Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

!!फ्लश!!

अ — अत्रुप्त आत्मा, Wed, 10/05/2016 - 12:52
पेर्ना..! =)) प्रत्येकाला सकाळी जायची घाई असते, घुसायचीही मधे भलतीच तयारी असते, जो मधे घुसला, तो धन्य होतो, जो तसाच्च राहिला बिचारा तो "अन्य" होतो !! पण घुसणाय्राच्या मनी कुठलाही खेद नाही, आज, उद्या, पर्वा, नेहमीच!, असा भेद नाही, पोटात कळ आणि गच्चीत नळ असेल तर, तिकडे पहाटे बसणेही अशक्य नाही !! तशीच अशांची एक दुसरीही बाजू असते, ती तुम्हाला स्वत:च्या नंब्रात हळुच्च पुढे सोडते, तुम्ही लाख स्वत:च्या नंबरावर अडून "बसत" असला तरी, ती अचानक तुमच्या नंबरावर खेळते !! मित्रानो घुसायचं असं कुठलंच सूत्र नाही, ह्हु: ह्हु: करत घुसायला ते कै गल्लीतलं कुत्रं नाही, नंबर नाही मिळणार म्हणून जो चिडून डबडे फोडतो, तो कधीच गच्चीत 'जायला' पात्र होत नाही !! ---------------------------- @पाणी आणव (हुंबअअ् हुंबक.. हुक हुक! )

प्रतिक्रिया द्या
15150 वाचन

💬 प्रतिसाद (28)
ब
बोका-ए-आझम Wed, 10/05/2016 - 12:58 नवीन
आगोबा आहे पण पांडुब्बा नाही. काब्रे?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 10/05/2016 - 14:26 नवीन
पां डुब्बा अजूनही काव्य रसात आलेला नाही! (ह्ही ह्ही ही! =)) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ट
टवाळ कार्टा Wed, 10/05/2016 - 14:49 नवीन
तुम्च्या खवत तर काही वेगळेच दिसते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
य
यसवायजी Wed, 10/05/2016 - 13:19 नवीन
अशलील
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 10/05/2016 - 14:22 नवीन
धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना... नम्बर लागावा मधेच लोभ धरीला महा.. प्राप्त तो दिव्य पथ ( स्पेशल एन्ट्री) पूर्ण ती आराधना.... संगीत " कळ" कल्लोळ ह्या नाटकातील पद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 10/05/2016 - 14:26 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
क
कवि मानव Wed, 10/05/2016 - 13:26 नवीन
विडंबन :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 10/05/2016 - 13:50 नवीन
खी खी खी...बर्याच दिवसांनी कळ लागली म्हणायची
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 10/05/2016 - 13:56 नवीन
कळा लागल्या जीवा असे का म्हणायचेय तुला टका... चला गृहस्थाश्रमाने "मुळ कवी" हरवलेत की काय असे अगोबांचे (विनाकारण) मत होते ते दूर झाले...आणि मळभ दूर झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 10/05/2016 - 14:01 नवीन
कवीता आधुनिक होते आहे...तांब्या जाउन फ्लश आला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
च
चौकटराजा Wed, 10/05/2016 - 14:16 नवीन
ते कालच आमचे निवासी येऊन गेले. ते संसारात रमले म्हणून कवतिक केले तर हे शेफारले .उतले मातले घेतल्या वशाला टाकते झाले.संसाराच गम्भीर वसा सोडून वात्रट पणाचा पट आता हे पुन्हा मांडतायत काय...... हे टिळकांच्या शाळेचे माजी ( खरे तर .*जी विद्यार्थी) काय रे ब्वा कोण झाला होतास तू कसा परतलास तू..... ?
  • Log in or register to post comments
म
मारवा Wed, 10/05/2016 - 14:31 नवीन
दोन दोन कवितांना विंडबनाचे भाग्य लाभले. कमाल आहे.
  • Log in or register to post comments
क
कवि मानव Wed, 10/05/2016 - 15:03 नवीन
आभारी आहे :)))) विषय होता यशा चा आणि जाला नंतर कशा चा ;))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 10/05/2016 - 15:14 नवीन
ह्या ह्या हुक्क! =)) रुमाल तुमच्या खिशाचा, अन् तांब्या कायम उशाचा. !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवि मानव
प
पगला गजोधर Wed, 10/05/2016 - 15:42 नवीन
?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रचेतस Wed, 10/05/2016 - 16:09 नवीन
सहज सुंदर कविता. कवीने घाईवाल्यांची व्यथा फार सुरेखरीत्या मांडली आहे. त्यात स्वत:चा नंबर असूनही हळूच दुसऱ्याला पुढे सोडून व्यथेतून एक अलवार कथा निर्माण केलीय त्याला तोड नाही. कवीची स्वाक्षरी आणि शेवटचे ते कुंथणे देखील मनोवेधक.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 10/05/2016 - 16:16 नवीन
सहज सुंदर प्रतिसाद. धन्यवाद हो धन्य वाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
महासंग्राम गुरुवार, 10/06/2016 - 09:05 नवीन
ओहो अगदी हुच्चभ्रू प्रतिसाद वेग्रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ब
बॅटमॅन Wed, 10/05/2016 - 19:42 नवीन
कविता मनोवेधक आपलं ते हे फ्लश खेचक! कविवर्यांना विनंती आहे की एकदा विमानातील बिनपाण्याच्या फ्लशचा अनुभव घ्यावा. अतिशय हृदयद्रावक वगैरे आहे. एकदा आमच्या पोटाने भर विमानातच बंड पुकारले तेव्हा आत गेलो. थोड्या वेळाने कुणी दरवाजा ठोठावत आलं. मी ओरडलो, अगोदर इंग्रजी व नंतर हिंदीतून "अबे मोकळे तरी होऊ द्या". तरी ठोठावणं थांबलंच नाय. मीही बधलो नाही, नंतर कळालं की पायलटला लागली होती जोराची आणि नेमका मी त्याच्या जवळच्याच स्वच्चकुपात गेलेलो. =)) दुसरा रोचक अनुभव जर्मनीतला. डुसेलडॉर्फ रेल्वे स्टेशनबाहेरचा रस्ता. एका बाजूला हाटेले आणि दुसर्‍या बाजूला बस ष्टाप आणि एक सार्वजनिक. ५० सेंटचे नाणे टाकून आत गेलो. विधी आटपून बाहेर आलो. सुदैवाने लौकर आटोपलं, नायतर आत लिहिलेलं, "२० मिनिटांत न आटपल्यास दार आपोआप उघडेल आणि मग बाहेरून नाणे टाकावे लागेल". =))
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 10/05/2016 - 20:58 नवीन
यासाठीच तर मिपा वर येतो. हे असे धागे आणि प्रतिसाद वाचले की माझ्या जीवनातील रीतेपणा निघोन जातो. बाकी काय बोलावे त्यांचे फॅण तर आहोतच...
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 10/06/2016 - 01:06 नवीन
देशोदेशींचे महाल,राजवाडे,म्युझिअम,मंदिरे आणि निसर्ग दाखवण्यात आले पर्यटनात पण कळनिवारक स्थानके दाखवण्याची गरज भासत आहे. एका कविच्या प्रतिभेचा प्रवास! "व्हेनिसमधली मलमूत्र प्रक्रिया " अशा लेखांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 10/06/2016 - 02:17 नवीन
खरेतर कळनिवारक स्थानके हा दुर्लक्षीत केलेला विषय आहे. जो खूप महत्वाचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
च
चौकटराजा गुरुवार, 10/06/2016 - 05:38 नवीन
एका अमेरिकन युवतीने रोम व कळ निवरणाची 'मोफत' ठिकाणे यावर लिहिलेला ब्लॉग माझ्या वाचनात आला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
किसन शिंदे गुरुवार, 10/06/2016 - 06:09 नवीन
या विषयावर इतकं वास्तववादी लिहीण्यात बुवांचा हात कुणी धरूच शकणार नाही. =))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/06/2016 - 08:58 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
ज
जव्हेरगंज गुरुवार, 10/06/2016 - 09:03 नवीन
अ पे क्षा भं ग
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 10/06/2016 - 10:12 नवीन
आपला नंबर आपणहून दुसर्‍याला देणे, हा केवळ परोपकारच असेल असे नाही. 'बद्धकोष्ठ' वाले पण परस्पर पुण्य मिळवत असतील.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 10/06/2016 - 11:02 नवीन
नंबर देण्यात इथेही स्त्रिदाक्षिण्य नाही जमणार. रांग वेगळी असते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा