Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रामोजी फिल्म सिटी बद्दल माहिती हवी आहे...!!

व
विशुमित
गुरुवार, 10/13/2016 - 12:37
💬 80

नमस्कार मंडळी..!!

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आमच्या लग्नाच्या वाढदिवस प्रितेर्थ रामोजी फिल्म सिटी (हैद्राबाद) पाहण्याचा मानस आहे. नुसता मानस च नाही तर संकल्प सुद्धा सोडला गेला आहे. अर्थातच म्याडम साहेबानी ...!!
अंतर जालावरती खूप पुनरावलोकन तपासली पण मनाचे समाधान नाही झाले.
त्या बद्दल मिपा कर मंडळीं कडून खालील माहिती हवी आहे.

****सदस्य संख्या- प्रौढ 2 आणि 1 चिमुकली (वय वर्ष 2.5)
****वेळ- 2 रात्री 3 दिवस

1) रामोजी सिटी पूर्ण पाहायची आहे.
2) फिल्म सिटी मध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे (Do 's अँड Don't 's )
3) आत मध्ये कोणत्या वयक्तिक वापराच्या वस्तू घेऊन जाऊ शकतो आणि कोणत्या नाही.
4) फिल्म सिटी मध्ये राहण्याचा पर्याय ठीक आहे का बाहेर हैद्राबाद मध्ये राहिलेला बरं पडेल.
5) फिल्म सिटी व्यतरिक हैद्राबाद मध्ये एका दिवसामध्ये पाहण्या सारखा कोणती ठिकाणे आहेत.
6) सर्वात महत्वाचं हैद्राबादी बिर्याणी खाण्याची कोणती प्रसिद्ध ठिकाण आहेत? अर्थात आणखी काही स्पेशल खाण्याची ठिकाणे असतील, ते पण कृपया नमूद करावी.

###


प्रतिक्रिया द्या
49107 वाचन

💬 प्रतिसाद (80)
क
कविता१९७८ गुरुवार, 10/13/2016 - 12:54 नवीन
1) रामोजी सिटी पूर्ण पाहायची आहे. उत्तर : - एका दिवसात पाहुन होते, बस मधुन फिरवलं जातं,तीन शोज देखील असतात, एकात शुटींग कशी केली जाते याबद्द्ल माहीती. दुसरा - लेजर शो - खुपच मस्त , मिस करु नये असा, तिसरा एक ड्रामा असतो. दोन ऑप्शन्स असतात, साधे आणि वि.आय पी. , वि. आय. पी . टिकिट साधारण १९००-२०००/- पर हेड. ( ए.सी. बस , ३ स्टार हॉटेल मधे जेवण. , खाण्यासाठी खुप वरायटी , सगळ्यात बेस्ट चिकन चेट्टीनाद) 2) फ्लिम सिटी मध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे (Do 's अँड Don't 's ) उत्तर : - फिल्म सेटस च्या वस्तुंना हात लावायचा नाही. 3) आत मध्ये कोणत्या वयक्तिक वापराच्या वस्तू घेऊन जाऊ शकतो आणि कोणत्या नाही. उत्तर : - खाण्या चे पदार्थ आतमधे नेले जात नाही. 4) फिल्म सिटी मध्ये राहण्याचा पर्याय ठीक आहे का बाहेर हैद्राबाद मध्ये राहिलेला बरं पडेल. उत्तर : - तिथे राहायला काही सोय नाही कदाचित , मुळ हैद्राबादहुन ४० हुन जास्त कीमी लांब आहे (आठवत नाही आता) 5) फ्लिम सिटी व्यतरिक हैद्राबाद मध्ये एका दिवसामध्ये पाहण्या सारखा कोणती ठिकाणे आहेत. हैदराबादला लुम्बिनि पार्क, लेझर शो (नक्की पाहाच , संध्याकाळी असतो) , बिर्ला मंदीर , बायकांना पाहण्यासारखं - चार मिनार जवळील चुडी बजार 6) सर्वात महत्वाचं हैद्राबादी बिर्याणी खाण्याची कोणती प्रसिद्ध ठिकाण आहेत? अर्थात आणखी काही स्पेशल खाण्याची ठिकाणे असतील, ते पण कृपया नमूद करावी. उत्तर : - होटेल पॅराडाईस सगळ्यात बेस्ट , फेमस डेझर्ट - खुबानी का मीठा म्हणजे जर्दाळु पाक किंवा जेली म्हणता येईल ; मिठाई - पेपर राईस ची कुठली तरी होती - खुप आवडली. वाईट अनुभव - हैद्राबाद बेगम पेठ इथे चटणीज मधे खुबानी का मीठा खाल्ल होतं अशक्य गोड होतं पुन्हा कधीच खाबारअनाही असं ठरवुन टाकलं , पण तेच मैत्रिणीने पॅरेडाईज मधे खाल्ल ते तिला आवडलं अजुन आठवलं की सांगते.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 10/13/2016 - 13:52 नवीन
सुंदर असतो. न चुकवण्याची गोष्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
अ
अमृत Tue, 10/18/2016 - 07:06 नवीन
शो छान असतू पण डास भयंकर असतात त्यामूळी सोबत ओडोमॉस अवश्य न्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
असंका Tue, 10/18/2016 - 13:51 नवीन
लुंबिनी पार्क मंजेच गोळकोंडा फोर्ट काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
त
त्रिवेणी Wed, 10/19/2016 - 07:51 नवीन
नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
त
त्रिवेणी Wed, 10/19/2016 - 07:51 नवीन
नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
त
त्रिवेणी Wed, 10/19/2016 - 07:51 नवीन
नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
स
संत घोडेकर गुरुवार, 10/13/2016 - 16:28 नवीन
१) रामोजी फिल्म सिटी पाहायला साधारण संपूर्ण दिवस जातो. आपण साधारण साडेनऊ ला प्रवेश केलात तरी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पाहून होईल. आतमध्ये फिरायला बस आहेत तरी काही ठिकाणी तुम्हाला चालत जावे लागते. जेवणाची सोय आतमध्ये उपलब्ध आहे. तिकीट दर आणि इतर माहिती online मिळेल. २) फिल्म सिटी मध्ये फिरताना दिलेल्या सूचनांचे पालन करा नियम काही कडक नाहीत, मोकळेपणाने व्यवस्थित फिरता येते. ३) माझ्या मते आत खाद्यपदार्थ व पाणी नेता येते. नसेल तरी अडत नाही खाण्याचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. कॅमेरा अथवा video shooting करता येते पण काही ठिकाणी परवानगी नाही. ४) राहण्यासाठी तारा आणि सितारा हॉटेल्स आहेत पण संध्याकाळी बाहेर फिरण्यासारखे काहीच नाही त्यामुळे हॉटेलमध्ये टीव्ही पाहण्याशिवाय पर्याय नाही. ५) पाहण्यासाठी बाकीच्यांनी सांगितलेल्या व्यतिरिक्त सुधा कार म्युझियम जरूर पहा.सालारजंग पाहताना नंतर कंटाळा येतो तसेच लहान मुले कंटाळून जातात. ६) कराची बेकरीला अवश्य भेट द्या. मोती खरेदीला abids ला जाऊ नका भलतेच महाग आहेत. त्याऐवजी चारमिनारच्या आसपासची दुकाने try करा. अजून काही माहिती हवी असल्यास अवश्य कळवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
स
साहना Sat, 10/15/2016 - 04:34 नवीन
> बायकांना पाहण्यासारखं - चार मिनार जवळील चुडी बजार बायकांनी पाहण्यासारखं ! उगाच काही लोक गैरसमज करून घेतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
भ
भ ट क्या खे ड वा ला Sun, 10/23/2016 - 09:24 नवीन
सालारजंग म्युझियम ,श्री शैलम एक दिवस रहाव लागेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
क
कविता१९७८ गुरुवार, 10/13/2016 - 12:55 नवीन
स्वतःचा कॅमेरा , मोबाईल बरोबर नेउ शकता आणि न्याच कारण पक्षी संग्रहालयात खुप रंगबेरंगी पक्षी असतात,
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 10/13/2016 - 13:06 नवीन
माहितीबद्दल खूप आभारी आहे...!! त्यांच्या वेबसाइट वर तारा सितारा ही हॉटेल्स आहेत ती फ्लीम सिटी मधेच आहेत ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
अ
अभ्या.. गुरुवार, 10/13/2016 - 13:45 नवीन
कुबानी का मीठा लैच गोड्ड असते. मला बिल्कुल आवडले नै. त्यापेक्षा डबल का मीठा (पॅराडाइज मधले) जब्बरदस्त टेस्ट होती. बिर्यानी अगदी अप्रतिम अशी नाही पण चूक काढायला जागाही नाही. कोटीत एक स्नॅक्स सेंटर होते. तिथे पण बरेच काही खाल्ले. (नाव आणि पदार्थ आठवेनात) पथ्थर गोश्त प्रकार पण ट्राय करणेबल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
र
राघवेंद्र गुरुवार, 10/13/2016 - 15:56 नवीन
अरे मित्रा, गोकुळ चाट सेंटर हे कोटी मधले सर्वात मस्त हॉटेल आहे. मिरची भजी, समोसा, पाव भाजी आणि बरेच काही. 'कोटी वुमेन्स कॉलेज' हा त्याच्या जवळील बस स्टॉप वरून रामोजी फिल्म सिटी जायला सिटी-बस सुटतात. रामोजी ला जायला सगळयात स्वस्त पर्याय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 10/13/2016 - 16:08 नवीन
अभ्या लगा प्रत्येक बिर्याणी अप्रतिमच असते रे, श्री श्री श्री १२००१ कोंबडी मांस प्रेमी ब्याटमन भाऊ म्हणतात त्याप्रमाणे "कोंबडी जाते जीवानिशी, तिचा मान राखणे गरजेचे असते, बाकी मै तुम्हारे लिये जान भी दुंगी वाल्या ५६ भेटतील पण खरोखर जान देऊन पानात येणारी एकटी कोंबडी असते." तेव्हा कुठलीही असो अन कशीही असो कोंबडी उत्तमच असते. अगदी उकडलेले पीस असले तरी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 10/13/2016 - 17:51 नवीन
खरोखर जान देऊन पानात येणारी एकटी कोंबडी असते.
बकरी, बोल्हाई, कोलंबी आणि मासळी या सर्व जान देऊनच पानात येतात. एकट्या कोंबडीचा उल्लेख केल्याबद्दल णिशेध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कविता१९७८ गुरुवार, 10/13/2016 - 14:01 नवीन
हो हे वि आय पी तिकिट असेल तर जेवणासाठी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ग
गंम्बा गुरुवार, 10/13/2016 - 13:28 नवीन
फिल्म सिटी मधे रहायची सोय आहे. नेट वरुन बुकींग पण होते. तिथेच रहा. आधी हैद्राबाद मधे मुक्काम करा. हैद्राबाद दर्शन झाले की सकाळी आरामात निघुन १०-११ च्या सुमारास फिल्म सीटी ला पोहचा. तो दिवस फिलम सिटी बघण्यात घालवा. रात्री मुघल गार्डन सारखी बाग आहे त्यात सुंदर लायटींग असते. रात्रीच्या जेवणा ची सोय तिथेच असते बुफे प्रकारात. बर्‍याच वेळेला रात्री गाण्यांचा शो पण असतो. दुसर्‍या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट असतो तो घ्यायचा, अजुन काही बघायचे असेल तर बघायचे आणि बॅक टू हैद्रबाद.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 10/13/2016 - 13:31 नवीन
हैदराबादहून रामोजी फिल्म सिटी बरीच लांब आहे. पण तुम्हाला जर हैदराबादमध्येच राहायचं असेल तर वनस्थलीपुरम भागात राहा. फिल्म सिटीचा रस्ता तिथूनच जातो. बिर्याणीसाठी पॅराडाईज (सिकंदराबाद मधलं) छान आहेच, पण नामपल्ली (हैदराबाद) स्टेशनजवळ बावर्ची म्हणून एक आहे. ते अप्रतिम आहे. अजून चौकी का खाना झोमॅटोवर बघून घ्या. चारमिनारजवळ आणि जियागुडा भागात बिर्याणी छान मिळते. अर्थात इथे 'टूरिस्ट' रेस्टॉरंट्स नसतील. पण चव आणि quantity दोन्ही जबरदस्त!
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि गुरुवार, 10/13/2016 - 13:54 नवीन
सालारजंग म्युझीयम , गोवलकोंडा किल्ला काही स्पेशल खाण्याची ठिकाणे - आंध्रा मील ( आता त्याला कदाचित तेलंगणा मील म्हणत असावेत .)
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ गुरुवार, 10/13/2016 - 14:05 नवीन
सालारजन्ग म्युझियम तस चान्गलय पण आम्हाला पाहायला जरा कन्टाळवाण वाटल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
क
कंजूस गुरुवार, 10/13/2016 - 15:51 नवीन
(दोन वर्षांपुर्वीच्या माहितीपत्रकातले रेट्स आहेत) CONDUCTED TOUR' 1. City' Tour: (Daily) Covers Birla Mandir, Qutab Shahi Tombs, Golconda Fort, Salarjung( closed on Friday), Zoological Park, (closed on Monday), Osmanasagar, drive past Mecca Masjid and Charminar and Lumbini Park, Timings: 0745-1900 hrs. Fare: Rs. 450/- (Adult) & Rs. 360/- (Child). Fare includes entry fee for Museum, Palace. Entry fee charged extra for Foreign Tourists at Museum, Fort and Nizam Jubilee 2. Golconda Fort (Daily): Covers State Fine Art Gallery, Sound and Light show at Golconda Fort,(closed on Monday) Lumbini Park via Charminar, Boat Ride at Hussainsagar Lake. Timings: 1700 to 2200 hrs. Fare: Rs. 450/- (Adult) & Rs. 350/- (Child). Fare includes entry tickets, dinner (veg) on cruise and transportation. 3. Ramoji Film City Tour: Covers Sai Baba Temple, Sanghi Temple, Ramoji Film city. Timings: 0700 to 1900 hrs. Fare: Rs. 800/-(Adult), Rs.700/-(Child) (includes transportation & entry fee for film city). 4, Srisaillam Tour (Daily): Tour covers Mallikarjuna Swamy Temple, Sakshi Ganapati, Dam & Ropeway. Timings: 0600 hrs to 2000 hrs. Fare: Rs.415/- (Non A/c Coach), Rs.700/- (A/c Coach) 5. Heritage Half Day Tour: Covers Buddha statue at Lumbini Park, Salarjung Museumprive through Charminar, Chowmahalla Palace,Golconda Sound & Light Show ,State Fine Arts Gallery & Lumbini Park ( Terminating Point) from Tank Bund Road. Dep.: 1400 hrs. & Arr.: 2100 hrs. Fare: Rs.350/- (Adult) & Rs.280/- (Child) (Including entry tickets) 6, Tirupati, Tirumala and Tirchanur Tour: (4 days tour) Every Friday covers Tirupati, Tirumalai, Tiruchanur, Srikalahasti, Kanipakam, Srinivasa Mangupuram and Kapila Teertham Dep: 1800 hrs Arr. 0600 hrs day) Fare: Rs.2600/-(Adult); Rs.2080/-(Child) includes accommodation at Tirupati and Sudarshan token).
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 10/13/2016 - 16:13 नवीन
शक्य असेल तर रामोजी फिल्म सिटीमध्ये नक्की रहा. संध्याकाळी गर्दी गेल्यानंतर तिथली गार्डन्स किंवा इतर वास्तुंमध्ये फिरायला फार सुंदर वाटते. निशीगंधाच्या फुलांचा मंद वास, नितळ चांदणं, त्यात भिजलेले संगमरवरी महाल , निरव शांतता एकदा अनुभवून पहा. एकदम royal वाटतं. तिथल्या रुम्स, जेवण तर अप्रतिम. शिवाय तिथल्या होटेलमध्ये रहात असाल तर आत कुठल्याही शो किंवा राईडला तिकीट लागत नाही. (4-5वर्षांषांपूर्वी नव्हतं, आत्ताचं कन्फर्म करा.)
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ गुरुवार, 10/13/2016 - 17:07 नवीन
फार सुंदर आहे रामोजी फिल्म सिटि.जाऊन बरीच वर्ष झाल्याने सध्याचे नियम वा रेट माहित नाहि पण रहायची सोय चांगलिये. आतल्या आत फिरायला बसची सोय चांगली आहे. हव तिथे उतरून पाहुन परत या वा पुढची बस पकडा.पूर्वी तरि खाण्याचे आत घेऊन जाता येत होते. आत सगळी सोय आहेच.आत असलेले वेगवेगळे शॊ चुकवु नका. बाकी हैद्राबादेत गोवळकोंडा किल्ला,लुंबिनि पार्क तिथला लेझर शॊ,एन टी आर गार्डन,सालारजंग म्युझियम,चारमिनार,सुधा कार म्युझियम,प्राणिसंग्रहालय,बिर्ला मंदिर हि ठिकाण आवडली. चिमुकली बरोबर आहे म्हणता तर तिला यातल काय आवडेल तस बघा .एन टि आर गार्डन आणि झु बघा.दोन्हिकडे टोय ट्रेन आहे फिरायला शिवाय झु मधे आत फिरायला वेगळ्या गाड्याहि आहेत.एन टि आर मधील फळांच्या, कीटकांच्या मोठ्या प्रतिकृती मुलांना आवडतात.किल्ला, म्युझियम,मंदिर याठिकाणी कदाचित ती कंटाळेल.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी गुरुवार, 10/13/2016 - 18:22 नवीन
व्हि आय पी तिकीट घ्या.यात वाॅटर बाॅटल आणि चाॅकलेट पण मिळतील.एकूण गर्दी बघता व्हि.आय.पी बरे पडते.यात एक राईड पण असते ती नाॅर्मल तिकीट मध्ये नसते.पॅराडाईज बकवास एकदम.शादाब ट्राय करा.गोवलकोंड्याचा नाईट शो नाही बघितलात तरी चालेल. आणि ईच्छा झालीच तर फुल कपडे घालून जा.डास दोन मिनीट बसू देणार नैत तिथे. आम्ही विवांता ला राहिलो होतो. वेळ असेल तर रामोजी पासून पुढे पोचमपल्ली ला जा. वहिनी खुष होतील.आम्हाला नवर्याच्या ओफिस मधले एक कलिग भेटले तिथे मग आम्ही सगळे मिळून रात्री आठ वाजता निघालो तिथे जायला. आणि एका विणकराच्या घरी जावून साड्यांची खरेदी केली तिथे.काय मस्त मस्त साड्या मिळाल्या तिथे.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी गुरुवार, 10/13/2016 - 18:27 नवीन
सुधा कार म्युझियम आणि प्राणिसंग्रहालय जवळ जवळ आहेत.३ ते ४ किमी अंतर असेल.चार पाच वाजता बिर्ला मंदिर ला जा तिथून लुंबिनी पार्क जवळ आहे. सहा वाजता तिकडे पोहोचून सातचा लेसर शो पहा.शक्य झाल तर शेवटच्या रांगेत बसा वरच्या.छान व्हू मिळतो.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो गुरुवार, 10/13/2016 - 19:35 नवीन
या बाबत हैद्राबादला काही कमी नाही. भरपूर चॉइस आहे प्रत्येकाची आवड त्यानुसार खायचे. रामोजी बद्दल सर्वींनी माहीती दिलीच आहे. मस्त जागा आहे दिवस जातो. गाडी करुन गेलात तर सकाळी नउ ते संध्याकाळी सहा सात पर्यंत तिथे थांबायचे. खाण्यासाठी - गोविंद बंडी चारमिनार आणि बंजारा हिल्स उत्कृष्ट दोसा, राम बंडी दुसरा नंबर. - कराची बेकरी नामपल्ली, तसे कराची बेकरीचे बरीच दुकाने आहेत हे मुख्य. - पॅराडाइज सिकंदराबाद. हे सुद्धा शहराच्या प्रत्येक भागात आहे परंतु मुख्य पॅराडाइज हे त्याच नावाच्या चौकात सिकंदराबाद मधे. व्हेज बिर्याणीच खायची असेल तर इथे जाउ नये. मटन बिर्याणी उत्तम असते असे ऐकून आहे. - बावर्ची, शा घोस (नक्की उच्चार कसा ते माहीत नाही), पिस्ता हाउस बिर्याणी अगदी खास हैद्राबादी परत व्हेज असेल तर जाउ नये. - फेमस आइस्क्रिम नामपल्ली - शाकाहारी साठी ताजमहाल, चटणीज, संतोष धाबा अॅबीडस. चटणीज मधे मला आवडनार म्हणजे बाबाइ हॉटेल इडली, स्टिम दोसा, ओनियन रवा मसाला दोसा बघण्याची काही ठिकाणे - फलकनुमा पॅलेस पण बघण्यासारखा आहे. तेलंगणा सरकार हेरीटेज इमारतीची सैर घडवते गाइड सोबत. पायीच फिरावे लागते सकाळी असते. - भोंगीर फोर्ट - हुस्सेन सागर, बोट राइड आणि लुंबीनी लेझर शो - ओस्मान सागर लेक आणि हिमायत सागर लेक. हल्ली पूर्ण भरुन आहे. शहराच्या दुसऱ्या बाजूला आहे. तलावाशिवाय फार काही नाही. - प्राणिसंग्रहालयात तीन ते चार तास जातात. जायचे दोन तास वेगळे. लग्नाच्या वाढदिवसाला जायचे आहे म्हणून लंचसाठी एक जागा सुचवतो फक्त रामोजीपासून खूप लांब आहे आणि तुलनेत महाग आहे. तुम्ही नेटवर बघू शकता. गोवलकोंडा रिसोर्टच्या आत ज्वेल ऑफ निझाम. पहीला नंबर फलकनुमा पॅलेस आणि दुसरा हे हॉटेल. इथे निझामी पद्धतीचे जेवण आणि सेवा असते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 10/14/2016 - 03:42 नवीन
रामोजि फिल्म सिटी फोटो त्यांच्या माहिती पत्रकातून १) १/२ Image removed. २ ) २/२ Image removed.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 10/14/2016 - 04:06 नवीन
रामोजी भेट हा एक रम्य अनुभव आहे. हैद्राबाद मधून बस ची सोय आहे. चालण्याची तयारीही ठेवावी तर मजा आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 10/14/2016 - 06:46 नवीन
धन्यवाद मिपाकर बंधू आणि भगिनींनो...!! अप्रतिम प्रतिसाद. माझी 80% टक्के सहलीची तयारी आजच झाली. फक्त स्वतः गाडी हाकत घेऊन जाऊ की रेड बस.कॉम वरून बस बुक करून मस्त माझ्या दोन्ही पिल्लाना कुशीत घेऊन प्रवास करू एवढ्याच विवंचनेत आहे. हैद्राबाद मध्ये एखादी कॅब करता येईल.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Fri, 10/14/2016 - 07:34 नवीन
हैद्राबादला म्युझियम , पार्क, बिर्ला मन्दीर जवळ आहे पण रामोजी वैगरे बरेच लाम्ब आहेत , त्यानुसार ठरवा. हैदराबादेत स्नो वर्ल्ड ला गेलो होतो, मुलाना आवडेल तुमच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मी-सौरभ Fri, 10/14/2016 - 10:28 नवीन
बस पेक्शा आगगाडि चांगला पर्याय आहे. दुरन्तो का कहीतरी ए सी गाडी आहे. पहाटे निघते आणि मध्यरात्री परतते. सहसा तिकीटे ऊपलब्ध असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
र
रॉजरमूर Fri, 10/14/2016 - 15:33 नवीन
शताब्दी एक्सप्रेस ............! आहे ती . 12025 पुणे -सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस . पुण्याहून सकाळी 05:50 ला निघून दुपारी 2:20 वाजता सिकंदराबाद ला पोहोचते . बिर्याणीसाठी सिकंदराबाद मधील पॅरॅडाईस बेस्ट .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
म
मी-सौरभ Fri, 10/14/2016 - 15:35 नवीन
योग्य गाडीची महिती दिल्याबद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर
अ
अभ्या.. Fri, 10/14/2016 - 15:46 नवीन
शताब्दीच्या रेटमध्ये तीनदा प्रवास होईल एक्सप्रेसचा. अर्थात डबे आणि सर्व्हिस चांगली असते, फास्ट असते, क्रॉसिंग, स्टॉप न के बराबर. पण एक्स्प्रेसचे खूप ऑप्शन आहेत की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
क
कंजूस Fri, 10/14/2016 - 15:47 नवीन
निघण्या - पोहोचण्याच्या दृष्टीने कुटुंबाला कोणार्क एक्स बरी नाही का? गाडीत एक रात्र काढावी लागली तरी पोहोचल्यावर पावणेआठला हॅाटेलात जाऊन चेकइन करून त्या दिवसाचा अर्धा दिवस आरामात मिळतो. ५-५० ची गाडी पकडणे काही भागातून अशक्य आहे. पिंचिंतून येणारे असतील तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर
र
रॉजरमूर Fri, 10/14/2016 - 20:47 नवीन
हो .
५-५० ची गाडी पकडणे काही भागातून अशक्य आहे. पिंचिंतून येणारे असतील तर?
अगदी बरोबर .... कोणार्क चांगली आहे . त्याचबरोबर , 17031 हुसेनसागर एक्सप्रेस पण पर्याय चांगला आहे पुण्याहून दुपारी 04:30 ला निघून दुसऱ्या दिवशी सकाळी 6:00 ला पोहोचते हैदराबाद नामपल्ली ला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
म
मित्रहो Sat, 10/15/2016 - 04:42 नवीन
ती हुसेन सागर नाही, ती हैद्राबाद एक्सप्रेस आहे. हुसेन सागर रात्री दीड की दोनला पुण्यावरुन निघून दुपारी अडीचला हैद्राबादला पोहचते. पुण्यासाठी मुंबइ एक्सप्रेस किंवा येताना हैद्राबाद एक्सप्रेस तर मुंबइवरन हुसेन सागर आणि डुरांटो सोयीचे असते. वेळेवर प्रवास असेल तर शताब्दी उत्तम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर
व
विशुमित Sat, 10/15/2016 - 07:47 नवीन
कोणार्क बरी वाटतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
त
त्रिवेणी Fri, 10/14/2016 - 07:21 नवीन
आम्ही पुण्यातून गाडीने गेलो होतो.नविन आटूकमाटूक झेस्ट चालवायची होती नवर्याला म्हणून.सोलापूर पासून पुढे लईच बेक्कार रस्ता आहे.म्हणायला फक्त राष्टीय महामार्ग.पण छोटा आहे. त्यात बर्याच ठिकाणी रुंदिकरणाच काम सुरु होत. आम्ही सकाळी साडेपाचला घरातून निघालो ते पाच वाजता हैद्राबादला पोहोचलो.रस्त्यात चांगली होटेल नाहित.त्यात हैद्राबादचे ट्रैफिक पुण्यापेक्षा बेक्कार. आम्ही एकूण पाच दिवस होतो त्यातले फक्त दोन दिवस स्व:तची गाडी बाहेर काढली त्यातला एक दिवस रामोजीला नेली होती.बाकी दिवस ओलाने फिरलो.मुल खुप लहान असतील तर स्व:तची गाडी न नेलेलीच बरी.कंटाळतील ते.सरळ तिकडे गेल्यावर ओला वापरा.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 10/14/2016 - 08:34 नवीन
तोच विचार आहे...!! पिल्लांसाठी मला जास्त वेळ आणि लक्ष देता येईल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
अ
अभ्या.. Fri, 10/14/2016 - 08:46 नवीन
मस्त. बर्थडेपार्टीसाठी हैद्राबाद मस्त. आमची पण मस्त झालेली. प्याराडाईज आणि आयटीसी काकतीयाला जेवलेलो. सालारजंग जब्बरदस्त. दिवस त्यात गेला भारीपैकी. घड्याळाचे टोले पण पाहिले. बिर्ला मंदीर, लुंबिनी वगैरे पाह्यले. कार म्युझियम भंकस आहे. लहान पोरांना आवडेल. चारमिनारावाली चायबी पिये. मोस्ट मेमरेबल ट्रीप झाली आयुष्यातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
असंका Tue, 10/18/2016 - 14:03 नवीन
कार म्युझियम भंकस आहे
+१.. पण ऑप्शन म्हणून माहित असावं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
क
कविता१९७८ Fri, 10/14/2016 - 07:42 नवीन
मोत्यांचे दागिने सगळीकडे सेम पण किमतीत फरक असतो. ४-५ दुकाने फीरुन नंतर घ्या. आम्हाला प्लस पॉईंट हा होता की मैत्रीण आणि तिच्या नवर्‍याचा क्लासमेट तेलंगणाचे ए.सी.पी. महेश भागवत. त्यांना भेटायला गेलो त्यांच्या ऑफीसमधे गेलो तर त्यांनी त्यांच्या ओळखीच्या ज्वेलरला फोन केला होता. त्या ज्वेलर ने सगळे सेटस अर्ध्या किमतीत दिले म्हणजे ज्याची प्राईस ३५ के लिहिली होती तो सेट १७.५ के असा मिळाला. म्हणजे खुप जास्त मार्जिन असतो मोत्यांच्या सेटसवर त्यामुळे बार्गेन करा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 10/14/2016 - 08:30 नवीन
एकूण वाढदिवस गाजणार तर!!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 10/14/2016 - 08:40 नवीन
हा हा हा ..... तुमच्या सर्वांचे एवढे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यावर नक्कीच गाजणार त्यात काहीच संशय नाही..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
आ
आशुतोष-म्हैसेकर Fri, 10/14/2016 - 08:43 नवीन
मी हैदराबाद मध्येच राहतो, आणि हे ऐकून मला भेटणारा प्रत्येक नवीन माणूस हाच प्रश्न करतो, म्हणजे तू रामोजी फिल्म सिटी पहिली असणार...! खरं म्हणजे जन्मापासून हैदराबादचा संबंध असताना मी कधीच रामोजी फिल्म सिटी पाहिलेली नाही, त्या बद्दल महाराष्ट्रात सगळ्यांनाच भयंकर आकर्षण आहे,ती सुंदर आहे असंही ऐकलंय. पण एक हैदराबादी म्हणून तुम्ही हैदराबादला येऊन हैदराबाद न पाहणं म्हणजे तुमची सहल व्यर्थ होईल. केवळ रामोजी फिल्म सिटी करिता हैदराबादला येण्याऐवजी, हैदराबादला येऊन रामोजी फिल्म सिटी पाहणं जास्त मजा देऊन जाईल असं मला वाटतं, बाकी हैदराबाद मध्ये प्रसिद्ध स्थळांकडे ओढा तर आहेच पण बरीच अपरिचित किंवा अल्पपरिचित ठिकाणं आहेत जी पाहून सहल सार्थ करता येते
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 10/14/2016 - 09:14 नवीन
सालारजंगला जाल तर अकरा वाजता आत जाऊन तो तळमजल्यावरचा पडदेवाला पुतळा पाहा नंतर घड्याळाच्या दालनात जागा पकडून बसा साडेअकराला. बाराचे बारा ठोके पाह्यला नंतर दुसय्रा मजल्यावर २६ नं हिरे माणकांचे दालन पाहा. त्यानंतर त्याच मजल्यावर चाइनिज रेशमी भरतकाम पाहा. यानंतर उत्साह असलाच तर इतर दालने पाहा. यानंतर ओटो रिक्षाने चार मिनारला जा ( २०रु). स्ट्रीटफुड तिथे चाखल्यावर तुमची बांगड्या वगैरे खरेदी करता येईल. लहान मुले असल्याने अर्धा दिवसच साइटसिइंग करावे. फार ताणून सर्वच बघु नये.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 10/14/2016 - 09:17 नवीन
विचारांशी नक्कीच सहमत. रामोजी हैदराबादची नवीन पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख आहे असा समज झाली असल्या कारणाने असू शकते. रामोजीला पूर्ण अक्खा दिवस जातो (तरी सुद्धा संपूर्ण पाहता येत नाही) असे ऐकून आहे. वेळेचे काही बंधन नाही फक्त चिमुकली सोबत असल्या कारणाने फक्त निवडक स्थळ पाहण्याचा मानस होता. तरी सुद्धा शक्य तेवढे परिचित आणि अल्पपरिचित ठिकाणं पाहून सहल सार्थ करण्याचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Fri, 10/14/2016 - 11:13 नवीन
ईतकही खुप खुप छान नाहीये, सगळी कडे फील्मचे सेटस् अन पुतळे बसवलेत माणसान्च्या जागी, पक्षी पाहायला बरे वाटतात, वि आय पी जेवण मस्त अन जेवल्यानन्तर चे तीन शोज, दिवस सम्पतो. शेवटी ते सिनेमाच्या शुटीन्ग साठीच तर बनवलय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
  • 1
  • 2
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा