फुकटचे सल्ले, मार्गदर्शन, आणि फंडे
आतापर्यंत मिसळपाववर अनेक चर्चेचे, शंका निवरणाचे धागे आलेले आहेत. पण आपल्या जवळील माहिती (फुकटचे सल्ले) यावर धागे मी अजून बघितले नाहीत.
पुष्कळ वेळा आपल्याला अचानक नवीन आणि भन्नाट माहिती मिळते आणि आपले पोट दुखायला सुरुवात होते. तेव्हाच बाहेर निघून जगाला ओरडून सांगावेसे वाटू लागते. अशा वेळच्या साठी धागा काढण्याचे फार मनात होते. दसरा दिवाळीचे दिवस असल्याने पतंगबाजी लवकरच सुरु होईल त्यामुळे आता हा धागा काढल्याने माझी पोटदुखी तरी बंद होईल. आता माझे चार आणे
दोन वर्षांपूर्वी ब्रह्मपुर येथे युवा महोत्सवासाठी जात असतांना माझी समोर च्या बर्थवरील गुजराती तरुणांशी गट्टी जमली. अर्धवट गुजराती आणि मराठी बोलत, नवीन सरकार, गुजरात महाराष्ट्रातील फरक यावरून गाडी संक्रांत व पतंगावर गेली. मांजामुळे एका दुचाकीस्वार तरुणीचा गळा कापल्याची घटना तेव्हा ताजीच होती. त्यामुळे गुजराती लोक यावर काय करतात याची मला उत्सुकता होती. विचारल्यावर त्यांनी सांगितला तो जुगाडचा एक उत्तम नमुना आहे. त्यांच्यानुसार संक्रांत जवळ आली कि एक लांब बांबू किंवा सळई घ्यायची आणि दुचाकीच्या समोरील बाजूस उभी किंवा मागील बाजूस झुकती बांधायची. हि सळई गाडी किंवा सायकल च्या एक्सेल वर अशी बांधायची कि एकदा गाडीवर बसल्यावर तिची उंची डोक्याच्या पातळी एवढी असली पाहिजे. म्हणजे आपण जेव्हाही गादीवर निघू आणि रस्त्यात मांजा आडवा असेल तर तो आधी सळईला लागेल आणि सळई आपल्या बाजूने मागे झुकली असेल तर झटकन डोक्यावरून निघून जाईल. शेवटी सिर सलामत तो हेल्मेट पचास.☺
टीप: या अगोदर विचार करून फक्त निबंधच लिहिले असल्याने कृपया सांभाळून घ्यावे.
💬 प्रतिसाद
(37)
स
संदीप डांगे
Sun, 10/09/2016 - 19:33
नवीन
भा री धा गा!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sun, 10/09/2016 - 20:23
नवीन
छान धागा.
या प्रकारचे फिटिंग बसवलेले फेबुवर फोटो पाहिले होते. मस्त जुगाड आहे.
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Mon, 10/10/2016 - 01:15
नवीन
जेव्हाही "गादी"वर निघू.....
बाप रे...
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 10/10/2016 - 01:24
नवीन
फुकटचा सल्ला क्र. 1:
जेव्हा धागा मजेदार असतो तेव्हा सुद्दलकन इग्नोर मारावे
- Log in or register to post comments
स
सांरा
Mon, 10/10/2016 - 04:58
नवीन
आय ब्लेम ऑटोकरेक्ट
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Mon, 10/10/2016 - 05:43
नवीन
ऑटोकरेक्ट बंद करा...
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Mon, 10/10/2016 - 02:38
नवीन
आयडीयाची कल्पना चांगली आहे पण ईतकी मेहनत घेणे लोक पसंत करतील असे वाटत नाही आणि गाडी चालवताना दृष्टीत बाधा येणार नाही असेही नाही आणि त्यामुळे कायद्याच्या दृष्टीनेही हे पहावे लागेल.
छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करायला पूर्ण धागा काढणे किती ईफिशियंट आहे माहित नाही, पण फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा खरडफळा यासाठी चांगला कामी येऊ शकतो असे मत नोंदवतो. :)
- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 10/10/2016 - 04:46
नवीन
हॅहॅहॅ लय भारी धागा. इथे भरपूर 'कॉन्ट्रीब्युशन' दिले जाईल. ;-)
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 10/10/2016 - 04:55
नवीन
फारच उपयोगी धागा! लिस्टच काढते सल्ल्यांची..
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 10/10/2016 - 06:04
नवीन
कोणी मिर्ज्या पहिला नसेल तर सल्ला:
ओमप्रकाश मेहराच्या नावाला भुलू नका, युट्युब वर सिनेमा आलाय, फक्त शेवटची दहा मिनिटे बघा. अभिनयाच्या नावाखाली जे काय केलं ते बघून निर्णय घ्या, स्लोमोशनात धावणारे घोडे सोडले तर बघण्यासारखे काहीही नाही, मेहराने डोक्यावर जबरदस्ती टाकलेलं काम पाट्या टाकून उरकलं आहे, अनिल कपूर चा मुलगा लॉन्च करणे एवढा उद्देश त्यासाठी आपले पैसे कं खर्च करा?
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 10/10/2016 - 06:53
नवीन
असाच एक धागा होता "वॅाश बेसिनवरचा साधा साबण त्याचे बटण होईपर्यंत कसा वापरायचा.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 10/10/2016 - 14:26
नवीन
मस्त धागा आहे! काही सुचले तर लिहिणार अन्यथा सल्ले वाचणार.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 10/10/2016 - 17:11
नवीन
युट्युबची URLवरून व्हिडिओ टाकणे
हे तीन template वापरून URL ची डागडुजी करून , प्रत्यक्ष युट्युबवर जाऊन इमबेड लिंक न काढता --
Template
1)
<iframe width="560" height="315" src="
2)
watch?v= replace with embed/
3)
" frameborder="0" allowfullscreen></iframe>
ट्राइ करून पाहा.
- Log in or register to post comments
व
विद्यार्थी
Mon, 10/10/2016 - 17:40
नवीन
बहुतेक जण अनुभवाने शिकले असतीलच पण हा धागा पहिला आणि वाटले आपण पण एखादा सल्ला टाकावाच.
तर, सुखी वैवाहिक जीवनासाठीचा सल्ला,
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 10/10/2016 - 18:54
नवीन
आणि छाटी लावून निमुटपणे बाहेर पडावे?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 10/10/2016 - 20:24
नवीन
छातीला छाटी लावून निमूट बाहेर पडावे.
जंगलात/हिमालयात पोहोचल्यावर छाटी घातली तरी चालेल.
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
Tue, 10/11/2016 - 08:28
नवीन
ह.ह.पु.वा.
मस्त धागा!!
- Log in or register to post comments
P
palambar
Mon, 10/10/2016 - 19:13
नवीन
पोट दुखियला लागते, यावर काहीतरी उपाय सुचवा मंडळी.
ह.घ्या.
मला सुध्दा असेच होते. चांगला धागा आहे.
क्रेडीट कार्ड due pays जर लेट भरले गेले तर मोठा दंड होतो, पण जर तुमचे आतापर्यंत
चे रेकाॅर्ड चांगले असेल तर दोनवेळा दंड माफ करता येतो. फक्त योग्य अधिकारी गाठला पाहीजे.म्हणजे
ज्याला असे अधीकार आहेत. असे मलाकळले ,हे खरे आहे का?
- Log in or register to post comments
र
रुपी
Mon, 10/10/2016 - 20:40
नवीन
भारतातला अनुभव नाही. अमेरिकेत एक-दोन वेळा झाले तेव्हा माफ केला होता. फोनवर बोलूनच झाले होते. काही करतात, पण सर्वच करतात असे नाही.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 10/10/2016 - 20:43
नवीन
माझ्या मागे फार लागलेत हो क्रेडिट कार्डवाले. कशे घ्यायचे आणि सांभाळायचे? पैसे न घालवता?
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 10/11/2016 - 06:56
नवीन
घे आणि कुठेतरी टाकून दे घरात सापडणार नाही असे, वापरायला मिळणार नाही असे. फक्त फी भरावी लागेल मात्र ;)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 10/11/2016 - 07:58
नवीन
आँय?
हे काँय?
मग कशाला घ्यायचे?
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 10/11/2016 - 08:03
नवीन
पैशे न घालवता सांबाळायचे ना तुला?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 10/11/2016 - 08:07
नवीन
ते सांगतात ना मार्केटिंगवाले. तुम्हाला फ्युअलवर इतकी कॅशबॅक, मॉलवर इतकी, मुव्हीजवर इतकी, शिवाय ऑनलाईन शॉपिंग वर इतकी. प्लस ईएमाय फॅसिलिटी. हे कोण देणार?
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 10/11/2016 - 08:10
नवीन
ह्या सल्ल्याचे वेगळे पैशे पडतील =))))
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 10/11/2016 - 08:20
नवीन
मग नको. हे नेटसुद्धा डिसेंबरपर्यंत जिओ फ्री आहे म्हनून वापरतोय. ;)
असुंद्या
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 10/11/2016 - 08:24
नवीन
=)) अंबानी फुकट देत्यात व्हय! कायतरी झोल असेलच, बघाच.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 10/11/2016 - 08:26
नवीन
असु दे, नंतर टाटा, बिर्ला, मित्तल आहेतच की.
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
Tue, 10/11/2016 - 08:32
नवीन
२ क्रेडिट कार्ड घ्या
एका चे पेमेंट ५ तारखे ला आणि दुसर्याचे २५ तारखेला असेल असे सेट करुन घ्या. म्हणजे ज्या कार्डाची कट ऑफ तारिख नुकतीच झाली ते वापरता येइल. मोबाईल मधे रिमाईंडर लावुन ठेवा म्हणजे पेमेंट चुकणार नाही.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 10/11/2016 - 08:34
नवीन
म्हणजे कसं मेहेंदळे साहेब?,
ऑन्लाईन्बिन्लाईन न समजणारा मी शेतकरी माणूस आहे असं समजून सांगा ना प्लीज.
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
Tue, 10/11/2016 - 08:40
नवीन
मग तुम्ही कॅशच वापरा :)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 10/11/2016 - 08:51
नवीन
ते आमचे डॉन. आमी ज्युनिअर.
असु द्या. सल्ला आवाडला एकदमच. ;)
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 10/11/2016 - 09:42
नवीन
तुम्ही दिव्यातले की अंगठीतले हो?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 10/11/2016 - 09:44
नवीन
लग्नमंडपातले.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 10/11/2016 - 09:45
नवीन
किंवा वेडिंग रिंगमधले म्हणाले तरी चालेल.
- Log in or register to post comments
स
सांरा
Tue, 10/11/2016 - 11:01
नवीन
सध्या कुठलाच नाही. अजून एवोल्युशन बाकी आहे.
- Log in or register to post comments
म
मोहनराव
Tue, 10/11/2016 - 10:10
नवीन
अल्याडला जागा नसेल तर पल्याड बसावं!!
- Log in or register to post comments