Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

साक्षीदार ....... !

फ — फिझा, गुरुवार, 09/29/2016 - 06:35
साक्षीदार ....... मी निर्दोष आहे हे कसे सिद्ध करणार..... तो किनारा सगळं पुसून मूक बनून हसतोय, समुद्राच्या लाटा उलटच उत्तरे देतायत, डोळेही हे नजरेला नजर देत नाहीयेत , पारिजातकाची फुलेही गंधांसकट कोमेजून गेलीत ? सगळे साक्षीदार विरोधात जातील कुणास ठाऊक होते , पण मी अजूनही हार मानली नाहीये ...... मला बंदिवासात अडकायचं नाहीये .... प्रेम मी केलंच नाहीये हेच सिद्ध करतीये ... ...... "खरंच " ? ....... . पुरावे शोधत आहे मी अजूनही भावनांचे गाठोडे उघडून पाहते , माळ्यावरच्या आठवणी झटकून पाहते, अंगणातल्या मातीमध्ये उकरून पाहते , झाडावरच्या पक्षांना परत एकदा विचारून पाहते , मनातल्या पेटीमध्ये डोकावून पाहते , कुठेतरी सापडतीलच ........ ........ काहीच न बांधू शकलेले ते तुटक धागे, स्वतःच भिजलेल्या त्या पावसाच्या सरी, तुझ्या वाटेकडे न पाहणारे पाणावलेले डोळे, तुझ्या तळहातावर न ठेवता उमललेल्या कळ्या , तुला न दिलेली अबाधित वचने, आणि याच्याशी काहीच देणं घेणं नसलेला 'तू' ..... 'तू' भेटलास कि तूच देशील साक्ष "अनोळखी " असल्याची ........ बस्स , आता उरले काय ! ........ माफीचा साक्षीदार म्हणून 'माझे मन' घोषित केले जाईल ...... पण पर्वा नाही .... आजकाल तसंही ते माझं काही ऐकत नाही ...... !!! ......... फिझा

प्रतिक्रिया द्या
1085 वाचन

💬 प्रतिसाद (4)
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 09/29/2016 - 06:41 नवीन
'तू' भेटलास कि तूच देशील साक्ष "अनोळखी " असल्याची ........ बस्स , आता उरले काय !
भन्नाट...
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे गुरुवार, 09/29/2016 - 14:33 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 09/29/2016 - 15:43 नवीन
वा! कविता आवडली.
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर गुरुवार, 09/29/2016 - 19:14 नवीन
'तू' भेटलास कि तूच देशील साक्ष "अनोळखी " असल्याची ...... - अगदी,
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा