Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कारवीची फुले कुठे पाहायला मिळतील?

प
पथिक
Fri, 09/16/2016 - 07:57
💬 27
नमस्कार. दर ७-८ वर्षांनी फुलणारी कारवी यावर्षी पण फुलणार आहे असं वाचलं. मागे एकदा पेपर मध्ये कारवीच्या फुलांनी पूर्ण निळा झालेल्या डोंगराचा फोटो पहिला होता आणि ठरवलं होतं कि प्रत्यक्ष हे पाहायचंच. हे दृश्य पुण्याजवळ कुठे पाहायला मिळण्याची जास्त शक्यता आहे कुणी सांगू शकेल काय ?

प्रतिक्रिया द्या
11503 वाचन

💬 प्रतिसाद (27)
प
प्रचेतस Fri, 09/16/2016 - 07:58 नवीन
अपेक्षाभंग.
  • Log in or register to post comments
प
पथिक Fri, 09/16/2016 - 08:01 नवीन
शीर्षक वाचून मी पाहून आलोय आणि माहिती देतोय असं वाटलं असेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 09/16/2016 - 08:03 नवीन
ह्म्म. बाकी कारवीची फुलं भीमाशंकर परिसरात बघायला मिळतील. यंदा फुललीय का ते माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पथिक
प
पथिक Fri, 09/16/2016 - 08:05 नवीन
आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पथिक Fri, 09/16/2016 - 08:08 नवीन
शीर्षक बदलून 'कारवीची फुले कुठे पाहायला मिळतील?' असे करण्याची विनंती करतो..
  • Log in or register to post comments
A
alokhande Fri, 09/16/2016 - 09:26 नवीन
आमच्या साताऱ्याला कास पठारावर कारविची फुले उमलली आहेत संपूर्ण पठार निळे जांभळे झाले आहे.
  • Log in or register to post comments
A
alokhande Fri, 09/16/2016 - 09:30 नवीन
कास पठार च्या संकेतस्थळा वर जाऊन लेटेस्ट फोटो पाहु शकता लिंक - http://www.kaspathar.com/
  • Log in or register to post comments
A
alokhande Fri, 09/16/2016 - 09:30 नवीन
कास पठार च्या संकेतस्थळा वर जाऊन लेटेस्ट फोटो पाहु शकता लिंक - http://www.kaspathar.com/
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 09/16/2016 - 13:15 नवीन
राजगडावर फुललीय असं एका मिपाकराने लिहिलं होतं.राजगड जवळच आहे.
  • Log in or register to post comments
प
पथिक Mon, 09/19/2016 - 07:07 नवीन
धन्यवाद. मी एकटा तीन चार वर्षांपूर्वी राजगड करून आलोय. पण सहकुटुंब जायचं आहे कारवी बघायला आणि त्यात असा गड चढणे हा पर्याय नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
N
Nitin Palkar Mon, 09/19/2016 - 10:14 नवीन
सुमारे बारा तेरा वर्षांपूर्वी राजगड परिक्रमा केली होती. त्या वेळेस कारवीची झुडपे व फुले विपुलतेने पाहिली होती. प्रत्यक्ष राजगडावर कारवी बघितल्याचे स्मरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Fri, 09/16/2016 - 13:16 नवीन
सह्याद्री उतारावरची वेगळी.ही टोपली कारवी.
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 09/19/2016 - 08:04 नवीन
मागच्या वर्षी कास पठारावर पाहिलेली कारवी फुललेली.लोक कारवीचे गुच्छ बनवून तोडत होते आणि कोणीही काही बोलत नव्हतं :(
  • Log in or register to post comments
प
पथिक Mon, 09/19/2016 - 09:04 नवीन
परवाच एस डी महाजन सर बोलले, "कास ला वाचवायचं असेल तर एकच करावं - तिथे जाऊच नये !" :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ज
जिन्क्स Mon, 09/19/2016 - 10:15 नवीन
लोक एवढं का कास-कास करत असतात तेच कळत नाही. कास एवढीच किंबहुना त्यांहूनही सुंदर आणि जास्त प्रमाणात सुंदर फुले रायरेश्वर-कोळेश्वर पठार, तापोळा घाट उतरतानी डाव्या बाजूला उंचावर दिसणारे पठार, रायलिंग पठार इथे दिसू शकतात. वनस्पतीशास्त्रज्ञांच्या मते सह्याद्री रांगेतल्या दुसऱ्या फळीतले सर्व पठारी प्रदेश अशा फुलांसाठी अनुकूल आहेत. अगदी सप्टेंबर महिन्यात महाबळेश्वरच्या केट्स पॉइंट वरही खूप सुंदर फुले फुललेली असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पथिक
प
पथिक Mon, 09/19/2016 - 13:04 नवीन
लोकांना हि ठिकाणे माहित नाहीत तेच बरं आहे.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स
ज
जव्हेरगंज Mon, 09/19/2016 - 10:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
पथिक Mon, 09/19/2016 - 13:01 नवीन
वा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
व
विजुभाऊ Mon, 09/19/2016 - 10:34 नवीन
महाबळेश्वरला सुद्धा कारवीची फुले पहायला मिळतील
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 09/19/2016 - 10:37 नवीन
नकाच लिहु अजून ठिकाणं.सगळ्यांचं कास होऊ नये हीच इच्छा
  • Log in or register to post comments
प
पथिक Mon, 09/19/2016 - 13:01 नवीन
खरंच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Mon, 09/19/2016 - 10:49 नवीन
Image removed. मागच्या वर्षीचा कारवीचा बहर- कास
  • Log in or register to post comments
प
पथिक Mon, 09/19/2016 - 13:03 नवीन
सुंदर.. पण मला हवीय ती डोंगर उतारांवरची कारवी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
न
नूतन सावंत Mon, 09/19/2016 - 14:39 नवीन
या वर्षी मुंबईत पाहायला मिळाली चक्क कारवीची फुलं.
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Mon, 09/19/2016 - 15:30 नवीन
कमळगडावर पण पाहचा येतील
  • Log in or register to post comments
व
वाल्मिक Mon, 09/19/2016 - 15:44 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/others/tourism/sahyadritala-puspotsav/articleshow/49001833.cms
  • Log in or register to post comments
R
Rahul Sable गुरुवार, 09/22/2016 - 16:35 नवीन
मागील आठवड्यात परिवारासोबत सिंहगडला गेलो होतो तेव्हा सिंहगडच्या घाटात कारवी फुललेली पाहिली फोटो सुद्धा काढले लोनावळावरून राजमाची कडे जाणार्‍या मार्गावरही कारवी पहायला मिळेल लोनावळावरून सहारा सीटी कडे जानार्या मार्गावरही कारवी पहायला मिळते पण आता तिथे फुलोरा आला आहे की नाही ते माहीती नाही परिवारा सोबत जानार असाल तर सिंहगड हाच जवळचा उत्तम पर्याय आहे पण सिंहगडावरील वर्दळ वाढल्यामुळे कारवी चा मोठा फुलोरा पहायला मिळने कठिन आहे वाढत्या पर्यटनामुळे तेथील जैव विविधता धोक्यात आली आहे
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा