Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सोपं नसतं मायबाप होणं.........!!!!

फ — फिझा, Fri, 10/14/2016 - 10:38
सोपं नसतं मायबाप होणं .......!!!!! इवल्याशा जीवाला घास भरवताना  अडखळणाऱ्या पायांना आधार देताना  बोबड्या बोलांमध्ये स्वतःला शोधणं,  सोपं नसतं, हातांच्या कुशीत लेकरांना सांभाळत  रात्र रात्र जागणं , सोपं नसतं मायबाप होणं !! काडी काडी वेचून आपलं घरटं बांधणं,   उन्हं अंगावर झेलून लेकरांना सावली देणं,  कधी जमीन बनून तर कधी आभाळ बनून  घरट्यातला प्रेमाचा ओलावा कायम ठेवणं  सोपं नसतं, भिजत असताना लेकरांचे 'इंद्रधनू' पाहणं,  सोपं नसतं मायबाप होणं !!!!! पंख फुटलेले पिल्लू उडू लागते,  घरटे सोडून दूर जाऊ लागते, सोसाट्याचा वारा असो कि उधाणलेला समुद्र  पिलांचा दीपस्तंभ बनून त्यांना दिशा दाखवत राहणं  दूर जाणाऱ्या पिलांना पाहत, 'स्वतःचा' आधार होणं  सोपं नसतं,मागेल त्याला मागेल ते देत जाणं,  सोपं नसतं मायबाप होणं ! सोपं नसतं मायबाप होणं !!! --------फिझा

प्रतिक्रिया द्या
2093 वाचन

💬 प्रतिसाद (9)
प
पद्मावति Fri, 10/14/2016 - 11:04 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
क
कवि मानव Fri, 10/14/2016 - 11:27 नवीन
मस्त !! चार ओळी सुचल्या, पुंडलिका कधी न गेला पंढरी, स्वयें अवतरला पांडुरंग तयाच्या घरी, तयासी आवडे मात-पित्याची सेवा दर्शनी परी, कारणे उभा विठ्ठल उगे अठ्ठावीस विठेवरी !!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 10/14/2016 - 11:31 नवीन
संदर्भ लागेना! :/ सोपं नसत मूल (इथे पुंडलिक) असं म्हणायच का तुम्हाला कमा??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवि मानव
क
कवि मानव Fri, 10/14/2016 - 11:42 नवीन
नाही खरं तर...आई वडिलांचे कष्ट जाणून त्यांना दिलेली हि छोटीशी भेट आहे पुंडलिकाच्या आधार घेऊन हे सांगण्याचा प्रयत्न... "मात-पित्याची सेवा दर्शनी परी"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
च
चांदणे संदीप Fri, 10/14/2016 - 11:29 नवीन
आवडलीच! Sandy
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 10/14/2016 - 11:56 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 10/14/2016 - 11:59 नवीन
बालक-पालक नाखु
  • Log in or register to post comments
स
सतोश ताइतवाले Mon, 10/17/2016 - 06:24 नवीन
आई वडील शिवाय दुसरे कोणतेच दैवत नाही वाचून आनंद जल खूप छान कविता
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Mon, 10/17/2016 - 16:07 नवीन
सुंदर कविता...!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा