Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झड श्रावणाची

र — राजेंद्र देवी, Mon, 10/03/2016 - 13:24
झड श्रावणाची अचानक श्रावणाची झड ती आली अंग अंग भिजवून गेली ओल्या केसातून बट ही ओघळली चिटकून बसली गोऱ्या गाली मोहक हालचाल सुखावून गेली नकळत डोळे विस्फारून गेली कवेत घेता काया ही थरथरली चित्तवृत्ती मोहरून गेली त्रेधातिरपीट उडवून गेली यौवनास माझ्या खिजवून गेली जेव्हा जेव्हा आठवते रात्र ती ओली श्रावणात होते पापणी ही ओली राजेंद्र देवी

प्रतिक्रिया द्या
928 वाचन

💬 प्रतिसाद (2)
म
मिसळपाव Mon, 10/03/2016 - 17:35 नवीन
राजेंद्र, सुरेख कल्पना आहे कवितेतली. थोडे टोचणारे कोपरे घासलेत! हे कसं वाटतं बघ; ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~ श्रावण सर ती अवचित आली, तव अंगांगे भिजवून गेली हळूच भिजली बट ओघळली खुणावीत ती गोर्‍या गाली मोहक विभ्रम तुझिया तनूचे अवघे ओसंडती मम नयनी कवेत काया मग मोहरली चित्तवॄत्ती त्या सुखावतीही खळबळ मनी उमटवूनी गेली यौवनास मम डिवचून जाई आठव येता ओल्या रात्री अश्रू आणी माझ्या नयनी... टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी Tue, 10/04/2016 - 04:46 नवीन
अप्रतिम... धन्यवाद....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा