एक क: पदार्थ
मी
मी एक क: पदार्थ
चंचल, स्वैर नि चिकित्सक,
सौंदर्याच्या व्यर्थ व्याख्या,
भावनांचे बेकार प्रवाह,
आघात करताहेत
कशावर ? कुणावर ?
झीज, झीज, अपक्षय, अपक्षय,
एक सुरुकुती, पांढरा केस, तिशी, चाळीशी
हे दिसतं, जाणवतं, पण भावना त्या का पिकात नाहीत ?????
💬 प्रतिसाद
(2)
न
निनाव
Tue, 09/20/2016 - 17:12
नवीन
सांकेतिक कविता !
भावनांचे बेकार प्रवाह आणिक , भावना पिकात नाही - ह्या दोन गोष्टी पूरक वाटल्या नाहीत. - कदाचित कवी च्या मनात काहीतरी संदर्भ असल्यामुळे तसे लिहिले गेले असावे!
काव्य म्हणून -छान. विचार करायला लावणारी कविता.
- Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी
Tue, 09/20/2016 - 17:51
नवीन
डॉ. ना दाखवून द्या तब्बेत. आव पडतेय बहुधा
;)
- Log in or register to post comments