बासरी....
बासरी....
मनमंदिरी वाजू लागली बासरी
मनमोहना लागली तुझीच आस
रत्नजडितं मुगुट त्यावर खोचलेले मोरपिसं
घननीळा लागला तुझाच ध्यास
कुंजवनी घुमू लागला पावा
कृष्णा करिते तुझाच रे धावा
हंबरती धेनू ऐकून तुझी वेणू
वेड लावलेस या राधेला जणू
शामल मूर्ती कमरेस खोचली मुरली
पाहून आता ना जीवनाची आस उरली
राजेंद्र देवी
💬 प्रतिसाद
(3)
व
वेल्लाभट
Fri, 10/07/2016 - 20:21
नवीन
प्रयत्न कळला पण काव्य म्हणून कमी पडलं ते
लिहीत रहा!
- Log in or register to post comments
क
कवि मानव
Fri, 10/07/2016 - 22:27
नवीन
मला यात वापरलेले शब्द खूप आवडले
पण एकूण विचारांची आणि शब्दांची जुळवा-जुळव अजून छान झाली असती तर चार चांद लागले असते
पण प्रयत्नांती परमेश्वर
- Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी
Sat, 10/08/2016 - 06:20
नवीन
धन्यवाद...प्रयत्न करतो
- Log in or register to post comments