Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी कोणालाच काही सांगणार नाही...

B — bhavana kale, गुरुवार, 09/22/2016 - 12:22
तुज्या प्रेमाच्या ओलाव्यात चिंब भिजेन एवढं प्रेम करू नकोस.. प्रीतीच्या सागरात वाहून किनाऱ्याला येऊ शकणार नाही एवढं प्रेम करू नकोस... तुझ्या सौदर्यांने घायाळ फक्त स्वप्नातच असतो मी आजकाल.. म्हणून तुझ्या मनात काय आहे ते सांग मला, मी कोणालाच सांगणार नाही.. खरं खरं सांग मला, मी कोणाला सांगणार नाही.. डोळ्यावर झोप अशी नसतेच कधी स्वप्नात तुझी सोबत हवी हवीशी वाटते.. गजबजलेल्या गर्दीतून वाट काढताना तुझ्या हळुवार स्पर्शाचा आधार घ्यावासा वाटतो.. तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय आणखी मला काही सुचतच नाही.. म्हणून तुझ्या मनात काय आहे ते सांग मला, मी कोणालाच सांगणार नाही.. खरं खरं सांग मला, मी कोणाला सांगणार नाही.. धोधो कोसळणाऱ्या पावसात एकटं भिजताना तुला माझी आठवण नक्कीच येईल.. अशी काही अपूर्ण स्वप्न जाता जाता तुझ्या ओजंळीत मी देऊन जाईल.. माझ्या प्रेमाची भव्यता कदाचित तेव्हाच तुला समझेल.. म्हणून तुझ्या मनात काय आहे ते सांग मला, मी कोणालाच सांगणार नाही.. खरं खरं सांग मला, मी कोणाला सांगणार नाही..

प्रतिक्रिया द्या
2351 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/22/2016 - 12:51 नवीन
कवितेतील भावना पोहचल्या. छान लिहिलंय. '' धोधो कोसळणाऱ्या पावसात एकटं भिजताना तुला माझी आठवण नक्कीच येईल..'' खरंय.... पाऊस माणसाला वेडं करतो. आणि आठवणींचं विचारु नका. पाऊस आणि आठवण आली की डोळ्यातलं पाणी अन पावसाचं पाणी हातात हात घालून धोधो वाहतात, तो क्षण भन्नाट असतो. (असं म्हणतात) अब हिचकियाँ आती हैं तो पानी पी लेते है... ये वहम छोड़ दिया है की कोई हमे याद करता है...! -दिलीप बिरुटे (एक दिवाना )
  • Log in or register to post comments
B
bhavana kale गुरुवार, 09/22/2016 - 13:48 नवीन
खरंच...जितका पाऊस पडतोय त्याच वेगाने कविता लिहितेय... आणि ह्या पावसात फक्त आणि फक्त प्रेमवरच लिहावसं वाटत.. -एक पाऊसवेडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/22/2016 - 13:52 नवीन
>>>> जितका पाऊस पडतोय त्याच वेगाने कविता लिहितेय... आणि ह्या पावसात फक्त आणि फक्त प्रेमवरच लिहावसं वाटत.. प्रेमावर लिहा, पावसावर लिहा, पण लिहा. होऊ दे, मोकळं आकाश. हाय काय, अन नाय काय, पुलेशु. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: bhavana kale
प
पाटीलभाऊ गुरुवार, 09/22/2016 - 13:23 नवीन
मस्त लिहिलंय...!
  • Log in or register to post comments
क
किरण गुरुवार, 09/22/2016 - 20:23 नवीन
बोल दो ना जरा,????????
  • Log in or register to post comments
B
bhavana kale Fri, 09/23/2016 - 08:11 नवीन
बरोबर ओळखलंत..पण ह्या काव्यप्रकाराला काय नाव द्यावे ते मला कळलं नाही..हे विडंबन पण नाहीये..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किरण
प
पथिक Fri, 09/23/2016 - 08:59 नवीन
अशी काही अपूर्ण स्वप्न जाता जाता तुझ्या ओजंळीत मी देऊन जाईल..
सुंदर ओळी ...
  • Log in or register to post comments
स
सच६४८६ Wed, 06/21/2017 - 08:57 नवीन
अब हिचकियाँ आती हैं तो पानी पी लेते है... ये वहम छोड़ दिया है की कोई हमे याद करता है...! >>> खूपच भारी लिहिलंय
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा