Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उरीचा घाव

स — संदीप डांगे, Mon, 09/19/2016 - 13:45
छप्पन इंचाच्या ह्या 'उरी' भोसकली अठरा इंची सुरी बधिर मन ऐकून शब्दफुरफुरी मानवत नाही श्रद्धा अन सबुरी नेहमीच का आमच्या हातावर तुरी का सहन कराव्या ह्या कुरबुरी फोडून टाका तो जबडा आसुरी चमकवा तोफा, बंदुका, कुकरी माजवा हल्लकल्लोळ शत्रूच्या पुरी न ठेवावी कोणतीच मोहीम अधुरी होउदे जयघोष दाखवा बहादुरी लढाईच ही अछ्छी वा बुरी पुरे झाल्या हो त्या चर्चा संतुरी मागतो अखंड विजयाची कस्तुरी -संदीप डांगे

प्रतिक्रिया द्या
3152 वाचन

💬 प्रतिसाद (13)
अ
अप्पा जोगळेकर Mon, 09/19/2016 - 14:14 नवीन
कविता म्हणून ठीक आहे. प्रत्यक्ष कारवाई प्रभावी नियोजन आणि अनपेक्षित पणे व्हावी.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Mon, 09/19/2016 - 14:19 नवीन
कवितेच्या आशयशी सहमत. आता हातासारखे भारताने एक-दोन अणुबॉम्ब पाकिस्तान वर टाकुन हा किस्सा कायमचा संपवून टाकायला हवा.
  • Log in or register to post comments
न
निनाव Mon, 09/19/2016 - 17:15 नवीन
+1000
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 09/19/2016 - 17:57 नवीन
कविता मस्त आहे पण बाकी हिडीस आहे सगळे, इतके सोपे उरलेले नाही भेंडी काहीच. ज्या दिवशी निर्णय होईल त्या दिवशी अक्षरशः यमराजाचा येळकोट होईल, इतके मात्र नक्की सांगतो. वर्षोंवर्षे साचलेली भडास हताशा चीड अन संताप एक एक जवानात ठासून भरलाय राव, संपवून टाकायचा का नाही हा विषय ठरवावे राज्यकर्ते लोकांनी एकदाच आजी माजी सगळ्यांनी एकत्र बसून पण काहीतरी करावेच, वीट आलाय माxxxxपणाचा पाकड्यांच्या
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 09/19/2016 - 18:22 नवीन
असेच म्हणतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ख
खेडूत Mon, 09/19/2016 - 18:28 नवीन
+१००० दिवसभर फार अस्वस्थता आलीय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
न
नितिन थत्ते Mon, 09/19/2016 - 18:34 नवीन
ही कविता वाचून ही जुनी कविता आठवली.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 09/19/2016 - 18:51 नवीन
कवितेमागचा त्रागा, घटनेबद्दल मनात निर्माण झालेली चीड कितीही प्रामाणिक असली तरी कविता केवळ ओढूनताणून यमक जुळवल्यासारखी वाटली. जम्या नही संदीपशेठ.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 09/19/2016 - 18:55 नवीन
तुमचं निरीक्षण अचूक आहे, कविता आमचा प्रांत नाही, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
च
चांदणे संदीप Tue, 09/20/2016 - 03:09 नवीन
कविता जोषपूर्ण आहे! फक्त ते कुकरी ऐवजी "संगीनी दुधारी" हा शब्द चपखल बसला असता! तुमची परवानगी असेल तर कायप्पावर वायरल करून टाकतो. Sandy
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 09/20/2016 - 03:32 नवीन
चालेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
च
चांदणे संदीप Tue, 09/20/2016 - 06:40 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ज
जोन Tue, 09/20/2016 - 04:11 नवीन
आशय उत्तम आहे!!!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा