आमसुलाची चटणी
Primary tabs
एक मिपाकर गुरूजी म्हणाले होते जर आपण बाप्पाचे नैवेद्य देतो तर पितृपंधरवड्यात वेगवेगळ्या स्पेशल रेसिपी का नाही देत? मी काल जी चिबडाची कोशिंबीर दिली होती ती आमच्या कोकणात पक्षासाठी केली जाते. तशीच ज्याच्याशिवाय श्राध्द पक्ष पूर्ण होत नाही अशी ही आमसुलाची चटणी!
खरंतर आमसुलाची चटणी अतिशय चविष्ट असते, ती इतरवेळी का करत नाहीत कोण जाणे. कदाचित सारखे खीर वडे खाणाय्रा मंडळीना त्रास होऊ नये म्हणून आमसुलाची चटणी याचवेळी केली जात असावी.
साहित्यः
अर्धी वाटी आमसुले, पाव वाटी गूळ, पाच सहा ओल्यामिरच्या, पाव वाटी ओले खोबरे, एक चमचा जीरे, मीठ.
कृती:
आदल्यादिवशी रात्री आमसुले पाण्यात भिजत घालावीत. विसरल्यास सकाळी गरम पाण्यात घालावीत. मिरच्या धुवून तुकडे करावेत. आमसुले (पाण्याशिवाय), मिरच्यांचे तुकडे, ओले खोबरे, गूळ, जीरे आणि चवीनुसार मीठ एकत्र करून छान बारीक वाटावे. गरज वाटल्यास आमसुलाचे पाणी वाटताना घालावे. आमसुले व्यवस्थित आंबट असतील तर गूळ जास्त लागू शकतो.
ही चटणी एकदम मस्त लागते. उरलेले आमसुले भिजवलेले पाणी आमटीत वापरावे.
उपयुक्त माहिती
तापातून किंवा आजारपणातून नुकत्याच उठलेल्या व्यक्तीच्या तोंडाला अजिबात चव नसते म्हणून खायला खळखळ करतात. अशा व्यक्तीला गरमागरम मऊ भात आणि ही चटणी खायला द्यावी. उत्तम उपयोग होतो.
नक्की करुन बघते. मलापण आवडते ही चटणी.
मस्त. परवाच झाली आमच्याकडे.
इतरवेळी नाही होत.
मलाही चटणी आवडते पण श्राद्ध पक्ष याशिवाय खायला मिळत नाही हे खरे, तसेच तांदळाची खीर.
थांकू!

मस्त केल्ये. पण बय्राच जणांना अशी सॉफ्टी जमत नै.
आमसुलं जरा भिजवून मऊ पुठ्ठ्या सारखी गुळ मीठात चुरडतात. की झालं.
दुत्त दुत्त.
अता मी त्यांना ही चटणी दिईन. :)
आता काय सुगरण पण आलेय घरी!!
चक्क माझ्याकडे आमसुलं आहेत! आणि पित्तं उठतंच पोराच्या अंगावर सारखं. ही चटणी खाऊ घालणं सोप्पं आहे त्याला.
मी नक्की करुन पाहिन ग!!
आगाऊ सल्ला --
पिरा ताई,
पित्त उठण्याचे(urticaria) सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पोटात जंत होणे. यासाठी आपल्या बाळाला बेन्डेक्स (आल्बेण्डाझोल ४०० मिग्रॅ) असलेली गोळी विकत आणून चावून खाऊ घाला( गोळी गोड असते) किंवा सिरप दिले तरीही चालेल.
http://www.the-dermatologist.com/sites/default/files/issues/Screen%20Sh…
अरे हा प्रतिसाद पाहिलाच नाही!
धन्यवाद काका! राही ह्यांनीही आवर्जुन हेच कळवले होते.
मला अजिबात माहिती नव्हतं! आता लक्षात ठेवेन. :)
नक्कीच उपयोग होईल, मिरची नको घालू.
छान लागत असेल.कधी खाऊन पाहिली नाही.
चटणी. पण हिचं नातं कायम श्राध्दाच्या जेवणाशी जोडलेलं असल्याने पितृपक्ष सोडला तर एरवी केली जात नाही, :(
लहानपणी लहर आली की मी ही चटणी करा असा हट्ट आई आजीपाशी करायचे आणि ओरडा खायचे ह्याची आठवण झाली, :)
स्वाती
मलापण आवडते ही चटणी.
माझ्याकडेही याच पद्धतीने केली जाते.छान होते.
चटणी आहे ही. काय हे तोंड खवळलं ना....
आता ही चटणी खा.
नवीनच पाकृ कळली. छान आहे.
वाह , मस्तच
मला खूप आवडते, मी करते तोंडाची चव गेली की.
तांदुळाची खीरसुद्धा अशीच श्राद्धाला की काहीतरी करतात म्हणून मला अजून कधी खावीशी वाटत नाही. पण अशी आमसुलाची चटणी आमच्याकडे कोणत्यातरी उपासाला खाल्लेली आठवते आहे.
सेम पिंच..तांदुळाची खीर कर ना वरून पण बोलणी खाल्ली आहेत लहानपणी.. मग आई किवा आजी रव्याची खीर करून द्यायच्या आणि अशी नाही, ती तांदूळाची.. असा हट्ट केला की खीर बाजूला, बोलणी खाल्ली जायची.:)
स्वाती
घारकुटाचे वडे आणि खीर असतेच श्राध्दाला!
मस्त दिसत आहे, करुन पाहीन :)
अहाहा.. काय सुरेख रंग आलाय गं. नेहमी १३ व्याला वगैरेच खाल्लं आहे पण आता आवर्जुन करुन खाईन.
आताच ही चटणी केली आहे. झक्कास चवीची बनली आहे..