04:06
नवीन
pan कार्डलाच विरोध करायचा असे नाही. आपले जीवन साधे सरळ करण्याचा जो मार्ग आहे आणि आपल्या फायद्याचा मार्ग आहे तो अवलंबवायचा. तुम्हाला जर pan वापरून जास्त इन्कम मिळत असेल तर बिनधास्त वापर करा ना. मला संगणक घेताना जर PAN दिला तर ५% सवलत असे विक्रेत्याने सांगितले असते तर मी मुद्धाम हुन कष्ट घेऊन PAN दिला असता. अनेकदा विक्रेते कच्चे बिल देतात आणि ५% सूट देतात (विशेष करून लॅमिंग्टन रॉड वर) ह्यांत मी अतिशय आनंदाने त्यांना रोख रक्कम देते. त्यांचाही फायदा माझाही फायदा. आणि सामान बिघडले असता कच्चे बिल घेऊन ते ठीक सुद्धा प्रामाणिक पणे करून देतात.
उगाच सरकारने बेंड व्हा असे सांगितले तर आपण केवाय जेली घेऊन राहायला पाहिजे असे नाही. आपण जर असले कायदे दुर्लक्षून आपले जीवन जास्त सुकर करू शकता तर बिनधास्त करावे असे माझे सोपे म्हणणे आहे. सरकाने नियम करावे आणि आपण गुलामा प्रमाणे मान्य करून पालन करावे ह्यांत स्वातंत्र्य नाही. आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर बाधा आणणाऱ्या प्रत्येक नियमाचा प्रत्येक स्तरावर कडाडून विरोध करावा आणि तरीही शक्य नाही झाले तर प्रत्यक्षांत तो नियम किती इररेलेवंट होईल ह्या कडे ध्यान द्यावे.
हेल्मेटचा नियम, दारूबंदी विषयक नियम आणि शेकडो असे नियम सरकारने केले आहेत ज्याचा पापभिरू कायद्याने जाणाऱ्या माणसाला प्रचंड त्रास होतो. पण त्याच वेळी नियम उल्लंगण्याची शक्ती असलेला माणूस ह्यातून स्वतःचा फायदा करून घेतो.
- Log in or register to post comments
स
सत्याचे प्रयोग
Sat, 09/17/2016 - 18:55
नवीन
मलाही हा अनुभव आला आहे. डोकोमो चे सिम होते एक काॅल होत नव्हता पण बदलासाठी त्यांचे काॅल नोटीस येत होती मी पण एकच टेप लावली होती घरी या एकच काॅल करुन दाखवा आणि बिल घेऊन जा. बिल काही दिले नाही आपोआप प्रकरण बंद झाले.
- Log in or register to post comments
स
सत्याचे प्रयोग
Sat, 09/17/2016 - 18:55
नवीन
मलाही हा अनुभव आला आहे. डोकोमो चे सिम होते एक काॅल होत नव्हता पण बदलासाठी त्यांचे काॅल नोटीस येत होती मी पण एकच टेप लावली होती घरी या एकच काॅल करुन दाखवा आणि बिल घेऊन जा. बिल काही दिले नाही आपोआप प्रकरण बंद झाले.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2