Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी हिंदू असूनही हिंदू धर्माची बाजू का घेतो... बरीच कारणे...

व
वटवट
Fri, 10/14/2016 - 08:06
🗣 101 प्रतिसाद
नमस्कार... कालच मी इथे " मी हिंदू असूनही हिंदू धर्माविरोधात का लिहितो? -- 4 कारणे" ह्या नावाचा लेख (?) वाचला... हिंदू धर्माचा, हिंदू इतिहासाचा, काडीचाही अभ्यास नसताना उगाच आपण कोणी खूप थोर विचारवंत वगैरे आहोत आणि माझ्या मताने हा देश बदलणार आहे असा सूर वाटला (अर्थात मी चुकीचा असेनही). त्या संदर्भात हे माझे चिंतन... "मला असं वाटतं कि धर्मनिरपेक्षता ही अत्यंत निरर्थक गोष्ट आहे जी कधीच वास्तवात उतरू शकत नाही... कधीच नाही" हे वाक्य मी खूप जबाबदारीने बोलत वा लिहीत आहे. मुळात पूर्ण जगात धर्मनिरपेक्ष व्यवस्था कोठे असेल का ही माझ्या मनात शंका आहे.. सर्व शक्तिमान राष्ट्रेसुद्धा स्वतःला ख्रिश्चनराष्ट्रे म्हणवतात. हिंसक राष्ट्रे आणि तेलकट राष्ट्रे स्वतःला इस्लामी राष्ट्रे म्हणवतात. उरलो नेपाळ आणि आपण. नेपाळ आपल्या महाराष्ट्रापेक्षाही छोटा.. बाकी ते बाली आणि मौरिशस आहेत पण ते लिंबूटिम्बु.... उरलो आपणच... आपल्यालाच का सेक्युलर व्हायची घाई? मुळात सेक्युलर हाही शब्द मूळ घटनेत नाही... नंतर टाकला गेला (४२ वी घटनादुरुस्ती). मुळात मलातरी सध्याच्या परिस्थितीत सेक्युलर हा शब्द हिंदूंविरोधीही असाच घेतला जातो असं वाटतं. म्हणून मी ह्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे (कोण्याही धर्माच्या नाही) तरी बरं धर्मनिरपेक्षता आणि विकास ह्याचा काडीचाही संबंध नाही... (असल्यास उदाहरणासहित दाखवावा) म्हणून मला हिंदू धर्माची बाजू घ्यावी वाटते... कारण नं १ १९४७ नंतर बाबासाहेबांना हिंदू कोड बिल आणायचं होतं, जे फक्त हिंदूंनाच लागू होणार होतं.. (म्हणजे हिंदू, जैन, बौद्ध, शीख वगैरे वगैरे). सर्वांनी विरोध केला... कारण फक्त हिंदूच का... सर्वांनाच लागू करा... पण बाबासाहेबांना फक्त हिंदू समाजाची काळजी होती, (मुस्लिमांची नव्हती बहुतेक). बाबासाहेब एव्हढे आग्रही होते ह्या बिलाबद्दल कि त्यांनी स्वतः ह्या बिलाबद्दल असं म्हटलं होतं कि, जर कोणी त्यांना विचारलं कि त्यांचं भारत देशाप्रती त्यांचं सगळ्यात स्पृहणीय कार्य कुठलं तर मी सांगेन कि हिंदू कोड बिल म्हणून... पण राजेंद्रप्रसादांनी विरोध केला, राजीनामा द्यायची धमकी दिली. नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं उगी राजकीय अस्थिरता नको म्हणून नेहरूंनी ते पुढे ढकललं... नंतरच्य निवडणुकीत पुन्हा अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच आलं. आणि नंतरच्या काळात हे हिंदू कोड बिल चार भागात विभागून लागू करण्यात आलं. १.हिंदू मॅरेज ऍक्ट २. हिंदू मायनॉरिटी अँड गार्डीयनशिप ऍक्ट ३. हिंदू एडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट आणि ४.हिंदू सकशेशन ऍक्ट असे ते चार ऍक्टस... हिंदू समाज खूप सुधारला. त्यातल्यात्यात हिंदू स्त्रियांच्या परिस्थितीत खूप चांगला आणि अमूलाग्र बदल घडवला ह्या बिलाने.... ह्यात कुठलाच वाद नाही... अगदी मान्य... पण फक्त हिंदू समाजच का? आणि इतर समाजासाठी तरतूद केल्यासारखी दाखवणे म्हणजे कलम ४४, भारतीय राज्यघटनेचे (वादग्रस्त युनिफॉर्म सिव्हिल कोड)... पुढच्या सरकारांवर ही जबाबदारी टाकली गेली... खरंतर आधीच ते शक्य होतं... कारण एकतर काँग्रेस ला पर्याय नव्हता... आणि बरेच कट्टर आणि धर्मान्ध मुस्लिम जिनांमागे पाकिस्तानात गेले होते... तेंव्हाच जर मुस्लिमांसाठी सुद्धा हे बिल लागू केलं असतं तर??? त्यांचं वाईट झालं असतं? ते तसं नं करण्यामुळे त्त्यांची लोकसंख्या भरमसाठ वाढली. आणि आज त्यांच्या खर्चाचा बोजा आपण टॅक्स भरून उचलत आहोत... तेंव्हा हे बिल सर्व धर्मांना नं लागू करून त्यावेळेसच्या सरकारनं ह्या देशाचं सर्वार्थानं आणि अपरिमित, कधीही भरून नं निघणारं नुकसान केलं आहे. दरवेळेस सुधारण्याचा आणि इतरांची घाण काढण्याचा मक्ता हिंदूंनीच का घ्या बुवा??? कारण नं २ मध्ये एका फेसबुकपोस्ट वर वाचलं होतं कि ह्या भारतात फक्त तिघांच्याच मरणाची दाखल घेतली जाते. एक तर दलित, मुस्लिम किंवा जनावरे... हिंदूंच्या मरण्याची दखल कोणीच घेत नाही. आणि तसेच आहे वास्तवात सुद्धा... इतरांच्या मरण्याची दखल घेणाऱ्यांना विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष म्हटलं जातं. आणि हिंदूला जर कोणी मारलं आणि जर कोणी त्याबद्दल आवाज उठवला तर त्याला हिंदुत्ववादी म्हणून हिणवलं जातं, हेतुपुरस्सर.... कारण नं ३ भारताच्या घटनेत कलम २९ आणि ३० मायनॉरिटीला काही विशेष अधिकार देतात त्यांची संस्कृती अबाधित आणि जपली जावी म्हणून. तोच न्याय जर जगाला लावला तर हिंदू हेही अल्पसंख्यांकच आहेत.. तर आम्ही जर आमची संस्कृती जपायला सुरु केलं तर इतरांच्या पोटात का दुखावं?? आणि सेक्युलरीझमच्या नावाखाली हिंदुधर्माचा (अर्थात कोणत्याही धर्माचा) बळी देणे चुकीचे आहे असं मला वाटतं. कारण ४ मी जर माझ्याच घरावर टीका करत असेन, सतत इतरांच्या घराकडे दुर्लक्ष करत आणि तीच जर कसोटी असेल माझ्या निरपेक्षतेची तर ह्या असल्या निरपेक्षतेला आपण मधलं बोट दाखवतो, आणि तेही शेणात बुडवून... हिंदूंच्या बाबतीत हे असंच होत आलेलं आहे. हिंदूंवर टीका करणारे इतर धर्माच्या बाबतीत सोयीस्कर मौन पाळतात.. (अर्थात जे मुळात चुकीचं आहे त्याचं कधीच समर्थन होत नाही, कितीही प्रयत्न केला तरीही) निरपेक्ष लोकांनी सर्व बाजू लक्षात घ्याव्यात.. तसं नं करता उठसुठ हिंदू धर्माचं पायपुसणं करण्याच्या आपण विरोधात आहे. कारण ५ दहशतवाद आणि इस्लाम ह्यात काहीच संबंध नाही. दहशतवादाला धर्म नसतो असे म्हणणाऱयांनीच "हिंदू दहशतवाद" किंवा "भगवा दहशतवाद" ही संज्ञा रूढ केली, कुठलाही पुरावा नसताना. आजही ते प्रकरण खितपत पडलंय.. आणि ना शेंडा ना बुडखा... काही कुत्र्यांच्या छत्र्या "भगव्या दहशतवादाच्या" नावानं बॉम्ब मारत आपल्या पोळ्या शेकून घेत असतात.. आणि त्यांचा टी आर पी वाढवून घेत असतात. कारण ६ माझ्या धर्माने कधीही धर्मप्रसारासाठी कोणावर आक्रमण वा अत्याचार केल्याचे ऐकिवात नाही. कोणी ह्याच्यामागची कितीही कारणे द्यावीत तरी होय माझा धर्म सर्वात सहिष्णू आहे. मग माझ्या ह्या धर्मावर कोणी कसलीही माहिती नसताना किंवा अगदीच जुजबी माहिती असताना टीका केल्यावर माझं रक्त पेटतं... कारण ७ माझ्या धर्मात काही अनिष्ट रूढी, प्रथा आहेत. त्यांचं समर्थन मी अजिब्बात करत नाही. त्या नक्कीच काढून टाकल्या पाहिजेत. पण त्या काढून टाकताना हिंदू समाज विचारात घेतला जावा. हिंदू धर्म नाही. कारण धर्म हा रूढी आणि परंपरा ह्यापासून बर्याचदा वेगळा असतो. त्या काढून टाकल्यामुळे हिंदू धर्माला काहीच अडचण नसते. कायदा हा लवचिकच असावा. त्याप्रमाणे धर्म पण लवचिकच असावा ह्या मताचा मी आहे. काळानुसार बदल व्हावेच. ज्याप्रमाणे आपल्या घटनेमध्ये आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त वेळा घटनादुरुस्ती झालीये. पण ती करताना कधीही घटनेवर टीका करत झालेली नाही. हिंदू धर्माच्या बाबतीत मात्र असे होताना दिसत नाही. काही अनिष्ट प्रथेमुळे पूर्ण हिंदू धर्माला जाणूनबुजून लांच्छन दिले जाते. ते पूर्णपणे चुकीचे आहे. कारण ८ सध्यातरी एव्हढीच कारणे... अजून सापडल्यास टाकेन अजून... बाकी तथाकथित पुरोगाम्यांचे स्वागत...

प्रतिक्रिया द्या
21402 वाचन

💬 प्रतिसाद (101)
प
प्रचेतस Sun, 10/16/2016 - 15:01 नवीन
सर्वच प्रतिसाद आवडले काका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
C
chitraa Sun, 10/16/2016 - 18:19 नवीन
व्यापार व राज्य बळकट होणे या हेतूने राजाने स्वतःच इस्लामचा स्वीकार केला, तर त्यात इस्लामचा काय दोष? आणि समजा, राजा बोललाच असता की मी हिंदूच राहीन , माझ्या मुस्लिम बायकोलाही हिंदूच करा, तर हिंदु धर्म तसे करु शकणार होता काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 10/16/2016 - 20:19 नवीन
व्यापार व राज्य बळकट होणे या हेतूने राजाने स्वतःच इस्लामचा स्वीकार केला, तर त्यात इस्लामचा काय दोष? असा दावा कोणीही केलेला नाही. प्रतिसादात एक साधे विधान (स्टेटमेंट) आहे आरोप (अ‍ॅलिगेशन) नाही, हे डोळे उघडून वाचल्यास कोणाही सर्वसामान्य बुद्धी असलेल्या माणसाला समजेल. इतर सर्वांना ते समजले आहे असेच दिसते. सगळीकडे केवळ कांगावा करायची सवय लागलेल्या कोणाच्या काकदृष्टीला काही इतर दिसले तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
C
chitraa Mon, 10/17/2016 - 00:37 नवीन
थोडक्यात, मुस्लिम हा त्या भागात सर्वात शेवटी पोहोचलेल्या धर्माने इतर धर्मांशी जुळवून न घेता, नेहमीप्रमाणेच त्याच्या ताब्यात असलेल्या भूभागातील बहुतेक सर्वांना आपला धर्म स्विकारणे भाग पाडले आहे तुमच्या आधीच्या एका प्रतिसादात हे तुम्हीच लिहिले आहे... त्या सम्राटाने स्वतःच इस्लाम धर्म स्वीकारला .. जर तो हिंदूच राहिला असता व त्याची इच्छा जरी असती तरी हिंदू धर्माने त्याच्या बायकोला हिंदू केले नसते , त्याची संततीदेखील हिंदू मानली नसती. त्यापेक्षा तोच मुसलमान झाला आणि हा तिढाच संपला. म्हणजे जुळवून कुणी घेतले नाही ? हिंदू धर्माने की इस्लामने ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 10/17/2016 - 22:08 नवीन
त्याला त्या व्यापार्‍याच्या मुलीने लग्नासाठी धर्मांतराची अट घातली होती, अशी कथा आहे. फक्त, मूळ मुद्दा भरकटू नये म्हणून व विस्तारभयास्तव हा आणि इतर तडक संबंध नसलेले बरेच तपशील टाळले आहेत. चर्चेतला मूळ मुद्दा कोणत्याही धर्मावरच्या टीकेवर नसून धर्मांतर कसे होत गेले त्या प्रक्रियेबद्दल होता हे तुमच्या ध्यानात आले नाही, असे समजणे तुमच्या बुद्धीचा अपमान करणारे व खरे नसलेले विधान होईल. त्यामुळे ते मी करणार नाही. पण तरीही, तुमचे नेहमीचे पूर्वग्रहदूषीत लेखन पाहता तुमचे आताही जे तिरकस लेखन चालले आहे (जे नेहमीच चाललेले असते) त्याबद्दल फारसे आश्चर्य वाटले नाही, हे पण सत्य आहे. तुमच्या लेखनातून तुमच्या बुद्धीचे नेहमीच दर्शन होते (ही प्रशंसा उर्फ काँप्लिमेंट आहे). कारण, हेअर स्प्लिटींग करून मुळात नसलेला संदर्भ निर्माण करायलासुद्धा बुद्धी लागते. मात्र, तुम्ही असलेल्या बुद्धीचा सतत नकारात्मक उपयोग करत असता, जे तुमच्यासाठीच फार दुर्दैवाचे आहे. एका बुद्धिवान मिपाकराच्या चुकीच्या वागणूकीमुळे त्याच्याबद्दल वाटणार्‍या खरोखरच्या काळजीमुळेच हे सांगत आहे. कारण, अश्या वागण्याचा परिणाम केवळ बुद्धी फुकट जाण्यात होत नाही. इतर लोक तुमच्या वैचारिक कोलांट्याउड्या वाचून करमणूक करून घेतील किंवा काहीजण रागावून प्रतिसाद देतील आणि कालांतराने सर्वजण "क्षक्षक्ष माणुस आहे" असे म्हणून सोडून देतील. मात्र, सतत नकारात्मक विचार करण्यार्‍या तुमच्या सारख्याचे मन सतत चिंतित, अस्वस्थ आणि नाराज राहते. याचा दूरगामी मानसिक व शारिरीक परिणाम काय होतो हे 'मी वैद्यकीय व्यवसायीक आहे' असे कबूल केलेल्या तुमच्यासारख्या व्यक्तीला मी सांगायला हवेच असे नाही. बाकी, भारतिय लोकशाहीत लोकांना अविचाराने आपले स्वतःचे आयुष्य द्वेशपूर्ण व दु:खी करण्याचे एका सीमेपर्यंत स्वातंत्र्य आहेच. आयुष्य तुमचे, निर्णय तुमचा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 10/17/2016 - 22:14 नवीन
आणि हो. आता तुम्ही विचारले आहे म्हणूनच... इस्लाम धर्म आक्रमक आहे व ताब्यात आलेल्या प्रदेशातील जनतेला साम-दाम-दंड-भेदाने मुस्लिम बनवावे ही त्याची धर्माज्ञा आहे, हे काही गुपीत नाही ! ही सर्वमान्य असलेली गोष्ट तुमच्यासारख्या त्या धर्माबद्दल खास ममत्व असलेल्याला सांगावे लागले तर मात्र तो तुमच्या बुद्धीचा अपमान होईल, त्यामुळे ते मी टाळत आहे. :) इस्लामचा इतिहास व आजच्या मध्यपूर्व व इतर ठिकाणच्या मुस्लिमबहुल देशांचा वरवर अभ्यास केला तरी हे सहज कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
C
chitraa Tue, 10/18/2016 - 04:35 नवीन
होय काय ? कृन्वन्तु विश्वमार्यम ! हे कुणाच्या पुस्तकात लिहिलय ? आता प्रत्यक्ष्यात कुणी तसं करत नाही , हा एक वेगळा मुद्दा झाला. जमीन गादी आपली रहावी , आपल्या जातीधर्माची रहावी असे तर प्रत्येकालाच वाटते. अगदी मराठे / शीख / राजपूत / आर्य / द्रविड कोणत्याही ठिकाणी हे दिसतेच... पेश्वाईत तर देशस्थ - कोकणस्थ असाही सुप्त संघर्ष होता म्हणे ! मूसलमानानी त्यांचे चित्र रंगवायला कॅन्व्हास मोठा वापरला म्हणुन त्यांची ही इच्छा इतिहासात ठळकपणे दिसते , इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 10/18/2016 - 18:30 नवीन
पालथ्या घड्यावर पाणी !!! =)) =)) =)) आयुष्य तुमचे, निर्णय तुमचा ! शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
व
वटवट Tue, 10/18/2016 - 07:05 नवीन
डॉक्टर... दगडावर डोके जेव्हढे आपटू आपलेच डोके फुटते.... दगड दगड आहे म्हणूया... तुम्ही कितीही म्हणालात कि कुराणमध्ये काफिरांना फक्त दोनच पर्याय आहे एक तर इस्लाम पत्करणे किंवा मृत्यू... हे मान्य करणार नाहीतच... त्याच्या दृष्टीने हिंदूंतच अडचण आहे... लेट देम डू जे काही करायचंय ते.... हैश्श्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
C
chitraa Tue, 10/18/2016 - 04:28 नवीन
व्यापार्‍याच्या मुलीने अट घातली , ती त्याने मान्य केली , पण समजा , तिने अट नसती घातली , तरी तिला व तिच्या संततीला हिंदू धर्माने स्वीकारले असते का , माझा हा प्रश्न तुम्ही ऑप्शनला सोडुन भलतेच काही लिहित बसलात ! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुखीमाणूस Tue, 10/18/2016 - 05:16 नवीन
आता घरवापसी केली तरी बोम्ब मारत आहेत. आणि हिन्दु धर्माने स्वीकारले असते की पतिचा धर्म आणि जात बायको मुलाना मिळाले असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 10/18/2016 - 18:31 नवीन
पालथ्या घड्यावर पाणी !!! =)) =)) =)) आयुष्य तुमचे, निर्णय तुमचा ! शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
स
सतिश गावडे Sat, 10/15/2016 - 18:17 नवीन
याबद्दल काही कल्पना नाही. ते खाते प्रचेतस सरांचे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
C
chitraa Sat, 10/15/2016 - 19:13 नवीन
ते टक्केवारी काढणे व ट्रोलिंग यांचे विरोधक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 10/15/2016 - 19:34 नवीन
अंगकोर साम्राज्य त्याच्या सुरुवातीची अनेक शतके (९वे ते १३वे शतक) हिंदू साम्राज्य होते. नंतर तेथे बौद्धधर्माचा प्रचार झाला. अधिक माहिती इथे मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
व
वटवट Sun, 10/16/2016 - 12:30 नवीन
साम्राज्यविस्तार आणि धर्मप्रसार ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.. बर्याचदा इतिहास हा आपल्याला हवा तसा नसतो, तेंव्हा इतिहास आपल्याला हवा तसा बदलायचा प्रयत्न हा पुढच्या पिढयांसाठी घटक असतो... साम्राज्यविस्तार हा धर्मप्रसाराशिवाय होऊ शकतो हे हिंदूंनीच सांगितलं... असो आपणास हे पटणारंच नाही... आणि कोणाला काही पटावं म्हणून मी हे लिहिलेलं नाही... असो... श्री राम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
C
chitraa Sat, 10/15/2016 - 08:04 नवीन
आपल्या धर्मातील राजांनी आपापसातच मारामार्‍या करण्यात स्वतःला व जनतेला गुंतव्यून ठेवले. दुसर्‍या राष्ट्रात जाउन दुसर्‍या राजांशी संघर्ष करायला वेळच मिळाला नआही. यात सहिष्णुतेचा प्रश्न आलाच कुठे ?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 10/15/2016 - 08:28 नवीन
काही तुरळक "रक्त पेटण्याची" भाषा करणारे सोडले तर हिंदू धर्म खरंच सहिष्णू आहे हे माझ्यासारखा "जन्महिंदू*" ही खात्रीने म्हणू शकतो. *परात्पर गुरुंनी माझ्यासारख्या लोकांसाठी काय शब्द शोधून काढला आहे राव. एकच नंबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
न
नाखु Sat, 10/15/2016 - 10:27 नवीन
परात्पर गुरुंना भेटू शकतो काय? किमान आपल्या शिफारसीने तरी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
संदीप डांगे Sat, 10/15/2016 - 08:13 नवीन
मै कूच बोलू क्या? ;) हिंदू धर्माची बाजू वगैरे हा जो लेख लिहिलाय त्यामागची तळमळ समजू शकतो, पण हिंदू धर्मात टीकेचं स्वागत आहे त्यामुळे टीकाकारांना बोल लावणारे नेमक्या कोणत्या धर्माची बाजू घेऊन भांडतात हे कळत नाही. कि आपल्यावर टीका झाली की दुसरीकडे बोट दाखवायची गरज का उपटते तेही कळत नाही. हे म्हणजे अमेरिका भारतापेक्षा कैक पटीने सुधारलेली आहे म्हणून अमेरिकेवर कोणत्याही अमेरिकन नागरिकाने कसलीच टीका करू नये असे म्हणण्यासारखे आहे. असो, हेही नेहमीचेच झाले आहे म्हणा. हिंदू बद्दल कोणी काही बोलले कि त्यांना मस्तपैकी फैलावर घेणारे, 'मुस्लिमांना आधी सांगा' असा टाहो फोडणारे हिंदूंच्या नावावर मस्तवालपणा कारणाऱ्यांबद्दल मात्र गपचिप मूग कोंबून बसतात. विश्वहिंदुपरिषद, बजरंग दल, गौरक्षक आणि तत्सम संघटनांच्या कारवाया यांच्याबद्दल अगदी तस्सेच गप बसतात जसे सुडोसेकुलर विचारजंत मुस्लिम दहशतवाद व तत्सम गोष्टीवर गप बसतात. मस्तवाल हिंदू संघटनांबद्दल, आता विचारले पाहिजेत तेच प्रश्न जे अर्थहीन यांच्या धाग्यावर "मुस्लिम धर्मावर टीका न करणारांना" अनेकांनी, काहींनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन, विचारले आहेत, अपने गिरेबान में झान्क कर देखो, नुसते मुळमुळीत निषेध आणि नपुंसक विरोध करणे सोपेच असते, नैका? आता माझा एक प्रश्न, मथुरेत नास्तीक मेळाव्यावर हिंदू मस्तवालानी आक्रमण करून तोडफोड केली, गौरक्षकांनी उच्छाद मांडलाय, हिंदू समाजाचे अनावश्यक ध्रुवीकरणाचे प्रयत्न त्याबद्दल मी एक हिंदू म्हणून बोलावे कि नको?
  • Log in or register to post comments
अ
अर्थहीन Sat, 10/15/2016 - 08:35 नवीन
संदीप डांगे जी तुमचं स्वागत आहे देशद्रोह्यांच्या आणि धर्मद्रोह्यांच्या यादीमध्ये... लवकरच तुम्हाला सर्टिफिकेट मिळण्याची शक्यता आहे... यांच्या विरुद्ध बोललं कि हे लिहितात तुमचा काडीचाही अभ्यास नाही... काय मजा आहे साली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 10/15/2016 - 08:42 नवीन
अर्थहीनभाऊ, आमी पैलेच बदनाम हाओ, चिंता नसावी! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्थहीन
स
सतिश गावडे Sat, 10/15/2016 - 08:46 नवीन
तुम्हा पुरोगाम्यांना हेच हवं असतं. येनकेन प्रकारेण पुरुषो प्रसिद्धी भवेत. "सकाळचा खरारा" ब्लॉगवर तुम्हाला जे झोडपले जाते ते योग्यच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 10/15/2016 - 08:51 नवीन
प्रसिद्धी ची भूक हो फक्त! बाकी सगळ्या चिंता स्वाहा होतात प्रसिद्धी मिळाली की, धर्माच्या मागे लागून का कोणी प्रसिद्ध झालंय कधी? मिळाला का कोणाला मान सन्मान पैसे, अधिकार, लोक संग्रह, गाड्या घोड्या, महाल, आरत्या ओवळणारे भक्त? ते फकस्त पुरोगाम्यांच्या प्रारब्धात, धर्माभिमान्यांना काय कळते आणि मिळते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
त
तिमा Sat, 10/15/2016 - 08:49 नवीन
माझी जात माणूस आणि धर्म माणुसकी, असं प्रत्येकाला वाटेल तो सुदिन !
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 10/15/2016 - 08:55 नवीन
जात आणि धर्म हवेतच कशाला. आपलं माणूस "असणं" पुरेसं आहे. जात आणि धर्म याचा जे स्वतःच्या "आयडेंटिटी" साठी आधार घेतात त्यांच्या टिकेने भावना दुखावल्या जातात. मग वाक्याच्या पूर्वार्धात हिंदू धर्म सहिष्णू आहे असे म्हटले जाते आणि उत्तरार्धात रक्त पेटते असे सांगितले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
स
संदीप डांगे Sat, 10/15/2016 - 09:00 नवीन
हम सब केवल अहंकार के भभकते पुतले है, अपनी अपनी आग को अलग अलग नाम देते है।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
व
वटवट Sat, 10/15/2016 - 10:56 नवीन
बाSSSSSबो.... एक लाख रुपयांचा डायलॉग मारलाय ब्वॉ.... हा हा हा हा... आदर्शवादी चालू राहू द्या....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 10/15/2016 - 12:25 नवीन
जगातील सर्व मानव समूहाचा विचार करता हा आदर्शवादच आहे. मात्र व्यक्ती या पद्धतीने जगू शकते. तेव्हा त्या व्यक्तीपुरता हा विचार आदर्शवाद न राहता वास्तव होते. तुम्हाला हे विचार विनोदी वाटले त्याचे आश्चर्य वाटले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
ग
गामा पैलवान Sat, 10/15/2016 - 09:52 नवीन
संदीप डांगे,
विश्वहिंदुपरिषद, बजरंग दल, गौरक्षक आणि तत्सम संघटनांच्या कारवाया यांच्याबद्दल अगदी तस्सेच गप बसतात जसे सुडोसेकुलर विचारजंत मुस्लिम दहशतवाद व तत्सम गोष्टीवर गप बसतात.
अय्या हो ! काय गं बाई दिवस तरी आलेत !! कुठे गेला तो भगवा दहशतवाद !!! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 10/15/2016 - 12:02 नवीन
या विषयावरील दोन धागे बघून सुरसुरी आली आहे. लवकरच आता या मालिकेतील तिसरा धागा टाकण्याचा विचार आहे.
  • Log in or register to post comments
C
chitraa Sat, 10/15/2016 - 19:16 नवीन
मोदी सरकारची तीन वर्षे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Sat, 10/15/2016 - 20:10 नवीन
हॅट लेको, मांझ्या प्रतिसादाला कोनपन प्रतिवाद नै करत है.. :( आमी नै ज्जा...
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 10/16/2016 - 09:09 नवीन
घेऊन टाका एक ड्युआयडी आणि करून टाका प्रतिवाद. हाकानाका :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ग
गामा पैलवान Sun, 10/16/2016 - 10:46 नवीन
शाम भागवत, डांगेबुवांच्या इथल्या प्रतिसादातली एक गोष्ट लक्षात आली का? त्यात रा.स्व.संघाचं नाव नाहीये. ही प्रगती म्हणावी की अधोगती! ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
C
chitraa Sun, 10/16/2016 - 11:03 नवीन
तत्सम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
द
दिगोचि Sun, 10/16/2016 - 11:51 नवीन
तुम्ही हिंदू धर्म नाही हे वाक्य लिहिले आहे ते का?
  • Log in or register to post comments
प
प्रतापराव Sun, 10/16/2016 - 13:34 नवीन
मि हिंदु आहे आणी त्यातील दलित समजल्या जाणार्या जातीत मोडतो. वरती लेखकाने एक फेसबुकवरच्या पोस्टचा उल्लेख केलाय. म्हणजे आम्ही हिंदु नाही. मग उच्चवर्णियच हिंदु समजायचे का?आमचा उपयोग काय हिंदुंची संख्या इतकी भलीमोठी आहे ह्याच्या फुशारक्या मारण्यासाठी..लेखकाचा निषेध.
  • Log in or register to post comments
व
वटवट Sun, 10/16/2016 - 14:26 नवीन
आता मी जर ह्यावर स्पष्टीकरण देऊ लागलो तर विषय भरकटेल म्हणून फारसं ताणंत नाही... फक्त एव्हढंच स्पष्ट करतो कि वरच्या लेखात उल्लेख केलेले दलित हे हिंदू-दलितच आहेत ज्यांची दखल घेतली जाते... दलितेतर हिंदूंची घेतली जात नाही... कृपया त्याचा असाच अर्थ काढावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
C
chitraa Sun, 10/16/2016 - 16:22 नवीन
ते वाक्य असे आहे. फक्त तीघांच्या मरण्याची दखल घेतली जाते ... दलित , मुस्लिम आणि प्राणी ... हिंदुंच्या मरण्याची कुणी दखल घेत नाही. .... त्या वाक्याला पहिलं ऑब्जेक्शन मीच घेतल होतं ... जास्ती नाही लिहिलं कारण आमचा आयडी लगेच बदनाम होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
प
प्रतापराव Sun, 10/16/2016 - 16:36 नवीन
जाउ द्या हो chitraa.आम्हाला सवय झालीय याची. पार पाकिस्तान, बलुचीस्तान मधली दुःख येथे मांडली जातात. पण आपल्या खाली अंधार तसाच रहातो. धर्मनिरपेक्षता दुरची बात इथे तर कुणी जातनिरपेक्षही होउ शकत नाही. पण जे अनुभव घेतले त्यावरुन पुरोगामी परवडले जरी ढोंगी असले तरी.वरवर का होईना चांगले वागतील पण प्रतिगामी ठासुन वागतात वर हीच परंपरा आहे हे करावेच लागेल असे सांगतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa
प
प्रतापराव Sun, 10/16/2016 - 14:46 नवीन
दलितेतर हिंदु म्हणजे उच्चवर्णिय. सारी संसाधने, मिडिया, प्रशासन ह्यात मोठा टक्का असुनही तुमची दखल घेतली जात नाही ह्याला दलित तर जबाबदार नाहित ना.
  • Log in or register to post comments
प
प्रतापराव Sun, 10/16/2016 - 14:55 नवीन
आम्हिही हिंदु आहोत जरी जातीव्यवस्थेने आमच्यावर अन्याय केला.काय तर म्हणे धर्मप्रसार केला नाही. इतर धर्मातले इथे आले असते तरी कुठल्या जातीत घ्यायचे. त्यांनाही धर्मांतरीत म्हणुन मागासच ठरवले असते आणी मागासवर्गीयांत एका अजुन जातीची भर पडली असती.आमच्या सगळ्या पिढ्या साफसफाई करण्याच्या कामातच मेल्या. मी घरातला पहिला पदविधर त्या आंबेडकर साहेबांची मेहेरबानी नाही तर त्या खातेर्यातच बर्बाद झालो असतो.आंबेडकर बौध्द झाले आम्ही पुर्वजांचा धर्म म्हणुन इथेच राहिलो. आता बर आयुष्य जगतोय पण दलित म्हणुनच.
  • Log in or register to post comments
व
वटवट Sun, 10/16/2016 - 15:01 नवीन
मला विषय भरकटवायचा नाही ... वेगळा धागा काढा त्यावर हा विषयावर वाद घालू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
ग
गामा पैलवान Sun, 10/16/2016 - 19:11 नवीन
मी हिंदू असूनही हिंदू धर्माची बाजू घेण्याचं आजून एक कारण आहे. शांतीप्रिय धर्म कायदा आणि सुव्यवस्थेच्या विरोधात आहे. कालंच भिवंडीत दोन पोलिसांना पेट्रोलबॉम्ब टाकून ठार मारायचा प्रयत्न झाला. ७ पोलीस होरपळले आणि त्यांतल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अधिक माहिती : http://dainiksanatanprabhat.blogspot.co.uk/2016/10/blog-post_8532.html सर्वधर्मसमभावाची किती सुंदर घटना नाही का ही! आणि डांगेबुवा विहिंप, बजरंग दल, गोरक्षक वगैरेंना दोष देण्यात मग्न आहेत. -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 10/16/2016 - 19:20 नवीन
लेखक महोदयांनी विषय भरकटवू नका असे निवेदन केले आहे, पण आपल्याला विषयांतर करण्यातच जास्त रस असावा, ;) लगे रहो, मी मात्र माझ्या प्रतीसादाचे मुद्देसूद खंडन व्हायची वाट बघत आहे, anybuddy interested?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 10/16/2016 - 20:23 नवीन
संदीप डांगे, तुमच्या प्रतिसादाचे मुद्देसूद खंडन करण्यात मला तरी रस नाही. एकीकडे मुस्लिम खुलेआम पोलिसांना जाळत असतांना मला विहिंप, बजरंग दल आणि तत्सम संघटनांवर दोषारोप करण्याची आवश्यकता भासंत नाही. तुमच्या गरजा कदाचित वेगळ्या असू शकतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 10/16/2016 - 20:54 नवीन
गरजा? सध्या फक्त लेखविषयाशी संबंधित राहण्याची गरज आहे जे तुम्हाला अडचणीचे जात असावे, इतरधर्मीयांबद्दल धुणी धुवायला स्वतंत्र घाट बांधणे उत्तम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 10/16/2016 - 22:54 नवीन
संदीप डांगे, तुम्ही नाही का विहिंप, बजरंग दल वगैरे धुणी धुवायला काढलीत याच घाटावर ! संबंध काय यांचा लेखाच्या विषयाशी? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 10/17/2016 - 04:20 नवीन
असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा