Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

" कृष्णाकडे असतील का उत्तरे ???....... "

फ — फिझा, Wed, 09/28/2016 - 03:10
" कृष्णाकडे असतील का उत्तरे ???....... " 'त्याच्या' दूर दूर जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे राधा फक्त पाहत राहायची ..... रिकामं केलेलं मन पुन्हा एका नजरेने गच्च भरून जायचा .... तो वेड्या मनाला आता परत कसं सावरावं ? ना तिच्याकडे उत्तर .... ना 'त्याच्या'कडे मनामनांवर राज्य करणारा तो जगाचा रक्षण करणारा तो , प्रत्येक जीवात वास करणारा तो, विश्वविधाता तो , त्यालाही प्रश्न पडावा ? हे कसले 'प्रेम' ? केवळ अढळ विश्वास , जीवाला घोर लावणारी हुरहूर, डोळ्यात प्राण आणून वाट पाहायला लावणारी आस , फक्त एका क्षणाच्या भेटीसाठी ? बस्स!! फक्त एवढंच राधेच्या नशिबात ? पण ....... आसुसलेल्या डोळ्यांना 'त्याचे' दर्शन तरी व्हायचे .... वेडावलेल्या मनाला 'त्याची' नजर स्पर्शून तरी जायची..... वाट पाहताना 'तो' कधीतरी भेटेल हि आस तरी असायची ...... तो भेटून परत जाताना मन भरून तरी जायचे ....... 'त्याच्या' भेटीच्या ,नजरेच्या ,स्पर्शाच्या खुणा तरी असायच्या तिच्याकडे ....... पण मीरा ....... ? तिला तर यातले काहीच नाही... .नशिबी ........ तिचे मन काय मागत असेल ? तिचे डोळे कोणती आस लावून बसले असतील ? तिची भेटीची ओढ कशी असेल ? तिचं अस्तित्व कशासाठी असेल ? त्या 'कृष्णा' कडे असतील हि उत्तरे ? --------- फिझा

प्रतिक्रिया द्या
2262 वाचन

💬 प्रतिसाद (9)
प
पद्मावति Wed, 09/28/2016 - 20:30 नवीन
अतिशय सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
न
निओ Wed, 09/28/2016 - 22:23 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 09/29/2016 - 06:30 नवीन
तुफान आवडलीये कविता
  • Log in or register to post comments
व
विनटूविन गुरुवार, 09/29/2016 - 07:05 नवीन
राधा आणि कृष्ण म्हणजे उत्तर नसलेले प्रश्न..
  • Log in or register to post comments
J
Jabberwocky Fri, 09/30/2016 - 12:51 नवीन
संदीप खरे यांची, "राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला" या कवितेची आठवण झाली. छान आहे तुमची कविता......
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 09/30/2016 - 13:48 नवीन
छानच हो कविता. आवडली
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 09/30/2016 - 14:23 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
क
कवि मानव Mon, 10/03/2016 - 12:38 नवीन
खुपच छान !!
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Mon, 10/03/2016 - 12:48 नवीन
काही प्रश्नांना उत्तरे नसतात,
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा