Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चायना मालाचा बट्ट्याबोळ...

अ
अर्थहीन
Wed, 10/05/2016 - 08:29
🗣 181 प्रतिसाद
चीन च्या वस्तू खरेदी करू नका --कैम्पेन जोरात चालुय.!!! । । मग शेजारीच बसून त्याने "आला तसा" मेसेज फॉरवर्ड केला की "या दिवाळीत चीनच्या वस्तू खरेदी करू नका... कारण चीन पाकिस्तानला सपोर्ट करतो अन पाकिस्तान दहशतवादाला. अन मग दहशतवादाने आपले लोक मरतात. अन म्हणजे आपणच ते मारतोय" आणि अजून पुढे म्हणजे... . Bla bla bla bla bla वगैरे वगैरे --/असं काहीतरी **** लॉजिक त्यात दिलं होतं. मेसेज वाचला. थोडा विचार केला. ...--- अन त्याचा फोन मागितला. आय-फोन. 11 व्या मजल्याच्या खिडकीत दोघेही ऊभा होतो. फोन खिडकीतनं खाली टाकला. ---चेहरा बघण्यासारखा झाला. मग खिशात लपवलेला त्याचा तो आयफोन बाहेर काढून त्याला त्या फोनच्या मागची बाजू दाखवली. त्यावर क्लियरली लिहिलं होतं. "Designed in California. Assembled in China.". /// त्याला चूक कळालीच होती. पण तरीही कशाला सोडा?? म्हणून धुतलाच की... "बापाला **** शिकवत जाऊ नको." /// मुद्दा असाय की... आधी स्वतः ह्या गोष्टी करायला शिका मग दुसऱ्याला गिन्यान हेपला. कुठं रोडकडेला बसून- त्यांना स्वस्त मिळतील त्या चायनीज किंवा भारतीय दिवाळी वस्तू विकून, दोन पैसे कमवून जगणारी आपली गरीब माणसे -त्यांची ईवली पोरे. अन त्यांच्या पोटावर पाय द्यायला निघालोय आपण.?? फोन 'जीवनावश्यक' वस्तू नसूनही तुम्ही ती चायनात बनलेली वापरता अन त्यांचं बिचारयांचं पोट ज्यावर अवलंबून आहे -तो त्यांचा तातपुरता व्यावसायही असले मेसेजेस करून बंद पाडता?? का????? दहशतवादाला आर्थिक मदत न पुरवायचा ठेका फक्त गरिबांनीच घेतलाय अन तुम्ही मात्र तोंड वर करून असले मेसेजेस तेही (चायनीजच फोनवरुनच) पाठवणार??? अन ग्राहक म्हणून तुम्हाला परवडतीलही हो महागडया वस्तू पण बाजारात 'तसाच दिसणारा चायनीज आकाशकंदील' 50 ला मिळत असताना केवळ "भारतात बनला म्हणून" एखाद्या हातगाडा चालवून घर चालवणारया माणसाने तोच आकाशकंदील 150 ला का विकत घ्यावा?? का त्यांनीही तुमच्यासाठी अन दहशतवादाला खतपाणी नको म्हणून आपली दिवाळी साजरीच करू नये??? मग 'विकणारा गरीब' अन 'विकत घेणाराही गरीब' या दोन माणसात आपलं पैसेवाल्यांचं काय काम आहे? लक्षात ठेवा तुम्ही श्रीमंत या देशात फारतर फार 70 टक्के आहात -उरलेल्या 30 टक्के जनतेसाठी अजूनही रोजचा दिवस 'कसाबसा' उजाडतोय. अजून एक -- चायना चं सोडा हो... एवढं तरी माहिती आहे का, की भारत आज- या घडीला आता- पकिस्तान सोबत वर्षाला 5 बिलियन डॉलर्स चा व्यापार करतो??? की आपलं काहीही मेसेज वाचायचे अन (वर-वर बुद्धीला पटले) की करायचे फॉरवर्ड. तर एकूण वैलेंटाईन आला की "14 फेब्रुवारीला भगतसिंगला फाशी दिलती" असे तद्दन चुकीचे बाष्फळ मेसेज पाठवून खोट्या देशप्रेमाचा खरा आव आणणारी नवजात देशभक्त जनताच दिवाळीही आली की हे चायना मेड मेसेजेस पाठवत असते... दिवाळीच्या मोसमात असले ठोकळे मेसेजेस खूप येत असतात. तुम्ही मात्र हा फालतूपणा टाळा मित्रांनो. (ऑफ कोर्स ही फक्त विनंती आहे; विरोध असला तरी हरकत नाही.) अन हे नको असेल तर यावर सरकारनेच त्यांच्या लेव्हल वर निर्णय घ्यावा... पण असे मेसेजेस पाठवून बुद्धिभेद करण्यात काय हशील???

प्रतिक्रिया द्या
41556 वाचन

💬 प्रतिसाद (181)
म
मदनबाण Wed, 10/05/2016 - 08:33 नवीन
हे नको असेल तर यावर सरकारनेच त्यांच्या लेव्हल वर निर्णय घ्यावा अगदी असेच म्हणतो. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Petition to White House seeking to declare Pakistan 'a state sponsor of terrorism' makes new record
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर Wed, 10/05/2016 - 08:46 नवीन
:-(
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Wed, 10/05/2016 - 08:46 नवीन
लक्षात ठेवा तुम्ही श्रीमंत या देशात फारतर फार 70 टक्के आहात -उरलेल्या 30 टक्के जनतेसाठी अजूनही रोजचा दिवस 'कसाबसा' उजाडतोय.>>>>> हे उलटं झालय काय?
  • Log in or register to post comments
अ
अर्थहीन Wed, 10/05/2016 - 08:54 नवीन
एकटुअल्ली अगोदर मी हे उलटाच लिहिले होते... तुम्ही बरोबर ओळखले. बट नंतर वाटला कि मी त्या 30 टक्के लोकांबद्दल बोलतोय ज्यांच्या हाताना काम देण्यात अजूनही सरकार बिलकुल अपयशी ठरलाय... जसं कि ड्रेनेज लाईन मध्ये उतरून काम करणार सफाई कामगार... असे 30 टक्के लोक आहेत ज्यांच्या साठी नवा दिवस फक्त भाकरी मिळवण्यासाठी उगवतो ना कि देशभक्तीचा भ्रम घेऊन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
भ
भालचंद्र_पराडकर Wed, 10/05/2016 - 12:39 नवीन
एकटुअल्ली मिपाकरांना नवीन शब्द मिळाला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्थहीन
अ
अर्थहीन Wed, 10/05/2016 - 12:52 नवीन
धन्यवाद... माझं लेखन फार अशुद्ध आहे.. क्षमस्व... जे सांगायचं होतं मला ते पोचलं नसेन तर नक्की सांगा... (मान्य अमान्य हे नंतर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भालचंद्र_पराडकर
भ
भालचंद्र_पराडकर Wed, 10/05/2016 - 13:05 नवीन
एक गंमत होती फक्त :) बाकी मी काथ्याकूटवर कधी येतच नाही. त्यामुळे मान्य अमान्य पण करण्याचा प्रश्न येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्थहीन
स
संदीप डांगे Wed, 10/05/2016 - 08:48 नवीन
सहमताहे
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 10/05/2016 - 08:53 नवीन
वैलेंटाईन आला की "14 फेब्रुवारीला भगतसिंगला फाशी दिलती" असे तद्दन चुकीचे बाष्फळ मेसेज पाठवून -खोट्या देशप्रेमाचा -खरा आव आणणारी नवजात देशभक्त जनताच - दिवाळीही आली की हे चायना मेड मेसेजेस पाठवत असते...
हो, हा मेसेज तर दरवर्षी येतोच. एकूणातच स्वतः विचार- शहानिशा न करता आलेला संदेश पुढे धाडणारे महाभाग डोक्यात जातात. गेल्या आठवड्यात एक संदेश आला, काय तर म्हणे "शाहरुख खानने पाकिस्तानमध्ये झालेल्या एका अतिरेकी हल्ल्यानंतर पाकला ४० कोटी रु ची मदत केली..मग शाहरुख देशद्रोही, त्याच्या सिनेमाला पाडा वगैरे..." अविश्वसनीय वाटत होताच. तरी म्हंटल शोधाशोध करु. शाहरुखने अशी कुठलीही थेट अर्थिक मदत केलेलं कुठेच सापडलं नाही. २०१० मध्ये पाकिस्तानात पूराचे संकट आल्यावर, पूरग्रस्तांना मदत म्हणून अल्प मोबदल्यात (फूकट नाही) लंडनमध्ये एक शो करण्यास तो तयार झाला होता त्यानंतर शिवसेनेकडून त्याच्यावर टीका झाली होती.
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर Wed, 10/05/2016 - 08:53 नवीन
lekhashi sahmat! 2015 madhye tabbal 25 vyapari karar China barobar kele gele aahet. Aata Bhartiy kampnyani China madhye keleli guntavnuk parat kashi aannar aahet.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Wed, 10/05/2016 - 09:01 नवीन
अन हे नको असेल तर यावर सरकारनेच त्यांच्या लेव्हल वर निर्णय घ्यावा
सहमत. पाकला सर्वात जास्त आर्थिक मदत अमेरीका करते त्याच पैशावर पाकिस्तान दहशदवाद पोसते. खरंतर अमेरिकन कंपन्यांच्या नोकर्‍या व उत्पादनावर बहिष्कार टाकायला हवा. त्यांचे सिनेमेही बघू नये. बोलायला काय लागतं.
  • Log in or register to post comments
च
चिनार Wed, 10/05/2016 - 09:04 नवीन
सहमत ! अरे राजांनो..चीनकडून माल आयात करायचाच नाही असे जर सरकारने ठरवले तर त्याला पाठिंबा द्या हवेतर..पण जो माल भारतात पोहोचला आहे त्याचे पैसे चीनमध्ये पोहोचून चिन्यांनी ढेकर सुद्धा दिली असेल एव्हाना..आता तावातावात रस्त्यावर दिसणारा माल चीनचा आहे म्ह्णून विकत न घेणं म्हणजे बावळटपणाचा कळस आहे..अरे त्याने आपल्याच भाऊबंधांचे नुकसान होईल..जरा तरी विचार करा रे..
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 10/06/2016 - 12:57 नवीन
बाकी लेख जाऊदे. पण हे लोजिक काय पटले नाय ब्वॉ. मागणी कमी झाल्यावरच पुरवठा कमी होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
र
राजाभाउ Wed, 10/05/2016 - 09:07 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर Wed, 10/05/2016 - 09:12 नवीन
आताच्या पिढीला गैट करार, मंडेल करार यांची ओळख नाही. देशाप्रेमी लोकांना अभिप्रेत असलेले देशप्रेम आपण आपल्याच पायदळी कसे तुडवत असतो याची जाणिव नाही. पाकिस्तानबरोबर चालू असलेला जवळपास तिसहृजार कोटी रुपयांचा व्यापार बंद करण्याविषयी काहीही हालचाल नाही. उलट 2015 पासून अदानी समूह पाकिस्तानला ४००० mw विज विकण्याच्या प्रयत्नात आहे. एकदाच काय ते ठरवा. एकतर युद्ध करून एकमेकांची हानी करून घ्या. अन्यथा जनतेला सरळसरळ सांगून टाका कि व्यापाराला सर्वोच्च प्राधान्य आहे आणि जागतिक बाजारपेठीय करारांनुसार भारताला बंधनकारक आहे.
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 10/05/2016 - 09:27 नवीन
मुद्द्याशी सहमत, पण एवढ्या आक्रस्ताळी भाषेत तो मांडायची गरज नव्हती. ही लोकशाही आहे. ज्याला त्याला त्याच्या मताप्रमाणे वागण्याचा आधिकार आहे. आणि असे मेसेज वाचून कोणी आपली मते बदलत नसतो. ती ठामच असतात. या मेसेजमधल्या फालतु उपायांनी चीन थोडाच वठणीवर येणार ? चीनचा आर्थिक वा लष्करी पराभव आपण कधीच करु शकणार नाही. बळी तो कान पिळी, ही म्हण अमेरिकेनंतर चीन,रशियालाही लागू आहे. आणि चीन व अमेरिका, दोघेही पाकिस्तानच्या पाठीशी उभे आहेत, म्हणून तर आपल्या देशाला पाकिस्तानचा नायनाट करता येत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अर्थहीन Wed, 10/05/2016 - 09:36 नवीन
तिमा धन्यवाद... तुम्ही म्हणताय ते चीन बद्दलचे मुद्दे बरोबर आहेत... (मी माझ्या बोली भाषेत लिहायचा प्रयत्न करतो. त्यातून मला थोडासा खरेपणा समोर आणता येतो आणि मूळ भावनेशी प्रामाणिक असल्याचं समाधान मिळतं... तरीही या Raw भाषेबाद्ल त्याबद्दल क्षमस्व...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
स
सुहास बांदल Wed, 10/05/2016 - 10:02 नवीन
शक्य झाल्यास अमेरिकन चिनी गोष्टी वापरणे बंद केले तर योग्य होईल पण जागतिक बाजारात टिकुन राहण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतात सरकारला .
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Wed, 10/05/2016 - 10:07 नवीन
+१. आपलेच सरकार अजून पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेत नसले तरी अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करावे म्हणून इकडून ऑनलाइन पिटिशने काढणार्‍यांची पण मौज वाटते. *पिटिशनवर अमुक एक सह्या झाल्या तर अमेरिकेला ते सिनेटमध्ये मांडावेच लागेल वगैरे .... लोल
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 10/05/2016 - 10:16 नवीन
काही लोक त्यांना जमेल त्या मार्गाने प्रयत्न करतात, भलेही त्याचा परिणाम काहीही असो... काहींना फक्त पि़ंकाच मारणे जमते... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Petition to White House seeking to declare Pakistan 'a state sponsor of terrorism' makes new record
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ट
टवाळ कार्टा Wed, 10/05/2016 - 11:35 नवीन
अरे ते सुंता करुन घ्या वगैरे लिहायचे राहिले की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अनुप ढेरे Wed, 10/05/2016 - 12:13 नवीन
हा हा हा. लेखाशी पूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मदनबाण Wed, 10/05/2016 - 12:27 नवीन
तुला बरीच घाई झालेली दिसतेय ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Petition to White House seeking to declare Pakistan 'a state sponsor of terrorism' makes new record
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
न
नितिन थत्ते Wed, 10/05/2016 - 12:33 नवीन
>>जमेल त्या मार्गाने प्रयत्न करतात जमेल त्या मार्गात आपल्याच* सरकारला पिटिशन करणे येत नाही का? *हे सरकार तरी लोकांना "आपले" वाटत असेल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Wed, 10/05/2016 - 12:37 नवीन
जे जिकडे राहतात, ते तिकडे प्रयत्न करतात... जमेल त्या मार्गात आपल्याच* सरकारला पिटिशन करणे येत नाही का? तुम्ही का कष्ट घेत नाहीत ? ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Petition to White House seeking to declare Pakistan 'a state sponsor of terrorism' makes new record
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
आ
आनंदी गोपाळ Wed, 10/05/2016 - 15:55 नवीन
ती पिटीशन अमेरिकेने योग्य त्या ठिकाणी बंद करून ठेवून दिली अशी बातमी वाचली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मोदक गुरुवार, 10/06/2016 - 13:05 नवीन
*हे सरकार तरी लोकांना "आपले" वाटत असेल अशी आशा आहे. ज्यांना वाटत आहे ते पुढच्या टर्मला आणतील, ज्यांना वाटत नाही ते विरोधी मतदान करतील. बटाट्याची फॅक्टरी टाकण्यापेक्षा सोपे लॉजीक आहे हे. अर्थात कळावेच असा आग्रह नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
म
मदनबाण गुरुवार, 10/06/2016 - 13:13 नवीन
बटाट्याची फॅक्टरी टाकण्यापेक्षा सोपे लॉजीक आहे हे. अर्थात कळावेच असा आग्रह नाही.. इतके वर्ष अमेठी मधल्या लोकांना समजल्याचे दिसुन आले नाहीये ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- India asks Pakistan to 'abandon futile quest' of Kashmir at the United Nations
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ब
बोका-ए-आझम Wed, 10/05/2016 - 13:14 नवीन
Petition to White House seeking to declare Pakistan 'a state sponsor of terrorism' makes new record http://timesofindia.indiatimes.com/india/Petition-to-White-House-seeking-to-declare-Pakistan-a-state-sponsor-of-terrorism-makes-new-record/articleshow/54688055.cms via @timesofindia फेसबुकवरचं online petition सोडून द्या, तो फालतूपणा आहे पण या बातमीत म्हटलेलं आहे की White House ला म्हणजे अमेरिकन सरकारच्या Executive Branch ला, ज्यात राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा समावेश होतो; जर अशा पिटिशनवर १,००,००० पेक्षा जास्त सह्या जमल्या तर दखल घ्यावी लागते. यात इतर petitions बद्दलही माहिती आहे. दखल घेणं म्हणजे नक्की काय ते स्पष्ट नाही. पण ते असो. हे petition अमेरिकन संसदेत मांडल्या गेलेल्या एका ठरावाशी सुसंगत आहे. म्हणजे निदान हा तरी hoax नाही. अर्थात यातून काहीतरी भरीव होईल अशी अपेक्षा बाळगणं हा भाबडेपणा होऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
आ
आनन्दा गुरुवार, 10/06/2016 - 13:02 नवीन
ओ बोकशेट, भारतात कायाप्पावरून मेसेज फिरल्यावर ६लाख हा आकडा मला कमीच वाटतोय. किमान १ कोटी तरी व्हायला हवे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
विकास गुरुवार, 10/06/2016 - 16:02 नवीन
*पिटिशनवर अमुक एक सह्या झाल्या तर अमेरिकेला ते सिनेटमध्ये मांडावेच लागेल वगैरे .... लोल व्हाईट हाऊसच्या संस्थळावर पेटीशन केल्यास सिनेट नाही तर व्हाईट हाऊस अ‍ॅक्शन घेते. https://petitions.whitehouse.gov/about#step-by-step Promote and Gather Signatures After you publish your petition, it’s time to start promoting! You have 30 days to gather the 100,000 signatures required for a response, so it’s good to hit the ground running. An easy first step? Once your petition is published, you’ll receive an automatic email from us with a link that people can use to sign — simply forward it to friends and family and you’re on your way. Once you get your first 150 signatures, your petition will become publicly searchable on the We the People website. [Very exciting!] The White House Reviews and Responds Once the petition reaches the required threshold, it will be put in a queue to be reviewed by the White House. Others can still sign the petition while it is awaiting a response. When the White House responds, everyone who has signed the petition will get email from the White House to let you know that we’ve reviewed and responded to the petition. बाकी पाकीस्तानच्या विरोधात सिनेट मधे नाही तर अमेरीकन काँग्रेसमधे दोन प्रतिनिधींनी मसुदा आणला आहे... US lawmakers move bill to designate Pakistan as a terrorist state
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
म
मदनबाण Mon, 10/10/2016 - 06:54 नवीन
हरामी पाकड्यांचा कांगावा :- Petition to declare India terrorist state submitted in White House मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Will breach LoC to hunt terrorists, India tells Pakistan
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ध
धर्मराजमुटके Wed, 10/05/2016 - 10:14 नवीन
ते चीनी मालाचं राहू द्या. चीनी माल वापरायचा नाही असं ठरवलं तर अश्मयुगीन माणसासारखचं वागावं लागेल. तुम्ही कमीतकमी आपल्या पुर्वेकडील राज्यातील बंधु-भगिनिंना "चिनी" म्हणून हिणवलं नाही तरी ती मोठी देशसेवा होईल. जमले तर एवढे उपकार करा व्हॉटसपीय आणि फेस्बुकीय विद्वानांनो !
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 10/05/2016 - 12:29 नवीन
अगदी मनातलं बोललात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
न
नितिन थत्ते Wed, 10/05/2016 - 12:33 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
म
महासंग्राम Wed, 10/05/2016 - 10:20 नवीन
प्यार चायना का माल है असे निरीक्षण नोंदवतो.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 10/05/2016 - 10:41 नवीन
अगदी सहमत आहे. या वस्तू "कन्झ्युमर गुड्स" (सीजी) प्रकारात मोडतात. सीजी क्षेत्राचा एक विशेष म्हणजे ती वस्तू ग्राहकाच्या ढुंगणाशी आणून दिली तरच तो विकत घेतो. नाहीतर सरळ तडजोड करून मोकळा होतो. म्हणून, सीजी व्यवसायात वितरणसारिणीला (डिस्ट्रिब्युशन चॅनल) अशक्य महत्त्व असतं. भारतासारख्या विस्तीर्ण आणि विविधतेने भरलेल्या देशात तर वितरणसारिणी आणखीच महत्त्वाची असते. म्हणून आयटीसी, गोदरेज, डाबर, युनिलिव्हर इ० कंपन्या तगडी वितरणसारिणी तयार करण्याकडे लक्ष देतात. (या कंपन्यांच्या हेडकाऊंटकडे नजर टाकली तर ५०% पेक्षा जास्त हेडकाऊंट सेल्स-मार्केटिंगमध्ये भरलेला दिसेल.) अर्थातच, सीजीच्या संपूर्ण मूल्यसाखळीतला (व्हॅल्यू चेन) सिंहाचा वाटा वितरणसारिणीच्या वाट्याला येतो. आणि तसंच हवं. उत्तम प्रॉडक्ट असून भागत नाही - ते ग्राहकाला सहजासहजी उपलब्ध झालं पाहिजे. सिग्नलवर पन्नास रुपयाला मिळणार्‍या चिनी वस्तूतले चाळीस रुपये तरी वितरणसारिणीला जातात. (हा हवेतून काढलेला आकडा नाही. काही वर्षांपूर्वी हा अभ्यास काही कारणासाठी केला होता. कस्टम्स विभागाची 'स्पेशल व्हॅल्युएशन्स ब्रांच' इंपोर्ट ड्युटीचा विदा प्रसिद्ध करते. त्यावरून उलटं गणित करून पर्चेस प्राईस शोधता येते.) म्हणजे, थोडक्यात, चिनी मालाला मोजलेल्या पैशापैकी ऐंशी टक्के पैसे आपल्या भारतीय विक्रेत्यांना जातात (कारण वितरणसारिणी चिनी नाहीये). धागालेखक अर्थहीन म्हणतात त्याप्रमाणे ही वस्तू घ्यायची थांबवल्यास हातावर पोट असलेल्या त्या विक्रेत्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला जाईल. हे करायचं का हे ज्याचं त्याने ठरवावं.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 10/05/2016 - 12:41 नवीन
आबा, एक सांगू शकाल का, चीनला आपल्या मालाची किंमत इतकी कमी ठेवणे कसे परवडते? म्हणजे कच्चा माल निकृष्ट असतो, लेबर अत्यंत स्वस्त उपलब्ध आहे, पर्यावरण वगैरेचे लाड होत नाहीत हे सगळे मानले तरीही चिनी माल अविश्वसनीयरीत्या स्वस्त असतो. याचे गमक काय आहे? जपानच्या दुसर्या महायुद्धानंतरच्या औद्योगीक प्रगतीमागे त्यांची अत्यंत इफीशीअंट इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि क्वालीटी मॅनेजमेंट होते असे वाचलेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Wed, 10/05/2016 - 13:19 नवीन
माझ्या माहिती/अनुभवानुसार चीनमध्ये दोन प्रकारचे कारखाने असतात. एक म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कारखाने. (किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सप्लायर.) ते सहसा निकृष्ट कच्चा माल वापरत नाहीत. (कारण उद्या काही दर्जासंबंधी राडा झाला तर कंपनीचं नाव खराब होतं. रेप्युटेशनल रिस्क.) दुसरे ते "आंत्रप्रेन्युरियल" कारखाने. ते कारखाने म्हणजे वस्तू बनवून थेट विकणारे. चिनी कंदील, लाईटच्या माळा, पेनं वगैरे वस्तू बनवणारे. ते तुम्ही म्हणता तसा निकृष्ट कच्चा माल वापरतात. (निकृष्ट म्हणजे नेमकं काय हे एका क्वालिटी कंट्रोलवाल्याने मस्त समजावलं होतं. पण ते परत कधीतरी.) बाकी स्वस्त लेबर, पर्यावरणाची हेळसांड वगैरे दोन्हीकडे असतं. पण (माझ्या मते) चिनी माल स्वस्त व्हायचं कारण "छोटी सप्लाय चेन" हे आहे. म्हणजे कच्चा माल + कम्पोनंट्स ते कारखाना यातलं अंतर कमीत कमी असणं. आपण "चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग" असं सरसकट म्हणतो, पण चीनच्या नकाशावर पाहिलं तर बहुतांश मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स दालियान, चिंगदाओ, बेजींग, शांघाय, निंगबो, शेंझेन, गुआंगझाऊ या भागात असतात. हे सगळे बंदरपट्ट्याचे भाग आहेत (बेजींग वगळता.) दालियान, गुआंगझाऊ, नानजिंग, शांघाय, चिंगदाओ ही अजस्त्र बंदरं (डीप सी पोर्ट्स) आहेत. (स्वीट टॉकर याबद्दल अधिक सांगू शकतील.) त्यामुळे बंदर ते कारखाना अंतर अतिशय कमी असतं. चीनच्या स्पेशल इकॉनॉमिक झोनबद्दल तर बरंच छापून येतं. कच्चा माल हँडल करणारा होलिएर ते त्यावर प्राथमिक प्रक्रिया करणारे सप्लायर्स अक्षरश: एका कुंपणात बंदिस्त असतात. परतः कमी अंतर. हे सगळं सोडलं, तरी का कोण जाणे चीनमध्ये प्रतिकिलोमीटर फ्रेट (वस्तू इकडून तिकडे न्यायचं भाडं) प्र-चं-ड स्वस्त आहे. अगदी इतर एसीआन रीजनमधल्या देशांपेक्षाही. असं का याचं कारण मला ठाऊक नाही. कमी अंतर आणि कमी प्रतिकिलोमीटर भाडं या दोन घटकांमुळे ट्रान्स्पोर्टचा खर्च अत्यल्प असतो. (रूल ऑफ थंब प्रमाणे ट्रान्स्पोर्ट खर्च वस्तूच्या किमतीच्या ३-७% असतो. चीनमधला ट्रान्स्पोर्ट खर्च हार्डली २% असतो.) म्हणजे फ्रेटमधली ही बचत थेट नफ्यात रूपांतरित करता येते! चीनचे इतर स्पर्धक देश (फिलीपीन्स, थायलंड वगैरे) एक वेळ स्वस्त कच्चा माल आणू शकतील, पर्यावरणाची हेळसांड करू शकतील, लेबर स्वस्त ठेवू शकतील - पण फ्रेट/ट्रान्स्पोर्ट कॉस्ट कमी करणं (पक्षी: तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणं) हे खायचं काम नाही. त्यामुळे चीनमधल्या मॅन्युफॅक्चरिंगला नजीकच्या भविष्यकाळात तरी मरण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Wed, 10/05/2016 - 15:50 नवीन
अच्छ, थोडक्यात इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हे चीनच्या बाबतीतही सर्वात महत्वाचा घटक आहे.. इतक्या माहितीपुर्ण प्रतिसादाबद्दल बोकाशेठ आणि आबा दोघांनाही धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ब
बोका-ए-आझम Wed, 10/05/2016 - 17:17 नवीन
हे सगळं सोडलं, तरी का कोण जाणे चीनमध्ये प्रतिकिलोमीटर फ्रेट (वस्तू इकडून तिकडे न्यायचं भाडं) प्र-चं-ड स्वस्त आहे.
त्याचं कारण त्यातली human cost स्वस्त आहे. बाकी fuel cost स्वस्त नसावी. चीनही पेट्रोलियम आयात करतो. पण त्याची निर्यात अवाढव्य असल्यामुळे Current Account surplus आहे चीन, जे पैसे infrastructure मध्ये गुंतवण्यात आलेत. परिणामी जरी चीनचं petroleum consumption वाढलं, तरी चीन ते पैसे देऊ शकतो. त्यांना आपल्याप्रमाणे पेट्रोल subsidized (आता आपल्याकडेही market aligned pricing आहे म्हणा) द्यायची गरज नाही. चीनची १०% किंवा त्याच्या आसपासच्या दराने होणारी वाढ झाली याचं कारण कम्युनिस्ट हुकूमशाही. जमिनी सरकारी मालकीच्या. मजुरी सरकार ठरवणार. युनियन नामक प्रकार नाही. लोकसंख्या प्रचंड. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून the human aspect of cost हा कमी ठेवणं चीनला परवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ग
गंम्बा गुरुवार, 10/06/2016 - 08:28 नवीन
आबा - तुम्ही म्हणता त्यातले काही पटण्यासारखे असले तरी बर्‍याच चीनी मालाची चीनी उत्पादकाला मिळणारी किंम्मत बघितली तर मटेरीअल कॉस्ट सुद्धा भरुन निघणार नाही असे वाटते . स्पेसिफिकली स्वस्त गोष्टींमधे ( ५०० रुपयांच्या खाली ). उदा खेळणी, विजेची उपकरणे, लाइटच्या माळा. भारतात २०० रुपयांना मिळणारी दिव्यांची माळ, उत्पादकाला जास्तीत जास्त ४० रुपये देत असेल. ४० रुपयात ती माळ तयार करणे आणि पॅक करुन पाठवणे शक्य होत असेल असे वाटत नाही. काहीतरी दुसरे कारण असावे असे वाटते. २-३ वर्षापूर्वी डासांना मारणारी रॅकेट १२० रुपयांना मिळाली होती . चीनी उत्पादकाला ३० रुपये मिळाले असे धरले तरी त्या रॅकेट मधे रीचार्जेबल बॅटरी, त्याचे सर्कीट वगैरे होते. ३० रुपयात मटेरीअल कॉस्ट तरी कव्हर होइल का? ------ चीन मधे लेबर कॉस्ट कमी आहे ही चुकीची समजुत आहे. भारता पेक्षा ती नक्कीच जास्त आहे आणि बर्‍यापैकी जास्त आहे. चीन चे पर कॅपिटा उत्पन्न हे भारतापेक्षा बरेच जास्त आहे. जर लेबर कॉस्ट कमी असेल तर हे कसे शक्य होइल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 10/06/2016 - 08:45 नवीन
दरडोई उत्पन्न = एकूण राष्ट्रीय उत्पन्न / लोकसंख्या. चीनची लोकसंख्या भारतापेक्षा जास्त आहे आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्नही जास्त आहे. पण जेव्हा चीनची अर्थव्यवस्था ९-१०% दराने वाढत होती (१९९०-२००५) तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा सरासरी दर हा ५% होता. त्याच वेळी भारताची लोकसंख्या चीनपेक्षा वेगाने वाढत होती. परिणामी चीनचं दरडोई किंवा per capita उत्पन्न हे भारतापेक्षा जास्त आहे. यात डाॅलर्स - रुपये किंवा डाॅलर्स - युआन यांच्यातील विनिमय दराचा विचार केलेला नाही. तरीही हे स्पष्टीकरण देता येतं. दुस-या शब्दांत - भारतीय उत्पन्नाच्या वाढीचा दर कमी आणि लोकसंख्येच्या वाढीचा दर जास्त. चीनच्या उत्पन्नाच्या वाढीचा दर जास्त आणि लोकसंख्येच्या वाढीचा दर कमी. त्यामुळे चीनचं दरडोई उत्पन्न जास्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
म
महासंग्राम गुरुवार, 10/06/2016 - 09:00 नवीन

source: tradingeconomics.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ग
गंम्बा गुरुवार, 10/06/2016 - 09:07 नवीन
पण भारतापेक्षा चीन मधला कामगार दिवसभर काम करण्याचे जास्त पैसे घेतो. तुमचा प्रतिसाद बघुन मुद्दाम नेट वर शोधले तर सरासरी उत्पादन क्षेत्रातला पगार चीन मधे साडे पाच लाख रुपये आहे. तो चीनी कामगार उत्पादन पण जास्त करत असेल तर तो भारतीय कामगाराचा प्रॉब्लेम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
महासंग्राम गुरुवार, 10/06/2016 - 10:08 नवीन

source: tradingeconomics.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
महासंग्राम गुरुवार, 10/06/2016 - 08:59 नवीन
वर्ल्ड बँकेनुसार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
आ
आदूबाळ गुरुवार, 10/06/2016 - 09:43 नवीन
मला वाटतं त्याची दोन कारणं आहेतः १. मटेरियल कॉस्टची भानगड बर्‍याचदा अशी असते, की तुम्ही जितका जास्त व्हॉल्यूम उचलाल तितकी ती झपाट्याने घसरते. (लॉग स्केल?) २. बोकोबा वर म्हणाले आहेत त्याप्रमाणे डम्पिंग. किंवा जास्त व्यापक संकल्पना म्हणजे "प्रिडेटरी प्रायसिंग पॉलिसीज". कृत्रिमरीत्या मालाची किंमत कमी ठेवायची, बाजारपेठेतली स्पर्धा मारून टाकायची, आणि हळुहळू किंमत वाढवायची. #२ची शक्यता मला कमी वाटते. एक तर हा मोठा खेळ आहे - भविष्यात तोटा भरून काढता येईल याची खात्री वाटत असेल तरच नजीकच्या भविष्यात तोटा करायचं बळ येतं. शिवाय त्याला लय पैशे लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयातकर्ता देश अँटी डंपिंग ड्युट्या लावून हा गेम सहज उध्वस्त करू शकतो. भारतीय करखात्याबद्दलची मतं फारशी चांगली नसतात, पण डीगॅड (Directorate General of Anti-Dumping And Allied Duties) लय हुशार आणि कार्यक्षम आहे. इथे पहा. ---------- चीनमधल्या लेबर कॉस्टविषयी (लय स्वस्त आहे हे वगळता) सखोल माहिती मला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
ग
गंम्बा गुरुवार, 10/06/2016 - 11:10 नवीन
१. मटेरियल कॉस्टची भानगड बर्‍याचदा अशी असते, की तुम्ही जितका जास्त व्हॉल्यूम उचलाल तितकी ती झपाट्याने घसरते. (लॉग स्केल?)
हे अगदी छोट्या क्वांटीटी ( घरगुती ) आणि एकदम मोठ्या क्वांटीटी ची तुलना केली तर खरे आहे. पण भारतीय उत्पादक आणि चिनी उत्पादक ह्यांची तुलना केली तर मटेरीअल कॉस्ट मधे बेनिफीट मिळु शकेल का? उदा: भारतातली रेनॉ मारुती पेक्षा एक दशांश कार बनवते, पण मारुतीला ज्या दरात स्टील, कास्टींग वगैरे मिळतात त्यापेक्षा रेनॉला फारच थोडे जास्त पैसे द्यावे लागत असतील. कदाचित सारख्या दरात पण मिळत असेल.
बोकोबा वर म्हणाले आहेत त्याप्रमाणे डम्पिंग. किंवा जास्त व्यापक संकल्पना म्हणजे "प्रिडेटरी प्रायसिंग पॉलिसीज". कृत्रिमरीत्या मालाची किंमत कमी ठेवायची, बाजारपेठेतली स्पर्धा मारून टाकायची, आणि हळुहळू किंमत वाढवायची.
२० वर्ष डंपिंग? थोडे दिवस, महिने ठीक आहे, पण २०-३० वर्ष? आणि डंपिंग करायला पैसे लागणारच ना, ते कुठुन आणायचे? इतके सोप्पे असेल तर सर्वच देश ( भारत ) का नाही करत डंपिंग? चीन मधे लेबर कॉस्ट स्वस्त हे आपले अपयश झाकण्यासाठी लावलेला शोध आहे. अमेरीका असे म्हणु शकते, पण भारत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ गुरुवार, 10/06/2016 - 12:03 नवीन
भारतातली रेनॉ
हे उदाहरण बरोबर नाही. किंबहुना बहुराष्ट्रीय कंपन्यांची उदाहरणंच बरोबर नाहीत, कारण ते जगभर लागणारा कच्चा माल एकाच "छत्री करारा"खाली घेतात (अंब्रेला प्रोक्युअरमेंट काँट्रॅक्ट्स). उदा० विशिष्ट दर्जाचं स्टील रेनॉ जगभर आर्सेलरमित्तलकडूनच घेईल, काचा सेंट गोबेनकडूनच घेईल. (अगदीच बाजारातून घ्यायची वेळ आली तर व्हाले सारख्या कमोडिटी ट्रेडरकडून घेतात.) आपण बोलतोय ते "आंत्रप्रेन्युअर" प्रकारच्या कारखान्यांबद्दल (अ-बहुराष्ट्रीय कंपन्या). मला असं वाटतं की या चीनमधल्या आंत्रप्रेन्युअर कारखान्यांचा आकार (पर्यायाने व्हॉल्यूम उचलायची क्षमता) भारतातल्या आंत्रप्रेन्युअर कारखान्यांपेक्षा जास्त मोठा आहे. त्यामुळे त्यांना या इकॉनॉमीज ऑफ स्केल मिळताहेत.
२० वर्ष डंपिंग? थोडे दिवस, महिने ठीक आहे, पण २०-३० वर्ष? आणि डंपिंग करायला पैसे लागणारच ना, ते कुठुन आणायचे? इतके सोप्पे असेल तर सर्वच देश ( भारत ) का नाही करत डंपिंग?
सहमत आहे. म्हणूनच मला डम्पिंग हे जरा अव्यवहार्य कारण वाटतंय. ____________ छोटी सप्लाय चेन हे कारण आहे असं मला अजूनही ठामपणे वाटतंय. उदाहरण बघा. वडगाव धायरीमधल्या एका शेडसदृश 'कारखान्या'त पिवळ्या प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये मिळणार्‍या "सौंफ"चं उत्पादन होतं. चीनमध्ये ते आणखी स्वस्तात बनवणं कठीण नाही. पण ते चीनमध्ये बनवून विठ्ठलवाडीच्या "रमेश पान शॉप" पर्यंत पोचवायचा खर्च चिकार होईल. त्यापेक्षा धायरी ते विठ्ठलवाडी सौंफ पोचवणं कमी खर्चाचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा