Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठा मोर्चा भाग 2

व
वाल्मिक
Mon, 09/26/2016 - 08:40
🗣 363 प्रतिसाद
मागील धागा मूळ उद्देशातून भटकला म्हणून परत काही प्रश्न 1) खरंच सध्याचा मोर्चा उत्स्फूर्त आहे का ? कोणत्याही नेतृत्वाशिवाय एवढे लोक जमणे शक्य आहे का ? 2) अदृश्य हात असेल तर कोणाचा ? 3) झेंडे ,फलके ह्यावर कोणी खर्च केला ? 4) जर नेतृत्व नाहीये तर अमुक तमुक ठिकाणी भेटायचे हे कसे ठरले ? 5) कसाब ला फाशी नेमक्याच वेळी झाली तसे उरण मध्ये ह्याचवेळी अतिरेकी आले हे शक्यता असू शकत का ? मुख्य 6) अमेरिकेचे प्रगती आरक्षण नसल्यामुळे झाली का ? जगात किती देशांमध्ये आरक्षण आहे ? https://goo.gl/YXEbrt

प्रतिक्रिया द्या
100206 वाचन

💬 प्रतिसाद (363)
म
मुक्त Mon, 09/26/2016 - 09:18 नवीन
  • Log in or register to post comments
म
मुक्त Mon, 09/26/2016 - 10:16 नवीन
  • Log in or register to post comments
म
मुक्त Mon, 09/26/2016 - 10:17 नवीन
  • Log in or register to post comments
व
वाल्मिक Mon, 09/26/2016 - 11:37 नवीन
कुठे कुठे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त
भ
भाते Mon, 09/26/2016 - 10:19 नवीन
संमं, आता हे असले धागे खरंच आवरा. वाल्मिक, दोन महिने निःशब्द रहाणार असल्याचे मागे तुम्हीच जाहिर केले होते ना? मग पुन्हा हा आणखी एक धागा कशाला? धागा काढल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही का?
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Mon, 09/26/2016 - 10:20 नवीन
या मोर्चाशी संबधित दोन मित्रांबरोबर या शनिवारी चर्चा झाली (हे मित्र आधीपासून होते.. मोर्चाशी संबधित आहेत हे परवा कळले).. चर्चेचे निमित्त नेहेमीचेच... वीकेंड पार्टी.. या चर्चेचा सारांश : ह्या मोर्चामागची भावना उत्स्फूर्त आहे. यामागे नेहेमीचे यशस्वी नेते नाहीत त्यामुळे हा मोर्चा उत्स्फूर्त वाटू शकतो पण यामागे भरपूर प्लॅनिंग आहे. हे सर्वा करणारे राजकीय नेते नाहीत.. (भविष्यात ते राजकीय नेते म्हणून पुढे आले तर फार आश्चर्य वाटणार नाही).. ह्या मोर्चाच्या सर्वा मागण्या जरी पाटल्या नाहीत तरी शांततापूर्ण मार्गाने केलेले शक्ति प्रदर्शन म्हणून या अनोख्या घटनेची नोंद घ्यावीच लागेल या चर्चेतील सर्वा मुद्दे व शब्द येथे देता येणार नाहित.. पण चर्चेच्या अनुषंगाने बाकीच्या मुद्द्य्यांवर जरूर लिहायला आवडेल.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Mon, 09/26/2016 - 12:07 नवीन
हे लै डेन्गेर बघा फिल्म बनेल याच्यावर जबरा जर तरुण लोक असे सगळे करत असतिल अन वाढत्या जातियतेबद्दल त्याना काही वाटत नसेल तर अवघड आहे
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Mon, 09/26/2016 - 12:23 नवीन
वाढत्या जातियतेबद्दल त्याना काही वाटत नसेल... हा निष्कर्ष तुम्ही कसा कढला हे कळले नाही.. मी असे कुथलेही विधन केले नाही..
  • Log in or register to post comments
भ
भोळा भाबडा Mon, 09/26/2016 - 12:58 नवीन
सातार्यात ब्राह्मण महासंघ देखील मराठा मोर्चात उतरणार आहे. आता बोला
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Tue, 09/27/2016 - 08:29 नवीन
भोभा लिंक कुठे आहे बातमीची कि नुसताच महाराजांच्या टैमाला सारखं आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा
भ
भोळा भाबडा Tue, 09/27/2016 - 13:23 नवीन
हे घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
म
महासंग्राम Tue, 09/27/2016 - 13:35 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा
न
नाखु Tue, 09/27/2016 - 13:44 नवीन
मराठा क्रांतीला पाठींबा देणे आणि त्यांनी स्वतःसाठी आरक्षण मागणे हे दोन्ही वेग्वेगळे आहे. बातमीत्पून पहिल्या बाबीचा अर्थबोध होतो पण दुसरी बाब नसताना तशी दिशाभूल करून ब्राह्मण संघ आरक्षणाची मागणी करत आहे असे का भासविता. तुम्ही ना भोळा आहात ना भाबडा. अजूनही पहिल्या धाग्यातील काही प्रश्नांचि उत्तरे दिली नाहीत. अत्ताच का? आरक्षण फक्त याच सरकारची जबाबदारी आहे काय? मागील सरकारने शेवटच्या काही दिवसात कायदा न करता (न्यायालयात टिकणार नाही असा ) अध्यादेश का काढला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा
स
सचु कुळकर्णी Tue, 09/27/2016 - 14:13 नवीन
मागील सरकारने शेवटच्या काही दिवसात कायदा न करता (न्यायालयात टिकणार नाही असा ) अध्यादेश का काढला. मागिल सरकारला महित होते कि ते सत्तेत येणार नहि आहेत, त्यामुळे हे पिल्लु तर जाणिवपुर्वक सोडण्यात आल. त्यामधुन अनेक हेतु साध्य करायचा प्रयत्न होतोय. बोत लंबा गेम है काका ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
भ
भोळा भाबडा Tue, 09/27/2016 - 18:55 नवीन
अत्ताच का? आरक्षण फक्त याच सरकारची जबाबदारी आहे काय? मागील सरकारने शेवटच्या काही दिवसात कायदा न करता (न्यायालयात टिकणार नाही असा ) अध्यादेश का काढला.
तुम्हीच भोळे आहात हो!! हे सरकार हलवण्यासाठी मराठे बाहेर पडलेत किंबहुना त्यांना बाहेर पाडलं गेलं आहे हा तुमचा गोड गैरसमज आहे,त्याचा तुम्हाला लखलाभ. >>> मोर्चा अत्ताच का? → दूध कडक तापल्यावरच ऊतू जातं ओ,त्यामुळे तुमचा प्रश्न अस्थानी आहे. >>> मागील सरकारने शेवटच्या काही दिवसात कायदा न करता (न्यायालयात टिकणार नाही असा ) अध्यादेश का काढला → मागचे सरकार नालायक होतेच, पण मराठ्यांनी सेना भाजपला रेकाॅर्ड मतदान केले आहे हे का विसरता,सरसकटीकरण कशाला ओ करता? मराठा म्हणजे पवार आणि पवार म्हणजे राष्ट्रवादी हे समीकरण तुमच्या डोक्यात फिट्ट झालयं आता त्याला माझ्याकडे औषध नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
श
श्री गावसेना प्रमुख Wed, 09/28/2016 - 05:43 नवीन
तरीही प्रश्न उरतोच कि दुध आत्ताच का उतु गेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा
म
महासंग्राम Wed, 09/28/2016 - 05:54 नवीन
गॅस बंद केला नै म्हणून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
स
सुखीमाणूस Tue, 09/27/2016 - 11:30 नवीन
आधिच बदनाम आहेत जात्यान्ध म्हणून त्यावर शिक्कामोर्तब होइल Actually Brahmins should never ask for caste based reservation. They should participate in no reservation movement.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा
अ
अशोक पतिल Mon, 09/26/2016 - 15:55 नवीन
खरच चांगली गोष्ट आहे. समजात अश्या गोष्टीनींच सहिष्णुता वाढ्ते .
  • Log in or register to post comments
अ
अशोक पतिल Mon, 09/26/2016 - 16:07 नवीन
अरे मराठा मोर्चा आताच का ? हा धागा कुठे गेला राव ? सेन्सार केला की काय ?
  • Log in or register to post comments
व
वाल्मिक Mon, 09/26/2016 - 17:15 नवीन
कोणीतरी माझ्या धाग्याने 500 पार केले म्हणून ................................................अभिनंदन केले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अशोक पतिल
श
शिद Mon, 09/26/2016 - 19:26 नवीन
पहील्या भागात आलेले प्रतिसाद संख्या पाहून मन भरलं नाही वाटतं अजून?
  • Log in or register to post comments
ए
एमी Tue, 09/27/2016 - 03:34 नवीन
  • Log in or register to post comments
ए
एमी Tue, 09/27/2016 - 03:35 नवीन
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 09/27/2016 - 04:12 नवीन
एकदा हॉस्टेलमधे थर्डयिअर फोर्थयीअर पोरांची मारामारी झाल्यावर आमच्या रेक्टरने सर्वांना फैलावर घेतले. आमच्यासारख्या काही दोन्ही वर्गातल्या काही 'नामांकित' धुरंदरांना साहेबांनी क्रॉसचेक केले. प्रत्येकजण आपण मारामारी करत नव्हतो तर मारामारी करणार्‍यांना रोखत होतो, आवरत होतो असे सांगत होता. साहेब थोड्यावेळाने वैतागून बोललं, "भेंडी, तुम्ही सगळे मारामारी रोखत होते तर मग मारामारी नेमकी कोण करत होतं?" -आमच्यावर अन्याय झाला अशी हाकाटी करणार्‍या सर्वांचीच कैफियत ऐकून मलाही हल्ली हाच प्रश्न पडायला लागलाय-
  • Log in or register to post comments
व
वाल्मिक Tue, 09/27/2016 - 08:08 नवीन
लोळलेलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अशोक पतिल Tue, 09/27/2016 - 04:50 नवीन
सध्या ह्या राज्यत मराठा समाजाचे अभुतपुर्व व शातंतामय असे मोर्चे व तेहि सपुंर्ण महाराष्ट्र भर निघत आहेत. फक्त काही मागण्या ! आता पर्यंत ह्या राज्यात भरपुर मोर्चे , आदोंलन निघाले/झाले. तसा तो प्रत्येक समाजाचा कायदान्वये अधिकार पण आहे.व त्याचा समाजजीवनवर प्रतिक्रिया म्हणुन काही फारसा फरक पडत नव्हता . पण आता वेळी मात्र तसे झाले नाही. ह्या मोर्चे विषयी सहानुभुती राहु द्या पण ह्या संस्थंळावर टोकाची मते वाचायला मिळाली. मागच्या धाग्यावर जास्ती करुन एकतर्फी भुमिका बघायला मिळाली. कारण दुसरी बाजु मांडणारे इथे कमी असतिल कींवा जास्त कळफलक बडवता येत नसेल . मागच्या धाग्यावर प्रतिक्रिया विक्रमी संख्येत नेण्या मधे प्रा. बिरुटे यांचा मोलाचा वाट राहीला. त्यानी जे मत प्रदर्शन व तेही इतक्या हिरीरीने केले त्याचे खुप आश्चर्य वाटले. माणुस हा समाज जीवनात वेगळा व खर्या आयुष्यात वेगळा वागतो हे खरे असेल, तरीही त्यांना सांगु इच्छितो की जर त्यांचे कोणी मराठा मित्र असतील तर ते ही मते त्यांना सरळ सांगु शकतील का ? खरे म्हणजे हाच एकमेव असा समाज आहे त्याने आता पर्यंत जाती विरहीत मतदान केले आहे. फार पुर्वी पसुन मग कान्ग्रेस असेल आता राष्ट्र्वादी असेल, शिवसेना, भाजपा, शेकाप, फार काय जनसंघ लाही मत दिले आहे. पन एकगठ्ठा मते क्वचित दिली असतिल. त्या मुळे ह्या समाजाला आपल्याला वापरुन घेतल्याची भावन आहे व ती अगदी अनाठाही नाही. आजचे जे सरकार आहे त्यात ही त्याचा मोठा वाटा आहे. आज तो समाज आत्ममग्नेतुन बाहेर पडुन आत्मचिंतन करतोय व त्याला आता कुठे आत्मभान येत आहे. हा समाज जो आता पर्यंत सिनेमा , कथा कादंबर्या त दाखवता तसा नाहिहे. व कोणताही समाज जसा वाटतो तसा नसतो. हा एक सभ्य, शिक्षित , समजुतदार समाज आहे.व जसे अपवाद कोणत्याही समाजात असतात तसे तेही ह्या समाजात आहेत हे ही मान्य करायला हवे. म्हणुन ह्या समाजा कडे शकेंने पहायला पाहीजे असे नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 09/27/2016 - 05:00 नवीन
इथे मांडले गेलेले चिकित्सक प्रतिसाद हे कोणीतरी मराठासमाजाचा भयंकर द्वेषच करतंय म्हणून विरोधाच्याच भूमिकेतून मांडले गेलेत इतका ठाम विश्वास का बरे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अशोक पतिल
ख
खटपट्या Tue, 09/27/2016 - 18:23 नवीन
बर्‍याच अंशी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अशोक पतिल
न
नावातकायआहे Tue, 09/27/2016 - 05:51 नवीन
चान चान बाकि चालुद्या...
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 09/27/2016 - 10:11 नवीन
ह्या आरक्षणाच्या लढाईत, जे खुल्या वर्गातले आहेत, त्यांची स्थिती, 'मेलं कोंबडं आगीला भीत नाही' अशी आहे. आरक्षणाने २७ टक्क्यांवरुन ५० टक्क्यांवर झेप घेतली तेंव्हाच ते समजून चुकले की एकदिवस हे आरक्षण १०० टक्के होईल! त्यादृष्टीने त्यांची मानसिक तयारी झालीच आहे. त्यानुसार त्यांनी अन्य पर्यायांचा मार्ग शोधला आहे. ज्यांनी अजून शोधला नसेल त्यांनी तो लवकर शोधावा. आणि पुढे मागे खाजगी क्षेत्रातही हे लोण पोचले तर देशांतराचा पर्याय खुला ठेवावा. लोकानुनय म्हणजेच राजकारण, असे सिद्धांत असलेल्या देशांत , पुढे काय होणार हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही.
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Tue, 09/27/2016 - 10:22 नवीन
'मेलं कोंबडं आगीला भीत नाही' अशी आहे. वास्तव आहे. दुर्दैवाने कोटा १००% पर्यंतच वाढवता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
श
श्रीगुरुजी Tue, 09/27/2016 - 11:47 नवीन
ह्या आरक्षणाच्या लढाईत, जे खुल्या वर्गातले आहेत, त्यांची स्थिती, 'मेलं कोंबडं आगीला भीत नाही' अशी आहे. आरक्षणाने २७ टक्क्यांवरुन ५० टक्क्यांवर झेप घेतली तेंव्हाच ते समजून चुकले की एकदिवस हे आरक्षण १०० टक्के होईल! त्यादृष्टीने त्यांची मानसिक तयारी झालीच आहे. त्यानुसार त्यांनी अन्य पर्यायांचा मार्ग शोधला आहे. ज्यांनी अजून शोधला नसेल त्यांनी तो लवकर शोधावा. आणि पुढे मागे खाजगी क्षेत्रातही हे लोण पोचले तर देशांतराचा पर्याय खुला ठेवावा. लोकानुनय म्हणजेच राजकारण, असे सिद्धांत असलेल्या देशांत , पुढे काय होणार हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही.
+१ परंतु मराठ्यांची राखीव जागांची मागणी न्यायालयात टिकणार नाही. जाट आरक्षण, मुस्लिम आरक्षण, आर्थिक आधारावर आरक्षण इ. खटल्यात न्यायालयाने जो निर्णय घेतला त्यापेक्षा वेगळा निर्णय मराठा आरक्षणाच्या बाबतीत होण्याची शक्यता नाही. जर कदाचित न्यायालयाने मराठ्यांना जातीवर आधारीत राखीव जागा दिल्या तर गुजरातमध्ये पटेल, उत्तरेत जाट इ. ठिकाणी पुन्हा एकदा आरक्षणासाठी आंदोलन पेटेल व देशात यादवी माजेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
म
मन्याटण्या Tue, 09/27/2016 - 11:08 नवीन
पण, विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे कुणीच समाधानकारक देऊ शकला नाही. मागच्या धाग्यात जे प्रश्न बिरुटे संरानी आणि इतरानी विचारले तेच प्रश्न मला पण पडले आहेत मोर्चा आत्ताच का? मोर्चाची प्रमुख मागणी कोणती? आरक्षण हे पन्नास टक्क्यावरती देता येत नाही अस ऐकल, मग मोर्चा का काढायचा. मोर्चाच नियोजन कोण करत व् एवढे पैसे कुठून येतात. ब्राम्हण मुख्यमंत्री आहेत म्हणून मराठा समाजाची उपेक्षा होतेय अस एकजण म्हणाला.मागची कितीतरी वर्ष मराठा मुख्यमंत्री होते, तेव्हा नेमका समाजाचा सर्वांगीण विकास नेमका कसा झाला ते कोणी सांगू शकेल काय. उदयनराजे म्हणतात (पुण्याच्या मोर्चात) मुख्मंत्र्यानी राजीनामा द्यावा. तो नेमका का द्यावा व् त्यानी प्रश्न कसा सुटणार. खरतर ह्याची उत्तर कोणीच देऊ शकला नाही. इथे पण उत्तर शोधायच प्रयत्न करतोय पण अजुन मिळाली नाहीत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 09/27/2016 - 12:01 नवीन
मोर्चा आत्ताच का?
दोन मुख्य कारणे. दोन्ही कारणे जातीयवादी आहेत. (१) राज्यातील सर्वोच्च स्थानावर मराठा नसून दुसर्‍याच जातीचा माणूस आहे आणि (२) आपल्या जातीच्या मुलीवर अत्याचार करणारे "दलित" आहेत. इतर दुय्यम कारणे म्हणजे (३) मराठा जातीचे प्राबल्य असलेल्यांच्या हातातून केंद्रातील व राज्यातील सत्ता गेली व आता सहकारातील सत्तेवरही गदा येत आहे आणि (४) या पक्षातील मराठा नेत्यांवर भ्रष्टाचारामुळे कारवाई सुरू झाली आहे
मोर्चाची प्रमुख मागणी कोणती?
सांगण्यात येणार्‍या प्रमुख मागण्या - (१) कोपर्डीच्या गुन्हेगारांनी तात्काळ फाशी द्या, (२) राखीव जागा द्या, (३) अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करा. छुप्या मागण्या - (१) अमराठा मुख्यमंत्र्याला हटवा, (२) भ्रष्टाचारावरील कारवाईत बहुसंख्य मराठा नेते असल्याने ही कारवाई बंद करा, (३) सहकारक्षेत्रातील आमच्या मक्तेदारीला धक्का लावू नका, (४) कोणत्यातरी मार्गाने कोठेतरी आम्हाला पुन्हा सत्ता द्या.
आरक्षण हे पन्नास टक्क्यावरती देता येत नाही अस ऐकल, मग मोर्चा का काढायचा.
कायदा व घटनेतील तरतुदी सामान्य माणसाला फारश्या माहिती नसतात. कोपर्डी, आरक्षण इ. मुद्द्यांवरून भावना अगदी सहज भडकावता येतात. यापूर्वी प्रत्येक निवडणुकीच्या ३-४ महिने आधी मतदारांना राखीव जागा, स्मारके, पुतळे, कर्जमाफी, नामांतर अशांसारख्या अफूच्या गोळ्या देऊन पुढील ५ वर्षांसाठी मते मिळवून सत्ता टिकविली जायची. २०१४ मध्ये या गोळ्यांचा प्रभाव पडला नाही. म्हणून आता नवीन गोळ्या आणल्या आहेत.
मोर्चाच नियोजन कोण करत व् एवढे पैसे कुठून येतात.
बलदंड व धनाढ्य नेते यामागे असल्याशिवाय हे मोर्चे शक्य नाहीत.
ब्राम्हण मुख्यमंत्री आहेत म्हणून मराठा समाजाची उपेक्षा होतेय अस एकजण म्हणाला.मागची कितीतरी वर्ष मराठा मुख्यमंत्री होते, तेव्हा नेमका समाजाचा सर्वांगीण विकास नेमका कसा झाला ते कोणी सांगू शकेल काय.
विकास कधीच झाला नव्हता. परंतु हीच मंडळी कायम निवडून यायची कारण प्रत्येक निवडणुकीच्या काही महिने आधी सवंग, लोकानुययी घोषणा केल्या जायच्या.
उदयनराजे म्हणतात (पुण्याच्या मोर्चात) मुख्मंत्र्यानी राजीनामा द्यावा. तो नेमका का द्यावा व् त्यानी प्रश्न कसा सुटणार. खरतर ह्याची उत्तर कोणीच देऊ शकला नाही.
तो त्यांनी द्यावा अशी मागणी होतेय कारण ते अमराठा आहेत. महाराष्ट्रात गेल्या ४१ वर्षात एकाही अमराठा मुख्यमंत्र्याला आपली कारकीर्द पूर्ण करता आलेली नाही.
इथे पण उत्तर शोधायच प्रयत्न करतोय पण अजुन मिळाली नाहीत.
उत्तरे मिळाली असावीत अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्याटण्या
भ
भोळा भाबडा Tue, 09/27/2016 - 13:31 नवीन
अगदी सहमत आमच्या ह्याच मागण्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Tue, 09/27/2016 - 12:12 नवीन
<<<<<<मोर्चा आत्ताच का>>>>>> - ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून, त्याला खाली खेचायला. <<<<मोर्चाची प्रमुख मागणी कोणती>>>>>> - अख्या महाराष्ट्रात मोर्चे झाले, अजून तुम्ही अज्ञानी कसे? <<<<मग मोर्चा का काढायचा>>> -माज दाखवायला <<<<मोर्चाच नियोजन कोण करत व् एवढे पैसे कुठून येतात. -श्री शरदचंद्रजी पवार साहेब <<<<ब्राम्हण मुख्यमंत्री आहेत म्हणून मराठा समाजाची उपेक्षा होतेय अस एकजण म्हणाला>>>> - हो...तुम्हाला काही ही समज करून घेण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. <<<< मागची कितीतरी वर्ष मराठा मुख्यमंत्री होते>>>>> -ते सगळे झोपा काढत होते <<<<<उदयनराजे म्हणतात (पुण्याच्या मोर्चात) मुख्मंत्र्यानी राजीनामा द्यावा>>>> - राजे हे पण म्हणाले बलात्काऱ्यांना सगळ्या समोर गोळ्या घाला, आता न्यायालय असाच निर्णय देणार आहेत. <<<<उत्तर शोधायच प्रयत्न करतोय पण >>> -प्रयत्न करा प्रयत्न करा तुम्हाला शुभेच्छा कारण शेवटी "गरज ही शोधाची जननी आहे" मन्याटण्या-तुमच्या मनासारखी (खोडसाळ) उत्तरे दिली आहेत... समाधान नाही झालं तर अजून विचारू शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्याटण्या
स
सुखीमाणूस Tue, 09/27/2016 - 11:22 नवीन
At least private sector is open today. Why to look at government jobs and institutes. Work hard and smart and sky is the limit.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 09/27/2016 - 14:29 नवीन
We are actively working towards getting reservations in Private Sector. In fact Maha Govt has tried to do so couple of years back, not sure what happened there.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
व
वाल्मिक Tue, 09/27/2016 - 14:30 नवीन
misalpav should have marathi only,no english
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
स
सुखीमाणूस Tue, 09/27/2016 - 20:13 नवीन
म्हणून इन्गजी वापरले• ह घ्या टन्कनाला त्रास होत होता आणि गप् बसवत नव्हते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
भ
भीडस्त Wed, 09/28/2016 - 06:55 नवीन
वल्मिक सर इ फ़ुल्ल्य अन्द सोलेम्न्ल्य एन्दोर्से योउर विएव्स अस फ़र अस थे उसे ओफ़ लङुअगे ओन मिसल्पव इस चोन्चेर्नेद्. मिसल्पव शोउल्द हवे naay naay o मिसल्पव मुस्त् हवे मरथि ओन्ल्य नो एङ्लिश् कृ ह घे लो अ ही वि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
च
चौकटराजा Tue, 09/27/2016 - 14:00 नवीन
ओ गुर्जी साहेब तुम्ही आमच्या मागच्या प्रतिसादाची नवी येडीशन काढली आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे रुपांतर अधिकृतपणे मराठवादी कॉंग्रेस असे करावयाचे आहे. आमच्या येथील मराठा आमदाराना मानाचे परत मराठवादी कॉंग्रेसमधे आणायचे आहे. जे भाजपाने फोडले त्याना पुन्हा पदे द्यावयाची आहेत. आम्हाला असे वाटते कारण.... दलित ओबीसी जाट हे गप्प बसणार नाहीत , एका दिवसात कोणाला ( अगदी कसाबला देखील ) फाशी देता येत नाही. फेअर ट्रायल द्यावीच लागते. हे आरक्षण ओपन वाले ही टिकू देणार नाहीत. फकस्त येकच शॉर्टकट आहे. मराठा व कुणबी या काही दोन वेगळ्या जाती नव्हेत हे कोर्टाला पटववून देणे. हे सगळे " जाणत्या" ना ही माहीत आहेच.
  • Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे Wed, 09/28/2016 - 12:14 नवीन
मराठा व कुणबी या काही दोन वेगळ्या जाती नव्हेत मराठा आणि कुणबी रोटी बेटी व्यवहार करीत नाहीत आणि मराठा कुणब्याना तुच्छ मानतात ..... खासकरून हे 96 कुळी बद्दल पहिले aahe आता मात्र लोकसंखयेचे मोठे आकडे पाहिजेत म्हणून मराठयांना कुणबी लोणचं पुळका आलेला दिसतोय ? कोण्या 96 कुळाने आपली मुलगी कुणब्यांच्या घरी दिली ती कळेल का ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
श
श्री गावसेना प्रमुख Tue, 09/27/2016 - 14:46 नवीन
आमच्या गावात संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष ह्यांनी नाशिक च्या मोर्चाचे नियोजन केले, आणी कोण म्हणत कि मोर्चाला नेतृत्व नाही ,धुळे जिल्ह्यात होणार्‍या २८ तारखेच्या मोर्चासाठी एन सी पी आणी आय एन सी चे माजी मंत्री आमदार सारे झाडुन कामाला लागलेत.ह्या मोर्चामुळे एकच वाईट झाल जे अगोदर बिग्रेडी मानसिकता ठरावीक मेंदुत होती ती आता बर्‍याच मराठ्यांच्या मेंदुत झिरपली आहे.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 09/27/2016 - 14:51 नवीन
हेच ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
ट
टवाळ कार्टा Tue, 09/27/2016 - 14:53 नवीन
+१११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
स
संदीप डांगे Tue, 09/27/2016 - 14:53 नवीन
खाणे के दात और दिखाने के दात अलग, म्हणून वाईट वाटले मोरच्याबद्दल, सामान्य लोकांना घोळात घेता येतील अशा परस्पर संबंध नसलेल्या मागण्या पाहून आम्हाला सामान्य नागरिकांबद्दल वाईट वाटत आहे, लोकांना आम्ही मराठविरोधी आहोत असं सोयीस्कर वाटून घ्यायचं आहे
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 09/27/2016 - 16:35 नवीन
कित्येक दिवस आजारी असल्यामुळे (सध्या दिल्लीत इमान्दारीचे राज्य आहे, डासांना मारणे सुद्धा पाप आहे). मिसळपाव वर जास्त फिरकत आले नाही. 1) खरंच सध्याचा मोर्चा उत्स्फूर्त आहे का ? कोणत्याही नेतृत्वाशिवाय एवढे लोक जमणे शक्य आहे का ? दिल्लीत आम्हाला हि असे वाटले होते. पण आता कळले एका वर्षात मोठ्या संख्येने दारूची दुकाने व बार का उघडले. १५०० DTC बसेस scrap केल्या गेल्या फक्त १०० नवीन विकत घेतल्या गेल्या. निजी मिनी बसेस का चालू लागल्या. ऑटो मागे लागणार्या पोस्टर्स साठी आठवड्याचे १००० रुपये ६ महिन्यासाठी, नुक्कड नाटक कलाकारांना ५०० रुपये रोज शिवाय नाश्ता पाणी (?), टोप्या, प्रभात फेर्या. शिवाय १ बाटली १ नोट. कोट्यावधी रुपये खर्च झाला होता. करणारा कोण किंवा खर्च झाला होता, सांगता येणे कठीण. इथे तर नक्कीच त्या पेक्षा जास्त खर्च होत असेल. 2) अदृश्य हात असेल तर कोणाचा ? कुणाचा हात आहे, हे सर्वांना चांगलेच माहित असेल. जाट आणि पटेलांचे आरक्षण कोर्टाने रद्द केले. कोर्टासमोर आरक्षणची पात्रता पुराव्या सहित सिद्द करावी लागेल. मोर्चे काढण्याने ती सिद्द होऊ शकत नाही. राज्य सरकारने मोर्च्यांना घाबरून आरक्षण दिले तरी कोर्ट रद्द करेल. atrocityचा कायदा हि राज्य सरकार दुरुस्त करू शकत नाही. तो अधिकार केंद्राचा आहेत. आणि कायदा आणखीन सक्त करण्याची मागणी केंद्र सरकार नाकारू शकत नाही. अर्थात हे ज्या नेत्याला चांगले माहित आहे, त्याचाच अदृश्य हात आहे. 3) झेंडे ,फलके ह्यावर कोणी खर्च केला ?- 4) जर नेतृत्व नाहीये तर अमुक तमुक ठिकाणी भेटायचे हे कसे ठरले ? मीटिंग इत्यादी निश्चित होत असणार, काय आणि कसे करायचे ठरत असेल. समाचार वाहिनींवर काही नेत्यांचे वक्तव्य पहिले असेल तर नेतृत्व करणाऱ्यांची कल्पना करता येते. पटेल आणि जाट समुदाय मूर्ख बनले. शेकडो जाट तरुण आज जेल मध्ये आहे. त्या पैकी अधिकांश तरुणांना त्यांच्या कर्माचे फळे भोगावीच लागणार आहे. नेते अदृश्य झाले आहेत. पण जाट आणि इतर समुदायांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. महाराष्ट्रात हि असे घडण्याची शक्यता नाकारता नाही. जर अक्कल असेल तर मराठा तरुणांनी या मोर्च्यान्पासून दूर राहावे. खरे तर या नेत्यांचा बहिष्कार करावा. पण तसे घडणार नाही. आरक्षणाची लालसा प्रत्येकाला आहे. फक्त १% टक्के लोकांना सरकारी नौकरीचा लाभ होतो. पण ९९ टक्के मूर्ख बनतात. बाकी विधी लिखित अटळ असते.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 09/27/2016 - 17:38 नवीन
लै वेळा सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा