Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सगळं कस साधं सोप्प

अ — अबोली२१५, Fri, 09/30/2016 - 09:19
सगळं कस साधं सोप्प एक घर, एक गाडी आई बाबा आहेत ना फ्रेम मध्ये एक मुलगी पण मुलगा पाहिजेच आणि बायको अन मी... सगळं कस साधं सोप्प बॉस तिरका असला तरी आपलं डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर मग काय प्रमोशन आपलच सगळं कस साधं सोप्प गाडीतून भुर्र जाव गाडीतला AC खाऊन गार व्हावं भिकाऱ्याने काचेवर टुक - टुक केलं का तोंड वाकड करून १ रु फेकावा सगळं कस साधं सोप्प च्याआईला असं का होतंय आतून आतून काहीतरी खाताय असं कस होतंय, जीव का घुसमतोय दोन दिवसाची सुट्टी घ्यावी सगळं कस साधं सोप्प सुचत नाहीय, सगळं का साधं आणि सोप्पं काहीतरी सुटतंय, सांगता येत नाहीय आणि सापडतच नाहीय काय सापडायच सगळं कस साधं सोप्प का बघतोय असा तो वारा संथच का वाहतोय भे*** हातातला ग्लास पण संपत नाहीय किती रिचवितोय, कुठे जातोय सगळं कस साधं सोप्प किती दिवस असाच पडून आहे समुद्र आठवतोय, किती अंधार झालाय वाल्या कोळाची गोष्ट आताच का आठवतेय गार झालाय, ऊब हवीय सगळं कस साधं सोप्प साधं सोप्प तर होत सार मग झोपेच्या गोळ्याची काय गरज होती..... आता आई, बाबा मी फ्रेममध्ये सगळं कस साधं….. -अबोली

प्रतिक्रिया द्या
827 वाचन

💬 प्रतिसाद (1)
र
राजेंद्र देवी Fri, 09/30/2016 - 12:07 नवीन
आवडली...साधं सोप्प
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा