अमेरिका, चीन व भारत
**
डिस्क्लेमरः पूर्ण काल्पनिक परिस्थिती
**
अमेरिकेने भारताच्या पश्चिमेकडील सर्व देश इराक-इराण-अफगाणिस्तान-पाकिस्तान-उजबेकिस्तान-कजाकिस्तान इत्यादी त्यांच्या 'संयुक्त संस्थानात' विलीन केले आहेत.
चीनने पूर्वेकडील देश नेपाळ, भूतान, बांग्ला देश, म्यानमार त्यांच्या पोलादी पकडीत दाबून ठेवलेत.
दोन्ही देश भारतावर दबाव टाकताहेत की भारताने त्यांचे एक राज्य म्हणून सामिल व्हावे. म्हणजे युएसएचे एक्सष्टावे राज्य म्हणून अमेरिकेचा हिस्स व्हावे किंवा चीनचा चोपन्नावा प्रांत म्हणून चीनचा भाग व्हावे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या विरोधात आहेत. त्यांना भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र ठेवायचंय.
अमेरिका व चीन यांच्या सीमा इतक्या जवळ आल्या असताना दोघांनाही हा सामरिकदृष्ट्या महत्वाचा प्रदेश स्वतंत्र राहू द्यायचा नाहीये. दोघांनाही भारत आपलं राज्य म्हणून सामील व्ह्यायला हवाय.
काही दिवस वाट पाहून चीनने अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीमच्या बाजूने एकदम आपलं बरंचसं सैन्य घुसवलंय. पूर्वोत्तर राज्ये, बंगाल, बिहार, झारखंड, छत्तिसगड पुर्णपणे चीनच्या ताब्यात गेलेत. उत्तरप्रदेशमार्गे ते दिल्लीच्या दिशेने निघालेत. आता मात्र पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्रिमंडळ व इतर राजकीय पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतात की चीनने आपल्याला गिळंकृत करण्यापेक्षा आपल्याला जास्त अनुकुल असणार्या अमेरिकेत आपण सामील होऊ. ते अमेरिकेकडे मदत मागतात. अमेरिका आपले बलाढ्य आरमार, भेदक वायूदल व सक्षम सैन्यदलासहित भारतात उतरून चीनच्या सैन्याला रोखून मागे ढकलायला सुरुवात करते.
बराक ओबमांना सर्वंकष युद्ध नकोय, म्हणून ते संयुक्त राष्ट्रसंघात दाद मागतात. तिथे दोन्ही देशांना युद्धबंदीचा आदेश मिळतो.
भारताचा आलमोस्ट एक तृतियांश प्रदेश ताब्यात आलेला चीन हसत हसत युद्धबंदीला मान्य करून एकतर्फी युद्ध संपवतो.
काही वर्षे जातात....
चीनने त्यांच्या ताब्यातील भारतावर त्यांचे साम्यवादी साम्राज्य लादून तो प्रदेश त्यांच्या मुख्य भूमीसारखा असल्यासारखा केलाय. अमेरिका जरी त्यांच्या देशाचा नकाशा पुर्ण भारतासहित दाखवत असला, तरी प्रत्यक्षात त्यांच्या ताब्यात भारताचा दोन तृतियांश प्रदेशच आहे. चीन त्यांच्या ताब्यातील भारतीय प्रदेशात नक्षली गट उभे करून, त्यांना प्रोत्साहन, हत्यारे व प्रशिक्षण देऊन त्यांना अमेरिकेच्या प्रदेशात कारवाया करायला पाठवतोय. अमेरिकेने त्यांच्या इतर राज्यांप्रमाणेच भारतालाही एक समृद्ध राज्य बनवण्याचा प्रयत्न चालवलाय.
पण भारतातील काही डाव्या, साम्यवादी विचारांचे लोक चीनचे पाठीराखे, समर्थक आहेत. आणि अमेरिकेतील काही लोक 'मानवतावादी दृष्टीकोनातून' भारतातील या चीनवादी जनतेचं समर्थन करताहेत.
भारतातील जनता अजूनही मनाने पुर्णपणे अमेरिकन झालेली नाहिये. अमेरिकन जनतेच्या पैशाने भारतीय प्रदेशाचा विकास करूनही भारतीय प्रदेशातील बहुतेक लोक, विशेषतः काही परंपरावादी लोक, अमेरिकाविरोधी आहेत. आपण ज्या देशाचा भाग आहोत, ते मान्य न करता ते भारताला स्वतंत्र करण्यासाठी झटताहेत. त्यांना स्वतंत्र भारत हवाय. चीन स्वत:च्या स्वार्थासाठी अशा अमेरिकन-भारतीयांना पाठिंबा देतंय. त्यांच्या मदतीसाठी चायना-ऑक्युपाईड-भारतातून चीन प्रशिक्षित नक्षली अमेरिकेच्या भारत राज्यात कारवाया करताहेत. अमेरिकेने मोठे लष्कर तैनात करूनही अमेरिकन-भारतातील फुटिरतावादी लोक व चीनी नक्षल्यांच्या कारवाया वाढताहेत.
मग आता... ?
भारतातील बर्याच (बहुतांश नव्हे!) जणांना भारताने अमेरिकेचा भाग व्हावे, हे पटलेले नाही. ते भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी लढताहेत. अमेरिकेच्या भारत या राज्यातील इतर सामान्य जनतेने त्यांच्याशी कसे वागावे?
अमेरिकन मुख्य भूमीतील जनतेचा भारतीय प्रदेशातील दोन्ही प्रकारच्या लोकांविषयी कसा दृष्टिकोन असेल/असावा?
***
सर्व संवेदन्शील लोकांची आधीच माफी मागून ठेवतो.
पिवळ्या, हिरव्या, भगव्या, लाल, निळ्या चष्मेधारी व्यक्तींना जरी वाटू शकले, तरी, मी विकृत नाही.
खरंच!!
💬 प्रतिसाद
(15)
च
च्यायला
Tue, 10/04/2016 - 15:50
नवीन
.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Tue, 10/04/2016 - 16:47
नवीन
आता पुढची काल्पनिक स्टोरी
आता काही अमेरिकन लोकांना वाटू लागलं कि का म्हणून टॅक्स पेयर चा पैसा वाया घालवायचा देऊन टाका भारताला स्वातंत्र्य. मग अमेरिकेच्या ताब्यातील भारताला स्वातंत्र्य देण्यात येत. हळूहळू इतर अमेरिकन राज्ये सुद्धा स्वातंत्र्याची मागणी करतात इराण, इराक स्वतंत्र होतो. हळूहळू हे लोन मूळ अमेरिकेत येऊन पोहचत , तेथील मूळ राज्ये सुद्धा स्वतंत्र होतात अरिझोना , कॅलिफोर्निया स्वतंत्र होतात. आणि शेवटी अमेरिका हा देश वॉशिंग्टन अन्य त्याच्या आसपासची चार राज्ये एवढाच राहतो. इकडे स्वतंत्र झालेली राज्ये आनंद करत असताना चीन त्यांचा हळूहळू ताबा घ्यायला लागतो. अमेरिकेविरुद्ध स्वतंत्रासाठी लढणारी हि राज्ये आता चीन विरुद्ध लढू लागतात . अमेरिकन राज्यात मिळत असलेलं बरंच स्वतंत्र चीन हिरावून घेतो, भारत आणखीच अविकसित होतो . शेवटी भारतीय लोकांना कळते कि जगात सगळ्याच राष्ट्रात स्वतंत्र होण्याची आणि ते तिगवून ठेवण्याची क्षमता नसते, एखाद्या भूभागाच्या स्वातंत्र्याची किंवा विलानीकरणाची वेळ आंतराष्ट्रीय घडामोडी, त्याभुभागातील क्षमता तसेच इतर अनेक गोष्टीवर अवलंबून असते. स्वतंत्र जरी आवडीची गोष्ट असली तरी सोयीची नाही , आता तरी चीनपेक्षा अमेरिका बरा होता असं वाटू लागत . मग भारतीय लोकांना शेवटी कळते कि
we are just prawns in the game of giants. Little shrimp swimming around and waiting to be eaten by a big shark (this or that).
आता अमेरिकेला हि कळू लागते एका राज्याला त्याची वेळ आली नसताना स्वतंत्र द्यायला गेलो आणि स्वतःचे हजारो तुकडे पाडून बसलो . म्हणून म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावता कामा नये .
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Tue, 10/04/2016 - 16:52
नवीन
we are just pawn in the game of giants. Little shrimp swimming around and waiting to be eaten by a big shark (this or that).
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Tue, 10/04/2016 - 19:51
नवीन
we are just pawn in the game of giants. Little shrimp swimming around and waiting to be eaten by a big shark (this or that).
हेच सुरुय सध्या! पाकिस्तान, चीन युती अन आपण पडलोय एकटे! त्यात दोघे शेजारी अन दोघे पक्के वैरी!
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Tue, 10/04/2016 - 20:04
नवीन
ते इंग्रजी वाक्य मी वेगळ्या context मध्ये लिहिलेलं.
पण तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पाकिस्तानच्या मागे जसा चीन भक्कमपणे उभा आहे तसा भारतापाठीमागे कोण उभं नाहीये. कारण चीन ला माहित आहे की त्यांच्या ड्रॅगन ला भारतीय हत्ती (कि सिंह) च भविष्यात प्रतिस्पर्धी ठरू शकतो, त्यामुळे चीन भारतीय हत्तीच्या पायामध्ये पाकिस्तान नामक डुक्कर सोडून अडथळे निर्माण करतोय.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Tue, 10/04/2016 - 17:22
नवीन
आणि पटलं.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Tue, 10/04/2016 - 18:24
नवीन
मूळच्या काल्पनिक परिस्थितीमध्ये काही भारतीयांना 'स्वतंत्र' होण्याची इच्छा असणे, सामान्य आहे का?
त्यांना तसे वाटू ना देण्यासाठी खास प्रयत्न करणे, ही अमेरिकेची (त्या सरकारची व तेथील जनतेची) जबाबदारी नाही का? की राष्ट्रपती-पंतप्रधान यांनी सामील केलं की लगेच सर्व भारतीयांनी स्वतःला एकनिष्ठ अमेरिकन बनवावे? तसे नसेल तर केवळ सोडायचं नाही म्हणून भारताला धरून ठेवलंय आणि तरीही सर्व भारतीय जनतेने अमेरिकेशी एकनिष्ठ राहावे, अशी अमेरिकेने अपेक्षा ठेवावी का?
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Tue, 10/04/2016 - 19:06
नवीन
अगदी सामान्य आहे. हि लक्षणे विविध भागांतील लोकांबाबत सर्वकाळ आढळतात. मात्र जेंव्हा काही लोकांची बरीचशी किंवा बहुसंख्य लोक होतात तेंव्हा मात्र चिंतेची गोष्ट होते.
हो नक्कीच आहे. यासाठी गरज असेल तिथे कठोर धोरण आणि मृदू धोरण (चर्चा आणि सवलती) राबवले पाहिजे.
करणं जग idealism वर चालत नाही, realism चा पण विचार करावा लागेल. असंतुष्ट लोकांना भविष्यात काय वाढून ठेवलंय यांची जाणीव करून दिली पाहिजे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 10/04/2016 - 17:23
नवीन
नै जम्या
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/04/2016 - 20:24
नवीन
ह्या लेखातील घटना घटण्याची शक्यता गेल्या शतकाच्या शेवटच्या अर्ध्यात संपली आहे. प्रचलित काळात दुसर्या राष्ट्राला आपल्यात सामावून घेण्याची वसाहतवादी कल्पना वास्तवात येणे शक्य नाही.
सद्यस्थितीत दुसर्या राष्ट्राला आपल्या राष्ट्रात सामील करून घेण्याऐवजी त्याला वेगळे पण आपल्या कह्यात ठेऊन त्याच्याकरवी आपल्याला उघडपणे न करता येणारी त्यांच्याकरवी कामे करवून घेणे (आणि आपण नामानिराळे आहोत असे वरकरणी दाखवणे) जास्त सोईचे व कमी (राजकीय व आर्थिक) खर्चाचे आहे. राजकारणी लोक आपली कामे गुंडांकरवी करवून घेऊन आपण उजळ माथ्याने समाजात मिरवतात, अगदी तसेच.
उदा:
१. सद्या चीनने पाळलेले उत्तर कोरिया आणि पाकिस्तान हे देश.
२. भूतकाळात बराच आणि जरा कमी पण आताही राजकीय व आर्थिक दाब ठेऊन अमेरिकेने आपल्या कमीजास्त प्रमाणात कह्यात ठेवलेला पाकिस्तान. (अजूनही जरासे खुट्ट वाजले की दोन्ही शरीफ चीनच्या नाही तर अमेरिकेच्या दिशेन दुआ मागत पळत असतात.)
३. अमेरिकेच्या वरदहस्ताखाली असल्याने निर्धास्त असलेले कुवेत, बहारेन आणि कतार (आणि बर्याच प्रमाणात सौदी अरेबिया); जेथून अमेरिकेचे मध्यपूर्वेतील राजकिय व सामरिक खेळ खेळले जातात.
मर्सिनरी जनरल्सच्या ताब्यात असलेला पाकिस्तान पैश्यासाठी एकावेळेला दोन (चीन व अमेरिका) दादल्यांबरोबर नांदत आहे आणि त्याच वेळी अमेरिकेकडून पैसे घेऊन ज्याच्याबरोबर पूर्वी दुष्मनी केली त्या रशियाला खाणाखुणा करत आहे. तेव्हा, दुर्दैवाने, केवळ पैश्यासाठी आणि आपल्या खाजगी हितसंबधांसाठी आपल्या देशांना मर्सिनरी स्टेट्स किंवा "व्हर्चुवल" वसाहती बनवायला तयार असणारे नेतृत्व काही देशांत आहे, याबाबत संशय नसावा.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Tue, 10/04/2016 - 20:32
नवीन
वरील संपूर्ण लेखात आणि प्रतिसादात खालील गोष्टी रिप्लेस कराव्यात
अमेरिका>>>>भारत
चीन>>> पाकिस्तान
चीन च्या ताब्यातील भारत >>> POK
अमेरिकेच्या ताब्यातील भारत>>> भारतीय काश्मीर
नक्षलवादी>>> दाहशदवादी
ओबामा>>> नेहरू
मोदी>>> अब्दुला किंवा महाराज हरिसिंग
cutting the long story short वरील लेख आणि प्रतिक्रिया काश्मीर संदर्भात आहेत.
- Log in or register to post comments
आ
आकाश कंदील
Wed, 10/05/2016 - 09:21
नवीन
अगदी बरोबर पकडलेत अमितदादा
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 10/05/2016 - 04:29
नवीन
> अमेरिकन मुख्य भूमीतील जनतेचा भारतीय प्रदेशातील दोन्ही प्रकारच्या लोकांविषयी कसा दृष्टिकोन असेल/असावा?
आपण कितीही वैचारिक मनोमैथुंन केला तरी चालेल कशाला उगाच इतरांना भाग घ्यायला बोलावता ?
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Sat, 10/08/2016 - 06:50
नवीन
आपण माझ्या प्रश्नाचे उत्तर केंव्हा देणार ?
खाजगी शिक्षणाबद्दल आपले संशोधन चालू आहे का ?
मुलांना COEP ला घालू नये का ??
- Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ
Wed, 10/05/2016 - 10:54
नवीन
जाऊ द्या हो पैलवानजी...कल्पनाच करायची असेल तर जरा चांगल्या कल्पना करा कि राव...!
(अवांतर - आपला आणि गामा पैलवानांचा काही काल्पनिक संबंध आहे का ?)
(हलकेच घ्या ;))
- Log in or register to post comments