Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गॅटर

ज — जव्हेरगंज, गुरुवार, 09/15/2016 - 10:13
कुठेतरी फुललेलं फुलपाखरु आणि लाल फुलांचा सडा असावा वाटतं मला काही पक्षी रंगीबेरंगी किडे बाजरीचं कणीस पाणी चौफेर असावं वाटतं मला आभाळ झळाळून ऊन पडावं पंक्चर झालेल्या सायकलला वंगण लावून दमडावं रीम वाकडी व्हावी चिखलात चाक रुतावं खांद्यावर घेऊन घरला चालत जावं असावी म्हणून ठेवलेली दाढी चांगली हातभर वाढली जंगलातून भुत बाहेर पडावं तश्या माझ्या कविता अचानक आलेल्या जरीची टोपी घालूनंच मी कविता लिहायला बसतो अगदी राजबिंडा गंजलेल्या पत्र्याच्या घरात कोंबडी अंडी घालतेय टिव्हीच्या खाली डिरीवरच्या पेंडीच्या पोत्यात आजकाल चांदीची थाळी नाही मुळात म्हशी राहिल्यात किती? टंगस्टन दिव्याचा भगभगीत प्रकाश पेन चालत नाही लाकडे मसणात गेली इत्यादी इत्यादी "अरे थू..."

प्रतिक्रिया द्या
4345 वाचन

💬 प्रतिसाद (16)
अ
अभ्या.. गुरुवार, 09/15/2016 - 10:17 नवीन
हान तिज्यामारी. परफेक्शन. गेटर सारखी उपमा वापरणार्‍या जव्हेरभावला साष्टांग प्रणिपात.
  • Log in or register to post comments
न
निनाव गुरुवार, 09/15/2016 - 10:24 नवीन
+१ अभ्या जव्हेर जी - रुतलेली सायकल बरीच वेगाने पुढे गेलीये .. बर् का.. :)
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 09/15/2016 - 10:41 नवीन
गॅटर म्हणजे टायर फाटला की नवा टायर न टाकता फाटलेल्या जागी जुनी ट्युब किंवा टायरचा टाकलेला तुकडा.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 09/15/2016 - 10:43 नवीन
आँगळवाणे दिसते पण नाईलाज असतो. हेच जाणवले. म्हणून तर दंडवत ठोकला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
त
तुषार काळभोर गुरुवार, 09/15/2016 - 13:08 नवीन
टायरचा एखादा भाग थोडासा झिजला की आतून ट्यूब हवेच्या दाबाने बाहेर यायला बघते. (हर्निया सारखा) त्याला गॅटर म्हणतात. (गॅटर आलंय, असं अजून एका वेगळ्या संदर्भात म्हटलं जातं. पण ते एक असो...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
अ
अभ्या.. गुरुवार, 09/15/2016 - 13:28 नवीन
आम्हाला दुसरा एकच संदर्भ म्हैते. निवांत बसून बसून पोटाला वळ्या पडल्या की त्याला गेटर आले म्हणतो. पैलवान, तुमचा अर्थ वेगळा असेल तर सांगा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
इ
इरसाल गुरुवार, 09/15/2016 - 13:34 नवीन
त्यांना जो अभिप्रेत आहे तो इतरही ठिकाणी वापरला जातो नेमका त्याच कारणासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. गुरुवार, 09/15/2016 - 13:42 नवीन
इरसालबुवा तेवढा
अभिप्रेत
शब्द वापरु नका हो. उगीच नटून थटून, पांढरे कापड गुंडाळून स्ट्रॉबेडवर अधांतरी अधांतरी वाटते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
इ
इरसाल Fri, 09/16/2016 - 13:35 नवीन
तसला वंगाळ विचार नाही हो करत मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Fri, 09/16/2016 - 13:47 नवीन
एक दिन जाना तो है, मगर ऐसे नही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
त
तुषार काळभोर गुरुवार, 09/15/2016 - 14:05 नवीन
तो ' वळ्या पडणे' हा तिसराच अर्थ आहे. पहिला टायरचा दुसरा मला अभि*त असलेला (*च्या जागी प्रे आहे, अभ्याला अधांतरी वाटू नये म्हणुन तसं लिहिलंय :प) तिसरा वळ्यांचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सिरुसेरि गुरुवार, 09/15/2016 - 15:15 नवीन
गॅटरचं जीवनातलं म्याटर गमतीशीर .
  • Log in or register to post comments
क
क्षमस्व गुरुवार, 09/15/2016 - 15:25 नवीन
फक्त दण्डवत।।।
  • Log in or register to post comments
र
रातराणी गुरुवार, 09/15/2016 - 19:51 नवीन
हम्म. नाही कळली.
  • Log in or register to post comments
प
पथिक Fri, 09/16/2016 - 08:10 नवीन
नीट कळली नाही पूर्ण, पण आवडली.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 09/17/2016 - 06:25 नवीन
absurdity ची हीच गम्मत असते.... कळते, नाही कळत, पण मनात रेंगाळत राहते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पथिक
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा