Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिठीतली रात्र

न — निनाव, Wed, 09/14/2016 - 15:52
अनेक वर्षानी जुनी पाने पालटली आज, आणिक हि कविता नजरेस अाली मिपा वर बरेच नविन कवि वर्ग जुडले आहे, तेव्हा पुन्हा सादर करतो आहे. "मिठीतली रात्र" आले आहे पुन्हा सख्या रे मिठीत तुझ्या आज पाहा रे आवरे मोह मज न अधिक आता पडदा तारकांचा पडू दे ना रे... निजले जग, निजले तारे अंतर असे हे मिटले सारे माझ्या कुशीत तु उजळला अधिकच तुझ्या आलिंगनात मज लाज ना रे विझले कधी मी मलाच कळेना तुझ्या कुशीतुन पदर सुटेना उलगडली वेणी, उलगडले अशी मी तुझ्या डोळ्यांत मज बघवेना रे आले विरह ते किरणांचे मज कलह मनाचा काही शमेना दरवळते अजुनी तुझ्या श्वासांचे गंध, पडेल तारकांचा पुन्हा पडदा ना रे? आले आहे पुन्हा सख्या रे मिठीत तुझ्या आज पाहा रे न आवरे मोह मज अधिक आता पडू दे तारकांचा पडदा ना रे...

प्रतिक्रिया द्या
2069 वाचन

💬 प्रतिसाद (4)
श
शिव कन्या Wed, 09/14/2016 - 15:54 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Wed, 09/14/2016 - 16:02 नवीन
बरेच वर्षानी मी पण मिपाची जुनी पाने चाळतो आहे. हि कविता वाचण्यात आली नव्हती. सुरेख आहे कविता.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 09/14/2016 - 16:50 नवीन
शीर्षक वाचून, कवी ऑफिसमधून संध्याकाळी, घरी लेझीम खेळत खेळत जात असताना, मुंबईच्या मिठी नदीत, पडला असावा, आणि तिथेच रात्रभर पडून राहिला असावा, असे चित्र डोळ्यापुढे आले.
  • Log in or register to post comments
न
निनाव Wed, 09/14/2016 - 18:17 नवीन
;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा