Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सहजच

र — रातराणी, Sun, 10/09/2016 - 14:59
आळसावलेल्या एका सकाळी तू म्हणाव चल फिरून येऊ कुठे कस काही न सांगता घेऊन यावस मग समुद्रकिनारी मी विचाराव, "का रे, आज एवढ्या लांब?" तू म्हणाव, "सहजच, गंमत आपली" सूर्य पाण्यात पोहू लागेपर्यंत पडून राहाव गरम वाळुत सूर्यास्ताला जाव गार पाण्यात हलकेच उलगडावी तू माझी वेणी मी म्हणाव, "काय रे? केस विस्कटतील" तू म्हणाव, "असू देत असेच सहजच " बोचर्या थंडीची पर्वा न करता ओल्या वाळुत उमटवाव्यात पाउलखुणा अंधार पांघरुन मग मोजत बसाव्या आकाशभर चमचमणाऱ्या चांदण्या मी हळूच ओठ टेकवावे तुझ्या गालांवर तू विचाराव, "अरे वा, आज काय विशेष?" मी म्हणाव, "काही नाही, सहजच"

प्रतिक्रिया द्या
12657 वाचन

💬 प्रतिसाद (33)
प
पद्मावति Sun, 10/09/2016 - 15:05 नवीन
वाह...मस्तच. आवडली.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sun, 10/09/2016 - 15:07 नवीन
:) धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
अ
अभिजीत अवलिया Sun, 10/09/2016 - 15:09 नवीन
!!! एकदम रोमँटिक कविता !!!
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 10/09/2016 - 15:41 नवीन
छान कविता. थोडंसं 'लुप्त मात्रा अनुस्वार' याकडं लक्ष दिलं पाहिजे.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sun, 10/09/2016 - 16:40 नवीन
होय, उत्साहात जरा दुर्लक्ष झालं खरं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
य
यशोधरा Sun, 10/09/2016 - 15:44 नवीन
मस्त! सुर्रेख लिहिली आहे!
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 10/09/2016 - 15:59 नवीन
एकच कल्ला नुसता ! रच्याकने दिवसभर समुद्रावर बसून करपायला नाही का होणार ?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 10/09/2016 - 16:05 नवीन
राराने इतकी रोम्यांटीक कविता लिहिली आणि तुम्ही एकदम करपायच्याच गोष्टी बोलायला लागलात! दुत्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 10/09/2016 - 16:19 नवीन
प्रश्न तर पडतातच नं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
र
रातराणी Sun, 10/09/2016 - 16:39 नवीन
आं दुत्त दुत्त, आपण ज्याला करपने म्हणतो ते काही लोक हौस म्हणून टयान केलय म्हणतात बर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
प
प्रचेतस Sun, 10/09/2016 - 16:39 नवीन
सहीच लिहिलंय. बाकी सूर्यास्तानंतर समुद्राचं पाणी उबदार असते आणि जमीन गार म्हणून तर मतलई वारे सुरु होतात.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sun, 10/09/2016 - 16:41 नवीन
अरे देवा, इथे पण भूगोलच आठवला ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sun, 10/09/2016 - 16:43 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
र
रातराणी Sun, 10/09/2016 - 16:53 नवीन
चितळे मास्तरांच गोदाक्का सांगा बर आता वारे कुठल्या दिशेला वाहतायत? आठवल सहजच =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अजया Sun, 10/09/2016 - 16:39 नवीन
:) कविता आवडली.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sun, 10/09/2016 - 16:42 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 10/09/2016 - 18:07 नवीन
एकदम 'सहज' लिहील्यासारखी वाटली! :)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 10/09/2016 - 21:26 नवीन
करपलेल्या भाजीची पर्वा न करता भरावेत बकाण्यावर बकाणे लक्ख डब्याचे झाकण लावता लावता आठवावेत ते सुखाचे उखाणे मी हळूच पहावे तुझ्या डब्याकडे तू विचाराव, "अरे वा, आज काय विशेष?" मी म्हणाव, "काही नाही, विशेष आमची मिशेष" . येनी वे रारा. कविता ज्याम आवाडलीय. मस्तच.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 10/10/2016 - 01:38 नवीन
अभ्यादादाचा तडका.... कविताका अंग अंग भडका! ;) रातराणीतै कविता येकच लंबर... ज्याम आवडलीये! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
र
रातराणी Mon, 10/10/2016 - 04:12 नवीन
खी खी खी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 10/10/2016 - 03:40 नवीन
छानचं!
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 10/10/2016 - 04:10 नवीन
अंधार पांघरुन मग मोजत बसाव्या आकाशभर चमचमणाऱ्या चांदण्या
वाह..
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 10/10/2016 - 04:16 नवीन
पद्मावतीतै, अभिजीत, एसभाऊ, यशोतै, मापदादा, वल्लीसर, अजयातै, जव्हेरभाऊ, अभ्या.., संदीपदा, मिकादादा, आणि गावडेसर सर्वांचे मनापासून आभार :)
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 10/10/2016 - 05:37 नवीन
रोमँटीक. दिल गार्डन गार्डन हो गया.
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Mon, 10/10/2016 - 05:59 नवीन
छान,
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 10/10/2016 - 06:38 नवीन
चाणक्य आणि नीमो धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Mon, 10/10/2016 - 12:18 नवीन
कविता सुंदर आहे. अगदी अलगद सहज पणे मनातून पानावर उमटलीये !!!!!
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 10/11/2016 - 09:53 नवीन
धन्यवाद विवि :)
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 10/13/2016 - 05:39 नवीन
उपमांचा मारा न करता, म्हणून खूप आवडली. कवीता ही सहजच झाली पाहिजे.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 09/16/2020 - 12:41 नवीन
अरे वा, छानच!
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 09/16/2020 - 12:46 नवीन
👌
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 09/17/2020 - 17:00 नवीन
अप्रतिम... निव्वळ अप्रतिम...
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 09/18/2020 - 01:00 नवीन
थँक्यु थँक्यु थँक्यु 🤗
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा