Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रामोजी फिल्म सिटी बद्दल माहिती हवी आहे...!!

व
विशुमित
गुरुवार, 10/13/2016 - 12:37
💬 80

नमस्कार मंडळी..!!

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आमच्या लग्नाच्या वाढदिवस प्रितेर्थ रामोजी फिल्म सिटी (हैद्राबाद) पाहण्याचा मानस आहे. नुसता मानस च नाही तर संकल्प सुद्धा सोडला गेला आहे. अर्थातच म्याडम साहेबानी ...!!
अंतर जालावरती खूप पुनरावलोकन तपासली पण मनाचे समाधान नाही झाले.
त्या बद्दल मिपा कर मंडळीं कडून खालील माहिती हवी आहे.

****सदस्य संख्या- प्रौढ 2 आणि 1 चिमुकली (वय वर्ष 2.5)
****वेळ- 2 रात्री 3 दिवस

1) रामोजी सिटी पूर्ण पाहायची आहे.
2) फिल्म सिटी मध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे (Do 's अँड Don't 's )
3) आत मध्ये कोणत्या वयक्तिक वापराच्या वस्तू घेऊन जाऊ शकतो आणि कोणत्या नाही.
4) फिल्म सिटी मध्ये राहण्याचा पर्याय ठीक आहे का बाहेर हैद्राबाद मध्ये राहिलेला बरं पडेल.
5) फिल्म सिटी व्यतरिक हैद्राबाद मध्ये एका दिवसामध्ये पाहण्या सारखा कोणती ठिकाणे आहेत.
6) सर्वात महत्वाचं हैद्राबादी बिर्याणी खाण्याची कोणती प्रसिद्ध ठिकाण आहेत? अर्थात आणखी काही स्पेशल खाण्याची ठिकाणे असतील, ते पण कृपया नमूद करावी.

###


प्रतिक्रिया द्या
49107 वाचन

💬 प्रतिसाद (80)
क
कविता१९७८ Fri, 10/14/2016 - 11:20 नवीन
सगळी कडे फिल्म सेट्स उभारले आहेतस, सारखे सेट्स तरी किती पाहणार. फक्त योजनाबद्ध बांधकाम आहे , एखाद्या रीसॉर्ट मधे गावाची थीम घेउन घर आणि पुतळे काम करताना ठेवलेले दिसतात तसच आहे रामोजी मधे. उलट ते सेट्स तर फक्त एकेरी भिंत आहे, म्हणजे घर आणि बंद दरवाजा असा सेट आहे म्हणजे एक एकेरी भिंत त्याला रंगवुन एक दरवाजा लावलाय, दरवाजा उघडला कि समोर रान माजलेलं दिसतं घर वगैरे काही नाही. ओम शांति ओम आणि चेन्नई एक्स्प्रेस ची शुटींग तिथे झालिये. गेल्यावर सीन्स आठवतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
क
कविता१९७८ Fri, 10/14/2016 - 11:21 नवीन
पण एकदा पाहण्यासारखं नक्कीच आहे, जसे आनंद सागर बाग - शेगाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
आ
आशुतोष-म्हैसेकर Sun, 10/16/2016 - 14:27 नवीन
हो, रामोजी हे एक मोठे शहर असल्यागत आहे, आणि इतक्या लांब येऊन एक दिवस नक्की राखून ते पहावं कारण पूर्ण भारतात असे कुठे पाहायला मिळणार नाहीये. बाकी हैदराबाद की बाता नक्कोच करो,पुरी जिंदगी चारमिनार पे निकल गई तो बी हैदराबाद जीना नै होता.इदर उधर गल्ली गल्ली में चकाचौन्ध शोरशाराबा रेहता. हमारे इस्मैल भाई तो २५ साल से चारमिनार पे दुकान चलारे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
वामन देशमुख Fri, 10/14/2016 - 10:41 नवीन
हैद्राबादेतील ऑथेंटिक चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, नाहारी पाया, चिकन नाहारी (फक्त शनिवारी संध्याकाळी), तंदूर चिकन, रेशमी कबाब इ. खाण्यासाठी शाह गौस हे हॉटेल चुकवू नका.
  • Log in or register to post comments
प
पद्माक्षी Fri, 10/14/2016 - 10:53 नवीन
हैद्राबादमध्ये बघण्याची ठिकाणे; रामोजी, चारमिनार, गोळकोंडा फोर्ट, नेहरू झू , १. रामोजी :- खूप मोठे आहे. गर्दी असली तरी फरक पडत नाही. आत फिरायला बसेस असतात. रामोजीची साईट आहे. तिचे सर्व माहिती मिळेल. आतल्या राइड्स आणि बस प्रवास तिकिटात अंतर्भूत असतो. लहान मुलांसाठी छोट्या छोट्या राइड्स पण आहेत. नाताळच्या वेळी रामोजीमध्ये कार्निवल असते त्यावेळी जाण्यात जास्त मजा असते. एकूण पूर्ण दिवस आरामात जातो. तिथले नवीन पक्षी संग्रहालय खूप छान आहे. रामोजीमध्ये रहाण्यात फारसा फायदा नाही. हॉटेलचे दर खूप आहेत आणि शहरापासून रामोजी बराच लांब आहे (६० किमी ). २. चारमिनार : चारमिनार जवळचा बाजार चांगला आहे. घासाघीस बरीच होते असे ऐकून आहे. चारमिनार मध्ये बघण्यासारखे खास काही नाही. ३. गोलकोंडा फोर्ट : किल्ला चांगला आहे. गाईड घेतला तर जास्त माहिती कळते. चढायला फार अवघड नाही. चढून उतरायला जास्तीत जास्त दीड ते दोन तास लागतात. लेझर शो ठीक आहे. अमिताभचा आवाज आहे. ४. नेहरू झू : झू चांगले आहे. पुण्याच्या झूपेक्षा बरेच जास्त प्राणी आहेत. मुलांना मजा येते. कार museum मुलांना आवडेल. नेहरू झू पासून अगदी जवळ आहे. ५. खाण्यापिण्यासाठी : पॅराडाइज बिर्याणी (याच्या बऱ्याच शाखा आहेत), शाकाहारी लोकांसाठी chutneys, खायप्यायला काही प्रॉब्लेम नाही. भरपूर हॉटेल्स. ६. खरेदीसाठी मॉल्स : फोरम मॉल, इनॉर्बिट, GVK मॉल. Ola, Uber आणि इतर बऱ्याच कॅब आहेत. आरामात मिळतात. नोव्हेंबरमध्ये हवा चांगली असते. उन्हाचा त्रास होऊ नये.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 10/14/2016 - 11:23 नवीन
पारंपारीक वस्त्र खरेदी साठी - आर एस ब्रदर्स , चंदना ब्रदर्स , पटनी'स सेंटर . अपरिचित किंवा अल्पपरिचित ठिकाणं - क्लॉक टॉवर , चिलकुर बालाजी , नेकलेस रिंग रोड - हुसेन सागर तलाव
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 10/14/2016 - 11:56 नवीन
टाकलेला म्याप स्पष्ट दिसतो का मोठा केल्यावर?
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Fri, 10/14/2016 - 16:15 नवीन
बर्यापैकी वाचता येतय काका.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 10/15/2016 - 05:48 नवीन
हैदराबादचा सिटी म्याप टाकू का ( तुकड्यात)?गुगलचा/नेटवरचा चांगला असेल तर नाही टाकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
क
कंजूस Sat, 10/15/2016 - 10:57 नवीन
हैदराबाद/ सिकंदराबाद शहर नकाशा माहितीपत्रकातून १/४ ) उजवीकडे वर Link:https://c4.staticflickr.com/6/5632/29700762603_79abf79a94_k.jpg २/४ )उजवीकडे खाली Link:https://c7.staticflickr.com/8/7532/30296913126_768e186c6f_k.jpg ३/४ ) डाविकडे खाली Link:https://c7.staticflickr.com/6/5789/30035233470_ab3dccc02b_k.jpg ४/४ ) डाविकडे वर Link:https://c1.staticflickr.com/9/8560/30035244000_728665fdb3_k.jpg हैदराबाद/ सिकंदराबाद शहर नकाशा माहितीपत्रकातून १/४ ) उजवीकडे वर Image removed. २/४ )उजवीकडे खाली Image removed. ३/४ ) डाविकडे खाली Image removed. ४/४ ) डाविकडे वर Image removed.
  • Log in or register to post comments
श
शिद Sat, 10/15/2016 - 13:54 नवीन
चांगली माहीती मिळाली. कधी हैद्राबादला जायचं असलं तर हा धागा कामाला येईल.
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Sun, 10/16/2016 - 14:59 नवीन
रामोजी ' फ्लिम ' सिटी , ऐवजी ' फिल्म सिटी ' च म्हणायचे आहे ना ? नाहीतर ' बायकांनी ' ऐवजी ' बायकांना ' सारखा घोटाळा व्हायचा !
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 10/17/2016 - 06:50 नवीन
ओह्ह्ह..तरी मी म्हणतोय शब्दामध्ये काहीतरी गडबड दिसतेय... लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि
M
mayurpankhie Mon, 10/17/2016 - 11:42 नवीन
सध्या हैदराबाद मध्ये राहत आहे . सुरुवात रामोजी पासून करते, ३ वर्ष्यांपूर्वी गेले होते. फार काही बदल झालेला नाहीये. प्रचंड मोठ आहे, खूप चालायला लागत, मुलांसाठी शक्य असेल तर pram, stroller जवळ असू द्या. मुलांना कंटाळ येऊ शकतो. VIP पास घ्या, यात lunch आणि snacks , water bottle, caps, २-३ राइड्स , बस आणि एक guide मिळेल. हा गाईड सर्व माहिती देतो, उदाहरण म्हणजे अमुक अमुक एका पिक्चरच्या एका सीन मध्ये हे दाखवलाय वगरे वगरे. तिकीट बद्दलची माहिती तुम्हाला नेट वर मिळेल. यांच्या टूर AC बसेस पण आहेत. तुम्ही कॅब ऐवजी बस ने जाऊ शकता. नोव्हेंबर एन्ड ला थंडी असली तरी हैदराबाद मध्ये कधीही ऊन वाढू शकत म्हणून मुलाची विशेष काळजी घ्या. बाकी सगळी माहिती तुम्हाला आत्तापर्यंत मिळाली आहेच. रामोजी व्यतिरिक्त बघण्यासारखी ठिकाणे - बिर्ला मंदिर , नेकलेस रोड, लुम्बिनी पार्क, हुसेन सागर, सालारजंग , स्नो वर्ल्ड, कार म्युझियम, चारमिनार (वरती जाऊन बघण्यात काही पॉईंट नाही, खूप खराब आहे ), नेहरू झू पार्क, Escape अम्युझमेंट पार्क , पुरी जगन्नाथ टेम्पल (प्रति पुरी मंदिर ), फलकनुमा पॅलेस टूर , गोलकोंडा. सालारजंग , झू मुलांना जरा बोर होईल. खाणे : नॉन व्हेजिटेरियन असाल तर असंख्य ऑपशन्स. पॅराडाईज पेक्षा बावर्ची, शाह गौस , रायलसीमा रुचूलू इथे अप्रतिम बिर्याणी मिळते. पॅराडाईज मध्ये ब्रेकफास्ट ला खिमा पाव मिळतो. खाल्ला नाहीये पण फेमस आहे. तुम्ही ट्राय करू शकता. absolute barbeque, खान साब, Ohari 's - Rubayat , नौटंकी गली छान आहे. Chutney's प्युअर व्हेज आहे आणि साऊथ इंडियन स्पेशल. इथे ६ प्रकारच्या चटण्या आणि सांभर सर्व्ह करता प्रत्येक डिश सोबत. बबई इडली खाच. बिकानेरवाला अजून एक व्हेज ऑप्शन. Jewel of Nizam हा एक चांगला experience असेल तुमच्या एनिवर्सरी साठी. पण जायच्या आधी खात्री करा, इथे डिनर साठी लहान मुले allowed नाहीत (१२ वर्षा खालील) लंच साठी बहुदा असावेत. शॉपिंग : मोती फेमस , काही लोक स्टोन्स फेमस सांगता पण खर तर मोतीच फेमस आहे. Mangatrai , जगदंबा पर्ल्स , krishna pearls हे जेवेलर्स आहेत. Abids , चारमिनार मध्ये guarantee नाही. इथे सगळे लोक तुम्हाला मोती जाळून दाखवतील, त्यावर विश्वास नका ठेवू. चारमिनार च्या जवळ चुडी बाजार , अत्तर मार्केट आहे . खूप भाव करावा लागेल. नल्ली सिल्क , साऊथ इंडिया शॉपिंग मॉल, चेन्नई शॉपिंग मॉल इथे सिल्क शॉपिंग करू शकता. लहान मुलींसाठी जसे आपल्याकडे इरकल परकर पोलके मिळता तसे इकडे सिल्क चे मिळता. Half saree फेमस प्रकार. तुमच्या ट्रिप साठी शुभेछया !!!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 10/17/2016 - 11:47 नवीन
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद...!!
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी गुरुवार, 10/20/2016 - 09:39 नवीन
येत्या फ्रेब्रुवारीत हैद्राबाद व श्रीशेल्यला जाण्याचा विचार करतोय. त्यावेळी हा धागा नक्कीच उपयोगी पडेल. तरी यासाठी सर्वांचे आभार. शक्य झाल्यास आणखी एक मदत करावी. राहण्यासाठी चांगली हॉटेल, त्यांचे पत्ते व फोन नं. मिळाले तर बरे होइल.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 10/21/2016 - 12:45 नवीन
१. पार्कलेन , २. कामत -- सिकंदराबाद , ३. मांडवा'स इन ४. लेमन ट्री -- माधापुर हि काहि चांगली हॉटेल्स माहित आहेत . यांचे पत्ते व फोन नं हे नेटवर मिळतीलच . काहि शंका असल्यास त्याही फोनवरच त्यांना विचारुन घ्याव्यात .
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Sun, 10/23/2016 - 07:05 नवीन
आम्ही विवांता मध्ये राहिलो होतो.छान अनुभव होता.
  • Log in or register to post comments
व
विखि Wed, 11/30/2016 - 17:48 नवीन
मागच्या आठवड्यात हैदराबाद ला जाणे झाले. वरील सर्वे माहीती कॉपी पेस्टुन् गेलो होतो. हाडाचा खादाड असल्यामुळ आनी बरोबर पण सगळेच तसले असल्यामुळ वरती दिल्याप्रमाने पॅराडाइज बिर्याणी, बावर्ची, गोकुळ चाट, फेमस आइसक्रिम सगळे पालथे घातले. तसेच वर दिल्याप्रमाने रामोजी ला जायचा सर्वात स्वस्त मार्ग ( कोटी वरुन) ही माहीती लै उपयोगी ठरली. ४२ रुपये मधे रामोजी ला जाउन आलो. नामपल्ली रेलवे स्टेशन समोरच एक धर्मशाळा आहे. छान हवेशीर आहे. स्वस्त न मस्त. वरील सर्व माहीती पुरवल्याबद्दल सर्वान्चे आभार.
  • Log in or register to post comments
B
babubobade Sun, 08/06/2017 - 10:07 नवीन
ऑक्टोबरमध्ये जायचे आहे.. तीन दिवस कॉन्फ्रन्स + २ दिवस ....
  • Log in or register to post comments
B
babubobade Sun, 08/06/2017 - 10:26 नवीन
रहायला हे कसे आहे ? http://www.countryclubhyderabad.com/ कॉन्फ्रन्स बंजारा हिलच्या एका हॉटेलात आहे. म्हणून रहायची व्यवस्था बंजारा हिलच्या जवळ हवी .
  • Log in or register to post comments
ह
हर्मायनी Fri, 02/09/2018 - 05:50 नवीन
Birla Mandir, Chowmahalla Palace, Charminar, Mecca Masjid & Shopping at Laad Bazaar(By walk), Salarjung Museum(Lunch Break), Nizam Jubilee Pavilion(purani haveli), Golconda Fort, Qutub Shahi Tombs(Drive through), Lumbini Park -(Terminating point) हे एका दिवसात फिरून होऊ शकते का? साधारण किती वेळ लागू शकेल? हि इटिनेररी त्यांच्या ऑफिशिअल टुरिझम साईट वर दिली आहे. तसेच, २ व्हीलर रेंट करून फिरणे कितपत योग्य? आम्ही दोघेच आहोत. आणि कुठून रेंट करता येईल? या वीकेंडला जात आहोत..
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 02/09/2018 - 07:42 नवीन
यादीतला क्रम तसाच आहे का? तो फिरवून स्वत: ओटो करून जा. बरीच ठिकाणे बोगस आसेत अथवा वेळखाऊ आहेत.
  • Log in or register to post comments
ह
हर्मायनी Fri, 02/09/2018 - 08:19 नवीन
हो. तसाच आहे.. तुम्ही काय बदल सुचवाल ? आमचं आम्हीच फिरू.. आमच्या कडे फिरायला एकच दिवस आहे. सो, कोणती ठिकाणे एकदम मस्ट व्हिसिट अशी आहेत? शिवाय २-व्हीलर रेंट करून फिरता येत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
सिद्धार्थ ४ Fri, 02/09/2018 - 10:18 नवीन
Golconda Fort आणि Salarjung Museum
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 02/09/2018 - 11:35 नवीन
लुंबिनि पार्क, हुसेन सागर तलावाच्या उत्तरेस सिकंद्राबादकडे आहे. दक्षि्ण भागात अंज्जेया पार्क, आणखी एक पार्क आहे. सेक्रेटरिएटही जवळच आहे. आणि बुद्धाचा पुतळा तलावाच्या मध्यभागी आहे. संध्याकाळी एक क्रूज बोट फिरवतात, सर्वत्र लाइटिंग असते. फोटोमध्ये हे खुप छानछान वाटेल पण तलावात अतिशय दुर्गंधि आहे. आता डिसेंबरात गेलेलो. पाच वाजता पाहिला हा भाग. गटाराचे पाणी सोडून तलावाची वाट लावली आहे. बिरला मंदिर दक्षिण टोकालाच आहे. पण ही मंदिरे बय्ाच शहरांत आहेत. २) चार मिनार ,
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 02/09/2018 - 11:54 नवीन
) चार मिनार, चुडि बाजार, सालारजंग हे हुसेनसागरच्या दक्षिणेस आहेत. सालारजंग - दहाला उघडते, शुक्रवार बंद. २६ नंबर दालनात रत्नजडित वस्तू आहेत. खाली एक पुतळा आणि टोले देणारे घड्याळ बाराचे टोले पाहा. नंतर चार मिनारवरून चुडि बजारात खरेदी. ३) शहराच्या पश्चिमेस अकरा किमिवर गोलकोंडा फोर्ट आणि कुतुब टुम आहे. इकडे उन फार लागते. सकाळी लवकर जा. कमानीकमानी आणि भिंती. गेटपाशी टाळी वाजवून वर ऐकू येते म्हणतात ते आता गोंगाटात शक्य वाटत नाही. वरून हैदराबाद शहर दिसणार नाही खूप अंतर आहे.
  • Log in or register to post comments
प
परिंदा Fri, 02/09/2018 - 13:51 नवीन
बिर्ला मंदिरात जाताना मेन गेटच्या बाहेरच चपला, बुट काढायला लावतात. वर चढुन जायला संगमरवरी पायर्‍या आहेत, ज्या उन्हात बेक्कार तापतात आणि पायाला चटके बसतात. बिर्ला मंदिरात एक तर सकाळी उन्हे चढायच्या आधी नाहीतर संध्याकाळी उन्हे उतरल्यावर जा. संध्याकाळीच गेलेले चांगले कारण तिथून हुसेनसागर आणि दिवेलागणीच्या वेळेचा नेकलेस रोड छान दिसतो. अगदी मुंबईच्या राणीहारासारखा नाही, पण ठीक ठाक दिसतो. :) सालारजंग म्युझियममध्ये दुपारी बाराला टोले पाहायला गर्दी असते, तेव्हा जरा आधीच जा.
  • Log in or register to post comments
ह
हर्मायनी Wed, 02/14/2018 - 05:45 नवीन
आम्ही ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी शताब्दीने निघून हैद्राबादला दुपारी पोचलो. आमचं बुकिंग ताज बंजारा हिल्स ला होता. तिथे चेकइन केलं. दुचाकी कुठे मिळेल हे आधीच गुगलून ठेवलं होता. तिथे जाऊन दुचाकी घेतली आणि गोळकोंड्याला गेलो. (आपल्या पुस्तकांमध्ये गोवळकोंडा असे का लिहितात बरें ?) तिथे उन्हं उतरता उतरता गेलो आणि दिवस वातावरण ढगाळच होता. हा किल्ला फिरून मग कुतुब शाही कबरी लांबूनच बघून लुम्बिनी पार्कला गेलो. गटाराचे पाणी सोडल्यामुळे हुसेन सागर दुर्गंधित झालेला असून सुद्धा क्रूझ ने फेरी मारण्यात उत्सुक होती याचे आश्चर्य वाटले. तिथे थोडावेळ शांत बसून हॉटेलवर परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळी भरपेट नाश्ता करून बाहेर पडलो आणि गेलो ते थेट सालारजंग म्युझिअम ला.. तिथे सर्व दालने फिरून आणि ते १२ चे घड्याळाचे ठोके पाहून नेहरू झू ला गेलो. तिथे सायकल घेऊन झूल फेरफटका मारला. एव्हाना ४.३० वाजत आले. मग चारमिनार ला गेलो जात जाता chawmalha पॅलेस बंद झाल्याचे कळले. मग चारमिनार च्या इथे शॉपिंग करून सुलतानबझारला डोकावून हॉटेलवर गेलो. चारमिनार ला निमराह कॅफे मध्ये इराणी चाई घेतला. उत्तम चव! शिवाय कराची बिस्किटांची खरेदीही वाटेत झाली. तिसऱ्यादिवशीची सकाळ हॉटेल वर विश्रांती घेऊन घालवली आणि दुपारच्या शताब्दीने पुण्याला परत. अशा तऱ्हेने दोन दिवसाची हैद्रबाद ट्रिप सुफळ संपूर्ण(सम्प्रूण )! :D
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 02/14/2018 - 06:08 नवीन
सालारजंगची veiled रिबेका पाहिलीत का? प्रचंड सुंदर आणि अप्रतिम संगमरवरी मूर्ती. चटणीज ला साऊथ इंडियन थाळी आणि बावर्चि, पॅराडाइझ बिर्याणीचा आस्वाद घेतला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्मायनी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा