मी हिंदू असूनही हिंदू धर्माविरोधात का लिहितो? -- 4 कारणे
4 कारणे...
//
---------------------------------------------------------------------------
पहिलं कारण-
संख्या.
या देशात 80 टकक्यांपेक्षा जास्त लोकसंख्या हिंदुची आहे. नॅचरली- कोणत्याही धर्मावर होणाऱ्या टोटल टीकेपैकी -80 टक्के टीकासुद्धा -मेजोरिटी फॉलो करत असलेल्या धर्मातल्या चुकीच्या घडणाऱ्या गोष्टीबद्दलच होणार. याईतकं साहजिक काय?
उदाहरणार्थ. हेच जर अमेरिका किंवा यूरोपमधलं घेतलं तर- तिथले प्रोग्रेसिव लोक करत असलेली टिका- बहुसंख्य वेळा ख्रिश्चनिटी 'च्याच' विरोधात असते. अमिरिकेतले ख्रिश्चन लोक, तिथल्या अल्पसंख्य हिंदू धर्मावर टिका करून काय मिळवणार? ---तसंच भारतात आपण अत्यल्प असलेल्या ख्रिश्चन धर्मावर --टोटल टिकेच्या 50 टक्के टिका करून काय मिळवणार??
---------------------------------------------------------------------------
दुसरं कारण:
मी जन्मलो -त्या धर्मातल्या लहानपणापासून पाहत आलेल्या चुक बरोबर अशा साऱ्या गोष्टी बद्दल बोलताना मला नेचुरल कॉन्फीडेंस असतो. मी ठामपणाने एखाद्या गोष्टीला चुक तर चुक किंवा बरोबर तर बरोबर म्हणू शकतो. हेच मी (पुरेशा अभ्यासा अभावी) दुसऱ्या धर्माबद्दल बोलताना थोडासा तरी कचरेल...
उदाहरणार्थ.
मी हिंदू आहे अन जर मला इस्लामच्या ईद-उल-अध वर (हे नाव सुद्धा बरोबर आहे की नाही मला ठाऊक नाही) -टिका करायची म्हटलं-- तर त्याआधी ती मुळात साजरी का केली जाते?? याचा प्रचंड आणि "थेरोटिकल" अभ्यास करून मगच टिका करावी लागणार.
या विरुद्ध -मी ज्या हिन्दू धर्मात जन्माला आलो त्यात फॉलो होणाऱ्या अंधश्रद्धा, जात-पात, भोंदू बाबा, फुकटे पुजारी, अंगात येणे, या चुकीच्या गोष्टी मी लहानपणा पासून पाहत आल्याने- यावर टिका करताना स्वत:च्या धर्माच्या (मुद्दाम न करताही- आपोआप झालेल्या अभ्यासामुळे) करणाऱ्या टिकेत एक कॉन्फीडन्स असतो.
प्लस यात परत संख्या कामाला येते. आता 2015 च्या रिपोर्ट नुसार भारतात
80 टक्के हिन्दू
14 टक्के मुस्लीम
2 टक्के ख्रिश्चन
1 टक्का बुद्ध अन
इतर 3 टक्के आहेत.
त्यामुळे 10 पैकी टिकाकार घेतले तर-
प्रत्येक धर्मावर होणारी टिका साहजिक अशी असेल...
हिंदू 8%
मुस्लीम 1.4%
ख्रिश्चन 0.2% अन
बुद्ध 0.1%
म्हणजे हिंदू धर्माची होणारी समीक्षा 'कठोर' असणार यात वाद नाही.
---------------------------------------------------------------------------
तिसरं कारण:
मेजोरिटीचा-- माइनॉरिटी वरती सतत होणारा अन "न टाळता येणारा" परिणाम.
म्हणजे कोणत्याही देशातल्या मेजोरिटीचं जेवढं रॅशनलायजेशन, सेक्युलरिजेशन आणि लिब्रलायजेशन होईल- तेवद्याच प्रामाणात त्या त्या देशातल्या माइनोरिटीजचंही -थॉट एंड बेहविरियल लिब्रलायजेशन "आपोआप" अन नकळत होईल. "आपोआप" -हा शब्द इथं फार महत्वाच्या आहे- कारण ही प्रोसेस अतिशय इम्प्लीसीट आहे. ठरवून न करता केलेली.
अतिशय सोपं उदाहरण म्हणजे समजा 10 पोरांत 8 जन हुशार आहेत अन 2 थोड़े ढ. --तर त्या 2 ढ मधल्या, या 8 च्या संगतीत राहून ,एक तरी पोरगा हुशार होण्याची शकयता जास्त असते. And vice-a-versa!
म्हणजे केरळ मधला मुस्लीम अन बिहारचा मुस्लीम यात साहजिक फरक असणार आहे. तसाच भारतातला मुस्लीम अन पकिस्तानला मुस्लीम यात खुप फरक असणार आहे. "माझ्या engg च्या वर्गातल्या, कित्येक मुस्लीम मूली इतर मुलींसारखं जीन्स टॉप घालायच्या." तेच पकिस्तान मधल्या मुलींबद्दल बोलायचं झालं तर त्यांना तिथे इंजिनिअरींग पर्यंत 'शिकू तरी देत असतील का?' हाच मला प्रश्न आहे.
म्हणून हिंदू-- म्हणजे या देशातला बहुसंख्य समाज जेवढया कठोर समिक्षेला सामोरा जाईल अन जास्त लिबरल होईल तेवढाच इथला अल्पसंख्यक समाज सुद्धा आपोआप लिबरल होणार आहे यात काहीच शंका नाही.
---------------------------------------------------------------------------
चौथं कारण.
माझी टिका ही --माझा धर्म धुसमसत का होईना पण स्वीकारेल.
पण दुसऱ्या धर्मातल्या कोणी माझ्या धर्मावर केलेली टिका (मग ती कितीही बरोबर असली) तरी ती- माझा धर्म स्वीकारेल का?
उदाहरणार्थ:
एखादा मुस्लीम म्हटला की "काय तुमच्या हिन्दू धर्मात ते फालतू अंगात येणे अन असले काय काय प्रकार असतात." आता अंगात येणे हा प्रकार कितीही खोटा असला तरी त्याबद्दल ची टीका मी एका मुस्लीमाकडूम (प्रैक्टिकली बोलताना) स्वीकारेल का??? कुठेतरी मनातल्या मनात मी त्याला 'आउटसायडर' च मानेल. मग मी त्याला काय उत्तर देईल की "आधी तुम्ही त्या बुरख्याचा फाल्तुपना बंद करा- आता आपण ईसवी सन 2016 मधे आहोत. ईसवी सन - 216 मधे नाही".
प्रसंगी मी त्याच्या अंगावर सुद्धा जाईल. हिंसक होईल.
पण हेच एक हिंदू म्हणून मी म्हटलो की "काय यार आपल्या धर्मात हे अंगात येणे काय -अन जातीयवाद पाळने काय- प्रकार बिलकुल फालतू आहेत." तर समोरचा व्यक्ती माझा विरोध् करेल. पण शेवटी टोकाला न जाता किंवा हिंसक न होता -- गप्प बसेल. कारण त्यांच्यासाठी मनातल्या मनात मी कुठेतरी "इनसायडर" असतो.
त्यामुळे प्रोग्रेसिव हिंदू म्हणून -माझी हिंदू धर्मावर (कंपेरिटीवली जास्त) टिका होते..
.
माझ्या मते या सर्व कारणांमुळे प्रत्येक धर्मातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध त्या-त्या धर्मातल्या प्रोग्रेसिव्ह लोकांनी आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे...
//
(Constructive counter-arguments are Welcome as usual... :-) )
Article is inspired from T Manoj's view on religion...
💬 प्रतिसाद
(118)
ट
टवाळ कार्टा
Mon, 10/10/2016 - 06:19
नवीन
आता तुम्हाला "सुंता करून या" वगैरे प्रतिसाद येतील, लेखातले विचार बरोबर असले तरीही
- Log in or register to post comments
अ
अर्थहीन
Mon, 10/10/2016 - 06:29
नवीन
सॉरी तुम्ही नेहमी हा शब्द वापरता ... मला याचा अर्थ माहीत नाही...
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Mon, 10/10/2016 - 06:41
नवीन
बोळा अडकला की होतं असं...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Will breach LoC to hunt terrorists, India tells Pakistan
- Log in or register to post comments
अ
अर्थहीन
Mon, 10/10/2016 - 06:42
नवीन
ओकेे
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Mon, 10/10/2016 - 06:20
नवीन
(Constructive counter-arguments are Welcome as usual... :-) )
Article is inspired from T Manoj's view on religion...
म्हणजे यात तुमचं स्वतःच असं काहीच मत नाही. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते कळलं नाही.
- Log in or register to post comments
अ
अर्थहीन
Mon, 10/10/2016 - 06:28
नवीन
मी का टीका करतो - हेच मी म्हटलो आहे
- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 10/10/2016 - 06:24
नवीन
कारणमीमांसा बरोबर आहे.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 10/12/2016 - 17:38
नवीन
सहमत. लेखातील मुद्दे पटणारे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 10/10/2016 - 07:15
नवीन
मी हिंदू असूनही हिंदू धर्माविरोधात का लिहितो
- Log in or register to post comments
अ
अर्थहीन
Mon, 10/10/2016 - 07:17
नवीन
माझ्या मते या सर्व कारणांमुळे प्रत्येक धर्मातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध त्या-त्या धर्मातल्या प्रोग्रेसिव्ह लोकांनी आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे...
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 10/10/2016 - 07:19
नवीन
आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे...
>>मान्य !
पण सर्व धर्मात अशी आवाज उठवायची परवानगी नसते .
आवाज बंद केले जातात
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 10/10/2016 - 10:14
नवीन
मग आपणसुध्धा हिंदू धर्माला मुसलमानांच्या इतके खाली आणून ठेवायचे का?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 10/10/2016 - 11:29
नवीन
इतर काही धर्मात असे होते एवढेच निदर्शनास आणायचे होते.
हिंदूमधे असे सध्या होत नाही पण कलबुर्गी आणि दाभोळकर यांच्ज्या हत्या जर वैचारीक विरोधातून झाल्या असतील तर हिंदू धर्म तीच वाटचाल करत आहे असे म्हणावे लागेल
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 10/10/2016 - 15:26
नवीन
साडे तीन अतिरेकी सनातन्यांमुळे हिंदू धर्म अशा वाटेवर जाईल हे म्हणणे म्हणजे अतिशयोक्ती आहे.
मिपावरसुद्धा ९९% टक्के लोक अशा सनातनी अतिरेक्यांना उघडपणे विरोध करताना दिसतील.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 10/11/2016 - 12:24
नवीन
दोन हत्या किंवा दोन तीन अतिरेकी यांच्यामुळे सध्यातरी हिंदू धर्माला फरक पडणार नाही.
परंतु या किंवा अशा प्रकारछ्या हत्यांमागे विचार मंथन , ब्रेन वॉशिंग आणि इतर सपोर्ट ग्रुप असतात त्यामुळे हे विचार फोफावतात त्याची काळजी वाटते .
अर्थात अजून हे सनातन्यानी केलाय याचा कोणताच पुरावा नाही त्यामुळे जर तर जास्त चर्चण्यात अर्थ नाही.
- Log in or register to post comments
ब
बाजीगर
Mon, 10/10/2016 - 07:51
नवीन
चांगलं तर्कशुद्घ लिहीलय, सहमत.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Mon, 10/10/2016 - 10:31
नवीन
.
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Mon, 10/10/2016 - 10:36
नवीन
जाऊं द्याना बाळासाहेब.....
- Log in or register to post comments
प
पुंबा
Mon, 10/10/2016 - 10:55
नवीन
प्रत्येक मुद्द्याशी सहमत..
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Mon, 10/10/2016 - 11:02
नवीन
>>"याचा प्रचंड आणि "थेरोटिकल" अभ्यास करून मगच टिका करावी लागणार."
काय राव! असं असतंय का? टीका करायची तर असे विचार करून चालत नाही इकडे... बिनधास्त टीका करायची आणि पुढच्याने संदर्भ मागितले कि त्यालाच उलट पुरावे मागायचे अशी पद्धत असते! ;)
- Log in or register to post comments
अ
अर्थहीन
Mon, 10/10/2016 - 11:19
नवीन
वेड्यासारखा हसलो... एक नंबर... शब्दबम्बाळ.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 10/10/2016 - 11:44
नवीन
तुमचा स्वतःच्या हिंदू धर्माच्या अभ्यासा/आकलनावरुन हिंदू धर्म म्हणजे काय हे जाणून घ्यायला आवडेल.
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Mon, 10/10/2016 - 11:57
नवीन
माझी फाटते ...
दरदरून
बरोबर ना ?
नाहीतर गिरीश कुबेर काकांना विचार ना ?
केरळात बघा कि ?
आणि चार्ली हेब्दो तर माहीतच आहे ..
मग काय ??
- Log in or register to post comments
अ
अर्थहीन
Mon, 10/10/2016 - 13:29
नवीन
बरोबर हेरून या वाक्याकडे दुर्लक्ष केलत... व्हेरी गुड...
>>
माझ्या मते या सर्व कारणांमुळे प्रत्येक धर्मातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध त्या-त्या धर्मातल्या प्रोग्रेसिव्ह लोकांनी आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे...
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Mon, 10/10/2016 - 11:58
नवीन
तुमचे नक्की काय म्हणणे आहे ?
ह्या लेखातील मते तुमची आहेत का टी मनोज यांची?
तुम्हाला एखादी गोष्ट (कुठल्याही धर्मातील) पटत नसेल तर जरूर टीका करा... त्याच बरोबरोबर सुधारण्याचा मार्गही सुचवा.. व त्याच बरोबर येणार्या बर्या वाईट प्रतिक्रियांना सामोरे जायची तायारी ठेवा..
हे जमत नसेल तर मिपा सारख्या स्थळावर लेख लिहा.. मर्यादित प्रतिक्रियांना सामोरे जाणे सोपे आहे..
तेही जमात नसेल तर घरच्या घरी टीका करा..
हा लेख लिहून हिंदू धर्माविरोधात(च) केल्लेल्या टीकेचे समर्थन कशाला?
हिंदू धर्मात जे अयोग्य आहे जसे देवल बळी देणे.. ह्याचा विरोध जरूर करावा.. आणि आम्ही विरोध करतो हे जाहिरपणे सांगावे.. उगाच या लेखातील मुद्यांच्या कुबड्या कशाला?
- Log in or register to post comments
अ
अर्थहीन
Mon, 10/10/2016 - 13:34
नवीन
काय एवढं बेसिक पण मिपा वर सांगावं लागतं का राव?
बकऱ्याचा बली देऊ नका... आवरण सवर्ण मानू नका,
सुचवला मार्ग अजून काय सांगायला पाहिजे?
...
घरच्या घरी.. (त्याचा इथं काय संबंध)
...
लेख नीट वाचलात (पूर्वग्रह न ठेवता) तर हे लगेच समजलं असता कि माझी ऑलरेडी टीका करून झालीय आणि करत राहणारे...
फक्त ती का करतोय याची मला वाटलेली कारणे (मनोज च्या) लेखाच्या आधारे मी एक्सप्लिन केली आहेत...
- Log in or register to post comments
द
दिगोचि
Tue, 10/11/2016 - 01:55
नवीन
टी मनोज यान्च्या लेखाचा सन्दर्भ द्याल का?
- Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar
Mon, 10/10/2016 - 12:13
नवीन
बिनधास्त आणि मनोसोक्त टिका करा. आजिबात घाबरु नका. ज्यांच्या नावातच अर्थहिनता आहे त्यांचीन टिका सुद्धा तशीच असेल. आम्ही खुप सहिष्णु आहोत.
- Log in or register to post comments
अ
अर्थहीन
Mon, 10/10/2016 - 13:35
नवीन
अपेक्षित आहे... चालुद्या...
.
.
लेखावर टीकाच होणार नाही... हे माहीत नसण्याइतका खुला मी नक्कीच नाही...
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/10/2016 - 15:11
नवीन
बोरगावकर साहेब, अर्थहीन ह्यांनी काही माझ्या घरात ह्या महिन्याचा किराणा भरलेला नाही, फक्त कसंय न तुम्ही आत्ताच जे केलेत त्याला सभाशास्त्रात एड होमिनेम किंवा मुद्दे नसताना केलेले वैयक्तिक हल्ले म्हणतात, तेव्हा संभाषण शुचिता अबाधित ठेऊन जर चर्चेत विरोधाभासी तर्क देता आला तर जरूर द्या अन चर्चा सकस ठेवा. नाहीतर कमीपणा तुमच्या आयडीला येईल त्याच्याशी काही मला सोयरसुतक नाही, पण कमीपणा माझ्या धर्माला सुद्धा येईल, अन तो न येऊ देणे एक हिंदू म्हणून माझे कर्तव्य मी तरी समजतो.
- Log in or register to post comments
अ
अर्थहीन
Mon, 10/10/2016 - 15:15
नवीन
मला खूप मोठी अपेक्षा होती कि इथे या लेखाला खूप चांगल्या "काउंटर" अर्ग्युमेंट्स येतील पण इथे मला फक्त वैयक्तिक हल्ले - नाहीतर मग मुसलीम किंवा दुसरे धर्म कसे वाईट आहेत एवढच दिसत आहे...- सर्वां कडून नाही - पण काही जणा कडून... जे माझ्या दृष्टीने फारच दुर्दैवी आहे... अपेक्षा भंग झाल्यासारखे वाटते...
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 10/10/2016 - 15:17
नवीन
तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/10/2016 - 15:45
नवीन
अर्थहीन साहेब, कृपया उत्तर द्या अन आरग्युमेंटची सुरुवात करा.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 10/10/2016 - 16:08
नवीन
ऑ?
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 10/10/2016 - 16:09
नवीन
हां हां..
- Log in or register to post comments
अ
अर्थहीन
Mon, 10/10/2016 - 16:42
नवीन
एक वाक्यच पुरेसं आहे..
"तहाणलेल्याला ओंजळीने पाणी देणं" म्हणजेच हिंदू (अन दुसरा कोणताही) धर्म आहे...
पण याच्यात खूप अर्थ आहे ...
यशोधरा... नक्कीच समजेन तुम्हाला कि मला काय म्हणायचं आहे...
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 10/10/2016 - 17:56
नवीन
तुम्ही धर्म आणि रुढी ह्यांची गल्लत करीत आहात असे मला वाटते. हिंदू धर्म म्हणजे "रिलिजन" ह्या अर्थी तो धर्म नाही. चांगल्या वाईट रुढी प्रत्येक धर्मात आहेत. त्या बर्या का वाईट हा वेगळा विषय.
तेव्हा आधी तुम्ही रुढींविषयी बोलता आहात का धर्माविषयी, हे आधी सांगा.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 10/10/2016 - 18:21
नवीन
अनेकांची दुकानं एव्हाना बंद झाली असती.
असो. सावरकरांनी टिका जरुर करावी, पण ति सावरकरांनी करावी :ड
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Mon, 10/10/2016 - 18:48
नवीन
>>तुम्ही धर्म आणि रुढी ह्यांची गल्लत करीत आहात असे मला वाटते.
धर्म आणि रुढी यात काय फरक असतो? एखादी प्रचलित बाब धार्मिक बाब आहे की रुढी हे कसे ठरवतात?
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 10/10/2016 - 18:53
नवीन
धार्मिक बाब म्हणजे काय?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Mon, 10/10/2016 - 19:08
नवीन
असो.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 10/11/2016 - 03:45
नवीन
असो काय? :) मी खरेच विचारले होते. खालच्या काही खरडी वाचून त्या अनुषंगाने माझे जे काही आकलन आहे ते लिहिन.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/10/2016 - 18:55
नवीन
धर्म = Macro
रूढी = Micro
असे सुचवावे वाटते सगा सर, आयुष्य जगायचे ढोबळ नियम म्हणजे धर्म
त्या ढोबळ नियामातले व्यक्ती/ समूह/ गट/ भौगोलिक विविधातेनुसार पडलेले उपगट म्हणजे रूढी असाव्यात असे वाटते.
- Log in or register to post comments
ग
गणेश उमाजी पाजवे
Mon, 10/10/2016 - 19:40
नवीन
माझ्या मतानुसार हिंदू हा धर्म नसून जगण्याचे ढोबळ मार्ग ( WAY OF LIFE ) आहेत. महाभारत किंवा रामायण किंवा कोणतेही वेद यामध्ये जगण्याची मार्गदर्शक तत्वे हि गोष्टीरूपाने सांगितली गेली असावीत.कारण लोक असेच प्रवचन सांगितले तर ऐकून घेत नाहीत पण देवाधर्माची भीती घातली तर गोष्टी सहज गळी उतरवता येतात त्यांच्या.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Mon, 10/10/2016 - 19:48
नवीन
अस्पृश्यता हा धर्माचा भाग होता की रुढी होती?
मला वाटतं काहींना धर्मामध्ये काही गोष्टी वाईट असतात हे स्विकारणे अवघड जात असावे. त्यावर मग जे जे चांगले ते धर्म आणि जे जे वाईट त्या रुढी असा एक पळवाटसदृश्य मार्ग काढला जातो.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/10/2016 - 20:54
नवीन
मान्य ! जातीवाद हा एक हिणकस प्रकार होता/आहे अन दुर्दैवाने अजून काही दिवस राहील. मला धर्म अन रूढी वर्गीकरण फक्त पळवाट म्हणून करावे वाटले असे नाही, तर तत्क्षणी जे मला ग्राह्य धरता येण्यालायक दिसले ते मी ग्राह्य धरले होते
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 10/11/2016 - 04:41
नवीन
मुळात, हिंदू तत्वज्ञान 'वसुधैव कुटुंबकम' ह्या संकल्पनेवर आधारीत आहे, असे मला वाटते.
सुरुवातीला ऋग्वेद काळात - वैदिक धर्मामध्ये - जन्मावरुन जात ठरत नसावी. उदा. ब्राह्मणाची संतती ब्राह्मण, क्षत्रियाची क्षत्रिय वगैरे. प्रत्येकाला आपले व्यवसाय क्षेत्र निवडण्याची मुभा होती, तस्मात एकाच घरातील मंडळी वेगवेगळे व्यवसाय निवडू शकत आणि जाति ही व्यवसायावरुन ठरत असे. पुढे जेव्हा कधी जाती ठरवण्यामधील ही लवचिकता संपुष्टात आली असेल आणि काही व्यक्तींचे हितसंबंध, फायदे वगैरे टिकून राहण्यासाठी जन्मावरुन जात ठरवण्याचे प्रकार सुरु झाले असतील तेव्हा ह्या रुढीचा पायंडा पडला असावा.
हिंदू तत्वज्ञान हे एकाच व्यक्तीने सांगितलेले नाही. अनेक व्यक्तींनी आपापल्या आकलनानुसार काही मते मांडली आहेत, त्यावर चर्चा, वाद- प्रतिवाद झडले, घडले असतील आणि त्यातून त्या मतांना काही आकार प्राप्त झाला असेल. हिंदू हा धर्म आहेच कुठे? आहे ते तत्वज्ञान. अनेक विचारधारा त्यामध्ये समाविष्ट आहेत. अनेक परस्पर विरोधी विचारधारांना त्यामध्ये स्थान आहे, त्यांना कोणी झिडकारलेले नाही - भलेही स्वीकारले नसेल पण म्हणून त्यांचा गळा दाबून टाकलेला नाही.
हिंदू तत्वज्ञानाची लवचिकता हीच तर त्याची ताकद. त्यात जसे सुंदर आहे तसेच काही हीणही असेल, पण त्या हीणाचा प्रतिवाद करण्याची, त्याला नाकारण्याची, आणि सुधारण्याची संधी हे तत्वज्ञान प्रत्येकाला देते, हे त्याचे बलस्थान आहे. ते नाकारुन आपण काय मिळवतो?
असो. :) मग वाटल्यास लिहीन आणि जे लिहिले आहे, ते पटायलाच हवे असाही आग्रह नाही.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 10/11/2016 - 04:47
नवीन
वेदकाळात जात नसून वर्णव्यवस्था होती. जाती खूप नंतर आल्या.
अर्थात वर्णसंकरही होत असेच.
ह्या विषयावर कुरुंदकरांचे मनुस्मृती हे पुस्तक वाचनीय आहे.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 10/11/2016 - 04:53
नवीन
हो, वर्णव्यवस्था होती हे वाचनात आहे. वर्ण आणि ancestry महत्वाची मानली जात असे, असे वाचले आहे, परंतु पोस्ट वैदिक काळात ज्याप्रमाणे ठराविक व्यवसाय ठराविक जातीच्या व्यक्तीलाच करता येई, तसे नव्हते.
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Mon, 10/10/2016 - 14:06
नवीन
हा संपूर्ण लेख म्हणजे आपण फक्त हिंदू धर्मावर टीका करतो पण आपण निःपक्षपाती आहोत हे पटवण्याची केविलवाणी धडपड आहे..
तुम्हाला जर हिंदू धर्मावर(च) टीका करायची असेल तर जरूर करा..
पण तसे जहिरपणे सांगा.. कि येथे हिंदू धर्मावर टीका करून मिळेल.. बाकीच्या धर्मांच्या वाटेला जाण्याची टाप नाही.. उगाच आपल्या कृतीचे लंगडे समर्थन कशाला ?
बाकी हिंधु धर्मात टीका करण्यसरखे बरेच काही आहे.. तेंव्हा तुमचे दुकान बराच काळ चालू राहील काळजी नसावी
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »