एकक !
भूमिका :
ही कविता जमेल तेथे फक्त एक शब्द वापरून करण्याचा प्रयत्न आहे. एका स्त्री च्या आयुष्यातील महत्वाचे क्षण /घटना एका शब्दानं प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केले आहे. म्हणून शीर्षक एकक असे नाही . तर, एक स्त्री चे विश्व कसे एकक असून, साखरे प्रमाणे इतरांच्या आयुष्यात विरघळून जाते - इतरांच्या आयुष्यास अर्थ भरण्यास तिची स्वतःची ओळख.. अगदी तिच्या बाबांनी उत्कट प्रेमानं तिला दिलेले नाव सुद्धा - ती विसरून जाते (लग्न नंतर नाव बदलण्याच्या रीती वरून) - एका परिवारास अनेक प्रकारे जोडून -मात्र कुठे तरी ती 'एकक' म्हणून हरवून जाते... ह्या छोट्या अश्या निरीक्षणा वर लिहिण्याचा अल्प सा प्रयत्न आहे. आपल्या समाजात स्त्रियांना अजूनही हवे तितुके आदर-स्थान, सुरक्षा आणिक स्वातंत्र्य मिळत नाही ही संवेदना अजूनही आहे. अश्या असाधारण उपकाराची जाणीव आपल्या मध्ये राहावी म्हणून....विनम्रतेने सादर करतो आहे -
एकक !
- निनाव (१६.०९.२०१६)
जन्म
नाव
ओळख
अभिनंदन
पित्य.प्रेम
जन्मपत्रिका
आठवणीं
मैत्री
खेळणी
शाळा
परीक्षा
प्रगती पुस्तिका
अल्हड-वय
मैत्रिणी कॉलेज
सिनेमे
शॉपिंग
टाईम-पास
लग्न-वय
काळजी
लग्न-पत्रिका
लग्न
त्याग-
अखंड
प्रचंड
बाबांचे
आईचे
भावंडांचे
आवडत्या खोलीचे
मैत्रीचे
गोष्टींचे
स्वप्नांचे !
अपॆक्षा -
आपले सोडूनि
घर ते
कुणाचेच बांधायचे
रोपे घरची
विसरून
अंगण
'त्यांचे'
फुलवायचे !
नाव-
सोडायचे
गाव-सोडायचे
'चवी' बदलायच्या
'सवयी' बदलायच्या
'नमते' घ्यायचे
'त्यांच्या' कडचं
'स्वीकारायचे'!
झाले 'अन्नू'
'अनुपमाचे'
तरीही
'ए मंदार'
नाही संबोधायचे
अन्नपूर्णा
लक्ष्मी
अर्धांगिनी
वगैरे ....
प्रमुख म्हणुन
मात्र
त्यानंच
मिरवायचे
असो!
💬 प्रतिसाद
(6)
प
प्रचेतस
Fri, 09/16/2016 - 08:29
नवीन
खूप उत्कट कविता.
- Log in or register to post comments
ब
बरखा
Fri, 09/16/2016 - 12:35
नवीन
एका शब्दाची कविता फार छान, मस्त !
झाले 'अन्नू'
'अनुपमाचे'
तरीही
'ए मंदार'
नाही संबोधायचे
हे जास्त आवडल.
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Fri, 09/16/2016 - 17:13
नवीन
वेगळा प्रयत्न!!
खूप आवडला !!
- Log in or register to post comments
न
निनाव
Fri, 09/16/2016 - 18:46
नवीन
Prachetas Mitra, Pallavi Ji anik Javherganj ji,
Anek abhaar.
Aapla, Ninaav
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Sat, 09/17/2016 - 01:58
नवीन
आवडला.
- Log in or register to post comments
प
पथिक
Mon, 09/19/2016 - 07:22
नवीन
वेगळी आणि छान !
- Log in or register to post comments